Tuesday, October 25, 2011

नोटांवर शिवाजी महाराज, महाराणा प्रताप...

 
 हिंदुस्तान वरील १५० वर्षांचे ब्रिटीश साम्राज्य उधळून फेकणे हे काही एका व्यक्ती कडून शक्य नव्हते. त्या साठी हजारो क्रांतिकारकांनी स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात आपल्या प्राणांच्या आहुती दिल्या.
परंतु गांधीवादी (?) कॉंग्रेस सरकार सर्व श्रेय फक्त आणि फक्त महात्मा गांधी यांनाच देते.
आम्हाला गांधींचा विरोध नाही परंतु १० पासून १००० रुपयांच्या नोटांवर फक्त गांधीच, असे का?
फक्त त्यांच्या एकामुळे स्वातंत्र्य शक्यच नव्हते.

http://divyamarathi.bhaskar.com/article/DMS-shivaji-maharaj-on-indian-currency-2524288.html?HF=

 

वीर सावरकर, भगत सिंग आणि हजारो क्रांतिकारक फक्त पोस्टाच्या तिकिटावर!!!!
इतकेच काय परंतु ज्यांनी १७०० वर्षांचे मुघलांचे साम्राज्य उलथवून टाकले,
इंग्रज, पायी, फिरंगी, डच, पोर्तुगीज एवढे बलाढ्य आरमार त्यांचे.
जे फटकळ मुघली फौजांनी साधले नाही ते शिवाजी महाराजांनी करू दाखवले.
सांगायचा उद्देश एवढाच कि ब्रिटन प्रमाणे आपल्याही देशातील नोटांवर सर्वप्रकारचे क्रांतिकारक, विचारवंत, वैज्ञानिक या सर्वाचे फोटो हवेत.
असे विचार मांडले की त्याला जातीयवादी ठरवून वाळीत टाकले जाते.
गांधीजींच्या शिवाय अन्यही देशभक्त या देशात होवून गेले हे सांगितल्याने आपल्यावर जातीयवादी हा शिक्का बसत असेल तर जातीयवादी हे बिरूद अभिमानाने वागविले पाहिजे.
नोटांवर शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, नेताजी सुभाष, डॉ. आंबेडकर, छ. शाहू महाराज, म. फुले आदी महापुरुषांनाही स्थान मिळायला हवे.
( ही माहिती social networking sites वर फिरत आहे.)

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी