Monday, December 9, 2013

विवेकानंद साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेचे मंगळवारी प्रकाशन

सोलापूर | विवेकानंद साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेचे मंगळवार, दि. १० डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता हिराचंद नेमचंद म्फी थिएटर येथे प्रकाशन सोहळा होणार आहे. ज्येष्ठ निरुपणकार विवेक घळसासी यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. विवेकानंद केंद्र, कन्याकुमारीचे जीवनव्रती विश्‍वासजी लपालकर आणि मुंबई येथील ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर यांची प्रमुख उपस्थिती असेल.
९, १० आणि ११ नोव्हेंबर रोजी सोलापुरात झालेल्या साहित्य संमेलनाच्या पार्श्‍वभूमीवर कृतज्ञता समारंभ आणि स्मरणिका प्रकाशन होत आहे. तरी अधिकाधिक विवेकानंदप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन विवेकानंद केंद्र सोलापूरचे संचालक दीपक पाटील यांनी केले आहे.
काय आहे स्मरणिकेत
विवेकानंद केंद्राचे मराठी मासिक विवेक विचारतर्ङ्गे १६४ पानांची स्मरणिका प्रकाशित होत आहे. सुरुवातीच्या ५० रंगीत पानांमध्ये संमेलन वृत्तांत व छायाचित्रे आहेत. उर्वरित पानांमध्ये स्वामी विवेकानंदांच्या जीवन, संदेशाचे विविध पैलू उलगडून दाखवणारे, विवेकानंदांच्या साहित्याचा वेध घेणारे देशातील विविध मान्यवर अभ्यासकांचे लेख आहेत. विवेकानंद आणि हिंदी, नारायणगुरू, स्त्रीशक्ती, विवेकानंदांचे हिंदुत्व, विज्ञान, सामाजिक विचार आदी विविध विषय हाताळण्यात आले आहेत.

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी