Monday, October 31, 2011

कृष्णाचा मॅनेजमेंट फंडा

माणसासाठी सर्वात अवघड काम काय असेल ? आपले कर्मक्षेत्र आणि कुटुंब यात ताळमेळ घालणे. या ठिकाणी भले भले अपयशी होतात. जे बिझनेसमध्ये पडले त्यांचे कुटुंबाकडे दुर्लक्ष झाल्याचे तर ज्यांनी कुटुंबाकडे लक्ष्य दिले ते बिझनेसमध्ये मागे पडल्याचे आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळते. पैशाच्या भुकेने आपल्या प्रेमाच्या भुकेवर मात केल्याचे दिसते. आज घरातील लोकांसमवेत बसून जेवण करणे, गप्पा मारणे वगैरे आपण विसरूनच गेले आहोत. कुटुंबं संकुचित होण्यामागे हीच कारणं आहेत. व्यक्तिगत लाभ, उन्नती आणि आनंदाची भावना यालाच आपण विश्व समजून बसत आहोत.

सस्नेह निमंत्रण

प्रती,
बंधू - भगिनी,
विवेकानंद केंद्राच्या वतीने दिवाळी अंक प्रकाशन व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. येथे निमंत्रण पत्रक ठेवत आहे. ज्यांच्यापर्यंत पत्रिका पोहोचू शकली नाही त्यांनी हेच निमंत्रण समजून कार्यक्रमास यावे ही विनंती.

Sunday, October 30, 2011

विजय! पूर्ण विजय!!



युवाशक्तीला घातलेली साद



31 डिसेंबर 2008 ते 4 जानेवारी 2009 या कालावधीत महाराष्ट्रातील युवाशक्तीचे शेगाव (जि. बुलढाणा) येथे महाशिबीर झाले. संपूर्ण महाराष्ट्रातून 1377 तरुण-तरुणी या शिबिरात सहभागी झाले होते. युवा शक्तीला सकारात्मक साद घालणाऱ्या या उपक्रमाचा वेध घेणारा हा लेख.

स्थळ : शेगावजवळील आनंदसागर विसावा.
दि. 31 डिसेंबर 2008 ची संध्याकाळ.
18 ते 25 वयोगटांतील तरुण-तरुणी झुंडी-झुंडीने, घोळक्याने दाखल होत आहेत. यात सांगली-कोल्हापूरचे तरुण-तरुणी आहेत, तसे ठाणे-मुंबई-रत्नागिरीचेही आहेत. नागपूर-गडचिरोली-वर्ध्याचे आहेत तसे सोलापूर-लातूर-धाराशिवचेही आहेत. पुणे-नगरचे आहेत तसे अकोला-भंडारा-नांदेड-संभाजीनगर-परभणीचेही आहेत. एसटी बस आणि रेल्वेने आलेल्या तरुणांची एकच लगबग सुरू आहे.
प्रवेशद्वारात नोंदणी सुरू आहे. झुंडी-झुंडीने येणारे विविध गणांमध्ये विभागून शिस्तीच्या कोंदणात बसत आहेत. 25-25 जणांचे गण आपल्या गणप्रमुखाच्या मार्गदर्शनानुसार सभामंडपाकडे कूच करीत आहेत. "भारत माता की - जय', "जय भवानी- जय शिवाजी', "कौन चले भाय कौन चले- स्वीमीजी के वीर चले' या घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे. मुख्य सभामंडपात गणश: आणि क्षेत्रश: शिबिरार्थींची बैठक व्यवस्था केली आहे. उभ्या रांगा आणि आडव्या ओळीत बसलेले 1500 तरुण ॐकार उच्चारण करीत भजनसंध्येत सहभागी झालेत. येथूनच चार दिवसांच्या शिबिराला सुरुवात झाली आहे. उद्यापासून या साऱ्यांना पहाटे 4.30 वा. उठून पहाटेच्या योगसत्रासाठी तयार व्हायचंय. सगळेजणं आपले भ्रमणध्वनी बंद करून आपापल्या गणप्रमुखांकडे दिले आहेत. शरीर, मनाने स्वत:च्या घडणीसाठी सिद्ध झालेत. ( photos http://poornvijay.blogspot.com/search?updated-max=2009-02-06T02%3A43%3A00-08%3A00&max-results=6)

डॉक्टर साहेब,

हेही समजून घ्या थोडं...


मी काही वैद्यक क्षेत्रातला जाणकार नाही. डॉक्टर मंडळींना उपदेशाचे डोस द्यावेत असाही माझा विचार नाही. तरीही मला आलेल्या अनुभवामुळे हा लेख लिहित आहे.
चार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. दुपारी संपादकीय पानाचे काम आटोपले होते म्हणून कार्यालयातच वृत्तपत्रे चाळीत बसलो होतो. घरून लहान भावाचा फोन आला. तो घाबरलेला होता. "बाबाग्‌ यान्‌ अरे आग्याद्‌...' म्हणत तो सांगू लागला. माझ्या वडिलांना (वय साधारण 58) शेतात काम करताना अचानक पाठीत दुखायला लागले होते. तीव्र वेदना होत होत्या.

- महानायक... मृत्यूचे रहस्य ... netaji




टीम अण्णा आणि rss - मा. गो. वैद्य यांचे भाष्य


अण्णा हजारे यांच्या आंदोलनाने सामान्य जनमानस प्रभावित झाले असतानाच, त्यांच्या चमूतील दौर्बल्य प्रकट होऊ लागले. या दौर्बल्याचा, त्यांच्या आंदोलनाच्या परिणामकारकतेवर फार विपरीत परिणाम होईल, असे मला वाटत नाही. परंतु, अण्णांच्या विरोधकांना मात्र, त्यांच्यावर आघात करण्यासाठी एक शस्त्र मिळाले, हे मान्य करावे लागेल.

अण्णा, rss तुमच्यासाठी अस्पृश्य आहे ?

नुकतीच टीम अण्णाची पत्रकार परिषद tv वर पाहत होतो. rss विषयावर बोलताना प्रशांत भूषण म्हणाले की, आम्ही आमच्या मंचावर rss च्या लोकांना येवू दिले नाही. टीम अण्णाने कोणाला सोबत घ्यावे, कोणाला घेवू नये, हे ठरविण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे, हे खरेच. पण तरीही मनात प्रश्न येतो की, यांना जामा मशिदीचे इमाम बुखारी आपल्या मंचावर आणावे वाटले ( किरण बेदी यांनी बुखारी यांच्या घरी जावून त्यांना विनवण्या केल्या होत्या. 'भारत मत की जय', 'वंदे मातरम' म्हणणार नाही, असे आश्वासन दिल्यास राम लीलावर येण्याचा विचार करेन असे ते म्हणाले. ), अफझल गुरु याला फाशी होऊ नये असे मनापासून वाटणाऱ्या मेधाबाई पाटकर टीम अण्णात असू शकतात (पाटकर बाईंच्या पत्रकार परिषदेला मी सोलापूर पत्रकार संघात उपस्थित होतो, तेंव्हा त्या अरुंधती रॉय यांचा बचाव करताना अफझल गुरुची कड घेताना दिसल्या होत्या.), नक्सलवादी कारवायांशी जवळीक ठेवणारे,

Saturday, October 29, 2011

...अन् पाकिस्तानने तोडून घेतले काश्मीर

दिव्य मराठी नेटवर्क. एका छोट्याशा घटनेमुळे आज आपल्याजवळ पूर्ण काश्मीर नाहीय. दुर्दैवाने काश्मीरचे महाराजा हरि सिंह आणि देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे संबंध चांगले नव्हते. याची किंमत देशाला मोजावी लागली आणि आजही त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. राजा हरिसिंह यांना शेख अब्दुल्ला यांची कुटिल नीती, स्वार्थी आणि फुटीर वृत्ती माहीत होती. 'क्विट काश्मीर' आंदोलनाच्या आडून शेख अब्दुल्ला हे महाराजा हरिसिंहांना हटवून स्वत: सत्ता मिळवू इच्छित होते. याची हरिसिंहांना कल्पना होती.
http://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-neharu-and-kasmir-issue-2529050.html

Wednesday, October 26, 2011

हनुमानजींकडून शिका, 'माणसं कशी ओळखायची ?'

या व्यवहारी जगात आपला कोण आणि परका कोण, हे ओळखणे तसे कठीण आहे. कधी कधी आपण आपल्या हितचिंतकांना दूर सारतो आणि शत्रूंना जवळ करतो. काही लोकांना वाटतं की व्यावसायिक नाते हे ठराविक मर्यादेपर्यंतच ठीक असतात, परंतु हे खरे नाही.
व्यावसायिक नात्यांतही आपण जर आपले आणि परके ओळखू शकलो आणि त्या नात्यांला थोडे प्रेम आणि विश्वास याचे सिंचन केले तर हे नातेही दीर्घकाळ टिकू शकतात. जीवनाला अर्थ प्राप्त करण्यासाठी हे आवश्यकही आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/article/REL-hanumaan-sys-how-to-identify-friends-and-enemy-2525664.html

Tuesday, October 25, 2011

चाणक्य नीती 10 : अशा स्त्री, मित्र किंवा नोकरासोबत कधीही राहू नका

आपल्या आसपास अनेक प्रकारचे लोक असतात. काही आपले नातेवाईक असतात, काही मित्र, नोकर आदी असतात तर काही अनोळखी. प्रत्येक माणसाचा स्वभाव हा वेगळा असतो. काही चांगल्या स्वभावाचे असतात तर काही दुष्ट स्वभावाचे. आचार्य चाणक्य यांनी आपल्याला कशा लोकांसोबत राहू नये याचे मार्गदर्शन केले आहे.
आचार्य चाणक्य म्हणतात,
दुष्टा भार्या शठं मित्रं भृत्यश्चोत्तरदायक:।
स-सर्पे च गृहे वासो मृत्युरेव न संशय:।।
या श्लोकाचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे....
पूर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
http://divyamarathi.bhaskar.com/article/REL-chanakya-niti-woman-wife-friend-servant-life-management-2524385.html

 

नोटांवर शिवाजी महाराज, महाराणा प्रताप...

 
 हिंदुस्तान वरील १५० वर्षांचे ब्रिटीश साम्राज्य उधळून फेकणे हे काही एका व्यक्ती कडून शक्य नव्हते. त्या साठी हजारो क्रांतिकारकांनी स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात आपल्या प्राणांच्या आहुती दिल्या.
परंतु गांधीवादी (?) कॉंग्रेस सरकार सर्व श्रेय फक्त आणि फक्त महात्मा गांधी यांनाच देते.
आम्हाला गांधींचा विरोध नाही परंतु १० पासून १००० रुपयांच्या नोटांवर फक्त गांधीच, असे का?
फक्त त्यांच्या एकामुळे स्वातंत्र्य शक्यच नव्हते.

http://divyamarathi.bhaskar.com/article/DMS-shivaji-maharaj-on-indian-currency-2524288.html?HF=

 

Monday, October 24, 2011

पंतप्रधान, राष्ट्रपतींसमोर खुर्शिद करणार ‘वादग्रस्त’ नाटक

नवी दिल्ली - सलमान खुर्शिद आता आपल्यातील 'छुपी कला' पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्यासमोर सादर करतील. २८ ऑक्टोबरला राष्ट्रपती भवनमध्ये 'सन्स ऑफ बाबर' नावाचे वादग्रस्त ठरलेले नाटक सादर होणार आहे. या नाटकाच्या माध्यमातून बहादूर शहा जाफर यांच्यासारख्या देशभक्त राजाला बाबरसारख्या या देशावर क्रूर राजवट लादणा-याच्या पंक्तीत बसविल्याबद्दल मे २०११ मध्ये गोव्यातील काही संघटनांनी विरोध दर्शविला होता. सलमान खुर्शीद यांनी या देशावर आक्रमण करणाऱ्या बाबर या राजाचे उदात्तीकरण केल्याचा आरोप हिंदू संघटनांनी केला आहे.
पूर्ण बातमीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
http://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-salman-khurshid-will-act-in-play-2522265.html?HT4=

Sunday, October 23, 2011

कपाळावर टिकली, गंध लावायचे नाही, अन्यथा...

रोहतक. महिला कर्मचारी ऑफिसला येताना साडी किंवा सलवार कुर्त्यात येऊ शकतील मात्र त्यांनी सौभाग्याचे चिन्ह टिकली, सिंदूर लावता कामा नये. मंगळसूत्रही घालता येणार नाही. पुरुष कर्मचा-यांनाही ऑफिसला येताना गंध लावून येता येणार नाही. मनगटावर पवित्र धागाही बांधता येणार नाही. हे नियम केले आहेत देशात फायनान्स क्षेत्रात काम करणा-या मुथूट फायनान्स अ‍ँड गोल्ड लोन या कंपनीने. या कंपनीचे मुख्यालय केरळमध्ये असून ही कंपनी सोने गहाण ठेवून घेऊन सोन्याच्या किंमतीच्या 80 टक्के कर्ज देते.
पूर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
http://divyamarathi.bhaskar.com/article/NAT--muthoot-finance-and-gold-loan-2520492.html

Tuesday, October 11, 2011

विवेक विचार दिवाळी अंक

नमस्ते बंधू भगिनी,
यंदा विवेक विचार मासिकाचे दिवाळी अंक प्रकाशित होत आहे. त्याचे हे मुखपृष्ठ. विवेक विचार हे विवेकानंद केंद्राचे मुखपत्र आहे.
ओम
निमंत्रण पत्रिका
विवेक विचार
विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे मराठी मासिक
--------------------------------------------------------------------------------------------------------------
दिवाळी अंक प्रकाशन व व्याख्यानप्रति,
------------------------------------------------
------------------------------------------------
बंधू-भगिनी,
विवेकानंद केंद्र ही एक वैचारिक चळवळ आहे. घराघरापर्यंत संस्कारशील साहित्य आणि राष्ट्रभक्तीचे विचार पोहोचावेत यासाठी विवेक विचार या मासिकाच्या माध्यमातून विवेकानंद केंद्र प्रयत्नशील आहे. यंदा दिवाळी अंकाच्या प्रकाशनाचे निमित्त साधून व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. आपण या कार्यक्रमास यावे ही आग्रहाची विनंती.

व्याख्यान विषय : आयुष्यावर ऐकू काही
वक्ते : माननीय प्रकाश पाठक, भोसला मिलिटरी स्कूलचे संचालक व संस्कार भारतीलचे प्रदेशमंत्री
प्रमुख उपस्थिती : यतीन शहा, उद्योजक
स्थळ : शिवछत्रपती रंगभवन, सोलापूर.
वेळ : सायं. 6 ते 7.30 वा.

आपले स्रेहांकित,दीपक पाटील                                                                  
सिद्धाराम भै. पाटील
संचालक, विवेकानंद केंद्र सोलापूर                                        संपादक, विवेक विचार

टीप : कार्यक्रम वेळेवर सुरू होईल. कृपया वेळेआधी 5 मिनिटे उपस्थित राहावे, ही विनंती.

www.vkvivekvichar.blogspot.com

Sunday, October 9, 2011

...विवेकानंदांना सांगितली होती ही गोष्ट

स्वामी विवेकानंद यांनी संपूर्ण भारताचे भ्रमण केले होते. या भ्रमण काळात त्यांना अनेक संत महापुरुष भेटले. एका संतांने त्यांना पवहारी बाबांची गोष्ट सांगितली. ती कथा पुढीलप्रमाणे होती...
पूर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
http://divyamarathi.bhaskar.com/article/REL-swami-vivekananda-and-pawahari-baba-2487427.html


Wednesday, October 5, 2011

ओ... जेरुसलेम!

अलेक्स हॅलेची कादंबरी परवा पुन्हा लख्ख आठवली. 'रूट्स'. आपल्या मुळांचा शोध घेत हॅले अमेरिकेत गुलाम म्हणून आणलेल्या आपल्या अफ्रिकन पूर्वजांची पाळं मुळं शोधून काढतात. अक्षरश: खिळवून ठेवते ही कादंबरी. मुळांशी घट्ट बांधलेलं असणं हा मानवी स्वभाव असेल कदाचित; पण ज्यूंच्या बाबतीत हे बंध इतरांहून खूप घट्ट आहेत.

Tuesday, October 4, 2011

सोनिया गांधींचे जावईबापू लष्करप्रमुखांपेक्षाही मोठे!

रॉबर्ट वडेरा देशाचे भूदल, नौदल व हवाई दलाच्या प्रमुखांपेक्षाही मोठे असल्याचे सिद्ध झाले आहे. कारण ज्या लोकांना देशांतर्गत विमानतळावर तपासणीतून जावे लागत नाही, अशा लोकांच्या यादीत रॉबर्ट यांच्या नावाचा समावेश आहे. तसे पाहिले तर ज्या लोकांचा या यादीत समावेश आहे, त्यांना त्यांच्या पदानुसार ही सूट मिळालेली आहे. मात्र, रॉबर्ट वडेरा व तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा हे कोणत्याही अधिकृत पदांवर नसतानाही त्यांची नावे या यादीत आहेत. 28 सप्टेंबर 2005 रोजी रॉबर्ट यांचे नाव या यादीत आले होते. ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सेक्युरिटीने देशभरात एक पत्रक काढले होते. रॉबर्ट वडेरा जेव्हा स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपसह प्रवास करतील तेव्हा त्यांची तपासणी करण्यात येऊ नये, असे या पत्रकात म्हटले होते. देशाच्या भूदल, नौदल व हवाई दलाच्या प्रमुखांनाही तपासणीतून जावे लागते, मग रॉबर्ट वडेरांना ही सूट कशासाठी असा प्रश्न तेव्हा उपस्थित झाला होता. अनेकांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली.
पूर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
http://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-sonia-gandhi-son-in-law-robert-vadra-property-2478503.html?HT5=

Monday, October 3, 2011

विनायक सेनचा 'असली' चेहरा

राष्ट्रीय सुरक्षा या विषयावरील तज्ज्ञ  आणि अनुभवी व्यक्तिमत्व म्हणून ब्रिगेडियर हेमंत महाजन हे महाराष्ट्राला परिचित आहेत. नक्षलवादाची समस्या हे राष्ट्रीय सुरक्षेपुढील एक गंभीर आव्हान आहे. ब्रिगेडियर महाजन यांनी नक्षलवादाच्या समस्येचा सखोल अभ्यास केला आहे. नक्षलवादाचे विविध पैलू आणि तो नियंत्रणात आणण्याचा मार्ग सांगणाऱ्या लेखमालेचा हा तिसरा भाग.
नक्षलवाद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्याच्या वल्गना पंतप्रधानांपासून लुंग्या सुंग्यापर्यंत केल्या जातात.

Saturday, October 1, 2011

अमरसिंग झोपेत काय बडबड करतात ?

चिंता
राज्यसभा खासदार अमरसिंग यांनी सरकारला चिंतित केले आहे. मात्र, सरकारची चिंता अमरसिंगांच्या आजारपणाची नाही. खासदार खरेदी प्रकरणात अमरसिंग तिहारमध्ये असताना जे बोलत होते, त्याने सरकारला चिंतित केले आहे. तिहारमध्ये असताना दिवसा तर अमरसिंग शांत राहात होते, कुणाशी फार बोलत नव्हते. पण, रात्री झोपेत त्यांची जी बडबड होत होती, त्याने सरकारला सतर्क केले आहे. अमरसिंगांची प्रकृती लक्षात घेता त्यांच्या प्रकृतीवर रात्री लक्ष ठेवण्यासाठी तिहार प्रशासनाने एक डॉक्टर तैनात केला होता.

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी