Friday, May 6, 2016
Saturday, April 16, 2016
Sunday, April 10, 2016
सर्वस्पर्शी बाबासाहेब विशेषांक प्रकाशन । बातम्या
![]() |
| दै. दिव्य मराठी । सर्वस्पर्शी बाबासाहेब विशेषांक प्रकाशन बातमी |
![]() |
| दै. सोलापूर तरुण भारत । सर्वस्पर्शी बाबासाहेब विशेषांक प्रकाशन बातमी |
| दै. सोलापूर तरुण भारत । सर्वस्पर्शी बाबासाहेब विशेषांक प्रकाशन बातमी |
| दै. संचार । सर्वस्पर्शी बाबासाहेब विशेषांक प्रकाशन बातमी |
| दै. सकाळ । सर्वस्पर्शी बाबासाहेब विशेषांक प्रकाशन बातमी |
दै. पुण्य नगरी । सर्वस्पर्शी बाबासाहेब विशेषांक प्रकाशन बातमीसर्वस्पर्शी बाबासाहेब अभिवादन विशेषांकाचे थाटात प्रकाशन |
सर्वस्पर्शी बाबासाहेब अभिवादन विशेषांकाचे थाटात प्रकाशन
मनातील अस्पृश्यता संपायला हवी : करमरकर
सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तेजस्वी आणि प्रेरणादायी महापुरूष होते. पिचलेल्या समाजासाठी त्यांनी देशभर उभ्या केलेल्या चळवळीमुळे कायद्याने अस्पृश्यता संपली; पण सामाजिक न्यायाची भावना संपूर्णत: प्रस्थापित होऊन प्रत्येकाच्याच मनातील अस्पृश्यता संपली तरच बाबासाहेबांचे स्वप्न साकार होणार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते अरूण करमरकर यांनी आज येथे केले.
((विशेषांकासाठी संपर्क : 8855872228))
डॉ. आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त विवेकानंद केंद्राच्या विवेक विचार या मासिकाकडून काढण्यात आलेल्या अभिवादन विशेषांकाचे आज प्रकाशन झाले. त्यावेळी करमरकर बोलत होते. माजी सनदी अधिकारी विठ्ठल पाथरूट, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते राजाभाऊ इंगळे, विवेकानंद केंद्राचे संचालक दीपक पाटील, संपादक सिध्दाराम पाटील मंचावर होते.
करमरकर म्हणाले की, डॉ. आंबेडकरांनी आपल्या जीवनात लहानपणापासून अनेक अन्याय झेलले. अस्पृश्यतेसारख्या अमानुष अन्यायाची धग सोसली; पण यावर त्यांची प्रतिक्रिया सूड भावनेची नव्हती. राज्यघटनेचे एकेक कलम लिहिताना त्यांनी सामाजिक न्यायाचाच विचार केला. न्यायनिष्ठा, समाजनिष्ठा आणि राष्ट्रनिष्ठा हे बाबासाहेबांच्या जीवनाचे पैलू होते. सामाजिक न्यायाचाच त्यांनी जीवनभर ध्यास घेतला होता.
बाबासाहेबांनी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन या आपल्या पक्षाचे अधिवेशन आयोजित केले होते. तेव्हा वीस हजार महिला उपस्थित होत्या. त्यावेळी डॉ. आंबेडकरांनी या महिलांना स्वत:ला अस्पृश्य मानू नका, असा संदेश दिला. गुरांचा मृतदेह न वाहण्याचे आणि दारू न पिण्याचे आपल्या पतीला सांगा याच बरोबरच अर्धपोटी राहून आपल्या मुलांना शिकवा, असा महिलांना संदेश दिला, असे सांगून करमरकर म्हणाले की, बाबासाहेबांच्या जीवनात एकच सकारात्मक बाब होती, ती म्हणजे त्यांचे माता - पिता. वडील लष्कराच्या सेवेत होते. त्यांनी मुलाच्या शिक्षणाला महत्त्व दिले. विलायतेत शिक्षणासाठी जाण्यापूर्वी बाबासाहेबांनी सयाजीराव गायकवाड यांना आपल्या तेथील शिक्षणाचा उद्देश सांगितला. तेव्हा ते म्हणाले होते की, मला राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि सार्वजनिक वित्तव्यवस्था हे विषय शिकायचे आहेत. समाजाच्या उन्नतीसाठी मला विषयांचे शिक्षण घ्यायचे आहे, असे त्यांनी सांगितले होते.
प्रारंभी पाटील यांनी प्रास्ताविक केले. सागर सुरवसे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्रशांत बडवे, कवी मारूती कटकधोंड, शांतीवीर महिंद्रकर, प्रमोद खांडेकर, प्रशांत गायकवाड यांच्यासह श्रोते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
http://epaper.lokmat.com/
Wednesday, April 6, 2016
सर्वस्पर्शी बाबासाहेब या विषयावर शनिवारी अरुण करमरकर यांचे व्याख्यान
सोलापूर – विवेकानंद केंद्राचे मासिक विवेक विचारच्या वतीने शनिवारी (९ एप्रिल) सायंकाळी ६.३० वाजता फडकुले सभागृह येथे ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांचे "सर्वस्पर्शी बाबासाहेब’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. तसेच "सर्वस्पर्शी बाबासाहेब’ या १२५ पानी विशेषांकाचे प्रकाशन या प्रसंगी करण्यात येणार आहे.
भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास राजाभाऊ इंगळे, राजाभाऊ सरवदे, विठ्ठल पाथरुट, प्रमोद गायकवाड, बाळासाहेब वाघमारे आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत. केंद्राचे संचालक दीपक पाटील यांनी ही माहिती दिली.
विशेषांकात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रचिंतनाचे विविध पैलू आणि त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व उलगडून दाखवण्यात आले आहे. शेषराव मोरे, रमेश पतंगे, भाऊ तोरसेकर, प्रा. डाॅ. गौतम कांबळे, डाॅ. अभिराम दीक्षित, मुजफ्फर हुसेन, अरुण करमरकर आदी मान्यवर विचारवंतांचे लेख आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष लेखाचा समावेश या विशेषांकात केला आहे. मूल्य ५० रुपये असून होमगार्ड मैदानाजवळील विवेकानंद केंद्राच्या कार्यालयात अंकाची पूर्वनोंदणी सुरू आहे.
Tuesday, March 15, 2016
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध स्पर्धा
भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त
राज्यस्तरीय निबंध स्पर्धा
आयोजक : विवेक विचार, विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे सांस्कृतिक मासिक
स्पर्धा कोणासाठी ? पदव्युत्तर विद्यार्थी. तसेच २० ते ३० वयोगटातील कोणीही.
निबंध पाठवण्याचा अंतिम दिनांक ? १५ आॅगस्ट २०१६.
शब्दमर्यादा किती? १५०० ते २००० शब्द.
निबंधाचे विषय
१. बाबासाहेबांचे राष्ट्रचिंतन
२. बाबासाहेबांचे धर्मचिंतन
३. बाबासाहेबांचे अर्थचिंतन
४. घटनाकार बाबासाहेब
५. तरुणांचे प्रेरणास्थान बाबासाहेब
(वरीलपैकी एका विषयावर निबंध अपेक्षित.)
प्रथम – रु. ७०००/-
द्वितीय – रु. ५०००/-
तृतीय – रु. ३०००/-.
याशिवाय सहभागींना प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह.
Tuesday, September 15, 2015
डोळस विश्वबंधुत्वाच्या दिशेने दमदार पाऊल
Friday, September 11, 2015
हिंदू-बौद्ध ऐक्यातून सजग सुसंवादाचे नवे पाऊल
![]() |
| hindu buddhist initiative / दै. दिव्य मराठी, पान ७, दि. १० सप्टेंबर |
| hindu buddhist initiative |
Sunday, June 2, 2013
पुन्हा तोच प्रश्न : आंबेडकर की मार्क्स?
आंबेडकरी चळवळीतील लढाऊ कार्यकर्ते किंवा तरुण नक्षलवादाकडे आकर्षित होत आहेत का, अशी एक गंभीर चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे. या निमित्ताने दलित चळवळीमध्ये मार्क्सवाद की आंबेडकरवाद हा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. विद्रोह हा आंबेडकरी चळवळीचा स्थायिभाव आहे. परंतु या चळवळीने कधीच उग्रवादाचे समर्थन केलेले नाही. दुसरीकडे छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी नुकताच केलेला हल्ला या प्रश्नावर कायम गुळमुळीत भूमिका घेणाऱ्या काँग्रेससारख्या बडय़ा राजकीय पक्षाला आत्मचिंतन करायला भाग पाडणारा आहे. नेत्यांवर हल्ला करण्याचे धाडस नक्षलवाद्यांना राजकीय कुरघोडीतूनच आल्याचे दिसत आहे. हिंसाचार कुठलाही असो, त्याविरुद्ध कणखर भूमिका घेणे गरजेचे आहे. केवळ काँग्रेसच नाही तर सर्वच राजकीय पक्षांनी अशी भूमिका घेतली तरच अशा चळवळी मोडून काढता येणे शक्य आहे..
Tuesday, April 16, 2013
बौद्ध धर्माविषयी ‘ते’ लागू होत नाही !
Saturday, April 13, 2013
बाबासाहेब आम्हाला क्षमा करा
Thursday, September 22, 2011
क्या मुसलमान जाति नहीं मानते ????
तो पेश-ए -खिदमत है ..... नमूना -ए-खास.....
आप दलित भाइयों से अनुरोध है कि इसे पढ़ें.., समझें और उन तथाकथित बुद्धिजीवियों से पूछे कि वे आपको क्यों झूठ -सच बता के बरगला रहे हैं....... इसमें उनका क्या हित है....????
Saturday, June 11, 2011
दलित राजकारण आणि शरद पवार
9 जून रोजी मुंबईत भीमशक्ती शिवशक्तीचा महामेळावा झाला. दुस-या दिवशी मुंबईतच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्धापन दिनाचे निमित्त करून समता हक्क परिवर्तन परिषदेच्या नावाने कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. रामदास आठवले यांनी शिवसेनेसोबत गेल्याने राष्ट्रवादी पूर्णत: गडबडून गेल्याचे मेळाव्यातील राष्ट्रवादी नेत्यांच्या देहबोलीतून दिसून आले.
स्वार्थाच्या साठमारीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेत समाजात जातीभेदाचे विष आणखी जहरी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. बाबासाहेबांचे विचार समाजात दरी निर्माण करण्यासाठी आपल्या सोयीने सांगीतले जात आहे. बुद्धीभेद केला जातोय. रामदास आठवले यांनी शिवसेना भाजपशी जवळीक साधून बाबासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केल्याचे सांगण्याचा प्रयत्न होतोय. वस्तुस्थिती अशी आहे काय? डॉ. बाबासाहेबांच्या विचारांच्या प्रकाशात या विषयाचा वेध घेण्याचा प्रयत्न येथे केला आहे.
महापुरुषांनी वेळोवेळी व्यक्त केलेल्या विचारांचा कधीही तुकड्या-तुकड्यांत विचार करायचा नसतो. तसे केल्याने नुकसानच होण्याची अधिक शक्यता असते. महापुरुषांचे जीवनविचार समग्रतेने समजून घ्यावे लागते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे थोर समाजसुधारक होते. संपूर्ण समाज एकसंध व्हावा यासाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन वेचले. स्पृश्यास्पृश किंवा दलित सवर्ण भेद मिटावा यासाठी बाबासाहेबांनी सतत प्रयत्न केला. त्यावेळच्या सवर्णांच्या हेकटपणामुळे आणि अविचारामुळे बाबासाहेबांनी याच मातीत जन्मलेल्या बुद्ध धर्माचा स्वीकार केला. दलित समाजात परिवर्तन येण्यासाठी विष्णू, शिव, राम, कृष्ण आदी देवतांना आता स्थान नको असे सांगितले. अंध रुढींच्या जोखडातून बाहेर काढण्याच्या दृष्टीनेही अनेक नियम सांगीतले. या कृतीमागे वर्षानुवर्षे गावकुसाबाहेर राहिलेल्या समाजाला सन्मान मिळवून देण्याचा बाबासाहेबांचा उद्देश होता, समाजातील दरी अधिक रूंद करणे नव्हे.बाबासाहेब म्हणतात, '' ज्या भूमीने व्यास, कपिल, कणाद, गौतम, चार्वाक, महावीर आणि बुद्ध यांच्यासारखे श्रेष्ठ तत्त्ववेत्ते निर्माण केले आणि बौद्ध धर्मासारखी उदात्त देणगी जगाला दिली, त्या या थोर भूमीचा मी दूत आहे आणि तिचा तो श्रेष्ठ वारसा चालविण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. मी महाराष्ट्रीय नाही किंवा महारही नाही. मी भारतीय आहे आणि माझ्या या जन्मभूमीचे पांग फेडण्यातच माझ्या जीवनाचे सार्थक आहे. ''
या उद्गारातून बाबासाहेबांचे एकसंध समाजाबद्दलचे विचार समोर येतात. बाबासाहेब म्हणतात, '' ब्राह्मणांशी माझे काही वैर नाही. माझा विरोध दुसऱ्यांना हीन समजण्याच्या दुवृत्तीला आहे. भेदभाव मानणाऱ्या ब्राह्मणेतरांपेक्षा नि:पक्ष वृत्तीचे ब्राह्मण मला अधिक जवळचे वाटतात. आपल्या आंदोलनात सहकार्य देणाऱ्या अशा ब्राह्मणांना मी दूर लोटू शकत नाही. ''
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा यांचे वक्तव्य पाहा. दलितांनी शिव, गणेश, देवी, राम, कृष्ण यांची पूजा अर्चा करू नये, असे बाबासाहेबांनी म्हटल्याचा दाखला पवारांनी दिला. शिवसेनेशी अनेकदा जवलिक करण्याचा प्रयत्न केलेल्या पवार यांनी केवळ राजकारणासाठी समाजातील दरी वाढविण्याचा प्रयत्न करवा, हे दुर्दैवी आहे. ब्राह्मण ब्राह्मणेतर हा गाढला गेलेला वादही वाढविण्याचा प्रयत्न पवारांनी केला.
गेल्या 60 वर्षात कॉंग्रेसने दलितांच्या भौतिक उन्नत्तीसाठी काय केले ? या प्रश्नाचे उत्तर निराशाजनक आहे. अलीकडच्या 25/30 वर्षांत भाजप शिवसेनेसारख्या पक्षांना जातीयवादी ठरवून दलित समाजाचा केवळ स्वार्थासाठी उपयोग करून घेण्यात आला नाही काय ?
हिंदुत्ववादी हे जातीयवादी आहेत, हे गृहितकृत्यही फोल ठरले आहे. आकडेवारी काढून पाहा... दलितांवर जेवढे अत्याचार झाले आहेत त्यामागे बहुतेक वेळा कॉंग्रेस-राष्ट्रवादीशी जवळीक असणारेच गावगुंड असल्याचे दिसून येते. जातीभेद पाळणारे बहुतेक रुढीवादी लोक कॉंग्रेस-राष्ट्रवादीशी जवळीक असणारे असतात, अशी कबुली अनेक दलित कार्यकर्ते खासखीत देतात. मुस्लिमांविषयी देशाचे काय धोरण असावे, याबद्दलचे डॉ. बाबासाहेबांची विचारसूत्रे काढून पाहा. कसाब-अफजल गुरूसारख्या प्रवृत्तींना पाठिशी घालणा-या प्रवृत्तींबद्दल बाबासाहेबांनी कधीच सावध करून ठेवल्याचे दिसेल.
बाबासाहेब म्हणतात, '' हिंदी मुसलमानदेखील एक अजब चीज आहे. सर्व सामाजिक सुधारणेचे त्याला वावडे आहे. हिंदुस्थानाबाहेरील त्याचे धर्मबंधू समाजक्रांतीवादी बनले आहेत. राष्ट्राच्या व मानवी जीवनाच्या सामाजिक प्रगतीला अडथळा करणाऱ्या सर्व चालीरीतींचा मुस्ताफा केमाल पाशासारख्या मुसलमान देशभक्ताने धुव्वा उडवून दिला आहे, पण हिंदी मुसलमानांना मौ. शौकतअल्लीसारख्या देशभक्त व राष्ट्रीय हिंदी मुसलमानांनादेखील केमालपाशा व अमानुल्ला आवडत नाहीत. कारण ते सुधारक आहेत आणि हिंदी मुसलमानांच्या धार्मिक दृष्टीला सुधारणा हे तर महत्पाप वाटते. ''
आपले मत
तुम्हाला काय वाटतं ? रामदास आठवले यांनी चूक केली आहे ? सोनिया गांधी यांच्या विदेशी मुद्द्यावरून बाहेर पडून पुन्हा त्यांच्या आश्रयाला जाणार्या पवारांनी आठवले यांना सल्ला देणे योग्य वाटते ? या विषयावरील तुमची मते पुढील चौकटीत अवश्य लिहा.
Wednesday, March 31, 2010
डॉ. बाबासाहेब यांचे विचारधन
ब्राह्मणांशी माझे काही वैर नाही। माझा विरोध दुसऱ्यांना हीन समजण्याच्या द्ुष्प्रवृत्तीला आहे. भेदभाव मानणाऱ्या ब्राह्मणेतरांपेक्षा नि:पक्ष वृत्तीचे ब्राह्मण मला अधिक जवळचे वाटतात. आपल्या आंदोलनात सहकार्य देणाऱ्या अशा ब्राह्मणांना मी दूर लोटू शकत नाही.
आज जरी आम्ही राजकीय, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वेगवेगळ्या गटांत विभागले गेलो तरी मला खात्री आहे की, अनेक जाती-पंथ असूनदेखील आम्ही "एक राष्ट्र' म्हणून उभे राहू। एक दिवस असाही येईल की, फाळणीची मागणी करणाऱ्या मुस्लिम लीगला पण "अखंड हिंदस्थान'च आपल्या हिताचा वाटू लागेल.
माझे सामाजिक तत्त्वज्ञान हे निश्चितपणे तीन शब्दांत गुंफले जाण्याचा संभव आहे। ते शब्द म्हणजे स्वातंत्र्य, समता व बंधुभाव. तथापि, हे माझे तत्त्वज्ञान फें्रच राज्यक्रांतीपासून मी उसने घेतले असे कोणीही समजू नये. माझ्या तत्त्वज्ञानाची मुळे धर्मात आहेत, राज्यशास्त्रात नाहीत. माझा गुरू बुद्ध, याच्या शिकवणुकीपासून ते मी काढले आहे.
जगण्याचे अनेक मार्ग आहेत, पण ते सारेच सारख्या मान्यतेचे आहेत असे नाही। शत्रू आला असता, त्यावर चाल करून त्याचा पाडाव करणे हा जगण्याचा एक मार्ग आहे. तसेच त्याला शरण जाऊन तो घालील त्या अटींवर जगणे हा जगण्याचा दुसरा मार्ग आहे. दोहोंपैकी कोणत्याही मार्गाने गेले असता जगणे होतेच, पण एका परीचे जगणे हे दुसऱ्या परीच्या जगण्यापेक्षा फार निराळ्या तऱ्हेचे असते. एक मानवाचे जिणे आहे, तर दुसरे किड्याचे जिणे आहे.
देशाच्या राज्यकारभारात प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्षरीतीने भाग घेऊन तो आपल्या ध्येयास अनुकूल बनविल्याशिवाय कोणत्याही गांजलेल्या वर्गास आपली दु:खे दूर करता येणार नाहीत। दुसरा कोणी आपल्या हिताकरिता काही करील, या आशेवर जर गांजलेला व पिळला गेलेला वर्ग विसंबून राहील, तर तो तोंडघशी पडल्याशिवाय राहणार नाही.
आपल्याला ज्या मार्गाने जावयाचे आहे, तो मार्ग चिरस्थायी असावा। जो मार्ग अराजकतेकडे जातो, जो जंगलाकडे नेतो, असा मार्ग अनुसरण्यात काही अर्थ नसतो. जो मार्ग आपणास आपल्या इसिप्त ध्येयाप्रद सुरक्षित पोचवितो, जो आपले जीवन बदलवितो, असा मार्ग कितीही लांबचा असला तरी तो जवळच्या मार्गापेक्षा निश्चितच श्रेयस्कर असतो.
कार्ल मार्क्स अगर कम्युनिस्ट-कम्युनिझमचे ध्येय साध्य करण्याकरिता म्हणजेच गरिबी निवारण्यासाठी, खाजगी मालमत्ता नष्ट करण्यासाठी विरोधकांची हत्या करणे, त्यांना ठार मारणे हे साधन वापरू इच्छितात आणि येथेच बुद्धिझम आणि कम्युनिझममधील मूलभूत फरक आहे। भगवान बुद्धाचे मार्ग लोकांना हिंसेपासून परावृत्त करण्याचे, युक्तिवादाने पटवून देण्याचे, नैतिक शिकवण देण्याचे व ममतेचे आहेत. कम्युनिस्ट पद्धती ही पाशवी शक्तीवर आधारलेली आहे. कम्युनिस्ट पद्धती रशियन लोकांनी राजीखुषीने स्वीकारलेली नाही. त्यांनी ती भीतीमुळे स्वीकारलेली आहे. यादृष्टीने पाहिले तर बुद्धिझम शुद्ध लोकशाहीवादी आहे. अभ्यासू वृत्तीने बुद्धिझम व कम्युनिझमचा दीर्घकाळ अभ्यास करून मी या ठाम निर्णयास आलो आहे की, मनुष्यमात्राचे दु:ख निवारण्यासाठी जो बुद्धाने उपदेश केला आहे व जी पद्धती सांगितली आहे, ती अतिशय सुरक्षित व पक्की आहे.
शेतकऱ्यांच्या दारिद्र्याचे प्रत्यक्ष कारण जमिनीची लहान-लहान तुकड्यांनी होणारी विभागणी हे असून, त्यामुळे तिथे हे भांडवल गुंतवण्यास व सुधारलेल्या पद्धतीने शेती करण्यास वाव मिळत नाही। जमिनीचे तुकडे व त्यामुळे शेतकरीवर्गात वावरणारे दारिद्र्य याचे मुख्य कारण म्हणजे वाढत्या लोकसंख्येला केवळ जमिनीवरच अवलंबून राहावे लागते हे होय आणि जमिनीवर अवलंबून राहणाऱ्या जादा लोकसंख्येच्या पोषणाची शेतीव्यतिरिक्त इतर व्यवसायात तजवीज लावल्यावाचून शेतकऱ्यांचे दारिद्र्य हटणार नाही. म्हणून शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी व त्यांची उत्पादनशक्ती वाढविण्यासाठी उद्योगधंद्यांची वाढ करणे हे मुख्य साधन आहे. चालू उद्योगधंद्यांचे पुनरुज्जीवन आणि कच्च्या मालाच्या अनुरोधाने नव्या उद्योगांची निर्मिती या दोन्हींची आवश्यकता आहे.
हिंदी मुसलमानदेखील एक अजब चीज आहे। सर्व सामाजिक सुधारणेचे त्याला वावडे आहे. हिंदुस्थानाबाहेरील त्याचे धर्मबंधू समाजक्रांतीवादी बनले आहेत. राष्ट्राच्या व मानवी जीवनाच्या सामाजिक प्रगतीला अडथळा करणाऱ्या सर्व चालीरीतींचा मुस्ताफा केमाल पाशासारख्या मुसलमान देशभक्ताने धुव्वा उडवून दिला आहे, पण हिंदी मुसलमानांना मौ. शौकतअल्लीसारख्या देशभक्त व राष्ट्रीय हिंदी मुसलमानांनादेखील केमालपाशा व अमानुल्ला आवडत नाहीत. कारण ते सुधारक आहेत आणि हिंदी मुसलमानांच्या धार्मिक दृष्टीला सुधारणा हे तर महत्पाप वाटते.
पाश्चिमात्य राष्ट्रे पौर्वात्य राष्ट्रांकडे चढेल दृष्टीने पाहतात, ह्याचे कारण त्यांचे आर्थिक नि औद्योगिक बळ हेच होय. यास्तव माझे असे मत आहे की, भारताची जेव्हा आर्थिक नि औद्योगिक शक्ती वाढेल, तेव्हा साम्राज्यवाद नि काळ्या-गोऱ्यांचे वाद हे मिटतील.
माझी दैवते तीन आहेत। पहिले दैवत विद्या होय. विद्येशिवाय माणसाला शांतता नाही आणि माणुसकीही नाही. दुसरे दैवत विनय होय. मी कोणाची याचना केली नाही. माझे ध्येय असे आहे की, माझं पोट भरलं पाहिजे आणि माझ्या लोकांची सेवा केली पाहिजे. माझे तिसरे दैवत म्हणजे शील होय. माझ्या आयुष्यात मी दगाबाजी, फसवणूक, आत्मसिद्धीकरिता पाप केलंं असं मला आठवत नाही. शीलसंवर्धन हा गुण माझ्यात मोठ्या प्रमाणात आहे, हे सांगायला मला फार अभिमान वाटतो.
प्रस्तुतच्या लेखकाने समाजकार्याप्रीत्यर्थ जेवढा स्वार्थत्याग करणे त्यास शक्य होते, तेवढा स्वार्थत्याग त्याने केला। तो काही संस्थानिक नाही की जहागीरदारही नाही. काही झाले तरी द्रव्यानुकूलता नसता इंग्रज सरकारने देऊ केलेली दरमहा अडीच हजार रुपयापर्यंत वाढू शकणारी नोकरी त्याने नको म्हणून सांगितली. वकिलीसारख्या स्पृश्य लोकांवर अवलंबून असणाऱ्या धंद्यात विशेष किफायत मिळण्याची आशा नसताही केवळ समाजकार्य करण्यास मोकळीक असावी म्हणून त्याने तो मार्ग पत्करला आहे. रूढ धर्माचारातील आणि लोकाचारातील दोषांचे निर्भयपणे आविष्करण करण्याचे भयंकर कार्य हाती घेतले असल्यामुळे, देशाभिमानी व धर्माभिमानी म्हणविणाऱ्या पत्रांकडून होत असलेला शिव्यांचा व शापांचा भडिमार तो एकसारखा सोशित आहे. कवडीचा फायदा नसताना त्याने एक वर्षाच्या आत "बहिष्कृत भारता'चे बऱ्यावाईट रीतीने रकाने भरून काढून लोकजागृतीचे काम केेले व ते करताना त्याने आपल्या प्रकृतीकडे, सुखाकडे, चैनीकडे व ऐषारामाकडे न पाहता डोळ्यांच्या वाती केल्या.
मी प्रथम भारतीय आहे. मी तापट आहे. सत्ताधारी लोकांशी माझे अनेक खटके उडाले, राजकीय संघर्ष झाला, पण हे आमचे कौटुंबिक भांडण आहे. म्हणून मी परदेशात भारताबद्दल कडवट बोलणार नाही. देशहित प्रथम. मी माझ्या देशाशी कधीही द्रोह करणार नाही.
अस्पृश्यता ही मूर्तिमंत असमानता आहे। एवढी मोठी असमानतेची जागती ज्योत कोठेच दिसावयाची नाही. एका माणसाला दुसऱ्या माणसाने त्याला न शिवण्याइतका पतित लेखण्याची प्रथा हिंदू धर्माखेरीज व हिंदू समाजाखेरीज कोठेही सापडेल काय? ज्याच्या स्पर्शाने पाणी बाटते, ज्याच्या स्पर्शाने देव बाटतो, तो प्राणी मानवाच्या कोटीत गेला आहे असे कोणी म्हणेल काय? एवढा कलंक तुमच्या शब्दाला, तुमच्या शरीराला आहे.
धर्माची आवश्यकता गरिबांना आहे। पीडित लोकांना धर्माची आवश्यकता आहे. गरीब मनुष्य जगतो तो आशेवर. जीवनाचे मूळ आशेत आहे. ही आशाच नष्ट झाली तर जीवन कसे होईल? धर्म आशावादी बनवितो व पीडितांना, गरिबांना संदेश देतो- "काही घाबरू नकोस, जीवन आशावादी होईल.
ब्रिटिशसत्ता स्थिरावल्यापासून भारतात गेल्या शतकात एकंदर एकतीस दुष्काळ पडले व त्यात सुमारे अडीच ते तीन कोटी लोक भुकेने मेले. याचे कारण असे की, आपल्या देशात उद्योगधंदे व व्यापार यांची वाढ होऊ द्यायची नाही व हिंदुस्थानातील व्यापारी पेठा सदैव खुली राहावी, असे ब्रिटिश राज्यकारभाराचे बुद्धिपुरस्सर धोरण आहे. ब्रिटिशांनी सुधारलेली विधिपद्धती आणि सुव्यवस्था ह्यांची देणगी हिंदुस्थानास दिली ही गोष्ट खरी. तथापि मनुष्य केवळ विधीवर आणि सुव्यवस्थेवर जगत नाही, तर तो अन्नावरही जगतो.
तरुणांची धर्मविरोधी प्रवृत्ती पाहून मला दु:ख होते। काही लोक म्हणतात, धर्म ही अफूची गोळी आहे, परंतु ते खरे नाही. माझ्या ठायी जे चांगले गुण वसत आहेत, ते किंवा माझ्या शिक्षणामुळे, समाजाचे जे काही हित झाले असेल ते माझ्यासाठी असलेल्या धार्मिक भावनेमुळेच होय. मला धर्म हवा आहे. धर्माच्या नावाने चाललेला ढोंगीपणा नको.
राजकारण कोणास करावयाचे असेल, तर राजकारणाचा चांगला अभ्यास केला पाहिजे। आपल्या समाजातील प्रत्येक कार्यकत्यार्ंने राजकीय, धार्मिक आणि आर्थिक या सर्व प्रश्नांचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे. ज्यांना पुढारी व्हायचे असेल, त्यांनी पुढाऱ्यांची कर्तव्यकर्मे व जबाबदारी काय आहे, याचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे.
सत्तेचे राजकारण खेळण्यासाठी किंवा एखाद्या मंत्र्याची जागा रिकामी झाली असता ती आपणाकडे ओढून घेण्याची प्रधानमंडळातील सभासदात जी जिवापाड धडपड चालू होई, त्यापासून मी पूर्णपणे अलिप्त राहत असे। मूकावस्थेत राहून सेवा करणे हेच श्रेष्ठ कर्तव्य होय, असा माझा विश्वास आहे.
मार्क्स वाचून काही कामगार पुढारी असे गृहीत धरतात की, भारतात मालक आणि नोकर असे केवळ दोनच वर्ग आहेत आणि भांडवलशाही नष्ट करण्याची आपली मोहीम ते सुरू करतात। या दृष्टीत दोन ढोबळ चुका आहेत. जी बाब संभवनीय आहे किंवा आदर्श आहे, तिला वास्तविक म्हणण्याची पहिली चूक ते करतात. सर्व समाजातील माणसे अर्थ प्रवृत्तीचे, बुद्धिवादी किंवा न्यायप्रिय आसतात, हे म्हणणे जसे खोटे, तसेच सर्व समाजात केवळ दोनच वर्ग असतात, असे समजणेही खोटे आहे. भारतात असे सापेक्षपणे निश्चित असे दोन वर्ग अस्तित्वात नाहीत.
हिंसेच्या शक्तीला शरण जाऊन मिळविलेली शांतता ही खरी शांतता नव्हे, ती आत्महत्या होय। तसे करणे म्हणजे सुखी, सुंदर आणि स्वास्थ्यपूर्ण जीवन जगण्यासाठी जे काही उदात्त आणि आवश्यक असते, त्याची होळी करून रानटीपणाला व अनाचारीपणाला शरण जाण्यासारखे आहे.
मला बोैद्धधर्म आवडतो, कारण कुठल्याही धर्मात जी तीन तत्त्वे सापडत नाहीत, ती बौद्धधर्मातच सापडतात. बौद्धधर्म मला प्रज्ञा शिकवतो. तो मला अंधश्रद्धा नि अद्भुतता शिकवीत नाही. तो मला प्रज्ञा, करुणा आणि समता ही तीन तत्त्वे शिकवतो. देव किंवा आत्मा समाजाचा उद्धार करू शकत नाही. मार्क्सवाद आणि साम्यवाद यांनी जगाचे सर्व धर्म हादरून टाकले आहेत. बुद्ध हाच कार्ल मार्क्सला पूर्ण उत्तर आहे. रशियन साम्यवादाचा उद्देश रक्तरंजित क्रांती घडवून आणणे हा आहे. बुद्धप्रणित साम्यवाद हा रक्तहीन क्रांती घडवून आणतो.
.
.
siddharam patil photo
लेखांची वर्गवारी
- bjp (8)
- congress (16)
- g b syndrome (1)
- INBOX (1)
- research (1)
- rss (2)
- shivaji (3)
- tarun bharat (2)
- अग्रलेख (2)
- अतिरेकी हल्ले (3)
- अध्यात्म (16)
- अनुभव (1)
- अन्य (3)
- आंबेडकर (14)
- आर्मी (4)
- इतिहास (23)
- इस्लाम (25)
- एस. गुरुमूर्ती (3)
- ओळख (1)
- कसाब (3)
- कार्यक्रम (1)
- केन्द्र (3)
- खळबळजनक (1)
- ख्रिस्ती (15)
- गीत (3)
- चाणक्य नीती (7)
- चीन (1)
- छायाचित्र (1)
- जटायु (2)
- जटायु अक्षरसेवा (1)
- जीबीएस (4)
- जीवन मंत्र (2)
- डॉ. भूषण कुमार उपाध्याय (2)
- दहशतवाद (7)
- नक्षलवाद (4)
- निमंत्रण (1)
- न्यूज़ (6)
- पत्रकारिता (6)
- परिचय (9)
- पाक (2)
- पाकिस्तान (6)
- पुस्तक परिचय (7)
- पूर्वांचल (2)
- पोलिस (2)
- बातमी (9)
- बातम्या (1)
- बुद्ध (6)
- भारत (2)
- मा. गो. वैद्य (2)
- माझ्याविषयी थोडे... (18)
- मीडिया (11)
- मुकुल कानिटकर (6)
- मुलाखत (4)
- मुस्लिम जगत (9)
- मोदी (7)
- योग (5)
- राजकारण (21)
- विमर्श (6)
- विवेक विचार (15)
- विवेकानंद साहित्य संमेलन (1)
- वैचारिक (50)
- वैद्यक (5)
- शिव धर्म (2)
- सडेतोड सागर (2)
- सर्वस्पर्शी बाबासाहेब (3)
- संस्कृति (21)
- संस्कृती (5)
- सामाजिक (7)
- सावरकर (2)
- साहित्य (6)
- सिद्धरामचे लेख (11)
- सुविचार (1)
- सूर्यनमस्कार (4)
- सोलापुर (7)
- सोलापुर दंगल (2)
- सोलापुर बातमी (7)
- स्वामी विवेकानंद (1)
- स्वामी विवेकानंदांचे विचार (31)
- हिंदू (5)







