पोटनिडणुकांचा निकाल - बीबीसीचे विश्लेषण
सप्टेंबर २०१४ मध्ये देशातील काही राज्यांमध्ये ३३ विधानसभेच्या जागांसाठी निवडणूक झाली. भारतीय जनता पक्षाने अन्य पक्षांहून अधिक जागा जिंकल्या. पण सर्वत्र बातम्या प्रसिद्ध झाल्या की भाजपाचा दारुण पराभव, मोदी लाट झाली सपाट इत्यादि. परंतु, या निकालाचे वेगळ्या पद्धतीने केलेले विश्लेषण बीबीसी हिंदीच्या संकेतस्थळावर वाचायला मिळाले, जे अधिक तर्कसंगत वाटले.
त्यातील काही प्रमुख मुद्दे पुढील प्रमाणे...
१.
भाजपने उत्तरप्रदेशात ११ पैकी ३, गुजरातेत ९ पैकी ६, राजस्थानात ४ पैकी १
आणि पश्चिम बंगाल व आसाम एक - एक जागेवर विजय मिळवले आहे.सप्टेंबर २०१४ मध्ये देशातील काही राज्यांमध्ये ३३ विधानसभेच्या जागांसाठी निवडणूक झाली. भारतीय जनता पक्षाने अन्य पक्षांहून अधिक जागा जिंकल्या. पण सर्वत्र बातम्या प्रसिद्ध झाल्या की भाजपाचा दारुण पराभव, मोदी लाट झाली सपाट इत्यादि. परंतु, या निकालाचे वेगळ्या पद्धतीने केलेले विश्लेषण बीबीसी हिंदीच्या संकेतस्थळावर वाचायला मिळाले, जे अधिक तर्कसंगत वाटले.
त्यातील काही प्रमुख मुद्दे पुढील प्रमाणे...
२.
या निकालामुळे भाजप भयग्रस्त दिसला नाही. लव्ह जिहादच्या राजकारणामुळे
भाजपला अपयश मिळाल्याचे सांगितले जाते त्यात काही अर्थ नाही. लव्ह जिहाद
म्हणजे धर्मांतराच्या उद्देशाने मुसलमान तरुणांनी हिंदू मुलींशी फसवून लग्न
करणे. भाजपने हा मुद्दा उचलल्याने लोकांनी त्यांना नाकारले असे म्हटले
जाते ते खरे नाही. कारण लव्ह जिहादचा मुद्दा म्हणजे नकारात्म राजकारण असे
लोकांना वाटले असे असे वाटत नाही.
३. मायावती या निवडणुकीत रिंगणात उतरल्या नव्हत्या, हे येथे महत्त्वाचे आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उत्तर प्रदेशात भाजपला झालेल्या मतदानात तब्बल ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचाच अर्थ असा की लव्ह जिहादमुद्द्यामुळे उत्तर प्रदेशात भाजपला नाकारले गेले नाही. कमी जागा आल्या पण मते जास्त मिळाली.४. राजस्थानात भाजपचा मोठा पराभव झाला. लोकसभेच्या वेळी सर्व जागा भाजपला मिळाल्या होत्या. विधानसभेला ४ पैकी ३ वर अपयश हे मोठे अपयश आहे खरे. परंतु राजस्थानात भाजप आणि काॅंग्रेसमध्ये सदैव काट्याची टक्कर असते. त्यामुळे या पोटनिवडणुकीच्या निकालावरून लगेच भविष्य वर्तवणे अपरिपक्वपणाचे होईल.
५. पश्चिम बंगालमध्ये भाजपला काॅग्रेस आणि डाव्या पक्षापेक्षा अधिक मते मिळाली.गुजरातमध्ये भाजपविरोधी वातावरण दिसले नाही. तेथे ९ पैकी ६ जागांवर भाजप विजयी झाला. काॅग्रेस आजही तेथे बाहेरच आहे, हे यातून दिसते.

६.पश्चिम
बंगालमध्ये भाजपने कोणत्याही पक्षाशी आघाडी न करता एका जागेवर ऐतिहासिक
विजय मिळवला आणि दुसऱ्या जागी भाजप दुसऱ्या स्थानावर राहिला. दोन्ही जागी
भाजप डावे आणि काॅंग्रेस या पक्षांपेक्षा अधिक मते मिळाली. भाजपला हा विजय मोदींच्या लोकप्रियतेनेच मिळाला आहे.
७.
एकूण विचार केला तर मोदींसाठी पोटनिवडणुकांचे निकाल निराशाजनक नाहीत.
त्यांच्या अनुपस्थितीत पक्षाचा हा निकाल आहे. याचाच अर्थ असा की मोदी यांचे
असणे आणि त्यांचे नेतृत्व भाजपला विजय मिळवून देते.
८. मोदी यांचा करिश्मा आणि अमीत शहा यांचे संघटनकौशल्य यामुळेच उत्तरप्रदेशात भाजपला लोकसभेच्या वेळी यश मिळाले होते. पोटनिवडणुका सांगतात की मोदींचे योगदान शहांच्या तुलनेत अधिक आहे. भाजपच्या खऱ्या शक्तीचा अंदाज तेव्हा येऊ शकेल जेव्हा मोदी निवडणूक मैदानात उतरलेले असतील.

९. आता महाराष्ट्रात होणाऱ्या निवडणुकीत मोदी प्रचार मैदानात आल्यावरच मोदी लाटेची स्थिती खऱ्या अर्थाने समोर येईल.
संदर्भ - http://www.bbc.co.uk/hindi/india/2014/09/140919_by_election_modi_analysis_tk.shtml
संदर्भ - http://www.bbc.co.uk/hindi/india/2014/09/140919_by_election_modi_analysis_tk.shtml
No comments:
Post a Comment