Sunday, June 2, 2013

नक्षलींचा आतंक आणि अपयशाचे महामेरू!

देवेंद्र गावंडे
२००६च्या फेब्रुवारी महिन्यातला एक दिवस. तारीख आता नक्की आठवत नाही, पण छत्तीसगडमधील बिजापूरजवळच्या गंगालूर गावात हजारो आदिवासी एकत्र आलेले.. 'सलवा जुडूम'च्या नावावर गोळा झालेले व नक्षलवाद्यांच्या विरुद्ध उघडपणे नारेबाजी करणारे हे आदिवासी, त्यांचे नेते महेंद्र कर्माच्या आगमनाची वाट बघत आहेत. कर्मा येताच साऱ्यांमध्ये संचारलेला जोश, त्यानंतर गाजलेली सभा, त्यातील कमार्ंचे मुख्य भाषण, सारे कसे आता स्वप्नवत डोळय़ासमोरून सरकत आहे. त्यानंतरचा गेल्या आठवडय़ातला २५ मेचा दिवस. सात वषार्ंनंतर आलेला. कर्मा ठार झाले हे ठाऊक असूनसुद्धा २०० नक्षलवादी त्यांच्या पार्थिवावर गोळय़ा झाडत आहेत. त्याआधी चाकूचे ७८ वार कर्माच्या देहाने झेलले. एका लोकनेत्याला आलेल्या या अत्यंत निर्घृण आणि दुर्दैवी मरणाबद्दल सध्या देशात सर्वत्र हळहळ, संताप व्यक्त होत असला तरी नक्षलवाद्यांच्या या भ्याड हल्ल्याने अनेक प्रश्न आता उपस्थित केले आहेत.

पुन्हा तोच प्रश्न : आंबेडकर की मार्क्‍स?

मधु कांबळे
आंबेडकरी चळवळीतील लढाऊ कार्यकर्ते किंवा तरुण नक्षलवादाकडे आकर्षित होत आहेत का, अशी एक गंभीर चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे. या निमित्ताने दलित चळवळीमध्ये मार्क्‍सवाद की आंबेडकरवाद हा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. विद्रोह हा आंबेडकरी चळवळीचा स्थायिभाव आहे. परंतु या चळवळीने कधीच उग्रवादाचे समर्थन केलेले नाही. दुसरीकडे  छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी नुकताच केलेला हल्ला या प्रश्नावर कायम गुळमुळीत भूमिका घेणाऱ्या काँग्रेससारख्या बडय़ा राजकीय पक्षाला आत्मचिंतन करायला भाग पाडणारा आहे.  नेत्यांवर हल्ला करण्याचे धाडस नक्षलवाद्यांना राजकीय कुरघोडीतूनच आल्याचे दिसत आहे. हिंसाचार कुठलाही असो, त्याविरुद्ध कणखर भूमिका घेणे गरजेचे आहे. केवळ काँग्रेसच नाही तर सर्वच राजकीय पक्षांनी अशी भूमिका घेतली तरच अशा चळवळी मोडून काढता येणे शक्य आहे..

प्रकाश आंबेडकरांचा नातेवाईकच नक्षलवाद्यांचा 'मास्टरमाईंड' !

भास्कर न्यूज नेटवर्क   |  May 30, 2013, 17:22PM IST
नवी दिल्ली- 'दंडकारण्य' या संस्कृत शब्दाचा अर्थ 'जेथे शिक्षा दिली जाते असे जंगल' असा होतो. आंध्र प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, ओडिशा आणि मध्य प्रदेशच्या स‍ीमावर्ती भागात सुमारे 93 हजार किलोमीटर परिसरात दंडकारण्य (नक्षलवादी व्याप्त भाग) पसरले आहे. विशेष म्हणजे या भागात 'समांतर सरकार' चालवणारा 47 वर्षीय मिलिंद तेलतुंबडे याचे  नाव मोठ्या आदराने घेतले जाते. भा‍रिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांच्या बहिणीचे पती आनंद तेलतुंबडे यांचा मिलिंद हा भाऊ आहे. मिलिंद तेलतुंबडे हा महाराष्ट्रातील सीपीआयचा (माओवादी) सचिव असून सध्या तो फरार आहे.

‘राज’कडून वर्षा बनसोडेंना लोकसभेसाठी विचारणा

सिद्धाराम पाटील | May 31, 2013, 11:31AM IST
सोलापूर-  आगामी लोकसभा निवडणुकांना आणखी वर्षभराचा अवधी असला तरी राजकीय चाचपणी आणि जुळवाजुळव याला कधीच सुरुवात झाली आहे. अ‍ॅड. शरद बनसोडे यांनी आगामी निवडणूक लढवणार नाही, असा निर्णय बुधवारी जाहीर केला. रिपाइंचे नेते रामदास आठवले हे महायुतीकडून सोलापुरात उमेदवारी दाखल करतील अशी चर्चा आहे. दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी अ‍ॅड. बनसोडे यांच्या पत्नी वर्षा बनसोडे यांना सोलापूर लोकसभेसाठी विचारणा केल्याचा दुजोरा शरद बनसोडे यांनी दिला आहे.

विवेकानंदांनी पाहिले आधुनिक भारताचे स्वप्न - प्रणव मुखर्जी


मुंबई - देशाला बळकट करण्यासाठी स्वामी विवेकानंदांचे विचार, तत्त्वज्ञान आजही प्रेरणादायी आहे. सामाजिक बदलांच्या माध्यमातून त्यांनी आधुनिक भारत घडवण्याचे स्वप्न पाहिले होते, असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शुक्रवारी केले.

नक्षलवादाविरुद्ध ‘ऑपरेशन’ची गरज


अभिलाष खांडेकर | May 29, 2013, 02:00AM IST

मध्य प्रदेश  हे त्या वेळी एक मोठे अखंड राज्य होते. छत्तीसगडचा जन्म व्हायचा होता. छोटी छोटी राज्ये बनवायची की नाहीत, याबद्दल दिल्लीत अधूनमधून ज्या राजकीय चर्चा होत असत, त्यात तेलंगणा, विदर्भ, उत्तराखंड, झारखंड व छत्तीसगड अशी नावे प्रामुख्याने घेतली जात असत. छोटी राज्ये प्रशासकीयदृष्ट्या अधिक व्यवस्थितपणे चालवली जाऊ शकतात, असा त्यामागचा युक्तिवाद होता. यातील तीन राज्ये अस्तित्वात आली ती बिहार, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश या अवाढव्य राज्यांतून. विदर्भ आणि तेलंगणावर साधकबाधक चर्चा सुरू आहे आणि आंध्रमध्ये तर यावर जाळपोळ, दंगे झालेले आहेत. वर्ष 2000 मध्ये ‘छोटं’ राज्य छत्तीसगड अस्तित्वात आलं आणि तिथेच नक्षलवाद प्रचंड बोकाळलेला आहे, असं चित्र परवाच्या भयंकर घटनेने पुन्हा एकदा स्पष्ट केलंय.

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी