Sunday, December 23, 2012

रेहमान साहेब, पाकमधील चित्राल मशीद कुणी पाडली?


$img_titleमुझफ्फर हुसेन
बाबरी ढाचा पाडण्याला आता २० वर्षे लोटली असली, तरी पाकिस्तान त्या घटनेवर आजही अश्रू ढाळत आहे. भारतातील बहुसंख्य लोकांना ब्लॅकमेल करण्यासाठी मुस्लिमविश्‍वाने हा अफलातून उपाय शोधून काढला आहे. जगात शेकडो मशिदी काळानुरूप निर्माण होतात आणि काळाच्या ओघात पाडल्याही जातात. भूतकाळ जर बघितला तर अशी असंख्य उदाहरणे सापडतील आणि भविष्यातही हे असेच चालू राहणार. परंतु, बाबरीचा विषय धार्मिक कमी, पण हिंदूविरोधी अधिक असल्यामुळे तो वेळोवेळी उपस्थित केला जात आहे.
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानाचे गृहमंत्री रेहमान मलिक हे भारत दौर्‍यावर आले. सरकारी दौर्‍यावर येणारी कोणतीही व्यक्ती संयमाने आणि विचारपूर्वक बोलत असते. कारण, ती जी काही वक्तव्ये करते, त्यांना तेथील सरकारची संमती असल्याचे निहित असते. त्यामुळेच बहुतांश बाबी या अतिशय संतुलित, संयमित आणि भाषा गरिमापूर्ण असते. कारण, उभयपक्षी जी काही चर्चा वा निर्णय होतात, त्या दस्तावेजावर दोन्ही देशांची स्वाक्षरी असते. तो मग सरकारी दस्तावेज समजला जातो आणि दोन्ही पक्षांना तो बंधनकारक असतो. परंतु, रेहमान मलिक, स्वत: आपल्या देशात जे अनेक बाबींमुळे वादग्रस्त आहेत, भारतात आल्यावरही त्यांनी वायफळ बडबड केलीच. असे वाटते, त्यांना अशा गोष्टी करण्याची जणू हगवण लागली की काय? आपल्या अगदी निम्नस्तराच्या आणि मर्यादा सोडून केलेल्या वक्तव्यामुळे क्षणभर असे वाटले की, हा माणूस पाकिस्तानचा गृहमंत्री आहे, की अतिरेक्यांचा प्रवक्ता बनून येथे आला आहे? रेहमान मलिक हे स्वत: वादग्रस्त आहेत. ते पाकिस्तानसोबतच ब्रिटनचेही नागरिक आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान राजा परवेज यांनी या दुहेरी सदस्यत्वाबाबत संसदेत रेहमान मलिक यांना चांगलेच लाथाडले होते. एवढेच नव्हे, तर आता पाकिस्तानी संसद याबाबत एक कायदाही तयार करणार आहे. कारण, याचा लाभ बहुतांश गुन्हेगार आणि व्यापारी लोक उपटतात. पाकिस्तानात यामुळे वादळी वातावरण आहे. परंतु, ज्या देशाचा गृहमंत्रीच दुहेरी नागरिकत्व घेऊन पाकिस्तानात राहत असेल, तर त्याच्या मुसक्या कोण बांधू शकतो?
रेहमान मलिक हे आले होते सरकारी कामाने, पण त्यांचा खरा उद्देश होता पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयला खुश करणे. त्यासाठी ते आले आणि ज्यामुळे ते खुश होतील, तशी विधाने करण्याचा प्रयत्न करून ते पाकिस्तानला रवानाही झाले. त्यांनी आपल्या वक्तव्यात असेही ठोकून दिले की, २६/११ चा मुंबईवरील हल्ला आणि बाबरी ढाचा पाडण्याची घटना एकसारखीच आहे. त्यांच्या शब्दांत सांगायचे झाले, तर जसे कसाब आणि त्याच्या साथीदार अतिरेक्यांनी मुंबईवर हल्ला केला तसेच बाबरी ढाचा पाडणारेही अतिरेकी होते! बाबरी घटनेवर काही दिवसांपूर्वी मुस्लिम विचारवंत मौलाना वहिदुद्दीन यांनी आपले मत व्यक्त करताना, एका जबाबदार नागरिकाच्या नात्याने मी हे सांगू इच्छितो की, रामजन्मभूमीवर कब्जा करणारे कधीही खरे आणि चांगले मुसलमान असूच शकत नाहीत, कारण इस्लाम तसे करण्याची परवानगी देत नाही.’ त्यांनी आपले स्पष्ट मत व्यक्त केल्यानंतर, या विषयावर आता इस्लामी दृष्टिकोन आणि आपली पाकिस्तानी दादागिरी दाखविण्याला आता काहीही अर्थ उरत नाही.
लक्षणीय बाब अशी की, रेहमान मलिक हे भारतात येऊन बाबरीचा जप करीत आहेत. पण, पाकिस्तानातच काही दिवसांपूर्वी एका प्राचीन मशिदीला पाडून टाकण्याची घटना घडली आहे. त्यापासून रेहमान मलिक आपला बचाव कसा काय करू शकतात? मलिक हे पाकिस्तानचे गृहमंत्री असल्यामुळे त्यांना एवढ्या मोठ्या निर्णयाची माहिती असणारच आणि त्यांचा सहभागही असणार. स्वत:च्या कपड्यांवर जे काळे डाग लागले आहेत, त्यावर जर त्यांनी विचार केला असता, तर असे बेशरमपणाचे विधान त्यांनी भारतात येऊन कधीच केले नसते. बाबरी ढाचा पाडणारे हिंदू होते. कारण, हजारो वर्षांपासून तेथे राममंदिर होते. भगवान रामांचा जन्म येथे झाला म्हणून ती रामजन्मभूमी आहे. जी फक्त एकाच स्थानी असू शकते. अन्यत्र कुठेही नाही. परंतु, पाकिस्तानानील चित्राल नगरातील शाही मशीद तर तिथल्या सरकारच्या आदेशाने पाडण्यात आली. चित्रालच्या या प्रसिद्ध शाही मशिदीचे निर्माण १९१० साली प्रारंभ झाले होते. १९२२ साली ती बांधून पूर्ण झाली. या मशिदीला पाकिस्तानच्या पुरातत्त्व विभागाने सुरक्षित मशीद म्हणून स्थान दिले आहे. काही दिवसांपूर्वीच खैबर पख्तूनवा सरकारने या मशिदीच्या दुरुस्तीसाठी चार कोटी रुपये मंजूर केले होते. ज्या ठेकेदाराला या मशिदीच्या दुरुस्तीचे काम सोपविण्यात आले होते, त्याने एका रात्री डायनामाईट लावून ती उडवून दिली. मशीद पडताच लोक आपापल्या घरातून बाहेर आले. बिल्डरला पकडले आणि त्याला बदडून काढले. पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत नगरात हिंसाचार सुरू झाला होता. लोकांनी सांगितले की, यासाठी ठेकेदार जबाबदार आहे. पण, बिल्डरच्या निकटवर्तीयांनी सांगितले की, बिल्डर एवढी हिंमत तरी करू शकेल का? त्याने तेच केले जे निर्देश त्याला वरून देण्यात आले होते. संपूर्ण चित्राल शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लोक विचारीत आहेत की, मशीद उद्ध्वस्त करण्यामागे नेमके कोण आहे? ही घटना घडताच रेहमान मलिक हे देश सोडून बाहेर चालले गेले. याला योगायोग म्हणावा की पूर्वनियोजित कट? या घटनेच्या अवघ्या काही दिवसांनंतर रेहमान मलिक हे भारताच्या दौर्‍यावर आले होते. चित्रालमध्ये लोक अजूनही विचारीत आहेत की, मशीद कुणाच्या आदेशावरून पाडण्यात आली? इस्लामाबादचे सरकार असे म्हणते की, हा तर राज्य शासनाच्या अखत्यारितला विषय आहे, त्याच्याशी केंद्राचे काहीही देणेघेणे नाही. पण, वस्तुस्थिती अशी आहे की, चित्राल हे बरीच वर्षे केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली होते.
हा एक योगायोग आहे की, आणखी काही? कारण, चित्राल मशील उद्ध्वस्त करण्यासोबतच कराचीतील राम पीर मंदिरही पाडण्यात आले. येथेही एका बिल्डरनेच या प्राचीन मंदिराला पाडून टाकले. एवढेच नव्हे, तर मंदिराच्या आजूबाजूला राहणार्‍या हिंदू बांधवांची घरेही त्याने बळजबरीने तोडून टाकली. पाकिस्तानात भूमाफिया अलीकडे फोफावत चालले असून, प्रशासनात त्यांनी दबदबा निर्माण केला आहे. रेहमान मलिकसारखे नेते त्यांचे आश्रयदाते आहेत. भारतात मुद्दा मंदिर आणि मशीदीचा नाही, राममंदिराचा आहे. म्हणूनच तेथून राममंदिर हटविले जाऊ शकत नाही आणि ते दुसरीकडे स्थानांतरितही केले जाऊ शकत नाही. यासाठीच रेहमान मलिक बाबरी ढाचासाठी जे अश्रू ढाळत आहेत, त्यांनी आधी आपल्या काळ्या कृत्यांकडे पाहावे. चित्राल मशीद पाडण्यात रेहमान मलिक हेच सर्वांत आघाडीवर आहेत. त्यांचा उद्देश कोणतेही धार्मिक स्थळ बनवून ते त्यांच्या अनुयायांच्या स्वाधीन करणे हा नाही, तर त्या जमिनीचा सौदा करून येणारा पैसा त्यांना इंग्लंडच्या बँकांमध्ये जमा करायचा आहे. हा लेख लिहिस्तोवर अजूनही तेथील मुख्य सचिवाने चित्राल मशीद पाडणार्‍या बिल्डरविरुद्ध कोणतीही कारवाई केलेली नाही.
चित्राल मशीद पाडण्याच्या विषयावर पाकिस्तानातील एक दैनिक ‘जसारत’ने संपादकीय लिहिले आहे. त्यात म्हटले आहे की, अन्य देशांना (भारताला) मशिदीच्या संदर्भात मोफत सल्ला देणार्‍यांनी आधी हे सांगायला हवे की, पाकिस्तानात किती मशिदी सुरक्षित आहेत? पाकिस्तानात जेव्हा परवेझ मुशर्रफ यांची सत्ता होती, तेव्हा इस्लामाबादपासून जवळच असलेल्या लाल मशिदीत अतिरेकी घुसले होते. त्या वेळी मुशर्रफ यांनी कोणती भूमिका घेतली होती, हे पाकिस्तानची जनता विसरली? मशिदीत आधी मुशर्रफ यांनी लष्कर पाठविले आणि तेथे युद्धसदृश माहौल तयार केला. दोन्ही बाजूंनी प्रचंड गोळीबार करण्यात आला. लष्कराने मशिदीचा काही भाग पाडून आत प्रवेश केला आणि अतिरेक्यांना तेथून बाहेर काढले. ही कारवाई सहा तासांपर्यंत चालली. त्यानंतर लाल मशीद कित्येक महिने बंदच ठेवली गेली. या मशिदीत पुन्हा अतिरेकी शिरू नयेत म्हणून आता सरकार ही मशीदच तेथून हटविण्याचा विचार करीत आहे.
पाकिस्तानात मशिदीत गोळीबार होणे ही आता सामान्य बाब झाली आहे. कुठे वहाबी आणि बरेलवी, तर कुठे शिया आणि सुन्नी लोकांत हा संघर्ष सुरूच आहे. अहमदिया यांच्या प्रार्थनास्थळाला पाकिस्तानात मशीद म्हणणे हा गुन्हा आहे. जेथे अहमदियांची लोकसंख्या कमी आहे, तेथील मशिदी पाकिस्तानी सरकारने पाडून टाकल्या. आता अहमदिया यांना तंबी देण्यात आली आहे की, त्यांनी आपल्या प्रार्थना स्थळांना मशीद संबोधू नये. अहमदियांच्या मशिदींमध्ये जेव्हा नमाज अदा केली जात असते तेव्हा विरोधी गट तेथे येतात आणि अंधाधुंद गोळीबार करतात. कित्येक मशिदींमध्ये तर सरकारने लष्कर आणि काही ठिकाणी पोलिस तैनात करून ठेवले आहेत. पवित्र नमाज अदा करताना अशा प्रकारे तेथे हिंसा होत असेल, तर याला काय म्हणावे? रेहमान खान यांनी आधी एखाद्या मौलानाकडून हे शिकून घ्यावयास हवे होते की, मशीद कशाला म्हणतात. त्याची व्याख्या काय आहे? शरीयत या संदर्भात काय आदेश देते? यानंतर जर रेहमान मलिक यांनी आपले तोंड उघडले असते, तर त्याला काही अर्थ असता.
साभार - तरुणभारत

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी