मल्लिकार्जुन मंदिरातील याच शिवलिंगाची विटंबना झाली |
किल्ल्याविषयी
सोलापूरचा किल्ला नेमका कोणी बांधला या बाबत अजूनही तज्ज्ञांमध्ये
एकवाक्यता आढळत नाही. हिंदू राजांच्या काळात बांधलेला हा किल्ला नंतर महमूद गावान याने बळकावला आणि दुसरी तटबंदी बांधली. महमूद गावान हा बहमनी सुलतान महंमदशाह याचा दिवाण होता. किल्ल्यात सुमारे 900 वर्षांपूर्वीचे मल्लिकार्जुन मंदिर आहे. मुघल काळात हे मंदिर उध्वस्त करण्यात आले. मंदिराच्या अवशेषापासून बनवलेली एक इमारत मंदिराच्या दक्षिण बाजूस जवळच आहे. या 32 खाम्बी इमारतीत औरंगजेब बादशहा नमाज पडत असे, अशी माहिती काहीजण देतात.टीप
मंगळवारी संध्याकाळी किल्ल्यात बाशी खुदाबा या सणासाठी शहरातील मुस्लीम बांधवांनी किल्ल्यात मोठी गर्दी केली होती.
*******************
भुईकोट किल्ल्यातील मंदिराची विटंबना; सोलापुरात तणाव
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAH-WMAH-temple-degrade-in-solapur-3685139-NOR.html
सोलापूर- भुईकोट किल्ल्यातील प्राचीन मल्लिकार्जुन मंदिराच्या कुंडाजवळील महादेव पिंड फुटल्याच्या स्थितीत आढळून आली. ही घटना बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास उघडकीस आली. दुपारी तीननंतर किल्ला बाग, फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गर्दी झाली. ही घटना कशी घडली याचा शोध पोलिस घेत आहेत. नवी पेठ परिसरात सायंकाळी सहाच्या सुमारास जमावाने घोषणाबाजी केल्यानंतर व्यापार्यांनी दुकाने बंद केली. त्यामुळे घबराहट पसरली. शहरात सध्या शांतता आहे.
पुरातत्त्व विभाग, विश्व हिंदू परिषद, नगरसेवक नरेंद्र काळे व पांडुरंग खंडू शेंडगे (रा. सोलापूर) यांनी वेगवेगळ्या फिर्यादी दिल्या आहेत. मंगळवारी सायंकाळी पाच ते बुधवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत ही घटना घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भुईकोट किल्ल्यात उत्तर गेटच्या जवळ नऊशे वर्षांपूर्वीचे मल्लिकार्जुन मंदिर आहे. मुघल काळात उद्ध्वस्त करण्यात आलेल्या या मंदिराच्या ठिकाणी अवशेष आणि एक कुंड आहे. त्याठिकाणी महादेवाची पिंड आहे. या घटनेमुळे भावना दुखावल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे. हे कृत्य नेमके कुणी केले आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत. दरम्यान, रात्री उशिरा साखर पेठ येथील एका धार्मिक स्थळात अनुचित प्रकार घडल्याची अफवा पसरली. त्यामुळे तेथे बंदोबस्त वाढविण्यात आला. रात्री बाराच्या सुमारास पोलिस आयुक्त प्रदीप रासकर यांनी रात्री ग्रस्त घालून स्थितीची पाहणी केली. चौका-चौकात बंदोबस्ताचा आढावा घेतला.
http://www.flickr.com/photos/32799353@N03/3075137950/
No comments:
Post a Comment