Saturday, December 31, 2011

आंग्ल नवीन वर्षाच्या शुभेच्छा; पण ...

माझ्या हिंदुस्थाना ! तुला धोका आहे तो इथेच. पाश्चात्यांच्या अंधानुकारणाचा तुला एवढा मोठा शाप आहे की, एखादी गोष्ट चांगली की वाईट हे बुद्धीच्या, विवेकाच्या किंवा शास्त्राच्या सहाय्याने तू ठरवतच नाहीस. गोरी माणसे जे रीतीरिवाज पाळतात, ज्या कल्पना मनाशी बाळगतात, त्याच चांगल्या; त्यांना जे आवडत नाही ते ते सारे वाईट ! अरेरे, बुद्धीभ्रष्टतेचा, मूर्खपणाचा याहून कोणता पुरावा हवा ?
- स्वामी विवेकानंद 

आंग्ल नवीन वर्षाच्या शुभेच्छा; पण ... एका अटीवर. 
वक्तशीरपणा, शिस्त, अनुशासन, भान विसरून एखाद्या गोष्टीचे ज्ञान मिळविणे आदी पाश्चात्यांच्या चांगल्या गोष्टी सोडून

Tuesday, December 27, 2011

२०१४ पर्यंत निर्माण होईल राममंदिर

रायपूर - रायपुरच्या व्हीआयपी रोडवर भव्य राममंदिराची निर्मिती होत आहे. अयोध्येतील प्रस्तावित राममंदिरासारखेच हे मंदिर बांधण्यात येणार असून या मंदिर निर्माणातील सर्व अडचणी आता दूर झाल्या आहेत. हे मंदिर श्रद्धा, संस्कार आणि शिक्षणाचे केंद्र असणार आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-ram-mandir-at-raipur-2682172.html

Sunday, December 25, 2011

कब दुनिया को हिन्दु करने घर घर मे नरसंहार किया

आजच्याच दिवशी सन १९२४ रोजी श्री अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म झाला होता. उत्तर प्रदेशाला कर्मभूमी बनविलेले वाजपेयी आज वृद्धापकाळामुळे राजकारणातून निवृत्त झाले असले तरी त्यांची मोहिनी देशवासीयांवर आजही पाहायला मिळते.

Tuesday, December 20, 2011

गीतेवरील बंदीमागे ख्रिश्चन ऑर्थोडॉक्स चर्च

नवी दिल्ली  - गीतेच्या 'महाभारता'वरून रशियामध्ये काम करणा-या भारत, बांगलादेश, नेपाळसह अनेक देशांतील हिंदू समुदायातील लोकांनी हिंदू कौन्सिलची स्थापना करून प्रस्तावित बंदीला विरोध केला आहे. साधुप्रिय दास यांची इस्कॉनच्या रशियन विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आपली संघटना मॉस्को येथील भारतीय दूतावासाशी व पंतप्रधान कार्यालयाच्या संपर्कात आहे, असे दास यांनी म्हटले आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-chaos-over-move-to-ban-geeta-in-russia-2656436.html

Sunday, December 18, 2011

मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर...

निमित्त होते 'लोकसत्ता' आयोजित 'आयडिया एक्स्चेंज' या कार्यक्रमाचे. गडकरी यांनी 'प्रतिमा विरुद्ध वास्तव' आणि 'धारणा विरुद्ध वास्तव' ही पक्षाची मुख्य समस्या असल्याचे यावेळी ठामपणे सांगितले. मेधा पाटकर यांचे ऐकले असते तर मुंबईत एकही पूल बांधला गेला नसता, अशी माहितीही त्यांनी दिली....
गिरीश कुबेर - गडकरींचा कार्यक्रम कधी चुकवायचा नसतो. त्यांच्या एका कार्यक्रमात दोन कार्यक्रम असतात. जेवण आणि गप्पा. त्यांच्याकडे जेवायला जाण्यापूर्वी २४ तास आधी काहीही खायचं नसतं आणि दुसऱ्या राजकारण्याविषयी बोलायचे नसते. त्यांच्या गप्पा श्रवणीय आणि प्रेक्षणीय असतात. सर्वाच्या मनातील प्रश्न विचारतो, भाजपमध्ये सध्या नक्की चाललंय काय?
नितीन गडकरी - भाजपमध्ये सगळं व्यवस्थित चालू आहे. मी आता दिल्लीत आहे. विविध वाहिन्यांना मुलाखती देतो, तेव्हा तेही सगळं व्यवस्थित सुरू आहे, असे सांगतात. तुम्हीही ऐकलं असेल दोन वर्षांत भाजपमध्ये सर्व सुरळीत सुरू आहे. आमचा प्रॉब्लेम आहे तो इमेज वर्सेस रिअ‍ॅलिटी आणि पर्सेप्शन वर्सेस ग्राऊण्ड रिअ‍ॅलिटी. आम्ही लोकतांत्रिक पक्ष आहोत, फॅमिली पार्टी नाही.

श्रीकृष्णावरही चालला होता मजेशीर खटला

भारताच्या स्वातंत्र्ययुद्धात अनेक देशभक्तांना प्रेरणादायी ठरलेल्या भगवत गीतेवर बंदी आणण्याचा प्रयत्न रशियात सुरु आहे. २००७ साली अलाहाबाद उच्च न्यायालयाने भगवत गीतेला भारताचे राष्ट्रीय धर्मशास्त्र घोषित करावे, असे म्हटले होते. http://divyamarathi.bhaskar.com//article/REL-bhagadgeeta-russia-ban-2650519.html
 

Saturday, December 17, 2011

या 3 गोष्टींमुळे चिदंबरम ठरतात राजापेक्षाही मोठे गुन्हेगार

नवी दिल्ली - गृहमंत्री पी. चिदंबरम हे 2 जी प्रकरणी तुरुंगात असलेले माजी दूरसंचार मंत्री ए. राजा यांच्यापेक्षाही मोठे गुन्हेगार आहेत, असा आरोप या प्रकरणी न्यायालयीन लढाई लढणा-या सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. यासाठी स्वामी यांनी तीन आरोपांचा आधार घेतला आहे.http://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-swamy-to-testify-against-chidambaram-in-2g-case-today-2647784.html?HT1=

'लष्कर'ने वाहिली होती श्रद्धांजली

मुंबई - बहुचर्चित इशरत जहान चकमकप्रकरणी मुंबईच्या गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) २० गुजरात पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये अहमदाबादच्या पोलिस आयुक्तांवारही गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

Friday, December 16, 2011

स्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे ( भाग 4)

तरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा

 या भूतलावर जर कोणती भूमी पुण्यभूमी या अभिधानाला योग्य असेल तर ती भारतभूमी होय. या पृथ्वीवरील आत्मे आपल्या कर्मक्षालनार्थ येथे जन्माला येतात.

... झलक पाहूनच अमेरिकेने घाबरून काढला होता पळ


१६ डिसेंबरला जगाच्या इतिहासात एक वेगळे महत्व आहे. ४० वर्षांपूर्वी याच दिवशी बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळाले होते. १९४७ साली ब्रिटिशांनी भारतवर्षाचे तुकडे करून पाकिस्तान जन्मास घातले. त्यापैकी पूर्व पाकिस्तान या नावाने ओळखल्या जाणा-या पूर्व बंगाल प्रांताला  भारताने मुक्त केले होते. या युद्धात आणखी एका देशाने महत्वाची भूमिका बजावली होती, तो देश म्हणजे रशिया.
http://divyamarathi.bhaskar.com/article/DMS-indo-pak-war-and-usa-us-2644811.html?HF=

केवळ ३००० बहादूर जवानांनी जिंकले होते पूर्व पाकिस्तान

1971 चे भारत-पाकिस्तान युद्ध आणि त्यातून जगाच्या नकाशावर बांगला देश या नव्या देशाची निर्मिती हा भारताच्या इतिहासातील एक सुवर्णाक्षरांनी लिहिलेला अध्याय आहे. या युद्धाचे भारताच्या इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. संपूर्ण जगाचा सार्वभौम सम्राट होण्याचे स्वप्न पाहणार्‍या सिकंदराचा सरसेनापती सेल्यूकसचा पराभव इ.स. पूर्व 303 मध्ये चंद्रगुप्त मौर्यांनी केला होता. भारत खंडावर परकीयांनी केलेल्या आक्रमणाचा संपूर्ण बीमोड करणारा गेल्या अडीच हजार वर्षांतील हा पहिला विजय म्हणून नोंदवला गेला.
http://divyamarathi.bhaskar.com/article/DMS-india--bangladesh-divya-marathi-special-2644388.html?HT1=

Thursday, December 15, 2011

लोकपाल नको, जल्लाद हवा

औरंगाबाद - लोकपालप्रकरणी जंतर मंतरवर देशभक्तीची गाणी वाजवून काय होणार? 'भारतमाता की जय' याचा अर्थ भारतमातेवर हल्ला करणार्‍यांना जिवंत ठेवू नका. तुमचा तो लोकपाल हे सर्व करणार आहे काय? न्यायालयाने एका राष्ट्रद्रोह्यास फाशी ठोठावली. त्याला फाशी द्या. लोकपालापेक्षा देशाला एका जल्लादाची गरज आहे, अशा शब्दांत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तोफ डागली आहे.
शिवसेनेचे मुखपत्र 'सामना' या दैनिकातील अग्रलेखातून शिवसेनाप्रमुख लिहितात, http://divyamarathi.bhaskar.com/article/MAH-MAR-AUR-bal-thakare-on-lokpal-and-afazal-guru-2641802.html?HT1=

Saturday, December 10, 2011

चाणक्य नीती : या ५ गोष्टी कुणालाही सांगू नका; यातच आहे शहाणपण

धर्म डेस्क
जीवनात अनेक गोष्टींमुळे आपण अडचणीत सापडत असतो. या गोष्टींवर आपले नियंत्रण नसते. परंतु अनेकदा चुकून आपण अशा गोष्टी करतो की ज्यामुळे आपणच भविष्यात अडचणीत येतो. अशा गोष्टींविषयी आचार्य चाणक्य म्हणतात-
अरथ नाश मन ताप अरु, दा चरि घर माहिं।
वंचनता अपमान निज, सुधी प्रकाशत नाहिं।।
आचार्य चाणक्य सांगतात की, http://divyamarathi.bhaskar.com/article/REL-chanakya-niti-secret-wife-economy-life-management-2629881.html 

Friday, December 9, 2011

पाकिस्तानींनाही आहे नरेंद्र मोदींचे आकर्षण

अहमदाबाद - चीन आणि गुजरात सरकारच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एशिया इंटर-डाय-एग्झिबिशनमध्येही नरेंद्र मोदींची लोकप्रियता दिसून आली.
येथे उपस्थित पाकिस्तानी उद्योगपतींमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा ऑटोग्राफ घेण्यासाठी आणि त्यांच्यासोबत उभे राहून फोटो काढण्यासाठी चढाओढ दिसून आली. यावेळी मोदींनी आपल्या कोणत्याही चाहत्याला निराश होऊ दिले नाही. त्यांनी सर्वांना पर्सनल ऑटोग्राफ तर दिलेच, शिवाय त्यांच्यासोबत फोटोही काढून घेतले.

व्हिडीओत पाहा ऑटोग्राफसाठी चढाओढ http://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-narendra-modi-pakistan-gujarat-ahamadabad-china-industrialists-2627477.html

सोनिया गांधी 'विषकन्या' - सुब्रमण्यम स्वामी

दिव्य मराठी वेब टीम - देशातील आजवरचा सर्वात मोठा घोटाळा असलेल्या २ जी प्रकरणी न्यायालयीन लढाईत महत्त्वाची भूमिका बजावणा-या सुब्रमण्यम स्वामी यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर त्यांच्या वाढदिवशी जहरी टिपण्णी केली आहे. 'विषकन्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या नसतात', या शब्दांत स्वामी यांनी ट्विट केले आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAH-MAR-AUR-dr-2627188.html 

Thursday, December 8, 2011

स्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे ( भाग 3 )

तरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा

 गुरु गोविंदसिंहांनी आपल्या बांधवांसाठी अपरंपार सोसले
तसे सारे काही आपल्या हिंदू बांधवांसाठी सोसायची
तुमची तयारी असेल तरच तुम्ही हिंदू आहात.
हिंधू धर्मासाठी गुरु गोविंदसिंहांनी
रणभूमीवर स्वत:च्या रक्ताचे सिंचन केले.
त्यांच्या दोन पुत्रांनी रणांगणात बलिदान केले.
ज्यांच्याकरिता गुरूंनी

Wednesday, December 7, 2011

प्राण शक्ती, श्वास आणि प्राणायाम


प्राणायामाच्या नियमित अभ्यासाने श्वासावर नियंत्रण येते. प्राणशक्तीचे नियमन होते. श्वास आणि प्राण याविषयीची एक महत्वाची बातमी ...

Tuesday, December 6, 2011

स्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे ( भाग 2 )

तरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा

 माझे हे शब्द स्मरणात असू द्या :
'हिंदू' हा शब्द उच्चारताच
अपूर्व चैतन्याची लहर जर तुमच्यात सळसळून जात असेल
तर आणि तरच तुम्ही हिंदू आहात.

... रामजन्मभूमी हा वादाचा विषय ठरणारच नाही

मुस्लिमांबद्दल हिंदू कशा रीतीने विचार करतात हे विख्यात साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा यांनी अतिशय मार्मिक शब्दांत नोंदविले आहे. ते म्हणतात, ""...मागे कुणीतरी केलेल्या चुकांसाठी आजचे जबाबदार नाहीत हे तर खरंच, पण मागच्याशी नातं जोडून "आपण त्यांचेच वारसदार' या भावनेत आपण अडकणार असू तर त्यांनी केलेल्या कर्माची जबाबदारीही स्वीकारावी लागेल.''

सोनिया गांधी यांच्याबद्दल अक्षेपार्ह प्रसिद्ध झाल्यामुळे...


नवी दिल्ली - सोशल नेटवर्किंग साईट्सवर कॉंग्रेसची वक्रदृष्‍टी पडली आहे. या वेबसाईट्सवरुन प्रसारित होणा-या माहितीवर अंकूश आणण्‍याचा सरकारचा प्रयत्‍न सुरु आहे. कॉंग्रेसच्या अध्‍यक्ष सोनिया गांधी आणि पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्‍याबद्दल फेसबुक, ट्विटर, गुगल इत्‍यादी साईट्सवरुन आक्षेपार्ह माहिती प्रसारित होत आहे. त्‍यामुळे सरकारने अशा माहितीवर नजर ठेवण्‍याचा निर्णय घेतला आहे. 
... हे आहे सोनिया गांधी यांचे खरे रूप
स्वामी रामदेव, काळा पैसा आणि सोनिया गांधी
नागरिकत्त्व आचार्य बालकृष्ण आणि सोनिया गांधींचे

Monday, December 5, 2011

स्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे ( भाग १ )


गांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस  म्हणतात, आज स्वामी विवेकानंद असते, तर मी त्यांची गुरुस्थानी स्थापना केली असती.  जवाहरलाल नेहरू म्हणतात की, विवेकानंद हे अध्यात्म आणि विज्ञान यांचा समन्वय करणारे महापुरुष होते. स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्यापासून ते जमशेटजी टाटा यांच्यापर्यंत शेकडो महापुरुषांनी विवेकानंदांच्या जीवन व विचारातून प्रेरणा घेतली. योद्धा, संन्यासी आणि कोट्यवधी तरुणांचे स्फूर्तिस्थान म्हणजे स्वामी विवेकानंद.

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत सर्वच स्तरांतील लोकांचे जीवन गतिमान झाले आहे. जीवनात अचानक आलेल्या या गतीमुळे सर्वसामान्यांची स्थिती भांबावल्यासारखी झाली आहे. ज्ञानार्जन करू पाहणार्‍या तरुणांची स्थितीही याहून वेगळी नाही. अशा स्थितीत मनाला स्थैर्य देऊन आपल्या प्रगतीला सहाय्यक ठरणार्‍या विचारांची निकड आहे. अशावेळी ‘फोटोग्राफिक मेमरी’साठी प्रसिद्ध असलेल्या स्वामी विवेकानंद यांचे विचार आपल्या मदतीला धावून येतात. म्हणूनच  विवेकानंदांच्या शक्तीदायी विचारांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करीत आहे. नोबेल परितोषिक विजेते आणि विख्यात विचारवंत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर म्हणतात, ‘‘तुम्हाला जर भारत जाणून घ्यायचा असेल, तर विवेकानंदांचा अभ्यास करा. त्यांच्यात सर्वच सकारात्मक आहे, नकारात्मक काहीही नाही.’’

सकारात्मक विचारांमध्ये प्रचंड सामर्थ्य असते. सकारात्मक विचारामुळे जीवनाचे नंदनवन होऊ शकते, परंतु केवळ सकारात्मक विचार उपयोगाचे नसून, माणसाला आपल्या ध्येयाची निश्‍चितीही करता आली पाहिजे. स्वामी विवेकानंद म्हणतात की, ‘‘एखादे ध्येय निश्‍चित केलेला मनुष्य शंभर चुका करीत असेल, तर ध्येय नसलेला मनुष्य दहा हजार चुका करतो.’’ तात्पर्य असे की, ध्येयामुळे आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो, परंतु असे असले, तरी ध्येयाची निवड देखील महत्त्वाची बाब असते.

स्वामी विवेकानंदांच्या जीवन वाङ्‌मयातून आपल्याला उच्च ध्येयमार्गासाठीची दिशा मिळते.स्वामी विवेकानंदांचे जीवन पाहा. गुरुदेव रामकृष्णांच्या प्रयाणानंतर स्वामीजींनी संपूर्ण भारताचे भ्रमण केले आहे. भारत म्हणजे काही केवळ कागदावरचा नकाशा नाही. भारत म्हणजे भारतातले लोक. इथली गावं, इथल्या नद्या, पर्वत, इथे होऊन गेलेले ऋषीमुनी, इथले तत्त्वज्ञान आणि खूप काही... जोवर आपण खरा भारत समजून घेत नाही, तोवर तिच्याप्रती मनात भक्तीभाव निर्माण होणे कसे शक्य आहे? एखाद्या व्यक्तीप्रती प्रेम किंवा तिरस्कार तेव्हाच निर्माण होते, जेव्हा आपल्याला तिच्या गुण-दोषांची ओळख होते. देशाच्या बाबतीतही हेच तत्त्व लागू आहे. आपण इतिहास वाचलेला असतो. इतिहासातील आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाने आपला ऊर अभिमानाने भरून येतो. हा अनुभव आपल्या सार्‍यांचाच आहे. म्हणूनच केवळ प्राचीन भारत ग्रंथातून अभ्यासून न थांबता स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण वर्तमान भारत पायी फिरून अनुभवला.शेवटी स्वामीजी देशाच्या दक्षिण टोकाला- कन्याकुमारी येथे आले. तिथल्या श्रीपाद शिलेवर की, जिथे देवी पार्वतीने कैलासातल्या शिवशंकरासाठी एका पायावर तपश्‍चर्या केली होती, तिथे २५, २६ आणि २७ डिसेंबर १८९२ या तीन दिवस-रात्री त्यांनी ध्यान केलं.

हा पहिला सन्यासी होता की, ज्याने आपल्याला वैयक्तिक मोक्ष अथवा मुक्ती मिळावी म्हणून ध्यान साधना केली नाही. भारताला पुन्हा तिचं गतवैभव कसे मिळवता येईल हा त्यांच्या ध्यानाचा केंद्रबिंदू होता.एकेकाळी वैभवावर असलेल्या या देशाचे भग्नावशेष त्यांनी जागोजागी भ्रमणकाळात पाहिले होते. पाश्‍चात्य देशातील लोकांना जेव्हा कपडे घालण्याचीही बुद्धी नव्हती. तेव्हा या देशात एक प्रगल्भ संस्कृती नांदत होती, हेही त्यांना माहीत होते, परंतु आज मात्र भारत गुलामीत होता. भारताचा स्वाभिमान ब्रिटिशांनी पायदळी तुडवला होता. दारिद्र्याने आणि लाचारीने कळस गाठला होता. जातीभेद स्पृशास्पृशतेसारख्या घातक रूढींनी उच्छाद मांडला होता.

अज्ञानाचा अंध:कार गडद झालेला होता. अशा स्थितीतून पुन्हा भारताचे उत्थान घडवून आणायचे तर काय करावे लागेल हा त्यांच्या ध्यानाचा विषय होता. अखेर एक शक्तिशाली विचार घेऊन स्वामीजी त्या शिलेवरून उठले. आपण आत्मविश्‍वास गमावलेला आहे, त्यामुळेच आजची अधोगती झाली. या देशाला पुन्हा आत्मविश्‍वास मिळवून देणे हे विवेकानंदांच्या जीवनाचे ध्येय बनले. जगावर राज्य करणार्‍या लोकांच्या देशात जाऊन आमच्या देशाचा तरुण विजय मिळवतो, ही घटना समस्त भारतीयांना आत्मविश्‍वास देणारी ठरली. यातूनच खर्‍या अर्थाने भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाला बळ मिळाल्याचा इतिहास आहे.

स्वामी विवेकानंदांनी भारतीयांना भारताकडे भारतीय दृष्टिकोनातून पाहायची दृष्टी दिली.

स्वामी विवेकानंद म्हणजे साक्षात घनिभूत देशभक्ती. त्यांचा युवा पिढीवर प्रगाढ विश्‍वास होता. भारताच्या पुनरुत्थानच्या कार्यासाठी युवकच पुढे येतील, असा त्यांना विश्‍वास होता. देशभक्तीचे मूर्तीमंत प्रतीक असणारे स्वामी विवेकानंद केवळ भारतासाठीच प्रेरक आहेत असे मात्र बिलकुल नाही. संपूर्ण जगात सुख-शांती नांदण्यासाठी त्यांनी केलेले मार्गदर्शन लाखमोलाचे ठरले होते. म्हणूनच तर सार्‍या जगासाठी असा काय संदेश स्वामीजींनी दिला होता, तेही समजून घेतले पाहिजे. अन्यथा मोठा गोंधळ होईल.

दोन वर्षांपूर्वी जपानचे पंतप्रधान भारतात आले होते. संसदेला संबोधित करताना पंतप्रधान ऍबे सिंझो म्हणाले की, जपान भारताचा ऋणी आहे. कारण जपानचे शिल्पकार तेनशिन ओकाकुरा यांनी स्वामी विवेकानंद यांच्यापासून प्रेरणा घेतली होती. ते पुढे असे म्हणाले की, जगाचे नेतृत्व करण्यासाठी जपान आणि भारत या दोन्ही देशांनी पुढाकार घेतला पाहिजे.‘क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन’ या विख्यात पुस्तकाचे लेखक आणि नामवंत इतिहासकार सॅम्युअल हंटिग्टन म्हणतात की, जगात तिसरे महायुद्ध झालेच तर ते एकांतिक विचारधारा मानणार्‍या धर्मीयांकडून होईल. माझाच धर्म खरा या दुराग्रहामुळे होईल. यातून वाचण्याचा एकच मार्ग असेल, तो म्हणजे भारतीय मार्ग अर्थात हिंदू विचारधारा. आकाशातून पडणारे पाणी शेवटी या ना त्या मार्गाने समुद्राला मिळते. त्याप्रमाणे तुम्ही कोणत्याही ईश्‍वराची उपासना केली तरी ते अंती एकाच ईश्‍वराला पोचते, अशी भारतीय विचारधारा आहे. हाच हिंदू विचार अर्थात वेदांत हा भावी जगाचा मार्ग असणार आहे असे स्वामी विवेकानंद म्हणतात. हाच विचार आहे की, जो जगात शांती आणू शकतो, परंतु यासाठी हा विचार सांगणारा देश दुर्बल असून, चालणार नाही.

भारताने गेल्या दहा हजार वर्षांत कोणत्याही देशावर आक्रमण केले नाही. कारण दुसर्‍यांना पायदळी तुडविणे हा भारताचा स्वभाव नाही, परंतु जगाला शांतीचा आणि शाश्‍वत मार्ग दाखवायचा असेल, तर भारताने बलशाली झालेच पाहिजे. त्याला पर्याय नाही. भारताला बलशाली करण्याच्या कार्यात आपला खारीचा वाटा उचलणे हेच आपल्यासमोरचे सर्वोच्च ध्येय असू शकते. तुम्ही विद्यार्थी असा की, शिक्षक, शिपाई असा की, अधिकारी, शेतकरी असा की, सौनिक तुम्ही कोणीही असा, आपले सर्वोच्च ध्येय भारत पुनरुत्थानाच्या कार्यात योगदान देणे हेच असू द्या. स्वामी विवेकानंदांच्या शब्दांत सांगायचे तर आगामी काळात हे राष्ट्र हेच तुमचे दैवत असू द्या. एकदा ध्येय ठरले की, कार्य करण्याची दिशा आपोआप गवसून जाईल.

संघटित कार्य करण्याचा मंत्र स्वामीजींनी दिला आहे. संघटित कार्यात सहभागी झाल्याने आपल्या व्यक्तिमत्त्व विकासाचा वेग वाढतो. विवेकानंदांच्या शब्दांत, करावयास लागा म्हणजे कळून येईल की, तुमच्यात किती प्रचंड सामर्थ्य आहे. व्यक्तिमत्त्व विकासाची प्रक्रिया ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. यासाठी शक्तीदायी विचारांची सोबत आवश्यक असते. विवेकानंदांचे शक्तीदायी विचार तरुणांपर्यंत आणि जनसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी विवेकानंद केंद्र कन्याकुमारीतर्फे १५० व्या जयंतीच्या निमित्ताने आगामी ३ वर्षे विविध उपक्रमांची योजना करण्यात आली आहे. आज देशभरात विविध ठिकाणी या ‘सार्ध शती समारोहा’ची सुरुवात होत आहे.

स्वामी विवेकानंद यांची १५० वी जयंती २०१३ साली असून त्यानिमित्त १२ जानेवारी २०११ ते १२ जानेवारी २०१४ या कालावधीत विवेकानंदांचे शक्तीदायी विचार समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रमांची योजना करण्यात आली आहे. महाविद्यालयीन युवकांसाठी ‘सिंहनाद’ हा राज्यव्यापी वक्तृत्त्च विकास कार्यक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमांतर्गत आगामी ३ वर्षांत लहान, मोठी अशी एक़ूण १५० पुस्तके प्रकाशित करण्यात येणार असून ती माफक दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. माणूस घडविणारे आणि राष्ट्रभक्ती चेतविणारे विवेकानंदांचे विचार अधिकाधिक तरुणांपर्यंत पोहोचविण्यासाठी सुरू असलेल्या या उपक्रमास शुभेच्छा.
 

***************************************************
आजपासून स्वामी विवेकानंदांचे शक्तिशाली विचार येथे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. यानिमित्ताने मला स्वत:ला पुन्हा एकदा या विचारांचे सानिध्य मिळावे हा हेतू आहे. १९६३ साली स्वामी विवेकानंदांची जन्मशताब्दी होती. त्या आधी एक वर्ष - १९६२ साली चीन कडून आपला दारूण पराभव झाला होता. त्यानंतर देशातील तरुण पिढीत आलेले नैराश्य दूर करण्याचे महत्वाचे काम स्वामी विवेकानंदांच्या ' Rousing Call To Hindu Nation ' या पुस्तकाने केले होते.

देवानंद आणि राजकारण : आणले होते इंदिरा गांधी यांच्या नाकी नऊ

औपचारिकरीत्या राजकारणात पदार्पण करणारा पहिला अभिनेता म्हणून देवानंद यांची नोंद घ्यावी लागेल. स्वत: देवानंद हे राजकारणात अधिक काळ रमले नाहीत, पण त्यांनी फिल्मी हस्तींना राजकारणात उतरण्याचा मार्ग दावला.
१९७७ साली देशात इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केल्यानंतर देवानंद यांनी राजकारणात उतरण्याचा आणि त्यांना धडा शिकविण्याचा निर्णय घेतला. देवानंद यांनी 'नेशनल पार्टी ऑफ इंडिया'ची स्थापना केली आणि या माध्यमातून राजकीय जीवनाला सुरुवात केली.
http://divyamarathi.bhaskar.com/article/DMS-indira-gandhi-dev-aanand-emergency-india-sanjay-gandhi-2616888.html?HF=

मार्केट इकॉनॉमी की मार्केट सोसायटी (FDI)

गेले काही दिवस FDI या विषयावर उलट सुलट चर्चा सुरु आहे. FDI ला विरोधकांकडून जोरदार विरोध झाला. संपुआमधील घटक पक्षांनीच नव्हे तर केरळमध्ये सत्तेत असलेल्या कॉंग्रेस मुख्यमंत्र्यांनीही विरोध केला. बहुतांश वृत्तपत्रांची भूमिका FDI ला पाठींबा देण्याची राहिली. त्यामुळे परकीय गुंतवणूक काशी फायदेशीर आहे, बाजू जोरदारपणे समोर येत राहिली. दुसरी बाजू ठीक प्रकारे समजलीच नाही. विख्यात अर्थ तज्ज्ञ एस. गुरुमूर्ती यांचा या विषावरील दुसरी बाजू मांडणारा एक लेख वाचण्यात आला. पाहा ही बाजू कशी वाटते ? ज्यांना शक्य आहे त्यांनी या लेखाचे मराठी रुपांतर करावे, ही विनंती. 

Saturday, December 3, 2011

तब्बल 811 वर्षांनंतर उभारला देशातील सर्वांत उंच विजयी स्तंभ

दिव्य मराठी नेटवर्क । मोहाली (पंजाब) - पंजाबमधील ऐतिहासिक चप्पडचिडी या गावात मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी बुधवारी देशातील सर्वांत उंच विजयी स्तंभ 'मिनार-ए-फतेह'चे उद्घाटन केले. नांदेड येथील बाबा बंदासिंग बहादूर यांनी 300 वर्षांपूर्वी पंजाबमधील सरहिंदचा नवाब वजीर खानावर मिळवलेल्या यशाच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा स्तंभ उभारण्यात आला आहे. कुतुबमिनारनंतर 811 वर्षांनी उभारण्यात आलेला हा देशातील सर्वांत उंच विजयी स्तंभ आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-minar-e-fateh-in-panjab-2611963.html

Friday, December 2, 2011

मला भावलेली एक मेल

मित्रांनो, आपल्या इन बॉक्समध्ये अनेक मेल येत असतात. त्यातील काही मनाला भावून जातात. माझ्या इन बॉक्समध्ये नुकतीच एक मेल पडलेली दिसली. 'Save the Indian Rupee ........ Save India' ही मेल विचार प्रवृत्त करून गेली. ती मेल येथे देत आहे...

Thursday, December 1, 2011

धन्य आहे ते न्यायालय आणि धन्य ती मिडिया !

गुजरात उच्‍च न्‍यायालयाने बहुचर्चित इशरत जहॉं एन्‍काऊंटर प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्‍वेषन विभागाकडे (सीबीआय)  सोपवण्‍याचा आदेश दिला आहे. यापूर्वी याप्रकरणाचा तपास करणा-या विशेष्‍ा तपास पथकाच्‍या (एसआयटी) टीमने इशरत जहॉं एन्‍काऊंटर प्रकरण बनावट असल्‍याचे म्‍हटले होते. 

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी