Thursday, May 9, 2013

दोनशे घरे पेटवून दिली; कुठे दाद ना फिर्याद!

... आता या दंगलीवर कोण बोलणार?

या देशात ढोंगी सर्वधर्मसमभावाचे ढोल इतक्या कर्कश्श आवाजात बडविण्याची स्पर्धा लागली आहे की, त्या आवाजात पश्‍चिम बंगालमध्ये झालेल्या भीषण दंगलीचा आवाज आणि पीडित हिंदूंच्या किंकाळ्या कोणापर्यंत पोहोचल्याच नाहीत! गुजरातच्या दंगलींना आता तप उलटले, त्यानंतर किंचाळणार्‍या सर्व सेक्युलॅरिस्टांच्या आणि प्रसारमाध्यमांच्या नाकावर टिच्चून गुजराती जनतेने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाला तीन वेळा प्रचंड बहुमताने सत्तेवर बसविले. तरीही नितीशकुमारपासून ते कॉंग्रेसच्या छटाक नेत्यांपर्यंत कोणीही उठतो आणि नरेंद्र मोदींना बारा वर्षांपूर्वी झालेल्या दंगलींचा विषय काढून शिव्याशाप देऊ लागतो. मात्र, आता काही दिवसांपूर्वी सेक्युलॅरिजमबद्दल सतत चिरक्या आवाजात किंचाळणार्‍या ममता बॅनर्जी यांच्या राज्यात दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात मुसलमानांनी क्षुल्लक घटनेचे निमित्त करून तीन गावांत अक्षरशः नंगा नाच घातला. दोनशे घरे पेटवून दिली. या घटनेची कुठे दाद ना फिर्याद! सेक्युलॅरिस्टांची तोंडे बंद!
अगदी हाताची घडी अन् तोंडावर बोट! कारण अगदी सोपे आहे. दंगल करणारे मुसलमान आणि मार खाणारे हिंदू! महात्मा गांधींच्या काळात नौखालीत झालेल्या भीषण दंगलींपासून ते काही दिवसांपूर्वी पश्‍चिम बंगालमधील या नलियाखाली गावच्या पंचक्रोशीत झालेल्या दंगलीबाबत एकच भूमिका आहे. हिंदूंना मार बसला आणि मुसलमानांनी दंगल केली असेल, तर मग त्याबद्दल बोलायचे नाही!
१८ फेब्रुवारी २०१३! या दंगलीला भडकवण्याची संधी देणारे एक कारण घडले. मौलवी रोहुल खुद्दास आणि एक गावकरी अब्दुल वहाब हे दोघे मोटारसायकलवर जामतला या गावाहून एक धार्मिक कार्यक्रम आटोपून निघाले होते. नलियाखाली या गावाजवळ येताच मुख्य रस्त्यावरच कोणी अज्ञात लोकांनी या मोटारसायकलस्वार लोकांवर गोळीबार केला. त्यात मोटारसायकल चालविणारा मौलवी ठार झाला आणि मागे बसलेला अब्दुल जखमी झाला. हा हल्ला कोणी केला? कारण काय होते? हे अजूनही सेक्युलर ममता सरकारने शोधलेले नाही. स्थानिक मोठ्या वर्तमानपत्रांत मात्र असे प्रसिद्ध झाले आहे की, मौलवींकडे साडेआकरा लाख रुपये होते जे हल्लेखोरांनी पळवले. पहाटे समीर सेन नावाच्या बसड्रायव्हरने या घटनेची खबर पोलिसात दिली. या घटनेचे निमित्त करून आजूबाजूच्या गावांमधून ट्रक भरभरून सुमारे पंधरा हजार ते वीस हजार मुस्लिम मंडळी या गावात पोहोचली. रस्ते रोखले, रेल्वेचे रूळ उखडले आणि मग सुरू झाला नंगा नाच! नौखाली, हिरभंगा, गोपालपूर आणि गोलाडोग्रा या चार खेड्यांत हा मुस्लिम जमाव अक्षरशः चालून गेला. यांनी दिसेल ते हिंदूंचे घर पेटविण्याचा आणि लुटण्याचा एकच सपाटा लावला. विरोध करणार्‍याला बेदम मारहाण करणे चालूच होते. अगदी पोलिस अधिकारीही या मारहाणीतून सुटले नाहीत. कनिंग पोलिस ठाण्याचे अनुप समादार आणि अनुप घोष हे अधिकारी जखमी झाले आहेत. पोलिसांची वाहनेही जाळण्यात आली आहेत. अनेक हिंदू जखमी झाले. पाच महिलांचा विनयभंग करण्यात आला. शेकडो घरे पेटविण्यात आली. संताप आणणारी गोष्ट म्हणजे हे दंगेखोर दंगल करताना नारा ए तकवीर, अल्ला हो अकबर, पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्थान मुर्दाबाद अशा घोषणा देत होते.
विशेष म्हणजे गुजरातच्या दंगलीवर अजूनही जणू कालच दंगल झाली आहे, अशा प्रकारे बेंबीच्या देठापासून कंठशोष करणारे सेक्युलॅरिस्ट पश्‍चिम बंगालमधल्या या दंगलीवर तोंडाला कुलूप लावून का बसले आहेत? पश्‍चिम बंगालचे सरकार, ममता बॅनर्जी, त्यांचे विरोधक असलेले डावे सगळ्यांनी अफू खाल्ली आहे की गांजा? टीव्ही वृत्तवाहिन्या आता का गप्प आहेत? विशेष हे की पश्‍चिम बंगालमध्ये ही काही पहिली दंगल नाही. अशा घटना या २४ दक्षिण परगणा जिल्ह्यात सतत होत आहेत. बांगला देशातील घुसखोरांकडून जो त्रास आसाममध्ये झाला आणि त्याविरोधात चिडून तेथील वनवासींनी प्रतिक्रिया देताच देशभरात गोंधळ माजवला गेला. आझाद मैदानात पोलिसांच्या इभ्रतीला आणि शहीद स्मारकाला अवमानित केले गेले. आता तोच प्रकार आसाममधून पश्‍चिम बंगालच्या या भागात घडतो आहे.
दोन वर्षांपूर्वी देगंगा येथे दुर्गापूजेच्या वेळी दंगल झाली त्यावेळी तेथे लष्कराला पाचारण करावे लागले होते. या दंगलीत तृणमूल कॉंग्रेसचा नेता नरूल इस्लाम हा सक्रिय होता. या दंगलीत पोलिसांना न जुमानता जाळपोळ, मंदिरावर हल्ले, महिलांचा विनयभंग असल्या गोष्टी अगदी सर्रास घडल्या होत्या. त्याआधी एकच महिना आधी सीतापूर जि. नादिया येथे तीन हिंदू मुलींवर मुस्लिमांनी बलात्कार केला आणि त्यानंतर दंगल उसळली होती. अशाप्रकारे मुर्शिदाबाद जिल्ह्यातही दंगल झाली होती. मात्र, या बातम्या ममता बॅनर्जी यांच्या सरकारने तेथेच दाबून टाकल्या.
एरवी कोणत्याही अन्यायाविरुद्ध पेटून उठल्यासारखे कर्कश्श किंचाळणार्‍या ममता बॅनर्जी आता एकदम गप्प आहेत. मुस्लिमांची गठ्ठा मते त्यांचे तोंड दाबून धरत आहेत. या देशातल्या सेक्युलर राजकारण्यांच्या तोंडाला दोन तोबरे लागले आहेत. एक मुसलमानांच्या गठ्ठा मतांचा आणि दुसरा असंख्य घोटाळ्यातल्या कोट्यवधी रुपयांचा! पण म्हणून हे फक्त गप्प बसतात असे नाही, तर दुसर्‍या तोंडाने यांचा हिंदूविरोधातला उग्र दर्प असलेला भपकारा चालूच असतो. याचे एक उदाहरण ममता बॅनर्जी या बाईंचेच आहे. २०१० नंतर ममताबाई सत्तेवर आल्यानंतर हिंदूंवर अत्याचार करणार्‍या दंगली झाल्या त्याच्या बातम्या यांनी दाबून तर टाकल्याच, मात्र २० जानेवारी २०१३ रोजी या दंगलखोर कनिंग जिल्ह्यात एका सभेत ममताबाई काय बोलल्या ते पाहण्यासारखे आहे. गुजरातच्या विकासाच्या वार्ता आणि कौतुक सर्वत्र होत असल्याने या बाईंचा तिळपापड झाला आणि या सभेत त्या म्हणाल्या की, गुजरातमध्ये काय झाले ते मला सांगू नका. गुजरात जे करतो ते आम्ही करू शकत नाही. गुजरातसारख्या दंगली आम्ही बंगालमध्ये करू शकत नाही. गुजरातचा विकास अनिवासी भारतीयांच्या पैशावर होतो आहे.
या ममताबाईंचे बोल हवेत विरतात न विरतात तोच एकाच महिन्यानी ही नलियाखालीची भीषण दंगल झाली. यानंतरही या बाई हे बोलतच राहणार. माध्यमे आणि ढोगी स्वयंघोषित पुरोगामी तोंडाला कुलूप लावून गप्पच बसणार. याचे कारण मुसलमानांनी हिंदूंवर अत्याचार करत दंगली केल्या, तर हे त्याला दंगल समजतच नाहीत. उलटे घडले की मात्र हे छाती बडवतात. व्हाईट हाऊसपर्यंत मातम करतात. ज्या राज्यात अशी दंगल झाली तेथील मुख्यमंत्री भाजपाचा असेल, तर त्याला कायमचे अपात्र ठरविण्याच्या प्रयत्नाला लागतात.
वो कत्ल भी करते तो चर्चा नही होती
हम आह भी भरते हैं तो हो जाते हैं बदनाम
अशी या सेक्युलॅरिजमची स्थिती आहे. आता यांचे हे भंपक सेक्युलॅरिजमचे ढोंग जगासमोर उघड केले पाहिजे. त्यासाठी हिंदूंनी संघटित होण्याची गरज आहे. ही ढोगी मंडळी, ही ढोंगी माध्यमे, हे ढोंगी राजकारणी, हे किंचाळत उठणारे कथित डावे पुरोगामी यांना संघटितरीत्या जाब विचारण्याची आणि यांची ढोंगबाजी उधळून देण्याची गरज आहे. बंगालमधील दंगलीचा हा देशातील हिंदूंना इशारा आहे. आसाममध्ये, म्यानमारमध्ये मुस्लिमांवर अन्याय झाला, तर या देशातील मुस्लिम आझाद मैदानावर नंगा नाच करणार, परदेशात कोणी आक्षेपार्ह व्यंग्यचित्र काढले तर इथे रस्त्यारस्त्यावर गोंधळ माजवणार आणि हिंदूंवर अन्याय, अत्याचार, हल्ला झाला तर त्याची ना दाद ना फिर्याद! हे सगळे ढोंग उघड केले पाहिजे. राजकारण्यांना जाब विचारला पाहिजे. संघटित सामर्थ्य उभे के ल्याशिवाय हे शक्य नाही.

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी