Monday, September 30, 2013

यशोगाथा अमेरिकेतील हिंदूंची ! - -'लोकमत'मधील लेख

     हिंदू विदेशात जातात, तेव्हा ते तेथे आपली विजयपताका फडकवितात. असे असताना आपला भारत देश गरीब का राहिला आहे? हा मला पडणारा व सतावणारा प्रश्न आहे. माझ्या मते, 'सोशालिझम' व 'सेक्युलेरिझम' ही दोन दुखणी त्याला कारण आहेत. नेहरूप्रणीत 'सोशालिझम'ने 'लायसन्स- कोटा- राज'ला जन्म दिला आणि उद्योजक वर्गाचे आर्थिक स्वातंत्र्य हिरावून घेतले; आणि एकविसाव्या शतकात आपण हमखास यशस्वी होऊ, असे जगात कोठेही स्वत:च्या कृतीने ज्यांनी अद्याप दाखवून दिलेले नाही, अशा लोकसमूहांचे लाड करण्याचे व त्यांना खास वागणूक देण्याचे काम 'सेक्युलेरिझम'ने केले आहे. त्याचीच फळे संपूर्ण भारत देश आणि ते लाडावलेले लोकसमूहही भोगत आहेत आणि यापुढेही भोगणार आहेत. 'कोटा' व 'रिझर्वेशन' यांमुळे बहुसंख्याकांना त्यांच्या हक्काचे नाकारले जात आहे
>
> यशोगाथा अमेरिकेतील हिंदूंची
> (22-09-2013 : 00:07:51)     
>
> - डॉ. दिलीप कारे
>
> 'प्यू' रिसर्च फोरम' नावाच्या एका अमेरिकी संशोधन गटाने त्या देशात वास्तव्य करणार्‍या विभिन्न धार्मिक लोकसमूहांचे सामाजिक, शैक्षणिक दृष्टिकोनांतून सर्वेक्षण केले आणि त्यांची अमेरिकी लोकांशी तुलना केली आहे. अमेरिकेतील हिंदू हा तेथील सर्वांत सधन व संपन्न लोकसमूह बनला असून, सर्वच क्षेत्रांत त्यांने उत्तम कामगिरी केल्याचे दिसून आले आहे.
>
> एका 'प्यू' रिसर्च फोरम' नावाच्या अमेरिकी संशोधन गटाने त्याचा अहवाल अगदी नुकताच प्रसिद्ध केला आहे. सर्वेक्षणासाठी घेतलेले सर्व लोकसमूह आशिया खंडातून अमेरिकेत स्थलांतर केलेले आहेत. त्यात हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, ज्यू आहेत, बौद्धधर्मीय आहेत. या सर्वेक्षण अहवालांतून या लोकसमूहांमधील साम्य व विरोध यांवर उत्तम प्रकाश पडतो आणि एकंदर अमेरिकी समाजात या समूहांचा सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक दर्जा काय आहे, त्यांचा प्रभाव कसा व किती आहे, याचा उलगडा होतो.
> सर्वेक्षणासाठी घेतलेल्या या लोकसमूहांमध्ये चीन, जपान, व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया, भारत, पाकिस्तान या देशांतून अमेरिकेत स्थलांतर केलेले लोक आहेत. यामधील सर्वांत मोठा लोकसमूह बौद्ध धर्मीयांचा आहे आणि तो प्रामुख्याने चीन, व्हिएतनाम, लाओस व कंबोडिया या देशांतून दडपशाही, छळ, अन्याय, अत्याचार यांमुळे निर्वासित झालेल्यांचा आहे. याशिवाय जपानमधीलपण बौद्धधर्मीय आहेत. ज्यू, मुस्लिम व हिंदूपण आहेत. यापैकी हिंदू अमेरिकेत गेले आहेत, ते छळ, अत्याचार यांतून सुटका करण्यासाठी नव्हे, तर आपले नशीब अजमावण्यासाठी, अधिक सुखी जीवन जगण्याची आकांक्षा बाळगून! हे सगळे हिंदू भारतातील आहेत. अमेरिकेची एकूण लोकसंख्या ३१ कोटी आहे आणि त्यात या स्थलांतरित हिंदूंचे प्रमाण 0.५ टक्के किंवा त्याहून थोडे अधिक आहे. याचा अर्थ अमेरिकेत वास्तव्य करणार्‍या हिंदूंची संख्या १ लाख ५५ हजारांच्या आसपास आहे.
> अमेरिकेतील सर्वसाधारण अमेरिकी नागरिकांच्या तुलनेत हे आशियाई स्थलांतरितांचे लोकसमूह शिक्षणाच्या क्षेत्रात अधिक यशस्वी झालेले आहेत, असे या सर्वेक्षण अहवालावरून लक्षात येते. त्यांची सरासरी मिळकतसुद्धा इतर अमेरिकी लोकांच्या मानाने बरीच अधिक आहे. त्यातही विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे शिक्षण व मिळकत या दोन बाबतींत हिंदूंनी ज्यूंसकट इतर सर्व स्थलांतरितांच्या लोकसमूहांना फार मोठय़ा फरकाने मागे टाकले आहे. याआधी हा मान ज्यू लोकसमूहाला होता. सर्वेक्षणात स्थलांतरित लोकसमूहांचा मतदानाचा कल, त्यांचा शैक्षणिक दर्जा, त्यांचे मिळकतीचे प्रमाण, विविध वयोगट, त्यांची धर्माबाबतची भूमिका, त्यांच्यातील आंतरधर्मीय विवाहाचे प्रमाण यांसारख्या अनेक बाबी विचारात घेण्यात आलेल्या असल्या, तरी त्यांचा शैक्षणिक दर्जा व मिळकतीचे प्रमाण या फक्त दोन बाबी विचारांत घेतल्या, तर अनेक गोष्टींचा उलगडा होतो. अहवालानुसार अमेरिकेतील हिंदूंमध्ये ५७ टक्के पदव्युत्तर शिक्षण घेतलेले व ८५ टक्के पदवीधर आहेत. त्याखालोखाल ज्यूंमध्ये हे प्रमाण ३४ टक्के व ६३ टक्के आहे. उरलेल्यांपैकी बौद्ध धर्मीयांमध्ये १७ टक्के व ३४ टक्के आहे. अमेरिकेतील अमेरिकी लोक चौथ्या क्रमांकावर असून, त्यांच्यात फक्त १२ टक्के पदव्युत्तर शिक्षण घेतलेले, तर २८ टक्के पदवीधारक आहे. मुस्लिमांमध्ये ११ टक्के पदव्युत्तर शिक्षण घेतलेले व २३ टक्के पदवी प्राप्त केलेले आहेत.
> शिक्षणामधील या भरारीशिवाय अमेरिकेतील हिंदूंमध्ये आणखी एक विशेष गुण आहे, जो अमेरिकनांमध्ये व अन्य आशियाई लोकसमूहांमध्ये नाही. हिंदू जोखीम पत्करणारे आहेत. म्हणून ते स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यास एका पायावर तयार असतात. किंबहुना स्वतंत्र व्यवसाय ही अमेरिकेतील त्यांची पहिली पसंती असते. कमी शिक्षण घेतलेल्यांनी अमेरिकेतील मॉटेल उद्योग व 'कन्व्हिनियन्स स्टोअर' व्यवसाय काबीज केला आहे. आजच्या घडीला अमेरिकेतील ५0 टक्क्यांवर मॉटेल्स गुजराथी पटेल समाजाच्या मालकीची आहेत आणि ती 'पटेल मॉटेल्स' म्हणूनच ओळखली जातात. हिंदूंच्या मालकीच्या 'कन्व्हिनियन्स सेंटर्स'ची संख्या तर ६0 टक्क्यांच्या वर आहे. तांत्रिक व तंत्रवैज्ञानिक क्षेत्रातदेखील उद्योजकांनी अशीच दौड मारली आहे. हायटेक उद्योगांचे जगातील सर्वांत मोठे केंद्र मानल्या जाणार्‍या 'सिलिकॉन व्हॅली'मध्ये जे नवे उद्योग उभे राहतात, त्यापैकी ३३ टक्के उद्योगांच्या प्रमोटर्समध्ये किमान एक हिंदू असतो.
> अमेरिकेतील हिंदू जेथे नोकरी मिळण्याची खात्री आहे, अशाच क्षेत्रातील पदव्या संपादण्याची ते खबरदारी घेतात. अमेरिकेतील हायस्कूलमध्ये शिकणार्‍या प्रत्येक पाच हिंदू विद्यार्थ्यांमागे एक मेडिकल कॉलेजमध्ये जातो. उरलेले चार विशुद्ध विज्ञान, गणित किंवा इंजिनिअरिंग विषयात पदवी मिळवितात. त्यांना अमेरिकेत सर्वाधिक मागणी आहे.
> वरील सर्व बाबी एकत्रित विचारात घेतल्या, तर एक गोष्ट ठळकपणे लक्षात येते, की अमेरिकेतील हिंदू हा तेथील सर्वांत सधन व संपन्न लोकसमूह बनला आहे. विभिन्न धार्मिक लोकसमूहांमधील मिळकतीची आकडेवारी यावर उत्तम प्रकाश टाकते. अहवालाप्रमाणे हिंदूंमध्ये ४८ टक्के कुटुंबांची मिळकत एक लाख डॉलर्स व त्याहून अधिक आहे आणि ७0 टक्के कुटुंबांची मिळकत ७५ हजार डॉलर्स व त्याहून अधिक आहे. ज्यू कुटुंबांच्या बाबतीत हे प्रमाण ४0 टक्के व ५३ टक्के, बौद्धांमध्ये १४ टक्के व २७ टक्के आणि मुस्लिमांमध्ये १४ टक्के व २३ टक्के आहे. तर अमेरिकी कुटुंबांच्या बाबतीत फक्त १५ टक्के व २८ टक्के आहे. याचा अर्थ मिळकतीच्या बाबतीतपण हिंदू पहिल्या स्थानावर आहेत. हिंदूंना अमेरिकेत पक्षपाती वागणूक मिळत असूनही त्यांनी सर्व आघाड्यांवर हे असे असाधारण यश मिळविलेले आहे. अर्थात, अमेरिकेत हिंदूंकडे अभिमानाने व आदराने पाहिले जाते, हे पण लक्षात घेतले पाहिजे. मी अधूनमधून अमेरिकेला जातो, तेव्हा विमानतळावर किंवा शॉपिंग मॉलमध्ये अपरिचित भेटतात. मी भारतीय आहे असे सांगताच, मी एक तर वैज्ञानिक किंवा डॉक्टर असणार, असे त्यांना ठामपणे वाटते.
> हिंदू लोक विदेशात जातात, तेव्हा तेथील स्थानिक लोकांच्या मानाने अधिक शिकलेले, कायद्यांचे काटेकोर पालन करणारे व अधिक संपन्न असल्याचे जाणवते. हे फक्त अमेरिकेपुरतेच नाही. इंग्लंड, कॅनडा, सिंगापूर, हाँगकाँग व इतरत्र कोठेही जा, हिंदूंच्या बाबतीत हेच आढळून येते. हिंदू विदेशात जातात, तेव्हा ते तेथे आपली विजयपताका फडकवितात. असे असताना आपला भारत देश गरीब का राहिला आहे? हा मला पडणारा व सतावणारा प्रश्न आहे. माझ्या मते, 'सोशालिझम' व 'सेक्युलेरिझम' ही दोन दुखणी त्याला कारण आहेत. नेहरूप्रणीत 'सोशालिझम'ने 'लायसन्स- कोटा- राज'ला जन्म दिला आणि उद्योजक वर्गाचे आर्थिक स्वातंत्र्य हिरावून घेतले; आणि एकविसाव्या शतकात आपण हमखास यशस्वी होऊ, असे जगात कोठेही स्वत:च्या कृतीने ज्यांनी अद्याप दाखवून दिलेले नाही, अशा लोकसमूहांचे लाड करण्याचे व त्यांना खास वागणूक देण्याचे काम 'सेक्युलेरिझम'ने केले आहे. त्याचीच फळे संपूर्ण भारत देश आणि ते लाडावलेले लोकसमूहही भोगत आहेत आणि यापुढेही भोगणार आहेत. 'कोटा' व 'रिझर्वेशन' यांमुळे बहुसंख्याकांना त्यांच्या हक्काचे नाकारले जात आहे. मित्तल स्टील हा जगातील मोठा पोलाद उद्योग ज्यांनी इंग्लंडमध्ये उभा केला, त्यांचे याबाबतीत उत्तम उदाहरण म्हणून सांगता येईल. आज ते इंग्लंडमधील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वांत श्रीमंत उद्योगपती आहेत आणि त्यांची संपत्ती ११ अब्ज अमेरिकी डॉलर्स एवढी आहे. 'लायसन- कोटा- राज'ला कंटाळून त्यांनी भारत सोडला होता. नव्हे, त्यांना सोडावा लागला होता. एकूण आलेख पाहिला तर अमेरिकास्थित हिंदूंची कामगिरी मात्र निश्‍चितच गौरवास्पद आहे व त्यांच्या गुणांचे दर्शन घडवणारीही...
>
> http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=ManthanEdition-52-1-21-09-2013-c7f71&ndate=2013-09-22&editionname=manthan
>
> --
>
>
>
>

Watch "Nawaz Sharif calling Indian Prime Minister a dehati aurat( Village woman)" on YouTube

http://www.youtube.com/watch?v=a47HFJ0imYk&feature=youtube_gdata_player

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी