Showing posts with label संस्कृति. Show all posts

Thursday, January 21, 2016
९०० वर्षांपूर्वी दिलेली “गिफ्ट’’ आम्ही उघडून पाहिलीच नाही !
सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धराम. ९०० वर्षांपूर्वी सोलापुरात जन्मास आलेले. त्यांचे व्यक्तिमत्त्व हे बहुआयामी होते. त्यांनी ६८ हजार वचनांची निर्मिती केली. कर्नाटक, आंध्र आणि महाराष्ट्रात शिवयोगी सिद्धराम यांना ईश्वर मानून भक्ती करणारा वर्ग खूप मोठा आहे. परंतु त्यातील खूप कमी लोकांना सिद्धरामांच्या वचनसाहित्याची माहिती आहे. रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या या विचारांची ही शिदोरी, गिफ्ट आम्ही उघडून पाहिलीच नाही.
Tuesday, September 15, 2015
डोळस विश्वबंधुत्वाच्या दिशेने दमदार पाऊल
व्हीआयएफच्या देखण्या सभागृहात 3
आणि 4 सप्टेंबर रोजी जागतिक हिंदू-बौध्द संमेलन पार पडले. विवेकानंद
इंटरनॅशनल फाउंडेशन, जपानची थिंक टँक समजली जाणारी टोकियो फाउंडेशन आणि
जगभरातील बौध्दांची सर्वोच्च संस्था इंटरनॅशनल बुध्दिस्ट कॉन्फिडरेशन या
जागतिक स्तरावर नावलौकिक असलेल्या तीन संस्थांनी मिळून या संमेलनाचे आयोजन
केले होते. केवळ माझाच धर्म खरा म्हणणाऱ्या धर्मांचा अनुभव घेतलेल्या
जगासाठी हा विचार नवीन आणि आश्वासक होता. हा विश्वबंधुत्वाचा विचार आजही
एकांतिक धर्मीयांनी स्वीकारलेला नाही. धर्मांतरणे घडवून आणण्यासाठी ते
कोणत्याही थराला चालले आहेत. त्यामुळे जगातील संघर्ष टाळण्यासाठी एका सशक्त
पुढाकाराची गरज होती. जागतिक हिंदू-बौध्द संमेलनाकडे या पार्श्वभूमीवर
पाहिले पाहिजे..
Saturday, March 21, 2015
गुढीपाडवा आणि वैज्ञानिक कालगणना
काळासंबंधी आपण कसा विचार करतो त्याचा आपल्या जीवनशैलीवरही परिणाम होतो. आज सारे विश्व पर्यावरणाच्या समस्यांनी ग्रासले गेले आहे. आपण जर या समस्येच्या मुळाशी जाऊन पाहिले तर असे दिसून येईल की, याची मूळ कारणे पाश्चिमात्य विचारांत आहेत. ती मंडळी काळाला एकरेषीय समजतात. त्यामुळे जीवन केवळ मर्यादित वेळेपर्यंतच मानले जाते. यामुळे जेवढे अधिक भोगता येईल तेवढे भोगण्याची वृत्ती निर्माण होते. परिणामी सृष्टीचे शोषण होते.
Tuesday, March 3, 2015
संवादाची शक्ती - एक चिंतन
विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे राष्ट्रीय अध्यक्ष व विचारवंत पी. परमेश्वरन् यांचा लेख...
जेव्हा तुम्ही एखाद्या विषयावर एखाद्याशी चर्चा करता तेव्हा ती तीन प्रकारे करता येते. वाद, जल्प आणि वितंड हे ते तीन प्रकार आहेत. किती सुरेख विभागणी आहे ही. ‘वादा’ मध्ये सत्य शोधणे हा तुमचा हेतु असतो. सत्यशोधनाच्या हेतुने तुम्ही दुसर्याशी चर्चा करीत असता या चर्चेच्या वेळी तुम्ही शांत, संयमी असता. तुमच्याकडून वाक्ताडन होत नाही. चर्चाही गरमागरम नसते. अशा चर्चेला वाद असे म्हणतात.

Monday, April 21, 2014
आर्य आणि अनार्य
जे तथाकथित युरोपीय पंडित आहेत, ते सांगत असतात की, आर्य कुठूनतरी बाहेरून हिंदुस्थानात आले. त्यांनी एतद्देशीयांकडून भूमी बळकावली. त्यांना नामशेष केले. या सार्या तद्दन खोट्या गोष्टी आहेत. मूर्खांच्या वल्गना आहेत. दुर्दैव असे की, काही भारतीय पंडितसुद्धा या म्हणण्याला माना डोलावतात ! ही सर्व असत्ये आमच्या मुलांना शिकविली जात आहेत ! केवढी दु:खाची गोष्ट ही | मी काही मोठा पंडित असल्याचा दावा करीत नाही. पण मला जे काही कळले आहे, त्याच्या आधारे पॅरिसच्या परिषदेत मी हे म्हणणे प्रखरपणाने मोडून काढले. भारतीय आणि युरोपीय पंडितांशी मी याबद्दल वेळोवेळी बोलत आलो आहे. आर्य बाहेरून आले या सिद्धान्तावरचे माझे आक्षेप मी वेळ मिळताच सविस्तर रीतीने मांडणार आहे. माझे तुम्हाला सांगणे आहे की, आपले जुने धर्मग्रंथ स्वत: अभ्यासा आणि मग निष्कर्ष काढा.
युरोपीय लोकांना जेव्हा जेव्हा संधी मिळली, तेव्हा तेव्हा त्यांनी, ते जातील तिथल्या मूळच्या रहिवाशांना नेस्तनाबूत केले आणि तेथे ते आरामात राहू लागले. म्हणून त्यांना वाटते की, आर्यांनीही तेच केले असेल ! पाश्चिमात्य लोक आपापल्या देशातल्याच साधनसंपत्तीवर अवलंबून राहून तिथे सुखात राहीलेअसते तर त्यांना जगात ऐदी, उनाड समजण्यात आले असते. म्हणून त्यांना जगात सर्वत्र भटकावे लागले. जिथे ते गेले तिथे त्यांनी कत्तली केल्या, दरोडे घातले, लोकांची संपत्ती लुटली. म्हणून त्यांना वाटते की, आर्यांनीही तसेच केले असेल ! पण याला पुरावा काय ? युरोपीय पंडितांनो, हे सारे तुमचे तर्कटच ना ? मग ते कृपा करून गुंडाळी करून तुमच्या बासनातच ठेवून द्या कसे !
कोणत्या वेदात नि कोणत्या सूक्तात असे लिहिलेले आहे की, आर्य बाहेरच्या देशातून आले ? कुठे पुरावा आहे की, त्यांनी एतद्देशीयांच्या कत्तली केल्या ? असल्या वेडपट गोष्टी बोलून तुम्हाला काय मिळते ? रामायणाचा तुमचा अभ्यास व्यर्थ आहे. आपल्या सोयीची एक कपोलकल्पित गोष्ट तुम्ही रामायणावरून रचली आहे इतकेच !
रामायणात आहे तरी काय ? दक्षिण भारतातील अनार्य जमातींचा आर्यांनी केलेला पराभव. अहा ! काय पण प्रतिभा ! रामचंद्र हे आर्य सम्राट होते ना ? त्यांचे युद्ध कोणाबरोबर चालले होते ? - लंकेचा सम्राट रावण याच्याबरोबर. जरा रामायण वाचा म्हणजे कळेल की, रावण हा रामापेक्षा काकणभर जास्तच विद्वान होता. लंका ही अयोध्येपेक्षा समृद्ध होती. आणि वानरांवर किंवा दक्षिण भारतीयांवर रामचंद्रांनी विजय तरी केव्हा मिळविला ? - ते तर सारे रामचंद्रांचे मित्र आणि सहकारीच होते. वाली आणि गुहक यांची राज्ये खालसा करून रामाच्या राज्याला जोडली होती काय? - हा खुळेपणा आता पुरे !
महासरितांच्या विस्तीर्ण पात्रांनी खंडित झालेला विराट, समतल आणि समशीतोष्ण सुखद असा आर्यभूमीचा या भूभाग आर्यसंस्कृतीच्या महावस्त्राचा भाग आहे. येथील धागा उच्च संस्कृतीच्या, विकसनशील संस्कृतीच्या आणि वनवासी संस्कृतीच्या मानवांनी - बह्वंशी आर्यांनी घडविला आहे. वर्णाश्रमधर्माच्या चौकटीत या वस्त्राची निर्मिती होत आहे. निसर्गातील स्पर्धा आणि संग्राम यांच्यावर विधायक बुद्धीने विजय मिळविण्याच्या आकांक्षेच्या आडव्या-उभ्या धाग्यांनी हेमंगल वस्त्र विणले आहे. युरोपीय लोकांनो ! मला असे सांगा की, कोणत्या देशाला तुम्ही उन्नतीसाठी हात दिलात ? तुमच्याहून दुर्बल वंश तुम्हाला जिथे जिथे आढळले,तिथे तिथे तुम्ही त्यांचा समूळ उच्छेद केलात. तुम्ही त्यांची भूमी बळकावलीत. हे आजतागायत चाललेले आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पॅसिफिक बेटे आणि दक्षिण आफ्रिका यांचा इतिहास काय सांगतो ? तिथल्या मूळच्या जमाती आता कोठे आहेत ? पशूंची कत्तल करावी, तशी तुम्ही त्यांची निर्घृण कत्तल केली आहे. ज्या ठिकाणी असे करणे तुम्हाला शक्य झाले नाही, त्या ठिकाणची राष्ट्रे अद्यापही जिवंत आहेत.
हिंदुस्थानने असे कधीच केले नाही. आर्य हे सहृदय, उदार होते. त्यांची हृदये सागरासारखी अथांग होती आणि त्यांची प्रज्ञा हिमाचलासारखी उतुंग होती. त्यात या पशुवत जीवनाला, पाशवी आकांक्षांना तिळमात्र स्थान नव्हते.आणि माझ्या देशातल्या मूर्खांनो ! मी तुम्हाला विचारतो की, हिंदुस्थानात एतद्देशीयांच्या कत्तली झाल्या असल्या तर चतुर्वर्णांची रचना अस्तित्वात तरी आली असती काय ?
स्वत: जगण्याकरिता इतरांच्या मुंड्या मुरगाळाव्यात हे पाश्चात्यांचे ध्येय आहे. आर्यांचे ध्येय सर्वांनाच उन्नत करणे, सुसंस्कृत करणे, आर्य करणे हे आहे. युरोपीयांचे साधन शस्त्र हे आहे. आर्यांचे साधन चतुर्वर्णांची रचना हे आहे. संस्कृतीच्या निर्मितीसाठी समाजाची चार वर्णात विभागणी करणे आर्यांना आवश्यक वाटले. वर्णांचे कप्पे कडेकोट नव्हते. जो तो आपल्या साधनेने उच्च वर्णात प्रविष्ट होऊ शके. युरोपात दिसते की, सबलांनी दुर्बलांना सदैव खाऊन टाकले आहे. भारतात मात्र प्रत्येक सामाजिक नियम हा दुर्बलांच्या रक्षणासाठी आहे. म्हणून म्हणतो की, या दोन संस्कृतींचे ताणेबाणेच सर्वस्वी भिन्न आहेत.
(पूर्व आणि पश्चिम, स्वामी विवेकानंद समग्र वाङ्मय, खंड ५)
****
आधुनिक काळातील संशोधन आणि पुरावे
Introduction
Oriental Renaissance
Motives of the British East India Company
Implication of Aryan Invasion Theory
Voices of dissent
Indian protests
Challenging the infallible façade of Western scholarship
Indological MacCarthyism
Race, Religion and Philology in the 19th Century
Colonial Indology - Acceptance of A Racist Theory
California Textbook Controversy
CAPEEM Fights Discrimination Against Hindu Children with a Lawsuit
Disparaging/Sarcastic text of Ramayana in American Textbooks?
Background on Aryan Invasion Theory
Scientific Racism
India's Cultural Unity
Harmful Theory
Evidence from Indian tradition
Evidence from Archaeology
Conclusion
***
source : http://www.hinduwisdom.info/aryan_invasion_theory.htm
Thursday, February 21, 2013
Wednesday, February 20, 2013
स्वामी विवेकानंदांचे विविध पैलू
दैनिक दिव्य मराठीने स्वामी विवेकानंद यांच्या १५० व्या जयंती वर्षाच्या सुरुवातीला प्रेरणा ही विशेष पुरवणी काढून
Tuesday, September 18, 2012
चर्चचे वास्तव II
चर्चचे वास्तव- १२
दुहेरी लाभ घेणारे मिशनरी मानवतावादी कसे?
चारुदत्त कहू
नागपूर, १२ सप्टेंबर
ख्रिस्ती धर्माचा एकंदरीतच मानवतावादी,
भूतदयावादी चेहरा दृष्टीपुढे आणला तर निरनिराळ्या चर्चमध्ये कार्यरत असलेले
प्रिस्ट, पास्टर, सिस्टर्स, कॅटेचिस्ट, नन्स आदी व्यक्ती पोटाला चिमटा
घेऊन सेवाभावी वृत्तीने आणि कुठल्याही मानधनाची अपेक्षा न ठेवता कार्य करीत
असतील, अशी बाह्य जगाची प्रारंभिक धारणा झाल्याशिवाय राहात नाही. तथापि,
वस्तुस्थिती मात्र निराळीच आहे. या सार्या व्यक्ती नोकरदार असून
प्रत्येकाला त्यांचे काम, हुद्दा आणि ज्येष्ठतेनुसार डायोसिसने ठरवून
दिलेले वेतन दिले जाते. डायोशियन प्रिस्टवर पॅरिश चर्चच्या संपूर्ण
देखभालीची आणि संचालनाची जबाबदारी असते. त्यासाठी त्याला योग्य ते वेतन
पॅरिशमधूनच दिले जाते. (यात त्याची बचत, निवृत्ती वेतन, वाहन खर्च,
सुटीकालीन खर्च आणि गरजूंना मदत करावयाच्या निधीचाही समावेश असतो).
चर्चचे वास्तव
चर्चचे वास्तव-१
सेवाभावाच्या नावाने धर्मपरिवर्तनाचा कावेबाजपणा
येशूच्या मागे निघालेलो आम्ही, पोपच्या मागे कधी लागलो कळलंच नाही...
अशी
लोकनाथ यशवंत यांची कविता आहे.प्रभू येशूची दृष्टी आभाळाच्या बापाची होती.
तो म्हणाला, ‘सेवा हाच धर्म’. पोपला मात्र आपलं साम्राज्य वाढवायचं
होतं.धर्म म्हणून सेवा नव्हे तर धर्म वाढविण्याचं शस्त्र म्हणून सेवा... हे
नवं सूत्र आलं. पोपने आणि त्यांच्या छत्रछायेखाली कार्य करणार्या चर्च
आणि चर्चशी संलग्न विभिन्न संस्था-संघटनांनी आपली सत्ता वाढविण्यासाठी
सत्तेचा कसा कावेबाज वापर चालवलाय् याचं दाहक वास्तव मांडणारी वृत्तमालिका
तभात आजपासून...
Saturday, March 3, 2012
‘धर्म सोडायचंय मला...!’ वादाच्या निमित्ताने...
दि. २१ फेब्रुवारी २०१२ रोजीच्या वृत्तपत्रांमध्ये ठाणे दिवाणी
न्यायालयाने दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निकालाचे वृत्त प्रसिद्ध झाले
आहे. जात आणि धर्माचा उबग आल्याने आपल्याला धर्मविरहित घोषित करुन केवळ
भारतीय म्हणून ओळख मिळावी, अशी मागणी ठाणे येथील श्रीरंग खंबाटे या
वकिलाने केली होती. न्यायालयाने ती मागणी फेटाळून लावली.
एखादी व्यक्ती कोणत्याच धर्म किंवा जातीची नाही, अशी मान्यता कोर्टाने
दिल्यास त्याची व्यक्तिगत मते इतरांवर लादल्यासारखे होईल, तसेच त्या
व्यक्तीच्या मृत्यूनंतर कुटुंबियांमध्ये वारसा हक्क व त्यांचा धर्म
यावरुन समस्या निर्माण होऊ शकतात, असे कारण न्यायालयाने दिले. घटनेच्या
३४ व्या कलमानुसार न्यायालयांना धर्मसंबंधी घोषणा करण्याचा अधिकार नाही,
असेही कोर्टाने म्हटले.

Wednesday, January 25, 2012
इतिहास विसरल्यास...
Wednesday, January 11, 2012
तरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा
गांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, आज स्वामी विवेकानंद असते, तर मी त्यांची गुरुस्थानी स्थापना केली असती. जवाहरलाल नेहरू म्हणतात की, विवेकानंद हे अध्यात्म आणि विज्ञान यांचा समन्वय करणारे महापुरुष होते. स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्यापासून ते जमशेटजी टाटा यांच्यापर्यंत शेकडो महापुरुषांनी विवेकानंदांच्या जीवन व विचारातून प्रेरणा घेतली. योद्धा, संन्यासी आणि कोट्यवधी तरुणांचे स्फूर्तिस्थान म्हणजे स्वामी विवेकानंद.
Monday, January 2, 2012
जागं करणारी कादंबरी - आवरण
अवघ्या दोन वर्षांत 22 आवृत्त्यांचा पल्ला गाठणारी, वाचकाच्या "स्व'त्त्वाला हाक देऊन जागं करणारी कादंबरी - आवरण. डॉ. एस. एल. भैरप्पा या विख्यात कन्नड साहित्यिकाची ही बहुचर्चित कादंबरी. या कादंबरीने हजारो वाचकांच्या हृदयाचा ठाव घेतला आहे तर अनेक मतलबींची झोपही उडवली आहे. ही कादंबरी आता मराठीतही उपलब्ध आहे. या कादंबरीविषयी...
Tuesday, December 27, 2011
२०१४ पर्यंत निर्माण होईल राममंदिर
रायपूर - रायपुरच्या व्हीआयपी रोडवर भव्य राममंदिराची निर्मिती होत आहे. अयोध्येतील प्रस्तावित राममंदिरासारखेच हे मंदिर बांधण्यात येणार असून या मंदिर निर्माणातील सर्व अडचणी आता दूर झाल्या आहेत. हे मंदिर श्रद्धा, संस्कार आणि शिक्षणाचे केंद्र असणार आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-ram-mandir-at-raipur-2682172.html

Monday, August 1, 2011
मार्क्सवाद्यांची अवस्था संग्रहालयातील वस्तूंसारखी
दि. 30 जुलैच्या न्यू इंडियन एक्सप्रेसच्या संपादकीय पानावर भारतीय विचार केंद्रम आणि विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय परमेश्वरनजी यांचा लेख प्रकाशित झाला आहे. मार्क्सवाद्यांची अवस्था आता संग्रहालयातील वस्तुंसारखी या मथळ्याखाली हा लेख प्रकाशित झाला आहे. मराठी वाचकांच्या सोयीसाठी या लेखातील मुख्य बिंदू येथे मांडत आहे. संपूर्ण लेख इंग्रजीतूनही येथे दिला आहे.
Saturday, July 16, 2011
सोलापूर : यादवकालीन मंदिराचे अवशेष पाहा छायाचित्रांतून...
सोलापूर. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथे दर्ग्याच्या बांधकामाप्रसंगी सुरु असलेल्या खोदकामात शिवलिंग, भग्न मूर्ती, कोरीव नक्षीकाम असलेले खांब आणि हत्ती आढळून आले आहेत. हे मंदिर यादवकालीन आहे, अशी माहिती सोलापूर विद्यापीठातील पुरातत्त्व शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. माया पाटील यांनी दिली आहे.
अधिक माहितीसाठी क्लिक करा
सोलापूर : दर्ग्याच्या खोदकामाच्या वेळी सापडले यादवकालीन शिवलिंग

Wednesday, July 13, 2011
भारतातील अक्षरधाम मंदिर बनले जगातले पाचवे आश्चर्य

होय ! भारताच्या राजधानीत यमुनेच्या काठी वसलेल्या या मंदिराने जगातील 7 आश्चर्यात पाचवे स्थान पटकविले आहे. लंडन येथील रीडर्स डायजेस्टने दिल्लीच्या अक्षरधाम मंदिराचा समावेश 21 व्या शतकातील सात आश्चर्यात केला आहे. अद्वितीय स्थापत्य कला, प्राचीनता आणि आधुकनिकतेचा संगम, भव्यता या आधारावर हे स्थान मिळाले आहे. ताजमहल निश्चितच वास्तुशिल्पाचा एक अजोड नमुना आहे, परंतु दिल्लीतील हे मंदिर एक प्रमुख आकर्षण ठरले आहे.
सात आश्चर्यांमध्ये समावेश करण्यामागे अनेक कारणे दिली आहेत. हे मंदिर जगातील सर्वात विशाल हिंदू मंदिर आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
भारतातील अक्षरधाम मंदिर बनले जगातले पाचवे आश्चर्य
जगातले पाचवे आश्चर्य ठरलेल्या अक्षरधाम मंदिराची चित्रमय झलक पाहा...
Monday, July 4, 2011
तरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा

तरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा : स्वामी विवेकानंद">तरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा : स्वामी विवेकानंद
गांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, आज स्वामी विवेकानंद असते, तर मी त्यांची गुरुस्थानी स्थापना केली असती. जवाहरलाल नेहरू म्हणतात की, विवेकानंद हे अध्यात्म आणि विज्ञान यांचा समन्वय करणारे महापुरुष होते. स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्यापासून ते जमशेटजी टाटा यांच्यापर्यंत शेकडो महापुरुषांनी विवेकानंदांच्या जीवन व विचारातून प्रेरणा घेतली. योद्धा, संन्यासी आणि कोट्यवधी तरुणांचे स्फूर्तिस्थान म्हणजे स्वामी विवेकानंद.
Saturday, September 18, 2010
अयोध्या निकाल आणि गणेशोत्सवाचा संदेश
आता येत्या 24 सप्टेंबरला अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीबाबत लखनौ उच्च न्यायालयाचा निकाल अपेक्षित आहे. या निकालानंतर हिंदू-मुस्लिमांतील स्नेहबंध टिकून राहतील काय?
यंदा हिंदूंची गणेशचतुर्थी आणि मुस्लिमांची रमजान ईद एकाच दिवशी आले. मुस्लिमांनी आपल्या हिंदू मित्र-परिचितांना शिरखुर्म्यासाठी प्रेमाने घरी बोलावले. आजच्या भारतीय समाजाला एकत्र आणणारे असे सोनेरी क्षण मोलाचे आहेत. स्नेहाचे बंध दृढ करणारे हे अनुबंध दोन्ही समाजाने जपले पाहिजेत.
आता येत्या 24 सप्टेंबरला अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीबाबत लखनौ उच्च न्यायालयाचा निकाल अपेक्षित आहे. या निकालानंतर हिंदू-मुस्लिमांतील स्नेहबंध टिकून राहतील काय? किंवा ते टिकून राहण्यासाठी काय करता येईल, हा हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजांतील धुरिण आणि सर्वसामान्यांच्या चिंतनाचा विषय असला पाहिजे.
मुस्लिमांबद्दल हिंदू कशा रीतीने विचार करतात हे विख्यात साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा यांनी अतिशय मार्मिक शब्दांत नोंदविले आहे. ते म्हणतात, ""...मागे कुणीतरी केलेल्या चुकांसाठी आजचे जबाबदार नाहीत हे तर खरंच, पण मागच्याशी नातं जोडून "आपण त्यांचेच वारसदार' या भावनेत आपण अडकणार असू तर त्यांनी केलेल्या कर्माची जबाबदारीही स्वीकारावी लागेल.''
बाबर, औरंगजेब, टिपू सुलतान, अकबर हे परकीय आक्रांता आहेत. त्यांनी येथील शेकडो मंदिरे उद्ध्वस्त केली. हजारो लोकांना तलवारीच्या जोरावर बाटविले. मुस्लिम व्हायला नकार दिला म्हणून कित्येकांची अतिशय क्रूरपणे कत्तल केली. महिलांची अब्रू लुटली. हा इतिहास आहे. याची ढिगाने पुरावे उपलब्ध आहेत. असे असताना भारतातील आजच्या मुसलमानांनी बाबराशी नातं सांगावं का, हा खरा प्रश्न आहे. या प्रश्नाचे विवेकाने उत्तर शोधल्यास रामजन्मभूमी हा वादाचा विषय ठरणारच नाही.
भारतातील हिंदूंना अपमानित करण्यासाठी अयोध्या, मथुरा आणि काशीची मंदिरे पायदळी तुडविणाऱ्या धर्मांधांची बाजू घेणारे मुसलमान काही प्रमाणात का होईना या देशात आजही आहेत, हे सत्य आहे. तसे नसते तर बाबरीचा ढांचा पाडायची वेळच कशाला आली असती?
बहुतांश मुस्लिम समाज गुण्यागोविंदाने राहत असला तरी जिहादच्या धर्मवेडाने भारलेल्यांची संख्याही प्रभावी आहे, हे विसरून चालणार नाही. याकडे दुर्लक्ष झाल्यामुळेच खिलापतच्या दंगलीत हजारो हिंदूंना आपल्या प्राणास मुकावे लागले होते. देशाची फाळणी व्हावी म्हणून, पाकिस्तान हवे म्हणून दंगली घडविण्यात आल्या होत्या. दुर्दैवाने इतिहास असा सांगतो की, हिंदू गाफील राहतात आणि धर्मांध मुस्लिम अचानक हल्लाबोल करतात. गाफील असणे आणि दुर्बल असणे हा अन्याय करण्याएवढाच अपराध आहे.
सन 1883 मध्ये मुसलमानांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी निष्कारण दंगे करून हिंदूंना सळो की पळो केलं होतं. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या उन्मादाचा सफलतापूर्ण सामना करण्यासाठी आणि हिंदू समाजाला समर्थ बनविण्यासाठी गणेशोत्सवाचा आधार घेतला. लोकमान्य टिळक हे द्रष्टे महापुरुष होते. हिंदू समाजासमोरील संघटित आव्हानाला संघटित प्रतिसाद देणे हा गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप देण्यामागचा उद्देश होताच; पण केवळ प्रतिक्रयेच्या भावनेतून त्यांनी या उत्सवाला सार्वजनिक रूप दिलेलं नाही, हे त्यावेळच्या त्यांच्या चिंतनावरून दिसून येतं.
गणेशोत्सवाला टिळकांनी राष्ट्रीय स्वातंत्र्य आंदोलनाचं प्रेरणास्त्रोत बनविलं. हा उत्सव पुढील काही दशकांमध्ये महाराष्ट्राच्या सीमा पार करून देशभरातच नव्हे तर विदेशांमध्ये स्थायिक हिंदूंमध्येही जनोत्सवाच्या स्वरूपात प्रतिष्ठित होईल, हे त्यांच्या द्रष्ट्या मनाने हेरलं असावं.
गणपती हा गणांचा नायक आहे. गणतंत्रामध्ये नायकाची भूमिका ही महत्त्वपूर्ण असते. जर गणच असंघटित, उद्देशहीन आणि अशक्त असेल तर गणनायकाकडे हात जोडून करुणा भाकल्याने काहीही साध्य व्हावयाचे नाही. राष्ट्राला गौरव, स्वातंत्र्य आणि अभ्युदय प्राप्त करून देणारा एक शक्तिशाली गण (संघटित समाजशक्ती) गणेशोत्सवाच्या माध्यमातून निर्माण करणे हा लोकमान्यांचा उद्देश होता. आपल्या आतील गणनायकाला सबल, सशक्त करत अजेय गणशक्ती संघटित करणे हा गणेशोत्सवामागील मूळ भाव आहे; कर्मकांड नव्हे.
अंथरुणातून बाहेर न पडताच मोठमोठे उपदेशाचे डोस पाजणारी, फुकटचे सल्ले देणारी मंडळी सर्वच काळात असतात. सुरुवातीच्या काळातच लोकमान्यांनी त्यांना खणखणीत उत्तर देऊन ठेवलं आहे. 22 सप्टेंबर 1896 रोजी पुण्यातील एका जाहीर कार्यक्रमात लोकमान्य म्हणतात, ""आपले राष्ट्र म्हणजे काही गुलामांचे राष्ट्र नाही. मानवी प्राण्याला कैद्याच्या राहणीने राहा असे सांगणे म्हणजे महामूर्खपणा आहे. समारंभ व थाटमाट ही प्रत्येक उत्सवाची आवश्यक अंगे होत. कोणतेही काम पैशावाचून होत नसते. इतर वाईट गोष्टींत पैसे खर्च होण्यापेक्षा गणेशोत्सवात थोडेबहुत खर्च झाल्यास पुण्यच आहे. या उत्सवात प्रत्येकजण आपापल्या हौसेने खर्च करीत असतो. कोणाची कोणावर सक्ती नाही. आठ-दहा दिवस जर उत्साहाने काढता येत नाहीत व त्या उत्सवाप्रीत्यर्थ थोडेसे द्रव्य खर्चण्याचे जर सामर्थ्य नाही, तर ते राष्ट्र जिवंत असून मेल्यासारखेच आहे. या गोष्टीला उधळपट्टी म्हणणारे म्हणोत, पण कष्टमय संसाराची यात्रा सुखाची व शांतीची होण्यास असले खर्च आवश्यकच आहेत.''
लो. टिळक यांनी गणेशोत्सवासंबंधी व्यक्त केलेली मते वाचली तर ध्यानात येईल की, भारतीय तरुणांना जल्लोष करण्याची, रस्त्यावर नाचण्याची व्यवस्था करणे हाही गणेशोत्सव सार्वजनिक करण्यामागे एक उद्देश होताच. त्यामुळे गणेशोत्सवावर टीका करणाऱ्यांना टीका करू द्या. परंतु धर्मांध शक्तींशी संघटितरीत्या मुकाबला करणे हा गणेशोत्सवामागील एक प्रमुख उद्देश होता हे विसारता येणार नाही.
आता 24 सप्टेंबर या दिवशी योगायोगाने शुक्रवार (जुम्मा) आहे. याआधीच्या दंगलींचा अभ्यास केला तर ध्यानात येईल की, हा दिवस दंगल घडविणाऱ्यांसाठी सोयीचा असतो. ज्या भागात मुस्लिम अधिक संख्येने राहतात त्या भागाला "संवेदनशील' भाग म्हणण्याची आपल्या देशात प्रथा आहे. कारण आपला देश सेक्युलर आहे. हिंदूबहुल भाग हा संवेदनशील नसतो. आता हिंदूंनाही एका वेगळ्या अर्थाने संवेदनशील व्हावे लागेल.
अयोध्येतील उत्खननात सापडलेली मंदिराची खांबं आणि इतर रचना पाहता निकालाचा अंदाज येऊ शकतो. समजा निकाल हिंदूंच्या विरोधात गेला तर हिंदू आपल्या स्वभावानुसार पुढच्या कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने लढाई करतील. परंतु निकाल मंदिर पाडणाऱ्या बाबराच्या विरोधात गेला तर मात्र स्वत:ला बाबराचे कैवारी मानणारे ठिकठिकाणी दंगली घडविण्यासाठी निश्चितच प्रयत्न करतील. "संवेदनशील' ठिकाणी पोलीस बंदोबस्त असणारच आहे, परंतु कोणत्याही क्षणी खात्रीने होणारी मदत म्हणजे आपण स्वत:च असतो हे विसरून चालणार नाही.
यावेळी तुम्ही शांत असता किंवा नाही हा प्रश्न नसतो, तर तुम्ही शक्तीशाली आणि संघटित असता किंवा नाही हे महत्त्वाचे असते. यावेळी गणेश मंडळांना सुरक्षा मंडळांचे काम करावे लागेल. देशभक्त मुस्लिमांच्या मुहल्ला कमिट्यांनाही आपल्या शक्तीप्रमाणे धर्मांधांना रोखण्यासाठी पुढे यावे लागेल.
गणेश मंडळं आणि मुहल्ला कमिट्यांनी आतापासूनच कठीण समयी आवश्यक ती तयारी करण्याच्या दृष्टीने पावलं उचलावीत. आपल्या परिसरातील लोकप्रतिनिधी, नगरसेवक, आमदार, खासदार, पोलीस चौकी यांच्या संपर्क क्रमांकांची यादीही आपल्याकडे असणे सोयीचे ठरेल. पाकिस्तानच्या प्रेरणेने देशभरात जिहादी शक्ती सक्रीय झाल्याचे रोजच्या बातम्यांतून समोर येतच आहे. मराठवाडा, सोलापूरसारखा भागही याला अपवाद नाही. त्यामुळे गणेशोत्सव काळातली गणेश मंडळं वर्षभरासाठी आपल्या गल्लीत सुरक्षा मंडळं बनली तर दंगलींना आळा घालणे शक्य होईल.
आपला समाज शांतताप्रिय आहे. आपण शेळीप्रमाणे राहिलोत तर लांडग्यांना चेव येऊ शकते. म्हणून वाघासारखे राहा. हाच गणेशोत्सवाचा आजच्या काळासाठीचा संदेश आहे.

Saturday, June 26, 2010
आणि शिक्षणाचे बाजारीकरण
गेल्या वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष श्री. बराक ओबामा यांनी अमेरिकेतील शिक्षण संस्थांना आवाहन केले. अमेरिकेतील शिक्षण संस्थांनी भारतातील उच्च शिक्षण संस्थांशी स्पर्धा करण्यासाठी तयार राहावे, असे ओबामा म्हणाले. त्यांचे म्हणणे आहे की, भारतात शिक्षण घेतलेल्या तरुणांना त्यांच्या योग्यतेमुळे रोजगाराच्या साऱ्या संधी त्यांनाच मिळत आहेत आणि सर्वसामान्य अमेरिकी तरुण शिक्षणात मागासलेला असल्यामुळे व्यावसायिक स्पर्धेत तो मागे पडत आहे.
काही दिवसांपूर्वी त्यांनी याच संदर्भामध्ये "बंगळूरला ना आणि बफेलोला हो' असे व्यक्तव्य केले होते. यावरून मोठा वादही निर्माण झाला होता, परंतु या वक्तव्यावर भारतात कोणीही आक्षेप घेतला नाही. भारतीय मीडिया आणि बुद्धीजीवी वर्ग कदाचित ओबामा यांच्या अज्ञानामुळे गोंधळून गेला असेल. आमच्या देशात तर शिक्षण क्षेत्रातील स्थितीमुळे सारे विचारवंत चिंतित आहेत. कोठेही वेळ मिळाला की, भारतीय शिक्षण व्यवस्था सुधारण्याच्या गोष्टी आपण करीत असतो.
बदललेल्या परिस्थितीमध्ये कोणीही व्यापक प्रयत्न केले नसतानाही काही बदल घडून येताना दिसत आहे. हे सर्व बदल सकारात्मक आणि योग्य आहेत असे मात्र म्हणता येणार नाही. परंतु देशाच्या कानाकोपऱ्यांपर्यंत शिक्षणाचा प्रसार मात्र होताना दिसत आहे. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात खाजगीकरणापेक्षा बाजारीकरण अधिक झाले आहे. परिणामी याचा नकारात्मक प्रभाव जाणवत आहे. संख्यात्मकदृष्ट्या प्रशिक्षित तरुणांची मात्रा प्रचंड वाढली आहे, परंतु त्यांच्या योग्यतेबद्दल चिंता करावी अशी स्थिती आहे. यावर उपाय म्हणून परदेशी संस्था तसेच तेथील पद्धती भारतात लागू करण्याच्या गोष्टीही आम्ही भारतीय करीत असतो. या विसंगतीचे कारण काय? विदेशी लोक आपल्या शिक्षणपद्धतीची स्तुती करीत आहेत. आपल्या शिक्षणपद्धतीचा त्यांनी धसकाच घेतला आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण स्वतःच आपल्या शिक्षणपद्धतीवर असंतुष्ट आहोत.
आपण जेव्हा आपल्या स्वभावानुसार कार्य करतो तेव्हा थोडीशी सफलतादेखील समाधान देऊन जाते, परंतु जेव्हा आपण आपल्या स्वभावाच्या विपरित कार्य करू लागतो तेव्हा उच्चतम सफलता मिळाली तरीसुद्धा जीवनात एक पोकळी जाणवत राहते. हीच गोष्ट राष्ट्राच्या बाबतीतही सत्य असेल असे वाटते. या आधुनिक शिक्षणाने आम्हाला रोजगार, विज्ञान, तंत्रज्ञान आणि व्यापाराच्या क्षेत्रात मोठी सफलता प्रदान केली आहे. आज भारतीय प्रतिभा पाहून विश्व आश्चर्यचकित झाले आहे. आम्ही संधी मिळताच आमच्या देशातही प्रत्येक क्षेत्रात चमत्कार केले आहेत, परंतु तरीही शिक्षणतज्ज्ञ समाधानी नाहीत. याचे एक कारण असे आहे की, गुणवत्तेच्या स्तरावर भारतात प्रचंड विषमता दिसून येते. एकीकडे राष्ट्रीय संस्थान (आय.आय.टी., आय.आय.एम.) आहेत. येथे जगातील सर्वोच्च संस्थांच्या तोडीचे शिक्षण मिळते. दुसरीकडे सर्वत्र पावसाळ्यातील भूछत्राप्रमाणे उगवलेल्या खाजगी शिक्षणसंस्थांमध्ये शिकलेले अभियंते आणि अन्य पदव्या घेतलेले तरुण दिसतात. आपल्या विषयातील अगदी किरकोळ ज्ञानही यांच्यामध्ये नसल्याचे आढळून येते. योग्यतेतली ही दरी निराशेचे एक कारण आहे, परंतु अधिक सूक्ष्म स्तरावर जाऊन पाहिले तर या पोकळीमागील कारण आहे, आमचे आपल्या मुळांपासून उखडले जाणे. भारताचा स्वभावच ज्ञान-प्रदान आहे. आम्ही ज्ञानार्जन आणि ज्ञानदानाच्या अनेक वैज्ञानिक पद्धतींचा विकास केला. आध्यात्मिक ज्ञान-परा विद्येच्या सोबतच व्यावहारिक भौतिक ज्ञान-अपरा विद्येच्या प्रशिक्षणाच्या अत्यंत परिणामकारी पद्धतींचा विकास आणि प्रयोग भारतामध्ये 19व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत होत राहिले.
गांधीजींचे शिष्य आणि विख्यात संशोधक डॉ. धरमपाल यांनी आपल्या संशोधनाने सिद्ध केलेआहे की, हे शिक्षण वैज्ञानिक पद्धतीचे, चारित्र्य निर्माणात प्रखर आणि अत्यंत प्रभावी होते. साऱ्या देशात सुलभपणे उपलब्ध असणारे हे शिक्षण होते. त्यांनी 1823 मध्ये इंग्रजांनी केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे सांगितले आहे की, (ज्यांना आज आपण वंचित किंवा दलित म्हणतो त्यांच्यासहित) शिक्षक आणि शिष्य लाखो शाळा आणि विद्यापीठांमधून शिकत होते. सारा देशच साक्षर होता. शिक्षणपद्धतीदेखील वैज्ञानिक होती, ज्ञानाला अंतःकरणापासून प्रकाशित करणारे प्रशिक्षण मिळत होते. आजच्या विकृत पद्धतीनुसार "माहितीची' देवाण-घेवाण एवढ्यापुरतेच ज्ञानदान मर्यादित नव्हते. आमच्या परंपरेनुसार गुरू म्हणजे असा की, जो आपल्या शिष्याची योग्य पद्धतीने जडणघडण होण्यासाठी आईप्रमाणे कष्ट करतो, शिष्याचे संपूर्ण दायित्व गुरू ग्रहण करतो. शिष्याच्या चित्ताच्या गुणधर्मितेनुसार प्राणाची प्रतिष्ठा करून गुरू त्याला मार्ग दाखवितो. इतकेच नाही तर गुरू त्याच्यासोबत त्या मार्गावरून चालतोदेखील. आवश्यकता पडली तर गुरू शिष्याचे बोट धरेल, कडेवरही उचलून घेईल. ठाकूर श्रीरामकृष्ण परमहंस यांनी आपल्या शिष्यांसोबत असेच केल्याचे दिसते. कुणाला केवळ मार्ग सांगून स्वतःच्या भरवशावर सोडून दिले. कुणाला बोट पकडून मार्ग दाखविला. गिरीश बाबूंचे संपूर्ण दायित्वच आपल्यावर घेतले. त्यांच्या शिष्यांनी देखील या परंपरेचे पालन केले.
आध्यात्मिक क्षेत्रात ही परंपरा दक्षिणामूर्तीला प्रारंभ करून व्यास महर्षींपर्यंत आणि तेथून वर्तमान आचार्यांपर्यंत जिवंत असल्याचे दिसते. काही अपवाद सोडले तर आज देखील अधिकांश पारंपरिक आचार्य शास्त्रीय विधीचा अवलंब करीत असल्याचे दिसतात, परंतु अपरा विद्येच्या क्षेत्रात ही परंपरा लोप पावली आहे. जीवनात आलेल्या पोकळीचे, निराशेचे हेच मुख्य कारण आहे. शिक्षणाची ही वैज्ञानिक पद्धती पुनजीर्वित करण्यात आली तर अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती आणि अन्य गोष्टी बदलल्या नाहीत तरी चालू शकेल. मुख्य गोष्ट तर "गुरू'ची आहे. शिक्षणसेवकांना शिक्षक बनविल्यानंतर गुरू बनण्याचे प्रशिक्षण प्रदान करणे हाच यावरील एकमेव उपाय आहे. शिक्षणाला केवळ "रोजी-रोटी'चे साधन मानून शिक्षणाच्या बाजारीकरणाची स्पर्धा सुरू आहे. या "स्थितीत गुरु-शिष्य' ही वैज्ञानिक परंपरा पुनःस्थापित करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.
केवळ दार्शनिक गोष्टी बोलण्याने काहीही होणार नाही. शिक्षणाच्या क्षेत्रात चारित्र्य निर्माणाची न्यूनता भरून काढण्यासाठी आपल्या स्तरावर विनम्र प्रयत्न सुरू करणे आवश्यक आहे.
-सिद्धाराम भै. पाटील.

Subscribe to:
Posts (Atom)
.
.
siddharam patil photo
लेखांची वर्गवारी
- bjp (8)
- congress (16)
- g b syndrome (1)
- INBOX (1)
- research (1)
- rss (2)
- shivaji (3)
- tarun bharat (2)
- अग्रलेख (2)
- अतिरेकी हल्ले (3)
- अध्यात्म (16)
- अनुभव (1)
- अन्य (3)
- आंबेडकर (14)
- आर्मी (4)
- इतिहास (23)
- इस्लाम (25)
- एस. गुरुमूर्ती (3)
- ओळख (1)
- कसाब (3)
- कार्यक्रम (1)
- केन्द्र (3)
- खळबळजनक (1)
- ख्रिस्ती (15)
- गीत (3)
- चाणक्य नीती (7)
- चीन (1)
- छायाचित्र (1)
- जटायु (2)
- जटायु अक्षरसेवा (1)
- जीबीएस (4)
- जीवन मंत्र (2)
- डॉ. भूषण कुमार उपाध्याय (2)
- दहशतवाद (7)
- नक्षलवाद (4)
- निमंत्रण (1)
- न्यूज़ (6)
- पत्रकारिता (6)
- परिचय (9)
- पाक (2)
- पाकिस्तान (6)
- पुस्तक परिचय (7)
- पूर्वांचल (2)
- पोलिस (2)
- बातमी (9)
- बातम्या (1)
- बुद्ध (6)
- भारत (2)
- मा. गो. वैद्य (2)
- माझ्याविषयी थोडे... (18)
- मीडिया (11)
- मुकुल कानिटकर (6)
- मुलाखत (4)
- मुस्लिम जगत (9)
- मोदी (7)
- योग (5)
- राजकारण (21)
- विमर्श (6)
- विवेक विचार (15)
- विवेकानंद साहित्य संमेलन (1)
- वैचारिक (50)
- वैद्यक (5)
- शिव धर्म (2)
- सडेतोड सागर (2)
- सर्वस्पर्शी बाबासाहेब (3)
- संस्कृति (21)
- संस्कृती (5)
- सामाजिक (7)
- सावरकर (2)
- साहित्य (6)
- सिद्धरामचे लेख (11)
- सुविचार (1)
- सूर्यनमस्कार (4)
- सोलापुर (7)
- सोलापुर दंगल (2)
- सोलापुर बातमी (7)
- स्वामी विवेकानंद (1)
- स्वामी विवेकानंदांचे विचार (31)
- हिंदू (5)