Saturday, November 10, 2012

वाचा विवेक विचार दिवाळी अंक

नमस्ते,
विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे सांस्कृतिक मराठी मासिक वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...


आमिरखान सत्याच्या नावावर धंदा करत होता...


भाऊ तोरसेकर यांचा लेख 




   आमिरखान या लोकप्रिय अभिनेत्याने सहा महिन्यांपुर्वी प्रथमच छोट्या पडद्यावर आगमन केले. तसे त्याच्या आधी बहुतेक लोकप्रिय अभिनेत्यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. पण आमिरखान आपल्या नेहमीच्या स्टाईलने वेगळेपणा दाखवण्यात चतूर आहे. तेव्हा त्याने नेहमीच्या कथाप्रधान मालिकेपेक्षा वेगळे रूप घेऊन पदार्पण केले. त्याने ‘सत्यमेव जयते’ नावाची एक मालिका स्वत:च निर्माण केली. त्यातून आजच्या भारतीय समाजाला भेडसावणार्‍या विविध समस्या लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. त्यातून मोठीच खळबळ माजली होती.

दलित मुस्लिम-दलित ख्रिश्‍चन?


रविवारचे भाष्य दि. जुलै २०१२ करिता
गेल्या आठवड्यात, दिल्लीहून प्रकाशित होणार्या ऑर्गनायझरया इंग्रजी साप्ताहिकात' Who is Secular? And what is Secular' या शीर्षकाचा माझा लेख प्रकाशित झाला होता. त्याची दखल सर्वत्र घेतली गेली याचा मला आनंद आहे. इंडियन एक्सप्रेसनेही आपल्या दि. जुलैच्या अंकात व्ह्यू फ्रॉम् राईटया स्तंभात पुरेशा विस्ताराने त्याचा सारांश प्रकाशित केला आहे. त्या लेखानंतर, मला अनेक ठिकाणांहून अभिनंदनाचे संदेशही आले. हिंदुस्थान टाईम्सया सुप्रसिद्ध इंग्रजी दैनिकाच्या एका वार्ताहराने मला एक दूरध्वनी करून, प्रश् विचारला की, ‘‘दलित ख्रिस्ती दलित मुस्लिम यांना आरक्षण देण्याला संघाचा विरोध आहे, असे बिहारचे मुख्य मंत्री नीतीशकुमार यांनी म्हटले आहे, आपले मत काय?’’ मी म्हणालो, ‘‘मी माझे वैयक्तिक मत देईन.’’ आणि त्यांनाच प्रश् केला की, ‘‘आपण ऑर्गनायझरमधील लेख वाचला आहे काय?’’ त्यांनी तो वाचलेला नव्हता. मग मी एवढेच म्हणालो की, ‘‘धर्माच्या आधारावर आरक्षणाला आपल्या संविधानाची मान्यता नाही आणि सर्वोच्च न्यायालयानेही तसाच निर्णय दिला आहे. आपण माझा लेख वाचा आणि मग प्रश् विचारा.’’ त्यानंतर त्यांचा पुन: दूरध्वनी आला नाही.

भाजपाची अ-स्वस्थता

-मा. गो. वैद्य
रविवारचे भाष्य दि. ११ नोव्हेंबर २०१२ करिता 
भाजपात अस्वस्थता आहे. भाजपावर टीका करण्यासाठी किंवा त्या पार्टीची निंदा करण्याकरिता मी हे म्हणत नाही. भाजपाचे स्वास्थ्य चांगले दिसत नाही, असे मला जाणवते. त्या पार्टीचे स्वास्थ्य चांगले रहावे, तीत एकजूट रहावी, तिच्या कार्यकर्त्यांनी आणि विशेषत: नेत्यांनी, आपल्याच पक्षाला कमजोर करू नये, या इच्छेने मी हे म्हणत आहे; आणि असे वाटणार्‍यांमध्ये मी एकटाच नाही. भाजपाविषयी सहानुभूती असणार्‍या, २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाने अग्रेसरत्व प्राप्त करावे अशी इच्छा असणार्‍या असंख्य लोकांना असे वाटते. विशेष म्हणजे असे वाटणार्‍यांमध्ये जे भाजपामध्ये सक्रिय आहेत, लहानमोठ्या पदांवर आहेत, त्यांनाही असे वाटते.

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी