भाऊ तोरसेकर
नुकतेच गेल्या रविवारी, विसनगर, गोविंदचकला पटेलवाडीमध्ये विधानसभा निवडणूकीच्या पूर्वतयारीसाठी गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांच्या उपस्थितीत सक्रीय कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात वाघेला यांनी आपल्या भाषणात एक टिप्पणी केली. ’गुजरातमध्ये गेल्या २० वर्षांपासून कॉंग्रेस हरत आली आहे. अजून एखाद्या वेळी कॉंग्रेस हरेलही, पण जर का गुजरातमध्ये भाजप हरला तर नरेंद्रभाई मोदींचे काय होईल?’


जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद खर्या अर्थाने सार्थ करणार्या सोलापूरच्या
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा रामतीर्थकर यांना यंदाचा पु. भा. भावे
पुरस्कार जाहीर झाला आहे. ऍड. अपर्णा मूळच्या सातारा येथील पूर्वाश्रमीच्या
सुनीता यशवंत कुलकर्णी. त्यांची आजी हा त्यांचा आदर्श. यादो गोपाळ पेठेतील
त्यांचे घर म्हणजे कार्यकर्त्यांचा आधार. एरवीच नाही तर आणीबाणीतही भूमिगत
झालेला कार्यकर्ता मध्यरात्री दोन वाजता आला तरी त्याला पिठलं-भात करून आजी
आश्रय देत. ७५व्या वर्षी आणीबाणीविरोधात सत्याग्रह, पत्रके वाटणार्या आजीचा
वारसा अपर्णाताई पुढे चालवत आहेत.