Friday, August 5, 2011

धक्कादायक मेलचा धुमाकूळ : सत्य काय आहे ?

'काळा पैसा' हा विषय भारतामध्ये खूपच संवेदनशील झाला आहे. भारताचे संपूर्ण राजकारण प्रभावित केलेला हा विषय एक रहस्य बनले आहे. राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्यापासून ते अनेकांची नावे वेळोवेळी काळ्या पैशाशी जोडण्याचा प्रयत्न झाला आहे. परंतु कोणाकडेच ठोस पुरावे नसल्यामुळे उघडपणे नाव घेण्याचे धाडस कुणीच करताना दिसत नाही. परंतु अलीकडे ज्युलिअन असांजे या धाडसी पत्रकारामुळे स्विस बँकेत पैसा ठेवणार्यांची नावे उघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. सध्या इंटरनेटवर एका माहितीने धुमाकूळ घातला आहे. ही माहिती स्विस बँकेत कोणाकोणाची खाती आहेत आणि त्यात किती पैसा आहे याचे विवरण आहे. ही माहिती आतापर्यंत कोणत्याच वृत्तपत्राने छापण्याचे धाडस केलेले नाही; कदाचित या यादीत असलेली मोठी नावे किंवा या माहितीची विश्वासार्हता याबद्दल असलेली शंका यामुळे हि माहिती कोणीच प्रसिद्ध करायला तयार नाही. परंतु केरळातून चालविले जाणारे एक लोकप्रिय वेबसाईट यासाठी पुढे आले आहे. त्यांनी इंटरनेटवर विविध ग्रुपमध्ये फिरत असलेली हि माहिती आपल्या साईटवर प्रसिद्ध केली आहे. http://www.haindavakeralam.com/HKPage.aspx?PageID=14443&SKIN=B
हि माहित खरी कि खोटी...?
खोटी असल्यास ती कोठून प्रसिद्ध व्हायला सुरुवात झाली याचा शोध सरकारी यंत्रणांनी घेतला पाहिजे. आणि भारतीय नेत्यांची बदनामी केली म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.

माहिती खरी असेल तर सबळ पुरावे गोळा करून या नेत्यांना गजा आड केले पाहिजे. आता सर्वोच्च न्यायालयाने काळा पैसा शोधण्याकामी पुढाकार घेतल्याने आशेचा एक किरण निर्माण झाला आहे. इंटरनेट वर धुमाकूळ घालत असलेल्या माहितीचा खरे खोटेपणा तपासण्यासाठी तपास यंत्रणांना
सर्वोच्च न्यायालयाची चमू आदेश देईल किंवा नाही याबद्दल सध्या तरी काहीच सांगता येत नाही.
अधिकृतपणे नावे उघड होईपर्यंत रामदेव बाबा यांच्या आंदोलनाला सदिच्छा देणे एवढेच आपल्या हातात आहे. नाही का ?

संबधित लेख वाचा ...
स्वामी रामदेव, काळा पैसा आणि सोनिया गांधी

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी