Friday, December 16, 2011

... झलक पाहूनच अमेरिकेने घाबरून काढला होता पळ


१६ डिसेंबरला जगाच्या इतिहासात एक वेगळे महत्व आहे. ४० वर्षांपूर्वी याच दिवशी बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळाले होते. १९४७ साली ब्रिटिशांनी भारतवर्षाचे तुकडे करून पाकिस्तान जन्मास घातले. त्यापैकी पूर्व पाकिस्तान या नावाने ओळखल्या जाणा-या पूर्व बंगाल प्रांताला  भारताने मुक्त केले होते. या युद्धात आणखी एका देशाने महत्वाची भूमिका बजावली होती, तो देश म्हणजे रशिया.
http://divyamarathi.bhaskar.com/article/DMS-indo-pak-war-and-usa-us-2644811.html?HF=


१९७१ च्या युद्धात पाकिस्तानला मदत करण्यासाठी अमेरिका हा देश धावून आला होता. त्याच वेळी भारत आणि बांगलादेशच्या समर्थनार्थ रशियाने आपल्या युद्धनौका उतरविल्या होत्या.
हे युद्ध तसे भारत आणि पाकिस्तान दरम्यान सुरु झाले होते, परंतु अमेरिका आणि रशियाच्या सहभामुळे युद्धाला महायुद्धाचे रूप आले. ब्रिटनने भारताच्या मदतीसाठी हिंदी महासागरात ईगल युद्धनौका उतरविल्या. त्याच वेळी रशियाने एडमिरल ब्लादिमीर कृग्ल्याकोव यांच्या नेतृत्वाखाली आपल्या युद्धनौकांची एक युनिट पाठवून दिली.
हिंदी महासागरात पश्चिमेकडून अमेरिकेने आपली नौसेना पाठविली होती तर पूर्वेकडून सोव्हिएत क्रुजर, डिस्ट्रॉयर आणि जहाज भेदी क्षेपणास्त्रे तैनात करण्यात आली होती. अमेरिकेला घाबरविण्यासाठी रशियाने केवळ आपली क्षेपणास्त्रे सज्ज ठेवली अन् या गोष्टीचा सुगावा लागताच धास्ती घेऊन अमेरिकेच्या एडमिरल डिमॉन गॉर्डनने ७ व्या अमेरिकी फ्लीट कमांडरला याची माहिती दिली आणि अमेरिकेने काढता पाय घेतला. या व्हिडिओमध्ये हीच युद्धनीती सांगितली आहे.

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी