Tuesday, September 11, 2012

बाळासाहेब ठाकरे मुलाखत २

वाघाची डरकाळी!! नुसते ढोल कसले बडवताय?
मी उसळी मारली तर धर्मांध मुसलमान राहणार नाहीत!

महाराष्ट्र पोलिसांनी बिहारात जाऊन अमर जवान शिल्प तोडणार्‍यास अटक केली त्यात एवढा गहजब माजवण्यासारखे काय आहे? सार्वभौम राष्ट्राचे कायदे कोणासाठी असतात? जनतेसाठी की खतरनाक अतिरेक्यांसाठी?

बाळासाहेब ठाकरे मुलाखत १

मुलाखत १
 
ही तर वाघाची डरकाळी! जनता झोपली आहे काय?
मोर्चा निघाला; माणसं उठली, तोंडावरती बसली!
दंगली होतात कशा? बांगलादेशी घुसतात कसे? अफझल गुरू आणि कसाब फासावर का लटकत नाहीत? शेतकर्‍यांच्या आत्महत्यांमुळे सगळ्या दोर्‍या संपल्यात का आत्महत्या करून? तसं असेल तर त्यांना भरचौकात गोळ्या घालून ठार मारा!

कुडनकुलम प्रकल्पाला विरोध करण्यामागे परकीय शक्ती !

युरेनियम साठ्यावर बसलेले भुजंग - ख्रिश्‍चन मिशनरी
  कुडनकुलमच्या आंदोलनामागे ख्रिश्‍चन मिशनरी आहेत, हे उशिराने का होईना पण सिध्द झाले आहे. हे आंदोलन करणारा एस. पी. उदयकुमार हा इडन्तकेरी येथील पॅरिश धर्मगुरू फादर जयकुमार याच्यासोबत रहातो. फादर जयकुमार याने या आंदोलनाला उघड पाठिंबा दिला आहे. कोडान्कुलमचा धर्मगुरू फादर थोडपूज, ओव्हरी गावाच्या सेंट अँटनी चर्चचा फादर एस.पीटर हे या आंदोलनात केवळ पाठींबाच देतात असे नाही तर त्यात सहभागी असलेल्यांना मदतही करतात. उपलब्ध माहितीनुसार हे लोक वाहतूक, पैसा आणि आंदोलकांना फूस लावण्यासाठीही हे सारे धर्मगुरू बिर्याणीपासून फळांपर्यंत अनेक वस्तूंचा पुरवठा करीत आहेत. लोकांनी अणुऊर्जा प्रकल्पावर दगडफेक करावी, म्हणून हेच लोक त्यांना चिथावणीही देत आहेत.

अद्भुत यश श्री नरेंद्र मोदी यांचे

Google+ hangout with Shri Narendra Modi a grand success!

Phenomenal response from across the Internet, Social Media and Television!

 Millions glued to the screens to hear Shri Modi speak on various domestic, international and personal issues.

‘लव्ह जिहाद’ - ३ वर्षांत २१९५ युवतींचे धर्मांतर

तिरुवनंतपूरम - केरळ राज्यात ‘लव्ह जिहाद’च्या घटना वाढीस लागल्याने विधानसभेत त्यावर चर्चा झाली. २००९ ते २०१२ या तीन वर्षांच्या कालावधीत केरळमध्ये २ सहस्र १९५ हिंदू युवतींचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात आले आहे, अशी माहिती केरळचे काँग्रेसचे मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी नुकतीच विधानसभेत दिली. http://indiatoday.intoday.in/story/love-jihad-oommen-chandy-islam-kerala-muslim-marriage/1/215942.html

Monday, September 10, 2012

rss समजून घ्यायचाय ?

‘लोकसत्ता- आयडिया एक्स्चेंज’मध्ये सरसंघचालक मोहन भागवतांनी संघाविषयीच्या मूलभूत माहितीसंबंधी एक निवेदन केले. त्याचा हा गोषवारा..
संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या जीवनात देशाचे उत्थान हेच एकमेव लक्ष्य होते. देशाच्या भल्यासाठी होणाऱ्या प्रत्येक चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग असे.

Sunday, September 9, 2012

  भाऊ तोरसेकर

रविवार 9 सप्टेंबर 2012

मौलाना वहिउद्दीन खान काय सांगतात?


   "बांगलादेशियांचे बेकायदा स्थलांतर रोखण्यात प्रशासनालाही अपयश आले आहे. पण आता त्यांना परत पाठविणे हा उपाय नाही. स्थलांतरितांनी स्थानिक लोकांशी जुळवून घेतले पाहिजे. मुस्लिम जातात तेथे त्यांना सांस्कृतिक ओळख कायम ठेवायची असते. हे काही योग्य नाही. युरोपातही ते बुरख्याचा आग्रह धरतात. माझ्या मते स्थलांतरित मुस्लिमांपुढे दोन पर्याय आहेत. एकतर त्यांनी पुन्हा आपल्या मूळ प्रदेशात परतावे. अन्यथा आसामातील स्थानिक जनतेशी जुळवून घ्यावे. सतत आपल्या सांस्कृतिक ओळखीवर भर देणे, हा काही इस्लाम नाही. स्थलांतरितांना याची जाणीव करून न देणे हा तिथल्या मुस्लिम नेत्यांचा दोष आहे. बोडोंचे काही चुकले असे मला वाटत नाही. स्थलांतरितांना सन्मानाने जगायचे असेल तर त्यांनी स्थानिक संस्कृती स्वीकारली पाहिजे. आणि आपल्या सांस्कृतिक ओळखीवर सातत्याने भर देणे टाळावे. बांगलादेश आणि पाकिस्तानात हेच घडले. बांगलादेशात ऊर्दू भाषिक मुस्लिमांनी सांस्कृतिक ओळख कायम ठेवण्याचा आग्रह धरला, तेव्हा बंगाली मुस्लिमांना ते सहन झाले नाही. उत्तर प्रदेश आणि बिहारमधून पाकिस्तानात गेलेल्या मुस्लिमांनी (मोहाजीर) कराची आणि सिंध प्रांतात आपल्या संस्कृतीचा आग्रह धरला, तो सिंधी मुस्लिमांना मान्य झाला नाही. त्याचीच पुनरावृत्ती आसामात घडत आहे. संस्कृती ही भौगोलिक परिस्थितीशी निगडीत असून ती काही धार्मिक प्रक्रिया नाही. इस्लाम हा धर्म आहे', असे सांगून यांची गल्लत होता कामा नये."

   हे माझे मत नाही. मुंबईतील आझाद मैदानच्या हिंसेनंतर मौलाना वहिउद्दीन खान या मुस्लिम धर्मपंडीताने व्यक्त केलेले हे मत आहे. तेव्हा त्याच्यावर तरी कोणी हिंदूत्ववादी असा निदान आरोप करू शकणार आही अशी आशा आहे. त्यात कुठेतरी त्यांनी संघ परिवार किंवा त्यांच्या हिंदूत्वाचा उल्लेख तरी केला आहे काय? मुस्लिमांना भेडसावणार्‍या समस्येचा विचार करताना आपल्याकडे नेहमी सेक्युलर लोक कारण नसताना हिंदूत्व हा विषय मध्ये घुसडतात. पण वहिउद्दीन हे सेक्युलर नाहीत तर धर्मनिष्ठ तेवढेच वस्तुनिष्ठ मुस्लिम आहेत. आणि म्हणूनच त्यांना सत्य बोलायची सेक्युलर भिती भेडसावू शकलेली नाही. कुणी हिंदूत्ववादी जेवढा नेमकेपणाने मुस्लिमातील दोष सांगू व दाखवू शकणार नाही; तेवढे वहिउद्दीन यांनी नेमक्या दुखण्यावर बोट ठेवले आहे. आसामच्या विषयावर किंवा बांगलएशी घुसखोरांच्या प्रश्नावर बोलतांना त्यात मुळातच हिंदू-मुस्लिम असे वळण देण्याचे कारण नसते. पण कुठल्याही सेक्युलर पुढारी वा बुद्धीमंताच्या वक्तव्याकडे बघा; तो हटकून त्यात चर्चेला हिंदू-मुस्लिम असे वळण देतो. वहिउद्दीन यांनी तसे केलेले नाही. शिवाय त्यांनी बांगलादेशी मुस्लिम किंवा जगातले स्थलांतरीत मुस्लिम कसे आपल्या सांस्कृतिक ( धार्मिक म्हणुन) ओळखीचा अट्टाहास करतात आणि समस्या निर्माण करतात, त्यावरच बोट ठेवाले आहे. समस्या तिथून सुरु होते. पण जेव्हा आपण त्याच दुखण्यावर बोलायचे टाळतो, तेव्हा मग उपाय शोधणेच अशक्य होऊन जाते. वहिउद्दीन काय म्हणतात?

‘मुस्लिम जातात तिथे त्यांना आपली सांस्कृतिक ओळख कायम ठेवायची असते, ते योग्य नाही.’ म्हणजे जिथे तुम्ही जाल तिथे तुम्ही तिथल्या स्थानिक संस्कृतीशी जुळवून घेतले पाहिजे. आणि तेच होत नाही. कुठल्याही समाजाची सांस्कृतिक ओळख भौगोलिक इतिहासातून तयार झालेली असते. त्यात शेकडो हजारो वर्षे खर्ची पडलेली असतात. शेकडो पिढ्यांनी केलेल्या अनुकरण व जगण्यातून ती ओळख तयार झालेली असते. त्याला कोणी स्वाभिमान म्हणतात तर कोणी अस्मिता असे नाव देतात. तिथे नंतर कोणी येऊन वसले तर त्यांनाही तिथला समाज सामावून घेत असतो. पण त्या स्थानिक संस्कृती वा समाजात सामावून न जाता कोणी त्या संस्कृतीलाच धक्का देण्याचा प्रयत्न करू लागला, मग अस्मितेची लढाई सुरू होते. आणि ती कोण सुरू करतो? कशामुळे सुरू होते? वहिउद्दीन नेमके तेच सांगतात. मुस्लिम जातात तिथे त्यांना आपली सांस्कृतिक ओळख कायम ठेवायची असते, म्हणजे काय तर स्थानिक समाज व संस्कृतीशी जुळवून घ्यायचे नसते. आणि हीच खरी समस्या आहे. जिथे तसा अट्टाहास केला जात नाही, तिथे मुस्लिम व अन्य बिगर मुस्लिम गुण्यागोविंदाने नांदताना दिसतील. पण हे बोलणे सुद्धा सेक्युलर लोकांना पाप वाटते. हा मुस्लिमांचा दोष आहे आणि तोसुद्धा समस्त मुस्लिम समाजातला दोष नाही, तर अगदी मुठभर हटवादी मुस्लिमांमध्ये तो आढळून येतो. (हे मुठभर हटवादी मुस्लिम नेमके कोन व त्यांचा पंथ व ओळख काय ते सविस्तरपणे मी पुढे मांडणार आहे.) पण त्यामुळेच तमाम मुस्लिमांकडे मग त्याच हटवादी स्वभावाचे म्हणुन बघितले जाते.

   ‘सतत आपल्या सांस्कृतिक ओळखीवर भर देणे, हा काही इस्लाम नाही. स्थलांतरितांना याची जाणीव करून न देणे हा तिथल्या मुस्लिम नेत्यांचा दोष आहे. बोडोंचे काही चुकले असे मला वाटत नाही.’ असेही वहिउद्दीन म्हणतात. याचा अर्थ काय होतो? आसाममध्ये आज जी हिंसा भडकली आहे त्याला बोडो हे मुळचे स्थानि्क जबाबदार नाहीत तर तिथे नंतर येऊन वसलेल्या मुस्लिमांच्या चुका हिंसेला कारण झालेल्या आहेत. आणि त्या चुका कोणत्या आहेत? तर त्यांचा आपली सांस्कृतीक ओळख कायम ठेवायचा अट्टाहास. आणि ती फ़क्त आसामची समस्या नाही. ती संपुर्ण जगातील समस्या आहे. त्याचा दाखला मौलानांनी युरोपमधील बुरख्याचा आग्रही भूमिकेतून दिला आहे. एक मुस्लिम धर्मपंडीत ठामपणे हे मुस्लिमांचे दोष दाखवतो आहे. पण ज्यांना धर्माशी कर्तव्य नाही ते सेक्युलर मात्र यातला एकही दोश मांडायला तयार नसतात. पण तेच सेक्युलर हिंदूंच्या दोष व चुकांवर बोट ठेवायला कायम उतावळे झालेले दिसतात. तेव्हा बहुसंख्य समाजाची काय भावना होते? इथे सेक्युलर म्हणुन मुस्लिमांच्या धर्मांधतेचे लाड केले जातात आणि हिंदूच्या भावना पायदळी तुडवल्या जातात. ही समजूत खरी समस्या आहे आणि तिचे जनक कोणी मुस्लिम धर्मवेडे वा हिंदूत्ववादी नसून सेक्युलरच आहेत. कारण हे सेक्युलर लोक हिंदू-मुस्लिम यांच्यात पक्षपात करत असतात. एक बारीकशी गोष्ट घ्या. आता गणेशोत्सव येतो आहे. त्यावेळी रस्त्यावर वर्दळीच्या जागी उत्सवाचे मंडप घातल्याने वाहतुक व नागरिकांचे हाल कसे होतात, त्याच्या मोठमोठ्या बातम्या झळकतील. पण तसाच काहीसा प्रकार शुक्रवारच्या नमाजाच्या निमित्ताने होत असतो. पण सेक्युलर माध्यमात त्यावर कधी अवाक्षर बोलले जात नाही.

   अशावेळी हिंदूंवर टिका करणारे सुधारणावादी मुद्दाम पुढे आणले जातात, ते हिंदूंच्या वागण्यावर टिका करतात. पण तसेच सुधारणावादी मुस्लिमातही आहेत. त्यांनीही अशा मुस्लिम आक्रमकतेवर अनेकदा टिका केलेली आहे. पण माध्यमे त्या शांतताप्रिय मुस्लिम विचारवंत किंवा नेत्यांना कधीच व्यासपीठ देत नाही. उलट जे आक्रस्ताळेपणा करतील व धर्मासाठी आत्मसमर्पण करायला सज्ज आहोत अशी भडक भाषा बोलतील, अशाच नेत्यांना माध्यमे पुढे आणतात. त्यात हैद्राबादचे ओवाइसी किंवा पाटण्याचे सय्यद शहाबुद्दीन वा मुंबईतले अबु आझमी असतात. पण संयमाची भाषा बोलणार्‍या वहिउद्दीन यांना कितीदा वाचक प्रेक्षकासमोर आणले जाते? यातून माध्यमे सेक्युलर विचार म्हणुन मुस्लिम धर्मांधतेला खतपाणी घालतात आणि हिंदूंच्या भावना पायदळी तु्डवतात अशी धारणा निर्माण होण्यास हातभार लागता असतो. शिवाय अनेक प्रश्न अनुत्तरीत रहातात, तेवढेच नाही. असे अनुत्तरीत प्रश्न शिल्लक रहातात ते गैरसमजूतीची जोपासना करू शकत असतात. जेवढ्या या गैरसमजूती वाढत जातात, तेवढा संशय व परस्पर विश्वास वाढीस लागत असतो. मुद्दा तिथेच संपत नाही. जेव्हा माध्यमे अशा रितीने मुस्लिमातील आक्रमकतेला प्रोत्साहन देतात व त्यातल्या समंजस प्रवृत्तीची गळचेपी करतात, तेव्हा सर्वसामान्य मुस्लिमही त्याच आक्रमकतेच्या प्रभावाखाली येत असतो. बहुसंख्येने जे शांततावादी मुस्लिम आहेत, त्यांना त्याच भडक माथ्याच्या नेत्यांच्या मागे फ़रफ़टत जावे लागत असते. कारण त्यांचा समंजस आवाजच उठत नसतो.

   मौलाना वहिउद्दीन युरोपातील बुरख्याच्या आग्रहाबद्दल बोलत आहेत तो आग्रह किती लोकांचा आहे? युरोपिय देशात स्थलांतरीत झालेल्या मुस्लिमांपैकी एक टक्का देखिल अशा आग्रही भूमिकेचे नाहीत. पण तिथल्याही सेक्युलर उदारमतवादाने चिथावणीखोर मुस्लिमांना सतत प्रसिद्धी देऊन मोठे केले आहे आणि उर्वरित मुस्लिम लोकसंख्येला त्याच माथेफ़िरूंच्या मागे फ़रफ़टावे लागते आहे. कारण वहिउद्दीन म्हणतात व दाखवतात, त्या समस्येवर बोलायचे नाही असा सेक्युलर हट्ट असतो. त्यामुळे समस्येचे उत्तर शोधलेच जाऊ शकत नाही. मग उत्तर नाही म्हणून उपाय नाही आणि उपायच नाही म्हणुन संशयाचे धुके वाढलेले आहे. आणि इथे जसे समजले जाते वा दाखवले जाते, तशी ही हिंदू मुस्लिम समस्या अजिबात नाही. ती मुस्लिम व बिगर मुस्लिम अशी जागतिक समस्या आहे. आणि त्याचा आरंभ वहिउद्दीन यांनी सांगितला आहे. ती समस्या आहे आपल्या सांस्कृतिक ओळखीचा मुस्लिमांकडून होणारा अट्टाहास. त्यामुळे काय होते? ती समस्या का आहे? ते उद्या बघू.      ( क्रमश:)
भाग  ( २५ )   ९/९/१२

कैवारीच पत्रकारितेचे वैरी झालेत

  भाऊ तोरसेकर

गुरुवार 2 फेब्रुवारी 2012

मी स्वत: पत्रकार आहे आणि चार दशकांपेक्षा अधिक काळ पत्रकारिता करतो आहे. त्यामुळेच पत्रकारांचे आविष्कार स्वातंत्र्य मलाही मोलाचे वाटते. पण स्वातंत्र्य आणि स्वैराचार यात फरक असतो. त्यामुळेच आपल्या स्वातंत्र्याचे पावित्र्य पत्रकार - कलावंतांनी जपले नाही तर इतरांनी त्याची थोरवी मानायचे कारणच रहाणार नाही. आज आम्ही पत्रकार तेवढे प्रामाणिक राहिलेले आहोत काय? 'महाराष्ट्र टाइम्स' वर हल्ला झाला म्हणून ओरडणारे-रडणारे खोटय़ा बातमीबद्दल एकदा तरी माफ़ीची भाषा बोलले आहेत काय? जी बातमीच नव्हती तर निव्वळ अफवा होती ती पसरवण्याचे पाप हा कायदेशीर गुन्हा आहे. त्याची खंत कुठल्या पत्रकाराने व्यक्त केली आहे काय?

धडपडणारी मुले नव्हे तर तडफ़डणारी मुले

भाऊ तोरसेकर 
अमळनेर गांवात आज विश्वधर्ममंडळाच्यावतीने थोर, पैगंबर महंमद यांची पुण्यतिथि साजरी होणार होती. विश्वधर्ममंडळ तेथे नवीनच स्थापन झाले होते. नवीन जीवनाचा तो एक लहानसा अंकुर होता. हजारो वर्षे जो विशाल भारत बनत आहे, त्याच्याच सिद्धीसाठी ते लहानसे मंडळ होते. जे महाभारताचे महान वस्त्र परमेश्वर अनंत काळापासून विणीत आहे, त्या वस्त्रांतील एक लहानसा भाग म्हणजे ते मंडळ होते.

Thursday, September 6, 2012

तरुणांना आवाहन

विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी
शाखा - सोलापूर

तरुणांना आवाहन

गांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस  म्हणतात, आज स्वामी विवेकानंद असते, तर मी त्यांची गुरुस्थानी स्थापना केली असती.  जवाहरलाल नेहरू म्हणतात की, विवेकानंद हे अध्यात्म आणि विज्ञान यांचा समन्वय करणारे महापुरुष होते. स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्यापासून ते जमशेटजी टाटा यांच्यापर्यंत शेकडो महापुरुषांनी विवेकानंदांच्या जीवन व विचारातून प्रेरणा घेतली. योद्धा, संन्यासी आणि कोट्यवधी तरुणांचे स्फूर्तिस्थान म्हणजे स्वामी विवेकानंद.

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी