Saturday, November 11, 2017

हासन हास्यास्पद का ठरला ?

2013 मध्ये कमल हासनचा विश्‍वरूपम हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला काही मुस्लिम संघटनांनी विरोध केला. तामिळनाडूत या चित्रपटावर अघोषित बंदीच घातली. तेव्हा कमल हासनने हा इस्लामी दहशतवाद आहे असे म्हटले नाही. उलट त्याने शेपूट घालण्याची भूमिका घेतली. मुस्लिम संघटनांसोबत बैठक करून विश्‍वरूपम चित्रपटातील 5 दृश्य कापून टाकली आणि मुस्लिम संघटनांची परवानगी घेतली. मुस्लिम गटांनी चित्रपट बंद पाडल्याने 400 दशलक्ष रुपयांचे नुकसान झाले म्हणून रडणारा कमल हासन हिंदू गट दहशतवादी आहेत असे म्हणणे म्हणजे रस्त्यावर सपाटून मार खाल्ल्यावर घरी येऊन त्याचा राग बिचार्‍या बायका - मुलांवर काढणार्‍या भेकड माणसाप्रमाणे झाले. डाव्यांची ही नेहमीची भूमिका राहिली आहे.

तामीळनाडू हे दक्षिण भारतातील एक महत्त्वाचे राज्य. पण मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर तेथील राजकीय वर्तुळात एक अभूतपूर्व पोकळी निर्माण झाली आहे. वयाच्या शंभरीकडे वाटचाल करत असलेले  डीएमकेचे ज्येष्ठ नेते करुणानिधी हे आपल्या घरातील कलहामुळे हतबल झाले आहेत. त्यांचे पुत्र आणि पक्षाचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन  हे अधूनमधून हिंदू मंदिरांना भक्तिभावाने भेटी देत आहेत. डीएमके हा हिंदू भावनेचा आदर करणारा पक्ष आहे, असा संकेत देण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. दरम्यान, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात चेन्नई भेटीवर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करुणानिधी यांची स्टॅलिन यांच्या उपस्थितीत सदिच्छा भेट घेतली आहे.
सत्ताधारी अण्णा द्रमुक पक्षातील माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम आणि विद्यमान मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांच्यातील दुरावा वाढतच चालला आहे. पलानीस्वामी यांची पंतप्रधान मोदी यांच्याशी असलेली जवळीकता काही लपून राहिलेली नाही. एकूणच भारतीय जनता पक्ष हा 2019 मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीत तामिळनाडूत जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आणि याच वेळी तामिळनाडूतील काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम् यांचे पुत्र कार्ती चिदंबरम् हे भ्रष्टाचाराच्या जाळ्यात रूतत चालले आहेत. थोडक्यात, तामिळनाडूत काँग्रेस कुठेही स्पर्धेत दिसत नाही.
या पार्श्‍वभूमीवर तामीळ चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज कलावंत रजनीकांत आणि कमल हासन यांच्या नावांची चर्चा होणे अतिशय स्वाभाविक आहे. कारण तामीळ राजकारणातून चित्रपटसृष्टी वजा केली तर काहीच राहणार नाही. तामिळी जनतेने आजवर चित्रपटसृष्टीतील अभिनेत्यांना नेता म्हणून डोक्यावर घेतल्याचा अनुभव आहे. म्हणूनच  भारतीय जनता पक्षाने रजनीकांतला पक्षात आणण्याचा प्रयत्न चालवला होता. दरम्यान, रजनीकांतमध्ये नेता होण्यासाठीचे गुण नाहीत, असे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.
तामीळ जनता सिने नट - नट्यांना स्वीकारते याचा अर्थ प्रत्येक सुपरस्टारमध्ये नेतृत्वगुण असतीलच असे नाही. कदाचित रजनीकांतला याची जाणीव असावी. आपले आरोग्य, वय आणि मर्यादा ओळखून त्याने राजकारणात सक्रीय होणे टाळले असावे असे वाटते.
या पार्श्‍वभूमीवर 63 व्या वर्षी तामीळ अभिनेता कमल हासन गेल्या तीन महिन्यांपासून चर्चेत आहे. हासन याची मानसिक स्थिती जाणून घेण्यासाठी गेल्या तीन महिन्यातील त्याची बदलत गेलेली भूमिका पाहाणे आवश्यक ठरते.
तामिळनाडूत भाजपसाठी अनुकुल वातावरण असल्याचे पाहून कमल हासन सुरूवातीला म्हणाला की, जनतेच्या भल्यासाठी वेळ पडल्यास मी भाजपमध्ये प्रवेश करेन. त्यासाठी सिनेमात काम करणेही सोडून देईन. भाजपला माझी विचारधारा माहीत आहे. राज्याच्या हिताचा विचार केल्यास आणि त्यांना माझ्या विचारधारेचा अडथळा वाटत नसेल तर मी भाजपमध्ये प्रवेश करू शकतो. जनतेच्या भल्यासाठी मी राजकारणात कोणतीही अस्पृश्यता मानत नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कमल हासनची नुकतीच भेट घेऊन पक्षात येण्याचे निमंत्रण दिल्यानंतरचे हासन याचे हे वक्तव्य आहे, हे ध्यानात घेतले पाहिजे.
त्याच्या विवेकवादी भूमिकेबद्दल विचारले असता, तो म्हणाला माझ्या मते विवेकवादी असणे म्हणजे मंदिर उद्ध्वस्त करणे नव्हे. तुम्ही रातोरात कोणाच्याही श्रद्धेला नष्ट करू शकत नाही, ते आपोआप होईल. माझी विचारधारा सर्वश्रूत आहे. काही मार्क्सवादी आणि समाजवाद्यांचा मी चाहता आहे. डावी विचारधारा सोडण्याचा प्रश्‍नच येत नाही. मी केवळ थोडीशी तडजोड करतोय.
काँग्रेस किंवा डीएमकेमध्ये प्रवेश करणार का?, या प्रश्‍नावर तो म्हणतो, मी भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. अशा लोकांसोबत मला जायचे नाही.
म्हणजे, कमल हासन जाणून आहे की काँग्रेस आणि डीएमकेमध्ये भवितव्य नाही. अण्णा द्रमुकमध्ये मुख्यमंत्रीपदाची शक्यताच नाही. या पार्श्‍वभूमीवर भाजप प्रवेश करण्याची त्याची तयारी आहे. परंतु, भाजप त्याला स्वीकारण्यास उत्सुक दिसला नाही. त्याचा परिणाम म्हणजे कमल हासनने मांडलेली वादग्रस्त भूमिका होय.
तामिळ साप्ताहिक ‘आनंद विकटन’ला दिलेल्या मुलाखतीत कमल हासन म्हणतो, ‘हिंदू दहशतवाद अस्तित्वात नाही असे तुम्ही म्हणू शकत नाही. पूर्वी कडवे हिंदू चर्चा करत असत, आता ते हिंसा करतात. हिंदूत्ववादी संघटनांमधे दहशतवाद पसरलेला आहे. ‘सत्यमेव जयते’वरचा हिंदूंचा विश्‍वास उडाला असून बळी तो कान पिळी ही भावना त्यांच्यात बळावते आहे. उजव्या हिंदूत्ववादी संघटना आधी चर्चेवर भर द्यायच्या. त्या आता हिंसेवर भर देत आहेत.’
यावर सर्व स्तरातून टीका होऊ लागली. दरम्यान, 7 नोव्हेंबरला आपल्या वाढदिनी तो नवीन पक्षाची घोषणा करेल अशी चर्चा सुरू असताना त्याने यू टर्न घेतला. त्याने स्वच्छ सांगून टाकले, ‘हिंदूंना दुखवायचा माझा कोणताही हेतू नव्हता. फक्त एखाद्या धर्माच्या नावावर हिंसा करण्याला माझा विरोध आहे. मी कधीही ‘हिंदू दहशतवाद’ या शब्दाचा उल्लेखच केला नाही.’
तीनच महिन्यांत मारलेल्या या कोलांटउड्यांनी हासनला हास्यास्पद बनवले आहे. कमल हासन हा एक प्रतिभावंत अभिनेता असला तरी  नेता म्हणून तो अपरिपक्व असल्याचेच यातून पुढे आले आहे. तो पुढील काळात राजकारणात सक्रीय होईल का, स्वत:चे पक्ष काढेल काय किंवा केरळातील डाव्यांशी हातमिळवणी करून तामिळनाडूत नशीब आजमावेल याचा अंदाज करणे आजच्या क्षणी कठीण आहे. परंतु, स्वत:ला कट्टर मार्क्सवादी समजणारा आणि हिंदूंच्या श्रद्धा नष्ट होण्याची स्वप्ने पाहणार्‍या कमल हासनने हिंदू दहशतवादाचा वाद जाणीवपूर्वकच निर्माण केला असेल, असे म्हणायला पुरेसा वाव आहे. इस्लामी दहशतवादावर मौन बाळगणे आणि काल्पनिक भीती दाखवत हिंदूंचा तेजोभंग करणे ही डाव्या बुद्धीजीवींची रणनीती राहिली आहे.
विश्‍वरूपम

2013 मध्ये कमल हासनचा विश्‍वरूपम हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला काही मुस्लिम संघटनांनी विरोध केला. तामिळनाडूत या चित्रपटावर अघोषित बंदीच घातली. तेव्हा कमल हासनने हा इस्लामी दहशतवाद आहे असे म्हटले नाही. उलट त्याने शेपूट घालण्याची भूमिका घेतली. मुस्लिम संघटनांसोबत बैठक करून विश्‍वरूपम चित्रपटातील 5 दृश्य कापून टाकली आणि मुस्लिम संघटनांची परवानगी घेतली. मुस्लिम गटांनी चित्रपट बंद पाडल्याने 400 दशलक्ष रुपयांचे नुकसान झाले म्हणून रडणारा कमल हासन हिंदू गट दहशतवादी आहेत असे म्हणणे म्हणजे रस्त्यावर सपाटून मार खाल्ल्यावर घरी येऊन त्याचा राग बिचार्‍या बायका - मुलांवर काढणार्‍या भेकड माणसाप्रमाणे झाले. डाव्यांची ही नेहमीची भूमिका राहिली आहे.
साहित्य, कला आणि चित्रपटसृष्टीत अशा कणाहीन भेकडांची एक मोठी जमातच आहे. मुस्लिम किंवा ख्रिश्‍चन कट्टरतावादाविषयी ब्र बोलणार नाहीत, पण काल्पनिक हिंदू दहशतवादाबद्दल रान उठवणार.
 
गिरीश कर्नाड हे तसे मोठे दिग्गज साहित्यिक आणि कलावंत. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त लेखक आणि नाटककार असलेले कर्नाडही टिपू सुलतानची बाजू मांडताना म्हणाले, ‘टिपू सुलतानने फक्त केरळ, तामिळनाडूत कत्तली, बलात्कार आणि धर्मांतर केले. पण त्याने कर्नाटकात आदर्श राजकारभार केला. त्यामुळे त्याला धर्मांध म्हणता येणार नाही.’

टीपू सुलतान हा धर्मांध होता. केरळात त्याने लाखो हिंदू आणि ख्रिश्‍चनांना बळजबरीने बाटवले. मुस्लिम होण्यास नकार देणार्‍या हजारो हिंदूंची त्याने क्रूरतेने कत्तल केली. याचे ढीगभर पुरावे आज उपलब्ध आहेत. तरीही टीपू सुलतानचे उदात्तीकरण करण्यासाठी ही मंडळी आकाशपाताळ एक करतात. पण, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, परमवीरचक्र प्राप्त अब्दुल हमीद आदी महान देशभक्तांना मुस्लिमांचे आदर्श म्हणून सादर करत नाहीत. देशात सर्वाधिक मंदिरे पाडणारा क्रूरकर्मा अल्लाउद्दीन खिलजी. त्याचे उदात्तीकरण करण्यासही ही मंडळी पुढे मागे पाहात नाही. अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य या नावाखाली हे सारे चालते.
गेल्या काही दशकांपासून दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात जिहादी विस्तारवाद सुरू आहे. लव्ह जिहादचे अड्डे राजरोस काम करत आहेत. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात देशातील प्रमुख टीव्ही वाहिन्यांनी पुराव्यासह याचा भांडाफोड केला. पाप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर कारवाई करण्याचे संकेत केंद्र सरकारने दिले. आणि याच वेळी कमल हासनने हिंदू दहशतवादाचा तकलादू मुद्दा चर्चेत आणला. सर्वच धर्मांमध्ये  दहशतवाद असतो पाहा, असे बिंबवण्याच्या रणनीतीचा हा एक भाग असतो. डावे बुद्धीजीवी यात माहीर आहेत. काँग्रेसशी संबंधीत शहजाद पूनावाला यांनी लगेच लिहूनही टाकले की, ‘दहशतवादाला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे. दहशतवाद हा हिंदू अथवा मुस्लिम नसतो. सर्व अतिरेकी हे द्वेष पसरवतात. हे आयसिस आणि आरएसएस दोघांसाठीही खरे आहे.’
1 सप्टेंबर 2017 रोजी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांची भेट घेऊन आल्यानंतर कमल हासन म्हणाला होता की, ‘चित्रपटांमध्ये तुम्ही माझे अनेक रंग पाहिले असतील, पण भगवा नाही.’
पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने केरळमध्ये एका प्राध्यापकाचे हात तोडले कारण त्याने इस्लामी कट्टरतावाद वाढत असल्याचे लिहिले होते. या घटनेवर कमल हासनपासून एकाही कलाकाराने ब्रही काढले नाही. पाॅप्युलर फ्रंट ही लव्ह जिहादचा कारखानाही चालवते. माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी नुकतीच या संघ्टनेच्या व्यासपीठावर हजेरी लावली.

मूळ मुद्दा शिल्लक राहातो की, ही मंडळी असे का वागतात? हिंदू धर्माबद्दल मनात इतका आकस का ? या प्रश्‍नाचे उत्तर आहे हिंदूंमध्ये खोलवर रूजलेली गुलामी मानसिकता. पाप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने केरळमध्ये एका प्राध्यापकाचे हात तोडले कारण त्याने इस्लामी कट्टरतावाद वाढत असल्याचे लिहिले होते. या घटनेवर कमल हासनपासून एकाही कलाकाराने ब्रही काढले नाही. ख्रिश्‍चन आणि इस्लामी विस्तारवादाविरुद्ध कोणी काही बोलले की त्यांना अनेक स्तरावर वाळित टाकले जाते. तुम्ही बोलता ते सत्य असले तरी त्याबद्दल बोलायचे नाही, असे वातावरण अनेक क्षेत्रात आहे. थोर विचारवंत प्रा. शेषराव मोरे यांनी याला ‘पुरोगामी दहशतवाद’ हा शब्द वापरला आहे.
केवळ हिंदू धर्मच इतर धर्मांचे अस्तित्व मानतो. माझा धर्म सत्य त्याप्रमाणे इतरांचेही धर्म सत्य आहेत, हा विचार केवळ हिंदू धर्मातच आहे. त्यामुळे धर्मांतरासारखे प्रकार हिंदू धर्मीय कधीच करत नाहीत. याउलट इस्लाम, ख्रिस्ती आदी धर्म विस्तारवादी आहेत. त्यांच्या मते केवळ त्यांचाच धर्म खरा असतो. त्यासाठीच ते धर्मांतरासारखे प्रकार अवलंबतात. त्यासाठी हिंसा करायलाही ते मागेपुढे पाहात नाहीत. लव्ह जिहाद हे त्याचेच अपत्य. जिहादी आणि ख्रिस्ती विस्तारवादाची मानसिकता असलेले अनेक बुद्धीजीवी समाजाच्या विविध क्षेत्रात सेक्युलरतेचा जप करत वावरतात. आतून जिहादी असले तरी बाहेर धर्मनिरपेक्ष असल्याचे दाखवतात. चर्चप्रेरित अनेक एनजीओ मूलनिवासी, द्रविड चळवळ आदीच्या माध्यमातून हिंदूंना संभ्रमित करत असतात. यातूनच पुरोगामी दहशतवाद फोफावला. याला प्रसिद्धी माध्यमांतील मुख्य प्रवाहाने नेहमीच खतपाणी घातले. परंतु, पुरोगामी थोतांड हे असत्यावर आधारित असल्यामुळे त्याचा पाया ठिसूळ आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडियाचा उदय झाल्यामुळे सत्य झाकून ठेवणे इतके सोपे राहिले नाही. परिणामी, पुरोगामी भोंगळपणा उघड होऊ लागला.
हिंदू दहशतवादाची काल्पनिक भीती दाखवूनही देशात सत्तांतर झाले.  नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. न्यूयॉर्क टाइम्सने या घटनेची नोंद घेताना म्हटले, की, ‘1947 ला भारतातून ब्रिटीश सत्ता गेली असली तरी मे 2014 मध्ये भारत खर्‍या अर्थाने स्वतंत्र झाला.’
प्रखर राष्ट्रवादी विचारांचा नेता नरेंद्र मोदी देशाच्या प्रमुखपदी येणे ही देशाच्या इतिहासातली फार मोठी घटना आहे. जिहादी, ख्रिस्ती विस्तारवादी आणि देशबाह्य निष्ठा असलेल्या शक्तींना याची जाणीव आहे. सत्तांतरानंतर या शक्तीचे कंबरडे मोठ्या मोडले गेले आहे. आपले अस्तित्वच धोक्यात येत असल्याचे पाहून असहिष्णुता वाढल्याचा बनाव करून पाहिला. तरीही अनेक राज्यात हिंदुत्व विचारावर श्रद्धा असणारी सरकारे येऊ लागली.

आता 2019 जवळ येत आहे. 2019 मध्ये कसल्याही परिस्थितीत नरेंद्र मोदी सत्तेत येऊ नये यासाठी सर्व सेक्युलर जमात आकाशपाताळ एक करणार हे तर स्पष्ट आहे. नरेंद्र मोदी यांना रोखता नाही आले तरी फार बहुमताने येणार नाही याची रणनीती आखण्यात येत आहे. त्याचा भाग म्हणून आगामी काळात हिंदू दहशतवादापासून ते खोट्या बातम्या पेरण्यापर्यंत अनेक उपद्व्याप सुरूच राहातील. यामध्ये कमल हासनसारख्यांची अवस्था हास्यास्पद होणे हे ठरलेलेच आहे.

Wednesday, September 13, 2017

प्रिय भारतीय मित्रा

प्रिय भारतीय मित्रा,

हे राष्ट्र संविधानाची निर्मिती होण्याआधीपासून
अस्तित्वात आहे, हे तुला माहीत नाही काय?

भारत १९४७ ला स्वतंत्र झाला याचाच अर्थ
तो त्यापूर्वीही होता.

२३ टक्के मुसलमानांसाठी
भारतभूमी तोडून देण्यात आली.
उर्वरित भारताने तरीही स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणून घोषित केले, त्याचे कारण हिंदू हे स्वभावत:च धर्मनिरपेक्ष आहेत.

जामा मशिदीच्या कट्टर इमामानेही मान्य केले की भारतातील हिंदूंमुळेच हा देश धर्मनिरपेक्ष आहे.

या देशातील लोकांनी घटना तयार केलीय,
त्यामुळे ती धर्मनिरपेक्ष आहे.

घटनेत हिंदुस्थान शब्द नाही म्हणून
काही फरक पडत नाही.
भारत, इंडिया, हिंदुस्थान, जंबुद्विप ही नावे समानार्थी आहेत.

हिंदू म्हणवून घेण्याची लाज कशाला बाळगतो?
अभिमानाने म्हण मी हिंदू आहे.
हिंदू हा देशभक्त आहे.
तो या भूमीचा पुत्र आहे.

आणि हो हे ही खरेच आहे की
काही बुद्धीजीवींना आपण हिंदू असल्याची लाज वाटते,
ते सतत जिहादी प्रव्रुत्तीची तळी उचलतात,
त्यांच्यावर एकांतिक रिलीजन्सचा प्रभाव असतो,
हे जिहादींपेक्षा अधिक घातक असतात,
अभ्यासू पत्रकार तुफेल अहमद यांनी
अशा देशबुडव्या हिंदूंचे वर्णन
"अब्राह्मिक हिंदू" या शब्दावलीत केले आहे.

अब्राह्मिक हिंदू हे स्वत:ला
धर्मनिरपेक्ष अथवा काम्रेड / डावे म्हणवून घेत असतात.
हे लोक मुस्लिमांमधे सुधारणावादी नेत्रुत्व निर्माण होण्यातील सर्वात मोठा अडथळा आहे.

स्वामी विवेकानंद यांनी शिकागोच्या जगप्रसिद्ध भाषणात सांगितले होते की, "सनातन हिंदू धर्म हा नाना धर्मांचे उगमस्थान आहे."

भारतवर्षात उगम पावलेले सर्व पंथ व संप्रदाय (रिलीजन्स) मिळून हिंदू धर्म  बनला आहे. हा विशाल विचार नाकारणारे अब्राह्मिक हिंदू हे स्वत:ला उदार म्हणवतात आणि भारतात उगम पावलेल्या सर्व पंथांना ( उदा. जैन, बौद्ध, लिंगायत आदी) एका सूत्रात बांधणार्या हिंदुत्वाला संकुचित ठरवण्यासाठी आटापिटा करतात.

ब्रह्मदेश तोडून तेथे इस्लामस्थान करण्यासाठी रक्तपात करणारे रोहिंग्या मुसलमान निर्वासित बनतात तेव्हा घळाघळा पाझरणारे सेकुलरवादी ह्रुदय काश्मीरात हिंदू निर्वासित होतात तेव्हा पाषाण बनून जाते.

रोहिंग्या मुस्लिमांना काश्मीरात वसवण्याचे समर्थन अब्राह्मिक हिंदू करतात. पण तेथे निर्वासित हिंदूंना वसवल्यास काश्मीरियतला धोका पोचतो असे सांगून कोकलणारेही हेच असतात.

जेथून हिंदू कमी झाला तो भाग देशापासून तुटला
हे त्यांना माहित नाही असे थोडेच आहे.

काश्मीर, नागालैंडमधे आज ८० टक्के हिंदू असते तर तेथे देशद्रोही डोके वर काढले असते काय?

विवेकानंदांनी १०० वर्षांपूर्वी शिकागो भाषणातून जगाला सांगितलं, "मी अशा धर्माचा प्रतिनिधी आहे की जो म्हणतो, माझा धर्म सत्य आहे तसे तुमचेही धर्म सत्य आहेत."

जगात एवढा उदार धर्म कुठे आहे काय? मग हिंदूस्थान, हिंदू शब्द उच्चारताना लाज कसली?

अभिमानाने म्हण की हा देश हिंदुस्थान आहे. याला भारत, जंबुद्विप, इंडिया अशी अनेक नावे आहेत.

- एक भारतीय

Monday, August 14, 2017

देशभक्तीचे दुसरे नाव : स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद यांचे वर्णन अनेक विद्वानांनी घनीभूत देशभक्ती या शब्दावलीत केले आहे. अतिशय सार्थ असे हे वर्णन आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे गाढे अभ्यासक आणि इतिहासकार संकरी प्रसाद बसू म्हणतात की, 'फ्रान्सच्या क्रांतीवर रूसोचा जेवढा प्रभाव होता किंवा रशिया आणि चीन या देशात घडलेल्या क्रांतीवर मार्क्सचा जेवढा प्रभाव होता, तेवढाच प्रभाव भारतीय चळवळीवर विवेकानंदांचा होता.' भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनातील जवळजवळ सर्वच नेत्यांवर स्वामी विवेकानंदांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभाव होता याचे पुरावे उपलब्ध आहेत. त्यांच्या पाश्चात्य शिष्या भगिनी निवेदिता यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगादान सुवर्णाक्षरांनी नोंदवावे असेच आहे. 

विशेष लेख - सिद्धाराम भै. पाटील
विवेक विचार । ऑगस्ट २०१७ मधून...  

स्वामी विवेकानंदांच्या काळापासून आपल्या देशात खूप मोठे परिवर्तन झाले. त्या काळी तमोगुण, अकर्मण्यता तसेच निष्क्रियता लोकांच्या रोमारोमांत भिनली होती. नाही म्हणायला असंतोष आणि परिवर्तनाची मंद मानसिकता तयार होत होती. परंतु, स्वातंत्र्याविषयी विचार करावे इतके साहसी लोक तेव्हा नव्हते. त्या काळातील अत्यंत प्रबुद्ध व्यक्तीसुद्धा इंग्रजांसमोर सीमित प्रतिनिधित्वाची विनंती, आर्जव करीत होते. ते लोक इंग्रजांची राजवट म्हणजे भारताच्या हितासाठी ईश्वरी संकेत समजायचे. अशा मानसिकतेच्या लोकांमुळे स्वामी विवेकानंद व्यथित झाले होते. स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी यामध्ये मोठे परिवर्तन झाले. ब्रिटिशांच्या गुलामीतील भारतात स्वाभिमान जागवण्याचे काम स्वामी विवेकानंद यांनी केले. 

प्रा. धरमपाल
थोर चिंतक प्रा. धरमपाल यांच्या शब्दांत सांगायचे तर स्वामी विवेकानंदांनी भारतीयांना भारताकडे भारतीय दृष्टिकोनातून पाहायला शिकवलं. त्यांनी निद्रित अवस्थेतील भारताचा आत्मा जागवला. आणि यातून देशात जागृतीचे एक लाट उसळली. विवेकानंदांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन अनेक जण स्वातंत्र्य आंदोलनाचे नेतृत्व करू लागले. देशाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळाले पाहिजे या मागणीमागची प्रेरणाही विवेकानंदच होते. याची परिणिती पुढे जाऊन भारताला स्वातंत्र्य मिळण्यात झाली.
लोकमान्य टिळक यांच्या शब्दांत स्वामी विवेकानंद हे राष्ट्रविमोचनाच्या चळवळीचे पिता होते. कोट्यवधी देशबांधव, शेकडो क्रांतिकारक आणि नेत्यांमधे देशभक्तीची भावना जागवली. यातून भारत स्वतंत्र झाला. स्वामी विवेकानंदांनी केवळ इतकेच कार्य केले असते तरी त्यांचे वर्णन घनीभूत देशभक्ती किंवा देशभक्तीचे दुसरे नाव - स्वामी विवेकानंद या शब्दावलींनी करता आले असते. परंतु, स्वामी विवेकानंदांच्या कार्याचे महत्त्व केवळ येवढ्यापुरते मर्यादित नाही. त्यांच्या कार्याचे इतरही अतिशय महत्त्वाचे आयाम आहेत.

स्वातंत्र्य आंदोलनातील नेते स्वामी विवेकानंदांच्या विचारांशी घनिष्ट बांधलेले होते तेव्हा म्हणजे १९०५ मध्ये कर्झनने देशाची हिंदू-मुस्लिम आधारावर फाळणी केली; त्याविरुद्ध प्रचंड आंदोलन उभे राहिले. ब्रिटिशांना फाळणी रद्द करावी लागली. परंतु, १९४७ च्या सुमारास जेव्हा प्रत्यक्ष स्वातंत्र्य मिळण्याची वेळ आली तेव्हा घात झाला. स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या तत्कालीन धुरीणांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांना सोडचिठ्ठी दिली. भ्रामक विचार आणि स्वार्थ प्रबळ झाला. देशाला स्वातंत्र्य मिळाले पण ते खंडित होते. देशाचे तुकडे झाले. आपल्या देशाची भूमी आज जिहादी इस्लामच्या गुलामीत आहे. जग त्या भूमीला आज पाकिस्तान आणि बांगलादेश म्हणून ओळखते. स्वामी विवेकानंदांच्या विचारांपासून दूर गेल्याचा, एकांतिक धर्मांचा धोका न ओळखल्याचा हा परिणाम होता.
साऱ्या जगाला सर्वधर्मसमभावाचा संदेश देणाऱ्या स्वामी विवेकानंदांनी जिहादी इस्लाम आणि धर्मांतरणाला चटावलेल्या ख्रिस्ती मिशनऱ्यांचा या देशाला असलेला धोका अतिशय स्पष्टपणे सांगितला होता. त्याकडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम आज आपला देश भोगत आहे. खंडित भारतातही एकांतिक धर्मीय धर्मांतराच्या माध्यमातून देशाच्या एकतेला नख लावण्याचे काम करत आहेत. 
काश्मीर, नागालॅन्ड, त्रिपुरा, केरळ आदी राज्यातील धर्मांतरे आणि फुटीर चळवळीचे लोण इतर भागातही पोहोचत आहेत. स्वामी विवेकानंदांच्या वाङमयात या धोक्यावरील उपाय अतिशय नि:संदिग्ध शब्दांत सांगितलेले आहेत. आज या आव्हानाला थोपवण्यासाठी देशात ज्या संस्था आणि व्यक्ती कार्य करत आहेत त्या साऱ्यांची प्रेरणा स्वामी विवेकानंद आहेत. स्वामी विवेकानंदांच्या कार्याचा हा अतिशय महत्त्वाचा आयाम आहे.
स्वामी विवेकानंद हे एक बहुआयामी आणि चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व होते. ते बुद्धिमान होते. त्यांचे भाषेवर विलक्षण प्रभुत्व होते आणि ते उत्कट अंत:करणाचे होते. या सर्वात भर म्हणजे त्यांना एक साक्षेपी गुरू लाभलेले होते, ज्यांच्या सान्निध्यात त्यांना सत्याचा साक्षात्कार झाला होता. त्यामुळे त्यांच्या शब्दांना सामर्थ्य प्राप्त झाले होते आणि त्यांच्यात अंतरंग दृष्टी विकसित झाली होती.
स्वामी विवेकानंदांनी पूर्ण भारतभर भ्रमण केलेले होते आणि भारताच्या बाहेरही त्यांनी बऱ्याच देशांतून भ्रमंती केलेली होती. त्यामुळे त्यांना जगाचे दर्शन अगदी जवळून घेण्याची संधी प्राप्त झाली होती. माणसांच्या कमतरता आणि शक्तिस्थाने, विविध संस्कृती तसेच मानवाच्या जीवनावर प्रभाव गाजविण्याची त्यांची शक्ती यांचेही दर्शन त्यांना घडलेले होते. या संबंधात शतकभरात जगभर झालेले विचारमंथन स्वामी विवेकानंद यांनी समजून घेतले होते.
स्वामी विवेकानंदांनी अनेक प्रकारच्या श्रोत्यांपुढे भाषणे केलेली होती. अतिशय गरीब आणि अतिशय श्रीमंत, अशिक्षित आणि सुशिक्षित, तंत्रकुशल आणि तंत्रज्ञान वंचित, जेते असल्याचा गर्व बाळगणारे उन्मत्त राज्यकर्ते आणि त्यांच्या जुलमी राजवटीखाली दबले जाणारे गुलाम, आस्तिक आणि नास्तिक अशा सर्व प्रकारच्या श्रोत्यांना त्यांनी मार्गदर्शन केलेले होते. 
त्यांनी संबोधित केलेल्या श्रोत्यांमध्ये हे विश्व म्हणजे एका सत्याचाच विस्तार आहे असे मानणारे लोकही होते आणि त्याच्या विपरीत जगाला सश्रद्ध आणि अश्रद्ध अशा दोनच गटात वाटणारे कट्टर धर्मपंथीसुद्धा होते. सर्वांच्या कल्याणासाठी परमेश्वराची प्रार्थना करणारे लोकही त्यांच्या श्रोत्यांत होते आणि आमची देवाची व्याख्या मान्य करतील त्यांचेच फक्त कल्याण होईल असे मानणारे अभिनिवेशी लोकही होते. त्यांना अशा प्रकारे विविध प्रकारच्या श्रोत्यांपुढे भाषणे करावी लागली. त्यांचे भाषण हे त्यांच्या वक्तृत्वाचे प्रदर्शन घडविण्यासाठी होत नसे, तर त्यांचे भाषण म्हणजे त्यांच्या उत्कट अंत:करणाचा सहज आविष्कार असे. त्यांनी लोकांना आध्यात्मिकदृष्ट्या आहे त्या स्तरावरून वरच्या स्तरावर नेण्यासाठीच सातत्याने भाषणे केली. 
भारतात आल्यानंतर त्यांनी भारतीय तरुणांसाठी व्याख्यानांची एक मालिका गुंफली. कोलंबो ते अल्मोडा किंवा भारतीय व्याख्याने या ग्रंथात ही संकलित करण्यात आली आहेत. 
स्वामी विवेकानंद हे विश्व दिग्विजय करून भारताच्या भूमीवर पाऊल ठेवले ते कोलंबो (श्रीलंका) येथे. श्रीलंकेतील जनता तेव्हा स्वत:ला भारतीयच समजत होती हे आपल्या कोलंबोवासीयांनी स्वामी विवेकानंदांना दिलेल्या मानपत्रावरून दिसून येते. कोलंबो येथे स्वामी विवेकानंदांनी दिलेले पहिले व्याख्यान म्हणजे महान राष्ट्रद्रष्टा संन्याशाने दिलेला राष्ट्रमंत्रच होय. या देशाचे पुनरुत्थान कसे करता येईल, यासाठीच्या कार्याची दिशा काय असेल यासंबंधीची स्पष्टता आणि दूरदृष्टी त्यांच्या व्याख्यानातून दिसून येते. भारताच्या पुनरुत्थानाची महान योजना त्यात मांडली आहे. (जिज्ञासूंनी अधिक जाणून घेण्यासाठी भारतीय व्याख्याने हे पुस्तक वाचावे.)
 भारताच्या स्वातंत्र्यलढ्यावर स्वामी विवेकानंदांचा मोठा प्रभाव होता, हे खरे असले तरी केवळ राजकीय स्वातंत्र्यापुरताच तो मर्यादित नव्हता. पुढील हजारो वर्षे भारत परतंत्र होणार नाही याची पायाभरणी त्यांनी केली आणि जगद्गुरू भारताची संकल्पना मांडली आणि त्यासाठीचे तत्त्वज्ञानही उभे केले. 
वेदांत हा भावी जगाचा धर्म असेल असेही त्यांनी सांगितले. भारताने जगाकडून शिकले पाहिजे अशा अनेक गोष्टी आहेत हे खरेच आहे; पण त्या बदल्यात भारताने जगाला अध्यात्माचे ज्ञान दिले पाहिजे. ही भारताची नियती आहे असे ठाम प्रतिपादन स्वामीजींनी केले.
स्वामी विवेकानंद आपल्याला इशारा देतात की, अध्यात्माचा संदेश देणे म्हणजे तत्त्वज्ञान देणे आहे. आपण वर्षानुवर्षे छातीशी कवटाळून बसलो आहेत त्या अंधश्रद्धा आणि रूढी देणे नाही. त्या आपल्याला या आपल्या देशातही नष्ट करायच्या आहेत, फेकून द्यायच्या आहेत. त्या कायमच्या संपाव्यात यासाठी त्यागायच्या आहेत. (खंड ३ पृष्ठ २७७-२७८) 
मानवी जातीचे हे आध्यात्मीकरण कसे होणार आहे? हे सांगताना स्वामीजींनी शत्रूंपासून सावधही केले होते.
प्रतीकात्मक चित्र 
स्वामी विवेकानंदांनी म्हटले होते, ''शूर लोकच जगाचा उपभोग घेऊ शकतात. तुमचे शौर्य दाखवून द्या, त्याचा कालानुरूप आविष्कार घडवा, तुमच्या शत्रूत फूट पाडा, भेद निर्माण करा, वेळ पडल्यास लाच द्या, त्यांच्यात बंडखोरीची पेरणी करा आणि तुमच्या शत्रूविरुद्ध उघड युद्ध पुकारा, त्याला जिंका आणि जगाचा आनंद लुटा. तरच तुम्ही खरे धार्मिक राहाल, अन्यथा इतरांनी तुम्हाला लाथाडले, सतत अपमानित केले आणि तरी तुम्ही ते अपमान गिळून अध:पतित जीवन जगत राहाल, तर तुमचे आयुष्य म्हणजे एक नरकवास ठरेल! नंतर तर तुम्हाला नरकात जावे लागेलच, हेच शास्त्राने सांगितले आहे.''
विजयासाठी वाट्टेल ते करण्याचा संदेश देणारे स्वामी विवेकानंद दुसऱ्या ठिकाणी म्हणतात, ''माझ्या आयुष्यात मी एक मोठा धडा शिकलो आहे की, आपण जे साध्य करतो, ते साध्य तर पवित्र असले पाहिजेच, परंतु त्यासाठी वापरलले साधनसुद्धा शुद्ध असले पाहिजे. किंबहुना मी तर असे म्हणेन की, आपण जे साध्य करतो त्याच्यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा ते कोणत्या मार्गाने साध्य करतो, यावर जास्त लक्ष देणे हेच यशाचे रहस्य आहे.''
या दोन्ही गोष्टी वरवर पाहता परस्परविरोधी वाटू शकतील. परंतु, स्वामी विवेकानंद यांचे समग्र जीवन अभ्यासले तर ध्यानात येईल की, स्वामीजींनी उदात्त विचारांच्या नावाखाली भारतासमोरील धोक्यांकडे दुर्लक्ष केलेले नाही. सर्व धर्म सत्य आहेत.
सर्व धर्मांचा आम्ही आदर करतो असे सांगणारे स्वामीजी एकांतिक धर्मीयांच्या धर्मांतरण आणि विस्तारवादाकडे दुर्लक्ष करत नाहीत. एका हिंदूंने धर्मांतर केल्यास आपली संख्या एकाने कमी होते, इतकेच नाही तर शत्रूची एकाने वाढते हे सांगायलाही स्वामीजी विसरत नाहीत. स्वामीजींनी समर्थ भारतासंबंधी वास्तववादी विचार केला आहे, असे दिसते. 
भारत जगला तर जगाला मार्गदर्शन करेल. भारत जगायचा असेल तर येथील आध्यात्मिक शक्तींचे ऐक्य घडवून आणले पाहिजे. भारताचे ऐक्य म्हणजे भारतातील आध्यात्मिक शक्तींचे ऐक्य होय, असे स्वामीजी सांगतात. स्वामी विवेकानंदांचे विचार हे शाश्वत विचार आहेत. 
बलशाली भारतासाठी स्वामीजी सांगतात, 
''तुमच्या धमन्या बळकट करा. आपल्याला हवे आहेत पोलादी स्नायू आणि पोलादी धमन्या. आपण खूप रडलो आहोत. आता हे रुदन थांबवा. आता आपल्या पायावर उभे राहा आणि 'पुरुष' व्हा. आपल्याला असे पुरुष निर्माण करणारा धर्म हवा आहे. आपल्या मनुष्य-निर्माणाचे सिद्धांत हवे आहेत. आपल्याला सर्वांगीण मनुष्य-निर्माण करणारे शिक्षण हवे आहे. इथेच सत्याची पारख होणार आहे. जे तुम्हाला शारीरिकदृष्ट्या दुबळे करते, बौद्धिक दास्यात टाकते आणि आध्यात्मिक संभ्रमात लोटते त्याला विषसमान मानून अव्हेरा. त्यात काही जीव नाही. ते सत्य नव्हेच. जे आपल्याला सामर्थ्यशाली बनवते तेच सत्य होय. उपनिषदांकडे चला. देदीप्यमान, सामर्थ्य प्रदान करणारे झळाळते तत्त्वज्ञान त्यात आहे. आपल्याला दुबळे करणार्या सर्व गोष्टींपासून दूर राहा. वेगळे व्हा. उपनिषदातली सत्ये आपल्या समोर आहेत. त्यांचा स्वीकार करा. त्यांच्यासह जगायला शिका. भारत भूमीच्या मुक्तीचा मार्ग तुम्हाला गवसेल.'' (खंड ३ पृष्ठ २२४-२२५)
स्वामी विवेकानंदांनी जगाला जागृत करण्याबाबत खूप काही सांगितले आहे पण त्यांनी आपल्यालाही आठवण करून दिली आहे. 
''आम्ही कधी हातात तलवारी घेऊन आमच्या विचारांचा प्रसार केलेला नाही. आमचे काम सावकाश पण मूक, शुभ प्रभाती पडणार्या दंवासारखे न दिसणारे, न ऐकू येणारे, तरीही खूप मोठे ङ्गलदायी, शांत, संयत आहे. सर्व सहन करणार्या आध्यात्मिक स्वभावाच्या जातीचे हे कार्य विचार विश्वात झिरपणारे आहे.''
(खंड ३ पृष्ठ ११०).

----
लोकमान्य टिळक यांच्या मते स्वामी विवेकानंद हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे आध्यात्मिक जनक होते. भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनातील जहाल, मवाळ, क्रांतिकारी अशा सर्वच प्रवाहांवर स्वामीजींचा अमिट प्रभाव होता. गोपाळ कृष्ण गोखले, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, लोकमान्य टिळक, बिपिनचंद्र पाल, ऍनी बेझंट, नेताजी सुभाषचंद्र बोस, वि. दा. सावरकर, महात्मा गांधी, योगी अरविंद, जवाहरलाल नेहरू ते विनोबा भावे यांच्यापर्यंत साऱ्या देशभक्तांवर स्वामी विवेकानंदांचा थेट प्रभाव होता. लोकमान्य टिळक हे स्वामी विवेकानंदांना राष्ट्रविमोचनाच्या चळवळीचे पिता मानत होते.
----
 स्वामीजी हे मातृभूमीचे उत्कट भक्त होते. ते भारताशी तादात्म्य पावलेले देशभक्त होते. भारतभक्ती त्यांच्या नसानसांत होती. भारताचे उत्थान म्हणजे येथील सामान्य माणसाचे उत्थान ही त्यांची धारणा होती. भारतातील एक कुत्राही जोवर उपाशी आहे, तोवर मला मुक्ती नको, असे म्हणण्याचे धाडस करणारा संन्याशी म्हणून त्यांची ओळख आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर म्हणतात, तुम्हाला भारत जाणून घ्यायचा असेल तर आधी विवेकानंद वाचा.
----
ज्यांच्या मनात भारताविषयी प्रेमआणि आस्था नव्हती त्यांनी भारतीयांमधील स्वाभिमान मारला. आपल्या देशातील बुद्धिजीवी भारतावर टीका करण्यात धन्यता मानू लागले. भारतात सुधारणा करायच्या असतील तर भारतावर टीका केली पाहिजे. येथील परंपरांवर आघात केले पाहिजे, अशी एक चळवळ त्याकाळी उदयास आली. स्वामीजींनी ती आत्मवंचना थांबवली. 
भारतासाठी काही चांगले करता येत नसेल तर किमान शिव्याशाप देणे तरी करू नका. आधी भारतावर प्रेमकरा. आपल्या देशबांधवांमध्ये तुम्हाला शेकडो दोष दिसतील, पण ते दोष येथील रक्ताचे आहेत हे विसरू नका. येथील सर्वसामान्यांसंबंधीच्या उत्कटतेतून तुमच्या हृदयात प्रेमस्फुरू द्या. भारतातील दीन दलित आणि गरिबांची सेवा ही मोक्षप्राप्तीपेक्षाही श्रेष्ठ आहे. देशबांधवांप्रतीच्या आत्यंतिक प्रेमातून आपल्या क्षमता विकसित होतात. भारतीय तरुणांच्या क्षमता विकसित होण्यातूनच भारत उभा राहणार आहे. या सर्वसामान्य तरुणांमधूनच माझे कार्यकर्ते पुढे येतील. त्याग आणि सेवा या महान आदर्शांच्या आधारेच भारताचे पुनरुत्थान घडून येईल. माझ्या मृत्यूनंतरही माझे विचार कार्य करत राहतील. तरुणांना जागे करत राहतील, असा विश्वास स्वामी विवेकानंदांनी व्यक्त केला होता. आज शेकडो, हजारो तरुण स्वामीजींच्या विचारांने प्रेरित होऊन भारताच्या कानाकोपर्यांत भारताच्या पुनरुत्थानासाठी कार्य करत आहेत, यातून स्वामीजींचे द्रष्टेपण स्पष्ट होते.
-----------
देशभक्तीसंबंधीची माझी स्वत:ची अशी खास कल्पना आहे. प्रथम तुमच्या अंत:करणात भावना जागृत होऊ द्या. आज तुमचे लक्षावधी देशबांधव उपाशी आहेत, याची तुम्हाला जाणीव आहे का? आपल्या देशावर अज्ञानाच्या अंधाराचे सावट पडले आहे, याची खंत तुम्हाला वाटते का? यामुळे तुम्ही कधी अस्वस्थ होता का? लोकांच्या दु:खामुळे तुम्ही जवळजवळ वेडे होऊन जाता का?... देशभक्तहोण्याच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल आहे.
 ----------
तुमच्या भावना जागृत होतील, परंतु लोकांना या जीवन्मृत अवस्थेतून वर काढण्याचा व्यावहारिक मार्ग तुम्हाला सापडला आहे का? लोकांना त्यांच्या दैन्यावस्थेत कशी मदत करावी, हे तुम्हाला समजले आहे का? पण असे ज्ञान तुम्हाला झालेतरी पुरेसे नाही. तुमच्या मार्गातील अडचणींचे डोंगर ओलांडण्याचा निर्धार तुमच्याजवळ आहे का? उत्कट भावना, समस्यांची सोडवणूक करण्याचा व्यावहारिक मार्ग आणि दुर्दम्य इच्छाशक्ती या तीन गोष्टी जर तुमच्याजवळ असतील, तर तुमच्यापैकी प्रत्येकजण परमेश्वराची कृपा लाभलेल्या या आपल्या देशात अपूर्व चमत्कार घडवून आणू शकेल. देशभक्तीची माझी कल्पना ही अशी आहे. राष्ट्रभक्तीचा महामंत्रच स्वामी विवेकानंदांनी वरील ओळींतून दिला आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ऋषी बंकीमचंद्र यांच्या आनंदमठ या ऐतिहासिक कादंबरीचे एक वेगळे स्थान आहे. कादंबरीच्या शेवटी दिलेला संदेश सामान्य वाचकाला गोंधळात पाडतो. परंतु, स्वामी विवेकानंदांचे जीवनकार्य पाहिले की त्या संदेशाचा अर्थबोध होतो.

तात्कालिक राजकीय संदर्भाने शत्रूशी दिलेला लढा हा आवश्यक असला तरी त्याचा दीर्घकाळ उपयोग नाही. या राष्ट्राच्या शाश्वत मूल्यांसाठी लढा उभारणे, मनुष्य निर्माण करणे हे खरे कार्य आहे. स्वामी विवेकानंदांनी या कार्याची पायाभरणी केली. वर्षामागून वर्षे, शतकामागून शतके जातील तसे हे कार्य वाढत जाणारे आहे. स्वामी विवेकानंदांची काळावर पडलेली सावली ही वाढत जाणारी आहे. मनुष्य निर्माणातून राष्ट्र पुनरुत्थान हा संदेश स्वामी विवेकानंदांनी दिला. त्याग आणि सेवा या शाश्वत मूल्यांचे महत्त्व सांगितले. त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन राष्ट्रासाठी जीवन समर्पित करणाऱ्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शेकडो युवक पुढे येत आहेत. विवेकानंद विचारांच्या मुशीतून घडलेले अनेक जण आज देशाच्या नेतृत्वस्थानी येत आहेत, हा योगायोग नाही; ही या देशाची नियती आहे. 

स्वामी विवेकानंद म्हणतात, 
स्वदेशासाठी सर्वस्व अर्पण करणारे आणि पूर्णपणे निष्कपट असे लोक जेव्हा तुमच्यामधये निपजतील तेव्हा हिंदुस्थानही सर्व दृष्टींनी महान होईल. माणसांनीच तर देश महान बनत असतो. नुसत्या जमिनीच्या तुकड्यात काय आहे.

राष्ट्रभक्तीच्या भावनेचे सर्वोच्च पुरस्कर्ते काय म्हणतात पाहा...  

लोकमान्य टिळक 
दोघे जेव्हा बेलूरला भेटले तेव्हा त्या भेटीत विवेकानंदांनी शत्रूशी मुकाबला करताना अधिक विध्वंसक मार्ग चोखाळण्याचा आग्रह टिळकांपाशी धरला. टिळक हे स्वामी विवेकानंदांना राष्ट्रविमोचनाच्या चळवळीचे, पिता मानित होते.

सुरेंद्रनाथ बॅनर्जी
सुरेंद्रनाथांनी आपल्या बंगाली वृत्तपत्रात विवेकानंद चरित्राचे परीक्षण करताना, कार्लाइलच्या ‘देशाचा इतिहास हा त्याच्या महापुरुषांचा इतिहास असतो’ या वाक्याचा संदर्भ देऊन रामकृष्ण व विवेकानंद यांचे समकालीन महामानव म्हणून उदाहरण दिले.

बिपिनचंद्र पाल
बिपिनचंद्र पाल लिहितात, आपल्या राष्ट्रभक्तीच्या भावनेचे सर्वोच्च पुरस्कर्ते व महापुरुष होण्याचा मान विवेकानंदांचाच आहे. आपल्या देशाबद्दलच्या व संस्कृतीबद्दलच्या ज्वलंत भावनेची तार त्यांनीच प्रथम छेडली.

गोपाळकृष्ण गोखले
गोपाळ कृष्ण गोखलेंच्या धर्मासंबंधी कल्पनांमध्ये विवेकानंदांच्या प्रभावामुळे बदल घडल्याचे दिसून येते. त्यांच्या सामाजिक कल्पना, बहुजन समाजाच्या उद्धारावरील त्यांचा भर याचे स्फूर्तिस्थान विवेकानंद होते हे म्हणणे साधार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, भगवान बुद्ध यांच्यानंतर कोणी महापुरुष या भारतवर्षात अवतरीत झाला असेल तर ते स्वामी विवेकानंद होत.
(संदर्भ : रिमेन्सेस ऑफ नेहरू एज, लेखक : एम. ओ. मथाई)

वि. दा. सावरकर
क्रांतिकारकांचे मुकुटमणी वि. दा. सावरकर लिहितात, 1898च्या सुमारास उभा हिंदुस्थान विवेकानंदांच्या पुस्तकांनी भारला होता. ती पुस्तके आणि व्याख्याने माझ्या बंधूंनी आणि त्यांच्या नादाने मीही वाचली. राष्ट्रासाठी जीवनाचे बलिदान करण्याची प्रेरणा यातूनच मिळत होती.

महात्मा गांधी
आपली देशभक्तीची भावना प्रचंडतेने प्रखर होण्याचे कारण सांगताना महात्मा गांधी म्हणतात, मी विवेकानंदांच्या समग्र वाङमयाचे अध्ययन केले आहे. त्याचमुळे माझ्या ठायी असलेले मातृभूमीवरील प्रेमहजारोपटीने वाढले आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस
सुभाषचंद्र बोस वारंवार हेच लिहित की, त्यांचे जीवन विवेकानंद यांच्या प्रभावाखाली घडवले गेले; आणि युवकांनीही विवेकानंदांचा आदर्श समोर ठेवावा असाच त्यांचा आग्रह असे. त्यांच्या मते, चारित्र्य निर्माणाचा सर्वोच्च आदर्श देशापुढे जर कुणी ठेवला असेल तर तो विवेकानंदांनी. 

रवींद्रनाथ टागोर
रवींद्रनाथ टागोर लिहितात, तुम्हाला भारत जाणून घ्यायचा असेल, तर स्वामी विवेकानंदांचा अभ्यास करा. स्वामी विवेकानंदांनी मानवाच्या संपूर्ण विकासाचा मूलमंत्र दिला व त्यातून देशाच्या उद्धारासाठी अनेक तरुण कार्यप्रवृत्त झाले व अनेकांनी सर्वोच्च त्यागही केला.

जवाहरलाल नेहरू
चिनी आक्रमण होत असताना तरुणांपुढे आदर्श म्हणून ठेवण्यास नेहरुंनी सामर्थ्याची व तेजाची मूर्तिमंत प्रतिमा असलेल्या विवेकानंदांची निवड केली.विवेकानंदांबद्दल ते म्हणतात : ते कोणी राजकारणी नव्हते... आणि तरीही भारतातील राष्ट्रीय आधुनिक चळवळ सुरू करणारे ते एक थोर संस्थापक होते.

इंदिरा गांधी
इंदिरा गांधी यांचा स्वामी विवेकानंदांनी स्थापन केलेल्या रामकृष्ण मठाशी घनिष्ट संबंध होता. भारतीय तरुणांसमोर स्वामी विवेकानंदांचा आदर्श असला पाहिजे, अशी त्यांची भावना होती. १२ जानेवारी हा विवेकानंद जयंतीचा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून घोषित करण्याचे त्यांनीच ठरवले. राजीव गांधी यांनी या निर्णयाला मूर्त रूप दिले.

सर्वपल्ली राधाकृष्णन
डॉ. राधाकृष्णन म्हणतात, मातृभूमीच्या चैतन्याची विवेकानंद प्रत्यक्षमूर्ती होते. तिच्या आध्यात्मिक आशा आकांक्षा व त्यांची परिपूर्ती याचे ते प्रतीक होते. आणि हेच ते चैतन्य की जे आमच्या भक्तजनांच्या काव्यातून, द्रष्ट्यांंच्या तत्त्वज्ञानातून, पूजा प्रार्थनांतून व्यक्त झाले.

डॉ. एपीजे कलाम
डॉ. एपीजे कलाम म्हणतात, लोकांमध्ये विवेकानंदांच्या संदेशाचा प्रचार आणि प्रसार करणे खूप महत्त्वाचे आहे. मानव सेवा आणि मनुष्य निर्माण या संबंधात स्वामीजींची किमान १० बोधवाक्ये आधुनिक इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि चमकणार्या बोर्डाद्वारे जागोजागी प्रचारित केली पाहिजेत. आणि लोकांना आवाहन केले पाहिजे की त्यांनी यातील किमान एका संदेशाचे जीवनभर पालन करावे.

नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा मोठा प्रभाव आहे. श्री. मोदी हे १७ वर्षांचे असताना स्वामी विवेकानंदांच्या पुस्तकांमुळे अतिशय प्रभावित होऊन सत्याच्या शोधासाठी घराबाहेर पडले होते. संन्याशी बनण्यासाठी राजकोट येथील रामकृष्ण मठात गेले होते. त्यांच्यावरील विवेकानंदांच्या प्रभावामुळेच द गार्डियनने आपल्या संपादकीयात लिहिले, १६ मे २०१४ पर्यंत भारतात ब्रिटिशांचेच राज्य होते आणि नरेंद्र मोदी यांच्या निवडीमुळे भारत खर्या अर्थाने स्वतंत्र झाला.

-------

स्वामी विवेकानंदांनी आधुनिक काळामध्ये जगद्गुरू भारताची संकल्पना मांडली. समर्थ भारताशिवाय जगद्गुरू भारत ही संकल्पना अस्तित्वात येऊ शकत नाही, याची जाण स्वामीजींना होती.

स्वामी विवेकानंदांनी स्वातंत्र्य आंदोलनाला गती दिली, इतकेच नाही तर पुढील काळात भारत कधीच परतंत्र बनणार नाही यासाठीची पायाभरणीही केली. जे कार्य त्यांच्या पश्चातही हजारो वर्षे चालू राहणार आहे. आणि वृद्धिंगत होत राहणार आहे.

स्वामी विवेकानंद म्हणतात,
मी भविष्यकाळात डोकावून पाहात नाही. तसे करण्याची मला आवश्यकता वाटत नाही. पण एक चित्र माझ्या दृष्टीपुढे साक्षात् उभे राहते : ही प्राचीन माता पुन्हा एकदा जागी झाली आहे. सर्व वैभवांसह पुनश्च आपल्या सिंहासनावर आरूढ झाली आहे. शांतिमंत्रांनी आणि आशीर्वचनांनी तिचे आगमन जगापुढे प्रकट करू या !

विवेकानंद केंद्राचे मासिक - विवेक विचार । ऑगस्ट २०१७ मधून साभार vivekvichar.vkendra.org

Thursday, August 3, 2017

घनीभूत देशभक्ती : स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद यांच्याविषयी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, सर्वपल्ली राधाकृष्णन, एपीजे कलाम आणि नरेंद्र मोदी आदी प्रभावी नेत्यांनी केलेला उल्लेख पाहता विवेकानंद यांना घनीभूत देशभक्ती म्हणणे सार्थ ठरते. विवेक विचार । आॅगस्ट २०१७ मधून

विवेकानंद केंद्राचे मासिक - विवेक विचार । ऑगस्ट २०१७ मधून साभार 
vivekvichar.vkendra.org

देशभक्तीचे दुसरे नाव - स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद यांच्याविषयी लोकमान्य टिळक, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, वि. दा. सावरकर, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, गोपाळकृष्ण गोखले, सुरेंद्रनाथ बॅनर्जी आदी महापुरुषांनी केलेला उल्लेख पाहता विवेकानंद यांना घनीभूत देशभक्ती म्हणणे सार्थ ठरते. विवेक विचार । आॅगस्ट २०१७ मधून

Wednesday, June 21, 2017

योग आणि बौद्ध धम्म - साम्यस्थळे आणि वेगळेपण

डेव्हिड फ्राॅली,

विविध धर्मांचे साक्षेपी अभ्यासक. भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने गौरव केला.

योग आणि बौद्ध धम्म या प्राचीन भारताच्या आध्यात्मिक संस्कृतीतून विकसित झालेल्या भगिनी परंपरा आहेत. या दोन्ही परंपरांमध्ये अनेक संज्ञा एकसारख्या आहेत. अनेक तत्त्वं आणि उपासना एकसारख्या आहेत. यामुळेच माझ्यासारख्या पाश्चात्त्य देशात जन्म झालेल्या माणसाला सुरुवातीच्या काळात तरी योग आणि बौद्ध धम्माची शिकवण एकसारखी वाटते, यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही.

वास्तविक पाहता या दोन्ही परंपरांमध्ये फरक नसल्यामुळे त्यातील शिकवण आणि साधना यांचा आम्ही एकत्र अभ्यास करू शकतो. ऐतिहासिकदृष्ट्या या दोन्ही पद्धतींमध्ये अस्तित्वात असलेल्या वेगळेपणामुळे त्यांना स्वतंत्र परंपरा म्हणून वेगळे ठेवले आहे. परंतु आमच्यासारख्या पाश्चिमात्यांच्या दृष्टीने या दोन्ही परंपरांत वेगळेपणापेक्षा समानताच अधिक आहे किंवा या दोन्हींपैकी एका परंपरेचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तीची समजूत अशी होऊ शकते की, त्या परंपरेचा दुसऱ्यावर प्रभाव पडला आहे.
बौद्ध धम्माचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तीस योगामध्ये इतकी समानता आढळून येईल की, त्याला वाटू शकते की योगावर बुद्ध धम्माचा मोठा प्रभाव आहे. योगाचे अध्ययन करणाऱ्याला बौद्ध धम्मात इतकी समानता आढळून येईल की, त्याला वाटू शकते बुद्ध धम्मावर योगशास्त्राचा अमिट प्रभाव आहे.
तथापि, या दोन महान आध्यात्मिक परंपरांतील समानता शोधण्याची जिज्ञासा फक्त पश्चिमेपुरती मर्यादित नाही. पश्चिमेकडे योगशास्त्र सर्वप्रथम आणण्याचे श्रेय महान योगी स्वामी विवेकानंद यांना जाते. ते वेदांती होते. त्यांनी बौद्ध महायान ग्रंथावर भाष्य केले आहे. बौद्ध तत्त्वज्ञानाची प्रमुख तत्त्वे आणि वेदांत तत्त्वज्ञान हातात हात घालून जातात, हे त्यांनी पुरेसे स्पष्ट करून सांगितले आहे. अलीकडच्या काळात आध्यात्मिक गुरू दलाई लामा यांच्यासह तिबेटी निर्वासित मोठ्या प्रमाणात भारतात आले. त्यानंतर या दोन्ही परंपरांमध्ये सुसंवाद होऊन परस्परांविषयी आदरभावना वाढीस लागल्याचे दिसते. तिबेटी बौद्ध अनेकदा हिंदूंच्या धार्मिक संमेलनांमध्ये सहभागी होताना दिसतात आणि सर्व प्रकारच्या चर्चा, विचारविनिमय यामध्येही भाग घेतात.

अलीकडच्या काळातील संदर्भ घेऊन दोन परंपरा जोडणे हा माझा उद्देश नाही. हिंदू-बौद्ध एकत्रीकरणाची अनेक उदाहरणे इतिहासात दिसून येतात. बुद्ध स्वत: हिंदू धर्मात जन्मले होते आणि काही विद्वानांनी असा दावा केला आहे की, गौतम बुद्ध यांच्या महानिर्वाणानंतर अनेक वर्षांपर्यंत हिंदू धर्मापेक्षा वेगळा धर्म म्हणून बुद्ध धम्म अस्तित्वात नव्हता. मध्ययुगीन काळात इंडोनेशियामध्ये शिव-बुद्धांची उपासना अस्तित्वात होती. अनेक तांत्रिक योगींना हे सांगणे अवघड आहे की, ते हिंदू आहेत की बौद्ध. मध्ययुगीन काळात हिंदूंनी विष्णूचे अवतार म्हणून बुद्ध स्वीकारले आणि बहुतेक हिंदू अजूनही मानतात की, आपण बुद्ध-अवतार युगात आहोत. बहुतांश हिंदू गौतम बुद्धांची उपासना करत नसले तरी गौतम बुद्ध हे महान ऋषी असल्याची त्यांची श्रद्धा आहे.

असे असले तरी समानतेची सूत्रे बाजूला ठेवल्यास दोन्ही परंपरांमध्ये काही मतभेद आहेत, हे आपण नाकारू शकत नाही. मतभेद आणि वादविवाद यामुळेच या दोन्ही परंपरा आजवर पूर्णपणे एकजूट होऊ शकल्या नाहीत. दोन्ही परंपरांतील काही प्रथा आणि इतर बाबी आजपर्यंत वेगळ्या चालत आल्या आहेत. सामान्यतः हिंदू योग परंपरेने गौतम बुद्धांची वेदांतिक प्रकाशात पुनर्मांडणी केली आणि बुद्धांना आपल्यात सामावून घेण्याचा प्रयत्न केला. बौद्ध धर्माने मात्र आपले वेगळेपण जपण्याचा आटोकाट प्रयत्न केल्याचे दिसते. वैदिक आस्तिकता आणि स्व:च्या उच्च स्वरूपाला असलेली वैदिक मान्यता या दोन्ही बाबींशी असलेली असहमती बौद्ध परंपरेने जपली आहे.
बहुतेक हिंदू आणि बौद्ध गुरूंनी (यामध्ये विविध योग संस्था चालवणारे हिंदू आणि तिबेटी बौद्धही आले) आपल्या शिकवणीमध्ये विवेकभाव आणणे आवश्यक आहे. विशेषत: साधना आणि अंतर्दृष्टी याचा सूक्ष्म स्तरावर विचार करताना. योगविषयक ग्रंथांमध्ये आपल्याला अनेक ठिकाणी बौद्ध मताचे खंडन केल्याचे दिसते आणि बौद्ध ग्रंथांमध्ये अनेक ठिकाणी योग आणि वेदांत मताचे खंडन केल्याचे दिसते. म्हणूनच आपण या दोन परंपरांतील साम्यस्थळांचा गौरव करताना त्यांतील मतभेदांकडे दुर्लक्ष करू शकत नाही.

योग परंपरा
शास्त्रीय योग प्रणालीचा विचार करता ही प्रणाली ऋषी पतंजली यांनी योगसूत्रांद्वारे मांडली. पतंजली ऋषींनी मांडलेली प्रणाली ही मोठ्या वैदिक परंपरेचा केवळ एक भाग होता. ऋषी पतंजली यांच्याकडे योग परंपरेचे संस्थापक म्हणून कधीही पाहिले गेले नाही, हे ध्यानात घेतले पाहिजे. योगशास्त्राचे संकलक म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जाते. आधीपासून चालत आलेल्या परंपरेचा आधार घेत त्यांनी अष्टांगयोगाचा मार्ग सांगितला. यामध्ये नैतिक शिस्त (यम आणि नियम), आसन, श्वसनाद्वारे प्राणशक्तीचे नियमन (प्राणायाम), इंद्रियांचा निग्रह (प्रत्याहार), एकाग्रता (धारणा), ध्यान आणि समाधी यांचा समावेश होतो.
योगाकडे पाहण्याचा हा आठ आयाम असलेला दृष्टिकोन बहुतेक हिंदू विचाराच्या संस्थांमध्ये स्वाभाविकपणे दिसून येतो. पुराणे, महाभारत आणि उपनिषद आदी पतंजलीपूर्व साहित्यात योगासंबंधीची ही मूलभूत चर्चा दिसून येते. योग परंपरेचा उगम हिरण्यगर्भापासून झाला असे मानले जाते. हिरण्यगर्भ हा विश्वातील सृजनशील आणि उत्क्रांती शक्तीचे प्रतीक आहे.
ऋग्वेदामध्ये योगाचा शोध घेतला जाऊ शकतो, जो हिंदूंचा सर्वात प्राचीन ग्रंथ समजला जातो. या ग्रंथामध्ये मनाचा संयम आणि सत्याकडे घेऊन जाणाऱ्या अंतर्ज्ञानाबद्दल वर्णन आले आहे. योगाच्या सुरुवातीच्या महान गुरूंमध्ये वशिष्ठ, याज्ञवल्क आदी महान वैदिक ऋषींचा समावेश होतो. भगवान श्रीकृष्ण हे सर्वात महान योगी होते. म्हणूनच त्यांना योगेश्वर असे म्हटले जाते. भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितलेल्या भगवद््गीतेला योगशास्त्रही म्हटले जाते. हिंदू देवतांपैकी भगवान शिव यांना आदियोगी म्हटले जाते. म्हणूनच शास्त्रीय योग आणि बौद्ध धम्म यांची तुलना करताना सामान्यपणे बौद्ध आणि हिंदू मत (त्यातही विशेषकरून हिंदू धर्मातील योग आणि वेदांताचा भाग) यांची तुलना करावी लागते.
काही लोक, विशेषतः पश्चिमेमध्ये, असा दावा केला जातो की, "योग हिंदू किंवा वैदिक नसून एक स्वतंत्र किंवा अधिक सार्वभौमिक परंपरा आहे. ते दाखवतात की हिंदू शब्द योगसूत्रांत दिसत नाही आणि योगसूत्रांचा हिंदुत्वाच्या मूलभूत उपासनापद्धतींशीही काही संबंध नाही.’ वरवरचे वाचन करणाऱ्यांना असेच दिसते. योगसूत्रे ही हिंदू आणि वैदिक तत्त्वज्ञानाच्या तांत्रिक संज्ञांसह प्रचलित आहेत. ग्रंथांमध्ये या संज्ञांचे विस्तृत आणि तपशीलवार विवरण आढळून येते. 

योगशास्त्र हे वेद, भगवद््गीता आणि उपनिषद यांचा अधिकार स्वीकार करणाऱ्या वैदिक तत्त्वज्ञानाच्या सहा दर्शनांतील एक आहे. या परंपरेतील भाष्यकारांनी हे ठळकणे पुढे आणले आहे. बृहद योग याज्ञवल्क्य स्मृती हा प्रारंभिक योगशास्त्रावरील एक महान ग्रंथ आहे. यामध्ये आसन आणि प्राणायाम साधनेसह वैदिक मंत्र आणि उपासना याविषयीचे वर्णन आहे. अनेक संख्येने असलेल्या योग उपनिषदांमध्येही असेच वर्णन आहे. एखाद्याने या महान परंपरेला दूर सारून योग सूत्रांचा अभ्यास करायचा प्रयत्न केला तर तो मार्ग चुकणार हे निश्चित आहे. कारण योगसूत्र हे केवळ सूत्र रूपात आहेत. सूत्र म्हणजे अतिशय छोटी वाक्ये आहेत. बहुतेक वेळा अर्धवट भासणारी ही वाक्ये विस्तृत भाष्याशिवाय जवळजवळ अर्थहीन ठरतात किंवा त्या सूत्रांतून अनेक अर्थ निघू शकतात. त्यामुळे एखाद्याला योग सूत्र आणि योग परंपरेचा अभ्यास करायचा असेल तर त्याने केवळ त्या विषयावर आधुनिक काळात व्यक्त होणाऱ्या मतांचा विचार करून चालणार नाही. संबंधित सूत्राचा विचार अधिकृत ग्रंथ, भाष्य आदींचा आधार घेतच करावा लागेल.
पश्चिमेकडील योग शिक्षकांसह अनेकजण म्हणतात की योग हा धर्म नाही. हा मुद्दा विचार करण्यासारखा असला तरी यातून प्रामुख्याने दिशाभूल करण्याचाच अधिक प्रयत्न असतो. योग हा ईश्वर किंवा तारणकर्त्याकडे जाण्याचा आम्ही सांगतो तोच एकमेव मार्ग खरा आहे. अशा प्रकारचा प्रचार करणाऱ्या कोणत्याही धार्मिक शिकवणीचा भाग नाही. भारतातील योग शिक्षक हे त्यांच्या विद्यार्थ्यांनी औपचारिकरीत्या हिंदू धर्म स्वीकारला पाहिजे यासाठी कधीच आग्रह करत नाहीत, हे खरेच आहे. असे असले तरी योग हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा भाग आहे आणि हिंदू धर्माच्या सर्व पैलूंशी आणि भारतीय संस्कृतीशी तो जोडलेला आहे. योग हा आत्मा, ईश्वर आणि अमरत्वाचे स्वरूप उलगडून दाखवतो, जे संपूर्ण जगभरातील धर्मांचे प्रमुख विषय आहेत. योग हा केवळ व्यायाम किंवा आरोग्याशी संबंधित नसून  धर्म (रिलीजन या अर्थाने नव्हे) हा त्याचा मुख्य विषय आहे. योग हा प्रामुख्याने धर्माच्या आध्यात्मिक बाबींशी निगडित असला तरी तो उपासनापद्धतींशी संबंधित किंवा संस्थात्मक स्वरूपाचा नाही.
स्वैर अनुवाद : सिद्धाराम
साभार : विवेक विचार । जून २०१७
vivekvichar.vkendra.org

Wednesday, June 7, 2017

विवेक विचार । जून २०१७

विवेक विचार जूनचा अंक वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
विवेक विचार । जून २०१७

Wednesday, May 10, 2017

विवेक विचार मासिकाचे जुने अंक एकत्रित

विवेक विचार : मे २०१७ 
विवेक विचार : एप्रिल २०१७
विवेक विचार : मार्च २०१७
विवेक विचार : फ़ेब्रुवारी २०१७
विवेक विचार : जानेवारी २०१७
विवेक विचार : डिसेंबर २०१६
विवेक विचार : दीपावली विशेषांक २०१६
विवेक विचार । सप्टेंबर २०१६
विवेक विचार । आॅगस्ट २०१६
विवेक विचार । जुलै २०१६
विवेक विचार । जून २०१६ । योग विशेषांक
विवेक विचार । मे २०१६ । महाराणा विशेषांक
विवेक विचार । एप्रिल २०१६ । सर्वस्पर्शी बाबासाहेब
एप्रिल २०१५
एप्रिल 2014मार्च २०१३ चा अंक
फेब्रुवारी २०१३
डिसेंबर २०१२

दिवाळी अंकविवेक विचार ब्लॉग
विवेक विचार सदस्यता अर्ज

VivekanandaQuotes

ज्ञानप्रबोधिनीचे ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा ताम्हणकर यांचे निधन

प्रतिनिधी । सोलापूर
ज्ञानप्रबोधिनीचे  ज्येष्ठ कार्यकर्ते वसंत सीताराम तथा आण्णा ताम्हणकर (वय ८५) यांचे मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास निधन झाले. मायस चिनिया ग्रेविस या आजाराने ते ग्रस्त होते. त्यांच्यावर सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांनी येथील वैद्यकीय महाविद्यालयास देहदान केले होते. ज्ञानप्रबोधिनीच्या उपासना मंदिरात देहदान विधी झाल्यानंतर त्यांचे पार्थिव वैद्यकीय महाविद्यालयास सुपूर्द करण्यात आले. ताम्हणकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, ज्ञानप्रबोधिनीचे द्वितीय संचालक, अनेक वर्षे कार्याध्यक्ष आणि ज्ञानप्रबोधिनीच्या हराळी (ता. लोहारा) येथील केंद्राचे प्रमुख होते.
वयाच्या विशीत रा. स्व. संघाच्या संस्कारामुळे आपले संपूर्ण जीवन राष्ट्रकार्यासाठी समर्पित करायचे ठरवले आणि शेवटपर्यंत ते समाजासाठी झटत राहिले. पुणे विद्यापिठातून सुवर्णपदकासह एमए एमएड केल्यानंतर शैक्षणिक मानसशास्त्र या विषयात आण्णांनी विजिगीषु प्रेरणा हा संशोधन प्रबंध सादर करुन डाॅक्टरेट मिळवली. १९६२ मध्ये कै. आप्पा पेंडसे यांनी शिक्षण, संशोधन, ग्रामविकास आणि उद्योग या क्षेत्रात नवरचना व मनुष्यघडणीचे कार्य करणाऱ्या ज्ञानप्रबोधिनी या संघटनात्मक संस्थेची स्थापना केली.
१९६३ ते ६८ या काळात पुणे विद्यापिठाच्या मानसशास्त्र विभागात अध्यापन आणि त्यानंतर ज्येष्ठ संशोधक म्हणून कार्य केले. १९६९ ते १९८२ या संपूर्ण एका तपात आण्णांनी पुण्याजवळील शिवगंगा खोऱ्यात यंत्रशाळेचे प्रशासक म्हणून कार्य केले. एक हजार ग्रामीण तरुणांना यांत्रिकी विद्येतील प्रशिक्षण दिले. यंत्रशाळा उभारून अल्पशिक्षित ग्रामीण तरुणांतून अनेक उद्योजक उभे केले. १९७२ ते १९८३ या काळात ज्ञानप्रबोधिनी या मातृसंस्थेचे कार्यवाह झाले. १९८३ मध्ये आप्पा पेंडसे यांच्या निधनानंतर आण्णा यांनी प्रबाधिनीचे द्वितीय संचालक म्हणून सहा वर्षे धुरा वाहिली.
१९८९ मध्ये सोलापुरात ज्ञानप्रबोधिनीच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी आण्णा आपल्या कर्तत्वशाली कार्यकर्त्यांसह दाखल झाले. त्यापूर्वी त्यांनी शिवगंगा, गुंजवणी नद्यांच्या परिसरात पुण्याजवळी विविध ग्रामविकास कार्यांची उभारणी केली. दारुबंदी आंदोलन, बिहार भूकंपानंतर ११५ कार्यकर्त्यांसह तेथे जाऊन सेवाकार्य, खलीस्तानी अतिरेक्यांच्या चळवळीने पेटलेल्या पंजाबात सद््भावयात्रा, कोचीन येथील १९८३ च्या सर्वधर्म परिषदेत सहभाग, युरोपात तीन महिन्यांचा व्यवस्थापन शास्त्राचा अभ्यास, प्रबोधिनीच्या कार्याचा परिचय करून देण्यासाठी अमेरिका दौरा असे कार्य केले. पुणे, सोलापूर, निगडी आणि हराळीत प्रबोधिनीच्या कलशविराजित वास्तू निर्माण केल्या.
सोलापुरात आण्णा आणि डाॅ. स्वर्णलता भिशीकर यांच्या मार्गदर्शनातून प्रबोधिनीच्या रुपाने शिक्षण व संस्कार केंद्र उभे राहिले. फेब्रुवारी २००० पासून दक्षिण मराठवाड्याच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील हराळी या भूकंपग्रस्त गावी आधुनिक साधनांनी संपन्न शिक्षणतीर्थ उभे करण्याचा संकल्प करण्यात आला. हराळी, नारंगवाडी, तोरंबा, किल्लारी या परिसरातील अनेक गरजूंना कर्जे देऊन त्यांचे व्यावसायीक पुनर्वसन केले. तसे १९९५ ला हराळीत प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू केली. ३०० विद्यार्थ्यांचे निवासी गुरुकुल सुरू केले. १९९५ ते २००० या काळात ७ हजार फळवृक्षांची लागवड, नऊ एकरचे सत्तर एकर झाले. शेतकऱ्यांसाठी बाजार माहिती केंद्र, रोपवाटिका, शेततळी, गांडूळ खत निर्मिती, फलप्रक्रिया उद्योग, कृषी पदविका अभ्यासक्रम असे अनेक उपक्रम सुरू झाले.
**
आजवर मिळालेले पुरस्कार
शैक्षणिक योगदानाबद्दल डोंबिवलीच्या टिळक शिक्षण संस्थेतर्फे कै. वसंत गोवारीकर यांच्या हस्ते तेजस पुरस्कार, औरंगाबादच्या नवनीत प्रकाशनतर्फे जीवनगौरव पुरस्कार, माधवराव चितळे यांच्या हस्ते पुण्याचा निसर्गमित्र पुरस्कार, अंबरनाथचा दधीची पुरस्कार, कऱ्हाडचा प्रभुणे पुरस्कार.

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी