या व्यवहारी जगात आपला कोण आणि परका कोण, हे ओळखणे तसे कठीण आहे. कधी कधी आपण आपल्या हितचिंतकांना दूर सारतो आणि शत्रूंना जवळ करतो. काही लोकांना वाटतं की व्यावसायिक नाते हे ठराविक मर्यादेपर्यंतच ठीक असतात, परंतु हे खरे नाही.
व्यावसायिक नात्यांतही आपण जर आपले आणि परके ओळखू शकलो आणि त्या नात्यांला थोडे प्रेम आणि विश्वास याचे सिंचन केले तर हे नातेही दीर्घकाळ टिकू शकतात. जीवनाला अर्थ प्राप्त करण्यासाठी हे आवश्यकही आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/article/REL-hanumaan-sys-how-to-identify-friends-and-enemy-2525664.html
आज 'मला काय मिळणार ?' या विचारसरणीचा रोग फैलावताना दिसतो. अशा वातावरणात थोडा समजूतदारपणा दाखविला तर आपल्याला आपल्या प्रतिस्पर्धी गोटातूनही काही लोकांना जोडता येणे शक्य आहे. अनुभव आणि प्रतिभेने अशा लोकांना ओळखण्याची आणि त्यांना आपल्या व्यवहाराने जिंकण्याचीच काय ती आवश्यकता असते.
सुंदरकांडात एक अतिशय मार्मिक प्रसंग आहे. पाहा, हनुमान एका मोठ्या अभियानासाठी बाहेर पडले आहेत. लंकेत सीतेचा शोध घ्यायचा आहे. समुद्र पार करून, काही राक्षसांशी दोन हात करीत हनुमान पोहोचले आहेत. आपणही जेव्हा व्यावसायात पडतो ती स्थिती समुद्र ओलांडण्यासारखीच असते. परंतु आपण थोड्याशा प्रयत्नांनी लगेच थकून जातो. बुद्धी विचलित होऊ लागते. हनुमानजी शिकवतात की आपण जर आपली बुद्धी स्थिर करू शकलो तर शत्रूंच्या शिबिरातही आपली माणसं तयार करणे शक्य आहे.
देवी सीतेला शोधता शोधता हनुमानजी बिभीषणाच्या घरी पोचले आहेत. घराबाहेरील काही चिन्हांवरून त्यांनी जाणलं की येथे जो माणूस राहतो, तो रामाच्या कामाला येऊ शकेल. हनुमंतांनी बिभीषणाशी मैत्री केली. त्याला आश्वस्त केले की श्रीराम हे त्यांना शरण येणा-यांना अतिशय स्रेहाने वागवितात. हनुमंतांनी आपल्या प्रेमपूर्ण भाषेत एक मौन निमंत्रण दिले. रामाला शरण येण्याचं निमंत्रण. आजवर लंकेत बिभीषण उपेक्षित होते, त्यांना ही संधी मिळाली.
एक नातं तयार झालं. प्रेमाचे बंध तयार झाले. विश्वास दृढ झाला. बिभीषण लंका सोडून श्रीरामांच्या आश्रयाला आला. श्रीरामानेही हनुमंताच्या विश्वासाला पूर्ण मान दिला आणि तो राखला. बिभीषणाची भेट होताच श्रीरामांना राजतिलक करून टाकलं. मित्र बनविलं. रामायणातला हा प्रसंग तुम्ही समाजाच्या कोणत्याही क्षेत्रात काम करीत असा, तेथे औचित्यपूर्ण आहे.

No comments:
Post a Comment