Showing posts with label साहित्य. Show all posts
Showing posts with label साहित्य. Show all posts

Wednesday, June 29, 2022

ऋषी बंकिमचंद्र चरित्र ग्रंथाचे सुनील देवधर यांच्या हस्ते प्रकाशन

बंकिमचंद्रांनी वंदे मातरम् मंत्र दिला, त्यातूनच स्वातंत्र्याची उर्मी जागली

‘ऋषी बंकिमचंद्र' ग्रंथाचे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अॅम्फी थिएटर येथे प्रकाशन करताना जटायु अक्षरसेवा प्रकाशन संस्थेचे संतोष जाधव, डेक्कन एज्युकेश सोसायटीचे धनंजय कुलकर्णी, वक्ते सुनील देवधर, लेखक मिलिंद सबनीस आणि प्रकृती केअरचे डॉ. ज्ञानोबा मुंडे.


पुणे | कृतज्ञता हा भारताचा स्थायीभाव आहे. कुटुंबातील आई ही कृतज्ञतेचे मूर्तीमंत रूप आहे. ऋषी बंकिमचंद्र यांनी भारत देशाला मातेच्या, आदिशक्तीच्या रूपात पाहिले. ‘वंदे मातरम्‌‍' हा मंत्र दिला. या महामंत्रातूनच स्वातंत्र्याची उर्मी जागली. वंदे मातरम् हा वंगभंग आंदोलनाचा आत्मा होता. यातूनच लाल, बाल आणि पाल यांचे नेतृत्व पुढे आले. बंकिमचंद्रांचे चरित्र प्रेरक आणि स्फूर्तीदायी असल्याने ते घराघरात पोहोचले पाहिजे, असे प्रतिपादन ईशान्य भारतातील नेते व अभ्यासक सुनील देवधर यांनी केले.

पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ऐतिहासिक अॅम्फी थिएटरमध्ये जटायु अक्षरसेवा प्रकाशन संस्थेने आयोजित केलेल्या ऋषी बंकिमचंद्र या चरित्र ग्रंथाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे धनंजय कुलकर्णी, प्रकृती केअर फाउंडेशनचे डाॅ. ज्ञानोबा मुंडे जटायुचे संतोष जाधव आणि वंदे मातरम््चे अभ्यासक व ग्रंथाचे लेखक मिलिंद सबनीय यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आणि बंकिमचंद्र जयंतीचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी देवधर म्हणाले, आपल्या पूर्वजांनी शाश्वत विचारांची मांडणी केली आहे. या विचारांना आचरणात आणणाऱ्या समाजाची आज आवश्यकता आहे. राष्ट्रीय विचारांची प्रभावी मांडणी होण्यासाठी तरुणांनी सोशल मीडिया योद्धा बनण्याची गरज आहे. हिंदूंचे सैनिकीकरण झाले पाहिजे, यासाठी शस्त्र म्हणून कायद्याचे प्राथमिक ज्ञान करून घ्या, माहिती अधिकार कायदा जाणून घ्या. 

लेखक मिलिंद सबनीस यांनी ग्रंथलेखनामागील भूमिका सांगितली. संतोष जाधव यांनी प्रास्ताविक तर डॉ. रवींद्र मिणियार यांनी परिचय करून दिला. सूत्रसंचालन सिद्धाराम पाटील तर आभार अश्विनी चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता हिमानी नांदे यांनी गायलेल्या वंदेमातरम्‌‍ने झाली.

पवारांना पगडीचा राग येतो म्हणून पगडी घालूनच बोलणार

प्रारंभी देवधर यांचा बह्मर्षी विवेकानंद ते राजर्षी नरेंद्र मोदी हा ग्रंथ आणि पुणेरी पगडी देऊन सत्कार झाला. हा धागा पकडून देवधर म्हणाले, शरद पवार यांना पुणेरी पगडी पाहिली की राग येतो, असे ऐकिवात आहे. ते समाज तोडणारे नेते आहेत. त्यांना खूप राग यावा म्हणून मी पूर्णवेळ पगडी घालूनच बोलणार आहे, असे सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. 

पुस्तकाचे नाव - ऋषी बंकिमचंद्र
लेखक - मिलिंद सबनीस
प्रकाशक - जटायु अक्षरसेवा
मूल्य - ५९९
सवलतीत - ४९९ (टपाल खर्चासह)

पुस्तक मागवण्यासाठी jataau.com/shop/rishi-bankim

9767284038 व्हाटस् अॅप क्रमांकावर संपर्क करूनही पुस्तक मागवू शकता.

Tuesday, January 17, 2017

नव्या युगावर धनगर साहित्याचा ठसा!

दै. दिव्य मराठी, १७ जानेवारी २०१७

संजय सोनवणी

आ वाज उद्याचा...उद‌्गार उद्याचा’ हा नारा देत भारतातील पहिले “आदिवासी धनगर साहित्य संमेलन’ पार पडले. मूक समाजाचा आधुनिक काळातील पहिलाच साहित्यिक उद्गार हेच त्याचे वैशिष्ट्य नव्हते तर वैचारिक विश्वालाही नवविचारांनी नवे आशय देऊ शकतो, हे अत्यंत आत्मविश्वासाने सांगितले जाणे हेही एक वेगळेपण होते.
http://divyamarathi.bhaskar.com/news/DMS-quite-the-impression-on-the-world-of-the-new-material-5506909-NOR.html

Saturday, January 2, 2016

श्रीपाल सबनीस उठले अन् तुम्हीच माझे शरद पवार म्हणत सगळ्यांच्या देखत भोंगळेंच्या पायावर चक्क आपले डोके ठेवले


 
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांची वस्त्रे उतरवणारा, लबाडी वेशीवर टांगणारा युवा पत्रकार घनश्याम पाटील यांचा खळबळजनक लेख - कुत्र्याला खीर पचली नाही! .

श्रीपाल सबनीस यांचा राखी पौर्णिमेच्या दिवशी आम्हाला हर्षोल्हासात फोन आला की ‘‘चपराकच्या संपूर्ण टीमसह ताबडतोब घरी या. मी आतुरतेने तुमची वाट पाहतोय.’’ कसलाही विचार न करता आम्ही आमच्या फौजफाट्यासह त्यांचे घर गाठले. तिथे शरद पवारांच्या गोटातले विश्‍वासू पत्रकार, ‘राष्ट्रवादी’ मासिकाचे संपादक सुधीर भोंगळे उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, ‘‘साहेबांनी पी. डी. पाटलाला फोन केलाय. राष्ट्रवादीची सगळी ताकत आपल्या मागे उभी आहे.’’ त्यानंतर सौभाग्यवती सबनीस यांनी औक्षणाचे ताट आणले. भोंगळे यांना राखी बांधली. भोंगळेंनी राखीच्या ताटात ओवाळणी टाकण्यासाठी शंभराची नोट काढली. त्याबरोबर सबनीस उठले आणि आमच्या सगळ्यांच्या देखत त्यांनी भोंगळेंच्या पायावर चक्क आपले डोके ठेवले. ‘‘ओवाळणीत पैसे नकोत. आमच्या ‘हिने’ तुम्हाला भाऊ मानले आहे. सध्या माझ्यासाठी तुम्हीच शरद पवार. तुम्हाला केलेला नमस्कार त्यांना मिळेल. एकदा संमेलानध्यक्ष पदाची भीक माझ्या पदरात घाला. त्यानंतर मी तुम्हाला कधीच काही मागणार नाही. माझी ही शेवटची इच्छा आहे.’’ आणि त्यांनी डोळ्यात पाणी आणले.

संपूर्ण लेख पुढील प्रमाणे...

Tuesday, September 18, 2012

चर्चचे वास्तव II

चर्चचे वास्तव- १२

दुहेरी लाभ घेणारे मिशनरी मानवतावादी कसे?

 चारुदत्त कहू
 नागपूर, १२ सप्टेंबर
 ख्रिस्ती धर्माचा एकंदरीतच मानवतावादी, भूतदयावादी चेहरा दृष्टीपुढे आणला तर निरनिराळ्या चर्चमध्ये कार्यरत असलेले प्रिस्ट, पास्टर, सिस्टर्स, कॅटेचिस्ट, नन्स आदी व्यक्ती पोटाला चिमटा घेऊन सेवाभावी वृत्तीने आणि कुठल्याही मानधनाची अपेक्षा न ठेवता कार्य करीत असतील, अशी बाह्य जगाची प्रारंभिक धारणा झाल्याशिवाय राहात नाही. तथापि, वस्तुस्थिती मात्र निराळीच आहे. या सार्‍या व्यक्ती नोकरदार असून प्रत्येकाला त्यांचे काम, हुद्दा आणि ज्येष्ठतेनुसार डायोसिसने ठरवून दिलेले वेतन दिले जाते. डायोशियन प्रिस्टवर पॅरिश चर्चच्या संपूर्ण देखभालीची आणि संचालनाची जबाबदारी असते. त्यासाठी त्याला योग्य ते वेतन पॅरिशमधूनच दिले जाते. (यात त्याची बचत, निवृत्ती वेतन, वाहन खर्च, सुटीकालीन खर्च आणि गरजूंना मदत करावयाच्या निधीचाही समावेश असतो).

Monday, January 2, 2012

जागं करणारी कादंबरी - आवरण


अवघ्या दोन वर्षांत 22 आवृत्त्यांचा पल्ला गाठणारी, वाचकाच्या "स्व'त्त्वाला हाक देऊन जागं करणारी कादंबरी - आवरण. डॉ. एस. एल. भैरप्पा या विख्यात कन्नड साहित्यिकाची ही बहुचर्चित कादंबरी. या कादंबरीने हजारो वाचकांच्या हृदयाचा ठाव घेतला आहे तर अनेक मतलबींची झोपही उडवली आहे. ही कादंबरी आता मराठीतही उपलब्ध आहे. या कादंबरीविषयी...

Monday, June 1, 2009

स्मरण गोनीदांच्या साहित्याचे


मराठीतील विख्यात लेखक आणि कादंबरीकार गोपाल नीलकंठ दांडेकर यांच्या साहित्यकृतींची ओळख करून देणारे "पुनर्भेट - गोनीदांच्या साहित्यकृतींची' हे पुस्तक त्यांच्या स्मृतिदिनी, सोमवार, दि. 1 जून रोजी सायं. 6.30 वा. सोलापुरातील शिवस्मारक येथे प्रकाशित होत आहे. गोनीदांच्या साहित्यावर प्रेम करणारे ऍड. आनंद देशपांडे यांनी लिहिलेल्या या पुस्तकाला गोनीदांच्या कन्या डॉ. वीणा देव यांची प्रस्तावना असून, त्यांच्याच हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. त्यानिमित्ताने...
ज्ञानसागरात मनुष्याने जीवनभर जरी चालायचे म्हटले तरी तो फारतर गुडघाभर पाण्यापर्यंत पोहोचू शकतो, अशा आशयाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची एक उक्ती आहे. खरेच आहे ते. एका आयुष्यात खूप काही करायचे ठरविले तरी अनेक गोष्टी करायच्या राहून जातात. जसजसे आपण विविध क्षेत्रांतील अधिक ज्ञान मिळवू पाहतो, तसतसे आपले अज्ञान उघडे पडत जाते.
पुस्तक हे ज्ञान मिळविण्याचे एक प्रमुख साधन आहे. वाचन ही अशी साधना आहे, की जी साधकाला तात्काळ वरदान देते. मनुष्याच्या घडणीमध्ये पुस्तकांचे स्थान खूप महत्त्वाचे असते. पुस्तके माणसाला विवेकी बनवतात. विविधांगी वाचनाने मनुष्य प्रगल्भ बनतो. असे असले तरी आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत इच्छा असूनही अनेक चांगली पुस्तके वाचणे राहून जाते. यावर चांगला उपाय म्हणजे काही व्यासंगी लोकांनी मौल्यवान पुस्तके वाचली पाहिजेत आणि ती समाजापर्यंत पोहोचवली पाहिजेत.
छत्रपती शिवराय आणि गड-किल्ले यांना दैवत मानून भ्रमंती केलेल्या ऍड. आनंद देशपांडे यांनी नेमके हेच केले आहे. तपस्वी लेखक गो. नी. दाण्डेकर यांच्या साहित्याचा परिचय करून देण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले आहे. फुले सुंदरच असतात, पण ती कलात्मकतेने गुंफल्यावर जी माला तयार होते तिचे सौंदर्य हे मोकळ्या फुलांहून अधिक असते आणि त्याचे श्रेय ती माला वेधक रीतीने गुंफणाऱ्या कलाकाराला असते. "गोनीदां'चे संस्कारशील साहित्य, त्यांचा संपन्न जीवनानुभव, अभिजात कल्पनाशक्ती हे सारे अत्यंत प्रभावीपणे वाचकांसमोर आणण्याचे श्रेय आनंद देशपांडे यांना आहे.
1 जून 1998 ला गोनीदांचे निधन झाले. त्यानंतर सोलापूर तरुण भारतमधून आनंद देशपांडे यांनी गोनीदांच्या साहित्याचा परिचय करून देणारी लेखमाला लिहून आगळीवेगळी श्रद्धांजली वाहिली. गोनीदांच्या निवडक 28 पुस्तकांचा परिचय करून देणारे 28 लेख देशपांडे यांनी लिहिले आहेत. ""वाघरू, रानभुली, माचीवरला बुधा, पवनाकाठचा धोंडी, जैत रे जैत, मृण्मयी, पडघवली, कुणा एकाची भ्रमणगाथा, मोगरा फुलला, शितू, बया दार उघड, तुका आकाशाएवढा, वादळातील दीपस्तंभ'' आदी मराठी मनाला संस्कारित करीत आलेल्या कादंबऱ्यांचा यात समावेश आहे.
येथे विशेष नोंद करण्यासारखी बाब म्हणजे लेखकाची गोनीदांवर विशेष भक्ती आहे. महाराष्ट्राच्या मातीवर, संस्कृतीवर गोनीदांचे असलेले गहिरे प्रेम, भटकेपणाची दाण्डेकरांची प्रवृत्ती, इतिहासासंबंधी आत्मीयता या सर्वांबद्दल आनंद देशपांडे यांच्या मनात श्रद्धा आहे. ही श्रद्धाच त्यांच्या पुस्तकाची प्रेरणा आहे. शिवचरित्र आणि किल्ल्यांची तीव्र ओढ ही लेखकाची जमेची बाजू आहे. याशिवाय कोणी गोनीदांच्या पुस्तकांचा परिचय करू पाहील तर त्यात जिवंतपणा येणे शक्य नाही. भटकंती ही गोनीदांच्या लिखाणामागील प्रेरणा आहे. गोनीदांच्या साहित्याने आनंद देशपांडे यांचे भावविश्व बनले आहे, याची प्रचिती पुस्तक वाचताना पानोपानी येते.
पुस्तकातील प्रत्येक प्रकरण साधारणपणे तीन-चार पानांचे आहे. प्रत्येक प्रकरण मूळ कादंबरी वाचल्याचा आनंद देते आणि मनात मूळ कादंबरी वाचण्याची ओढ निर्माण करते. पराग घळसासी यांनी रेखाटलेल्या जिवंत चित्रांमुळे पुस्तकाच्या सौंदर्यात भर पडली आहे. मनोविश्व समृद्ध करणारे हे पुस्तक नव्या पिढीला जीवनदृष्टी देणारे आहे.

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी