Saturday, October 29, 2011

...अन् पाकिस्तानने तोडून घेतले काश्मीर

दिव्य मराठी नेटवर्क. एका छोट्याशा घटनेमुळे आज आपल्याजवळ पूर्ण काश्मीर नाहीय. दुर्दैवाने काश्मीरचे महाराजा हरि सिंह आणि देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे संबंध चांगले नव्हते. याची किंमत देशाला मोजावी लागली आणि आजही त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. राजा हरिसिंह यांना शेख अब्दुल्ला यांची कुटिल नीती, स्वार्थी आणि फुटीर वृत्ती माहीत होती. 'क्विट काश्मीर' आंदोलनाच्या आडून शेख अब्दुल्ला हे महाराजा हरिसिंहांना हटवून स्वत: सत्ता मिळवू इच्छित होते. याची हरिसिंहांना कल्पना होती.
http://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-neharu-and-kasmir-issue-2529050.html

एकदा जवाहरलाल नेहरू यांना शेख अब्दुल्ला यांनी श्रीनगरच्या एका सभेसाठी येण्याचे आमंत्रण दिले होते. या सभेत काश्मीरच्या राजाला हटविण्यात यावे, असा मुख्य प्रस्ताव होता. राजा हरिसिंह यांनी नेहरूंना या सभेस न येण्याची विनंती केली होती. परंतु नेहरूंची शेख अब्दुल्ला यांच्याशी घनिष्ठ मैत्री होती. आधीपासूनच राजाविषयी नेहरूजींच्या मनात चांगली भावना नव्हती, असेही सांगितले जाते. नेहरूजी त्या सभेस जाण्याचे ठरविले. यामुळे महाराजा हरिसिंह यांना धक्का बसला. त्यानंतर राजांनी नेहरूंना श्रीनगरला येण्यापूर्वीच जम्मू येथे राखले. नेहरूंनी या घटनेला अपमान मानले आणि ते ही घटना आयुष्यभर विसरले नाहीत.
स्वातंत्र्य मिळताच पाकिस्तानी सेना आणि कबायली टोळ्यांनी काश्मीरवर हल्लाबोल केला. राजा हरिसिंह यांना धडा शिकविण्यासाठी म्हणून नेहरूंनी भारतीय सेना पाठविण्यास जाणीवपूर्वक विलंब केला, असे म्हटले जाते. यामुळे आज दोन तृतियांश काश्मीर पाकिस्तानच्या ताब्यात आहे. या घटनेमुळे शेख अब्दुल्ला यांना अतिव आनंद झाला. कारण यामुळे त्यांनी नेहरूंना आनंदित करण्याचे आणि महाराजांना क्रुद्ध करण्याचे काम केले होते. नंतर शेख अब्दुल्ला आणि नेहरू यांच्यातही दरी निर्माण झाली. परंतु देशाचा मुकूट मात्र तुटून गेला. शेख अब्दुल्ला हे फारुक अब्दुल्ला यांचे पिता आणि ओमर अब्दुल्ला यांचे आजोबा होत. आता ओमर अब्दुल्ला हे काश्मीरातून सैन्याचे विशेष अधिकार काढून घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

1 comment:

  1. नेहरू हा गद्दार होता त्याने देश हित कधीच पहिले नाही त्याकडून दुसरी अपेक्षा काय असणार अगोदर कॉंग्रेस आणि गांधीने देशाचे तुकडे करून भारत मातेच्या पोटात खंजीर खुपसला आणि नंतर नेहरुला पंतप्रधान बनवून इंग्रजांकडून वाचलेला देश हि लुतावला मी आयुष्यभर या गद्दारांना कधीच माफ नाही करू शकत तसे मी करूही काय शकतो पण एवढे मात्र नक्की माझा वोट मी जिवंत असेपर्यंत तरी कॉंग्रेस किवा त्याच्या सहयोगी पार्टीला देणार नाही.

    ReplyDelete

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी