Sunday, September 30, 2012
Friday, September 28, 2012
सुदर्शन - एक साधा तरीही अथांग माणूस
Sudarshan – a man simple, yet profound
By
S Gurumurthy
28th September 2012 12:58 AM
Kuppalli Sitaramayya Sudarshan, who headed the Rashtriya Swayamsevak
Sangh (RSS) for nine years as its fifth Sarsanghachalak and when hale
and hearty himself, nominated Mohan Bhagwat as his successor, passed
away on September 15. A rare human being — simple, unassuming, honest,
innocent, child-like, and, most important, Sudarshan was least given to
being strategic or clever. He could be faulted for innocence but not
ever for deceit.
Thursday, September 27, 2012
इस्लाम प्रचारक झाकीर नाईकची मुक्ताफळे
तारीख: 9/25/2012 10:53:34 PM |
म्हणे गणपती देव कसा?, फेसबूक अकाऊंटवर बंदी आणण्याची मागणी
वृत्तसंस्था
मुंबई, २५ सप्टेंबर
‘इनोसंट मुस्लिम्स’ या अमेरिकन चित्रपटात
महंमद पैगंबराचा अपमान झाल्याचा कांगावा करून तसेच धार्मिक भावना
दुखावल्याची बतावणी करून जगभर धुमाकूळ घालणारे मुस्लिम मुल्ला मौलवी अन्य
धर्मीयांच्या भावना मात्र बिनदिक्कत पायदळी तुडवत असल्याचे चित्र आहे.
‘पीस’ या खाजगी दूरचित्रवाणी वाहिनीवरून इस्लामचा सातत्याने प्रचार करणारे
तथाकथित मुस्लिम विद्वान झाकीर नाईक यानेही गणपती देव कसा असू शकतो ? तो
देव असेल तर सिद्ध करा अशी मुक्ताफळे उधळली आहेत. दरम्यान, झाकीर नाईकच्या
या बेताल वक्तव्यांमुळे हिंदू धर्मीयांमध्ये संतापाची लाट उसळली असून
नाईकच्या फेसबूक अकाऊंटवर बंदी घाला, अशी मागणी करण्यात येत आहे.
बॉम्ब खाणारे जीव
मल्हार कृष्ण गोखले
निसर्ग हे निर्मिती आणि संहार यांचं एक
सतत फिरणारं चक्र आहे. निसर्गातल्या कोणत्याही पदार्थाच्या अस्तित्वाला एक
आवर्ती, चक्रीय गती आहे. यालाच निसर्गाचं चक्र म्हणतात. सूर्याच्या उन्हाने
पाण्याची वाफ होते, वाफेचे ढग बनतात, ढगातून पाऊस पडतो. बीजाचा वृक्ष
होतो. वृक्षाला फळं येतात, त्यांची बीजं पुन्हा जमिनीवर पडतात. दिवसानंतर
रात्र, रात्रीनंतर दिवस, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा पुन्हा उन्हाळा असं
रहाटगाडगं गोलाकार फिरत असतं. पृथ्वीतत्त्व म्हणजे मॅटरपासून वनस्पती आणि
प्राण्यांचे देह निर्माण होतात. मृत्यूनंतर त्यांचे देह कुजून ते पुन्हा
मॅटरमध्ये म्हणजे मातीत मिसळतात.
श्वेतांबर जैन कवींद्वारा श्रीगणेशाचे स्मरण
जैन धर्म भारताचा प्राचीन धर्म आहे.
त्याचे प्रमुख दोन संप्रदाय आहेत- १) श्वेतांबर, २) दिगंबर. यातले दिगंबर
संप्रदायाचे खूप कट्टर होते. त्यांच्या इथे तर गणेशासंबंधी काही साधने मिळत
नव्हती. संपूर्णानंद यांच्या ‘गणेश’ या पुस्तकाच्या ९ व्या अध्यायात पं.
श्री. कैलासचंद्र शास्त्री यांच्या सूचनेनुसारही उल्लेख केला गेला होता की,
जैन धर्मात जिनेंद्र भगवानालाच गणेश व विनायक म्हणतात. या व्यतिरिक्त
यांच्या नावाचा उल्लेख मिळत नाही. विवाहाच्या वेळी विनायक यंत्राची पूजा
केली जाते. त्या वेळी श्लोक म्हटले जातात-
चर्चचे वास्तव 21 - 24
चर्चचे वास्तव २१
वर्ल्ड व्हिजनचा पाखंडी चेहरा
नागपूर, २१ सप्टेंबर
चर्चशी संबंधित संघटनांचे जाळे भारतात आणि
विदेशात ऑक्टोपससारखे पसरले आहे. वर्ल्ड व्हिजन इंटरनॅशनल, ऍक्शन एड, कासा
आणि कॅरिटास या त्यातील काही प्रमुख संघटना बिनीच्या म्हणून ओळखल्या
जातात. वर्ल्ड व्हिजन ही संघटना त्यांना मिळालेले अनुदान आणि देणग्यांमधून
सर्वधर्मीयांची सेवा करण्याचा दावा करीत असली, तरी या संघटनेने नियुक्त्या
करताना फक्त ख्रिश्चन व्यक्तिंनाच रोजगार मिळेल, याची कायमची कायदेशीर
तजवीज करून, त्यांची धर्मनिरपेक्षता किती पाखंडी आहे, हेच सिद्ध करून
दाखविले आहे.
धार्मिक कट्टरवादाचे पसरणारे विष
बलबीर पुंज
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये काही दिवसांपूर्वी इस्लामी कट्टरवाद्यांनी घातलेला हिंसक धुमाकूळ काय अधोरेखित करतो? एका विशिष्ट समाजाच्या धर्मग्रंथाची पाने रेल्वे मार्गावर फाटलेल्या अवस्थेत आढळून आल्याची अफवा दुपारी १२ वाजता मुस्लिमबहुल डासना-मसुरी येथे पसरते आणि संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हा विशिष्ट समाजाचा जमाव एवढा हिंसक होतो की स्थानिक पोलिस ठाण्याला आग लावण्यापर्यंत त्यांची मजल जाते. सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असलेल्या अत्याधुनिक रायफलीतून पोलिसांवर गोळीबार करण्यात आला, प्राण वाचविण्यासाठी पोलिसांची पळापळ सुरू झाली आणि परिसरावर या दंगलखोरांनी कब्जा करून टाकला होता.सगळे जगणे ‘पर्यटन’ व्हावे!
शहाणे होण्याचा सोपा मार्ग आपल्या पूर्वजांनी आपल्याला दाखवून ठेवला आहे. ‘केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत वर्तन’ हे तीन मार्ग ‘शहाणे’ बनवणारे आहेत. ज्ञानी माणसांशी मैत्री असेल, तर त्यांच्या सहवासात आपल्याला खूप काही मिळत जाते. ज्ञान, अनुभव, विचार यांच्या संगमाने संपन्न झालेल्या ‘सभा, संमेलनात’ गेल्याने आपली झोळी आपसूकच भरून जाते. असेच महत्त्व देशाटनाचे आहे. देशाटन म्हणजे पर्यटन! भटकंतीने आपण सर्वार्थाने र्शीमंत होतो. नाना लोक, नाना पद्धती आपल्याला यात्रेमुळे कळतात. आपला दृष्टिकोन व्यापक होत जातो. म्हणजेच आपण शहाणे होतो. पर्यटन दिनानिमित्त पर्यटनाचा विचार व्हायला हवा. फिरण्याने आनंद मिळतो. पण, हे फिरणे जाणीवपूर्ण झाले की मगच ते पर्यटन होते.
Subscribe to:
Posts (Atom)
.
माझी टी.व्ही. मुलाखत पाहा...
siddharam patil photo
लेखांची वर्गवारी
- bjp (12)
- congress (19)
- g b syndrome (1)
- INBOX (1)
- research (1)
- rss (5)
- shivaji (4)
- tarun bharat (2)
- अग्रलेख (4)
- अतिरेकी हल्ले (6)
- अध्यात्म (16)
- अनुभव (2)
- अन्य (3)
- आंबेडकर (18)
- आर्मी (4)
- इतिहास (29)
- इस्लाम (35)
- एस. गुरुमूर्ती (3)
- ओळख (2)
- कसाब (3)
- कार्यक्रम (1)
- केन्द्र (3)
- खळबळजनक (1)
- ख्रिस्ती (21)
- गीत (3)
- चाणक्य नीती (7)
- चीन (1)
- छायाचित्र (2)
- जटायु (2)
- जटायु अक्षरसेवा (1)
- जीबीएस (4)
- जीवन मंत्र (2)
- डॉ. भूषण कुमार उपाध्याय (2)
- दहशतवाद (9)
- नक्षलवाद (5)
- निमंत्रण (1)
- न्यूज़ (7)
- पत्रकारिता (7)
- परिचय (10)
- पाक (2)
- पाकिस्तान (7)
- पुस्तक परिचय (7)
- पूर्वांचल (3)
- पोलिस (3)
- प्रज्ञा (2)
- बातमी (12)
- बातम्या (4)
- बुद्ध (6)
- भारत (4)
- मा. गो. वैद्य (2)
- माझ्याविषयी थोडे... (18)
- मीडिया (16)
- मुकुल कानिटकर (6)
- मुलाखत (4)
- मुस्लिम जगत (13)
- मोदी (9)
- योग (5)
- रमेश पतंगे (1)
- राजकारण (28)
- विमर्श (6)
- विवेक विचार (17)
- विवेकानंद साहित्य संमेलन (1)
- वैचारिक (57)
- वैद्यक (5)
- शिव धर्म (7)
- सडेतोड सागर (2)
- सर्वस्पर्शी बाबासाहेब (3)
- संस्कृति (22)
- संस्कृती (6)
- सामाजिक (9)
- सावरकर (2)
- साहित्य (7)
- सिद्धरामचे लेख (17)
- सुविचार (2)
- सूर्यनमस्कार (4)
- सोलापुर (9)
- सोलापुर दंगल (5)
- सोलापुर बातमी (9)
- स्वामी विवेकानंद (3)
- स्वामी विवेकानंदांचे विचार (32)
- हिंदू (9)