Thursday, December 31, 2015

एका हातात बॉम्ब दुसर्‍या हातात गीता


''आम्हाला वारंवार एक प्रश्‍न विचारला जातो आणि तो अनेक दशके विचारला गेलेला आहे की, भारताने गेल्या हजारो वर्षांच्या वाटचालीमध्ये आपला भूभाग विस्तारित का केलेला नाही किंवा जगामध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्याचा  प्रयत्न का केला नाही ? त्याचे उत्तर आपण देऊ शकत नसलो तरी काही नामवंत अभ्यासकांनी ते दिलेले आहे. भारतीयांच्या विस्तार न करण्याच्या प्रवृत्तीमागे त्याची मानसिकता दडलेली आहे. त्याचे स्पष्टीकरण करताना हे विद्वान लोक भारतीयांची सहिष्णुता, बेशिस्त, कोणाचाही बदला न घेण्याची किंवा सूड न घेण्याची भावना, परकीयांना आपल्यात सामावून घेण्याची लवचिकता आणि आक्रमणापेक्षा स्वसंरक्षणाला महत्त्व देण्याची प्रवृत्ती याकडेे बोट दाखवतात.''
माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी सहलेखक एस. वाय. राजन यांच्या सहकार्याने 1998 साली लिहिलेल्या ‘इंडिया व्हिजन 2020 - अ व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम’ या पुस्तकात वरील प्रतिपादन केलेले आहे. डॉ. कलाम यांनी या पुस्तकात हा विषय फार सखोलपणे मांडलेला आहे.
भारतीयांच्या या सार्‍या  मनोवृत्तीचे मूळ त्यांच्या गोंधळलेल्या मनःस्थितीत असते आणि ही गोंधळलेली मनःस्थिती ही आपली राष्ट्रीय प्रवृत्ती आहे. युध्दाचा त्याग करणारा राजा अशोक हा आपल्या देशातल्या जनतेचा आदर्श राजा झाला तेव्हापासूनची अनेक शतके भारतीयांच्या मनःस्थितीला हा संभ्रम वेढून राहिलेला आहे.

Friday, December 18, 2015

दिलीप कुलकर्णी यांनी उलगडली पर्यावरणस्नेही विकासनीती

विवेकानंद केंद्राच्या पर्यावरण मंडळातर्फे केले आयोजन
प्रतिनिधी । सोलापूर
निसर्गाच्याव्यवस्थेतील प्रत्येक घटक विघटित होतो. माणसांचे केंद्रीकरण अन्् प्रगतीच्या दिखाव्यामुळे कचऱ्याची निर्मिती होते. स्वत:ला वगळून कचऱ्याचे निर्मूलन अशक्य आहे. कचारानिर्मितीच होणार नाही, यासाठी प्रयत्न करणे हाच त्यावरील एकमेव शाश्वत पर्याय आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ दिलीप कुलकर्णी (कुडाळ, रत्नागिरी) यांनी केले. विवेकानंद केंद्राच्या पर्यावरण मंडळातर्फे गुरुवार आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महापालिका आयुक्त विजयकुमार काळम अध्यक्षस्थानी तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, केंद्राचे नगर संचालक दीपक पाटील, नगरप्रमुख प्रा. प्रशांत स्वामी डॉ. वासुदेव रायते पर्यावरण मंडळाचे प्रमुख अजित आेक आदी उपस्थित होते.

Wednesday, December 16, 2015

विवेकानंद केंद्रातर्फे गुरुवारी पर्यावरणतज्ज्ञ दिलीप कुलकर्णींचे व्याख्यान

सोलापूर । विवेकानंद केंद्राच्या पर्यावरण मंडळातर्फे गुरुवारी (१७ डिसेंबर) सायंकाळी साडेसहा वाजता प्रसिद्ध पर्यारवणतज्ज्ञ दिलीप कुलकर्णी यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. विवेकांनद केंद्र, १६५ रेल्वे लाइन्स येथे “कचरा निर्मूलन आणि नागरिकांची जबाबदारी’ या विषयावर व्याख्यान होईल, अशी माहिती मंडळाचे प्रमुख अजित ओक यांनी िदली. अध्यक्षस्थानी मनपा आयुक्त विजयकुमार काळम पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे सीइओ अरुण डोंगरे उपस्थित असतील. व्याख्यानानंतर कचरा िनर्मूलन आणि नागरिकांचा सहभाग यावर चर्चा होईल.

#होम_मैदान_सोलापूर कोणाच्या मालकीचे?

होम मैदान शासकीय आहे आणि शासनाकडून यात्रेसाठी देवस्थानला ही जागा देण्यात येते, असे अधिकारी आणि काही सन्माननीय पढतमूर्ख सांगत आहेत.
शासन जणू उपकार करते असा भासवण्याचा प्रयत्न यामागे असतो. पण हे खरे नाही.
५० वर्षांपूर्वी महापालिकेत एक अतिशय शहाणे अधिकारी आले होते.
त्यांनी म्हटले, “सिद्धेश्वर तलाव हे सरकारी मालकीचे आहे. त्यामुळे आम्ही तलाव बुजवणार आणि त्या ठिकाणी बाग फुलवणार.’’
हा वाद तेव्हांच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत गेला होता.
मुख्यमंत्र्यांनी समज दिली तेव्हा कुठे अधिकाऱ्यांची अक्कल ठिकाणावर आली.

Tuesday, December 15, 2015

मुंढेजी, अहंकाराचे भूत मानगुटीवरून उतरवा


जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे आणि सिद्धेश्वर यात्रा समिती वाद या विषयावर युवापत्रकार सागर सुरुवसे यांचा दैनिक तरुण भारतच्या रविवारच्या आसमंत पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेला लोकप्रिय लेख

“देवस्थान समितीने संपूर्ण होम मैदानावर मॅट आच्छादन केले आहे. आपातकालीन मार्ग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयालगतचा रस्ताही मोकळा सोडला आहे. ही दोन्ही कामे पूर्ण झाली आहेत आणि उद्घाटन माननीय जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते, मंदिर समितीचे पदाधिकारी आणि पालकमंत्री यांच्या उपस्थितीत होत आहे. ही स्वप्नवत कल्पना. पण ही गोष्ट सत्यात उतरली असती जर का जिल्हाधिकारी मुंढे यांनी स्वत:च्या कार्यशैलीत बदल केला असता.’’ हे उद्गार आहेत सोलापुरात जिल्हाधिकारी पदावर राहिलेल्या एका उमद्या अधिकार्‍यांचे. अर्थातच त्यांनी आपली ही भावना खासगीत बोलताना व्यक्त केली आहे.
संत ज्ञानेश्‍वरांनी अशा स्वभावाच्या व्यक्तींचे वर्णन मोठ्या चपखलपणे केले आहे. ज्ञानोबा म्हणतात, ‘अहंकाराचे वागणे मोठ्या नवलाचे आहे. अज्ञानी, सर्वसामान्य लोकांच्या मागे तो लागत नाही. पण बुद्धीमंतांच्या मात्र तो मानगुटी बसतो. त्याला आपल्या तालावर नाचायला लावतो.’ सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्या वर्तनाला हे वर्णन तंतोतंत लागू पडते.

Monday, December 7, 2015

पुनश्‍च एकदा सडेतोड

आमचे मित्र सागर सुरवसे यांनी तरुण भारतमध्ये सडेतोड या नावाने स्तंभ लेखनाला सुरुवात केली आहे. रामतीर्थकर सरांनी पेटवलेली मशाल अधिक प्रखर होत जावो या शुभेच्छा....

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी