Monday, January 6, 2014

मुस्लिमांवर अन्याय करणारी गोष्ट

५ जानेवारीच्या सोलापूर तरुण भारतात प्रसिद्ध झालेला देवल बुक्का यांचा एक विचार करायला लावणारा लेख.
२४ डिसेंबर २०१३ रोजी रात्री सोलापुरातून दोघांना अटक झाली. सिमीच्या अतिरेक्यांना मदत केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. महमद सादिक लुंजे आणि ओमर दंडोती हे ते दोघे. ओमर याच्याकडून बॉंब बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. मध्यप्रदेश व मुंबई दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि सोलापूर व संभाजीनगरच्या पोलिसांनी ही कारवाई केली.

पत्रकारांची सक्रियता
मंगळवारी कारवाई झाली. सोलापूरच्या पत्रकार सृष्टीत वावरणारे चौघे पत्रकार सक्रीय झाले. त्यांनी ‘शोधपत्रकारिता’ केली. पकडण्यात आलेले तरुण निष्पाप असल्याचा त्यांना साक्षात्कार झाला. हे पत्रकार सामाजिक कार्यकर्त्याच्या भूमिकेत शिरले. संशयीत अतिरेक्यांच्या कुटुंबियांकडे गेले. त्यांना पत्रकार परिषद घेण्यासाठी आत्मविश्‍वास दिला. योगायोग असा की हे पत्रकार मित्र मुस्लिम समाजाचे होते.
 

मास्तर आले धावून
सादिक आणि ओमर दोघे निर्दोष असल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. लगेच धर्माला अफूची गोळी मानणार्‍या पक्षाचे नरसय्या आडम धावून आले. नरेंद्र मोदी यांना हिरो ठरवण्यासाठीच मध्यप्रदेशच्या एटीएसने दोन्ही तरुणांना अटक केल्याचे त्यांनी सांगितले. दोघेही निर्दोष असल्याचे प्रमाणपत्रही त्यांनी दिले. या कारवाईत मुंबई एटीएस आणि सोलापूर व संभाजीनगरचे पोलिस सहभागी होते, याचे भानही या महाशयांना राहिले नाही. 


हाय रे, त्यांचे दुर्दैव
न्यायाधिशाच्या भूमिकेत जाऊन त्या तरुणांना निर्दोष ठरवताना ऍडम बनलेल्या मास्तरांना थाडाही संकोच वाटला
नाही. हे कमी होते म्हणून की काय, जमियत ए उलमा या संघटनेच्या बॅनरखाली नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. अटक केलेल्यांना त्वरित सोडण्याची मागणी झाली. शेकडो मुस्लिम धर्मगुरू होते. ऍड. यू. एन. बेरिया, माजी महापौर आरिफ शेख यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावली. पण, हाय रे, त्यांचे दुर्दैव, दोन जानेवारी रोजी पुन्हा कारवाई झाली.

आणखी दोघांना पकडले
गुरुवारी मध्यप्रदेश, पुणे आणि सोलापूरच्या एटीएसने संयुक्तपणे छापा टाकला. इरफान मुच्छाले आणि ईस्माईल माशाळकर या दोघांना ताब्यात घेण्यात आले. घातपात आणि कटाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याचे सोलापूरचे पोलिस आयुक्त प्रदीप रासकर यांनी सांगितले.

पद्धतशीर होताहेत प्रयत्न
पोलिसांकडे असलेले पुरावे सबळ असतील तर सोलापुरातून अटक झालेल्या तरुणांना शिक्षा होईल. पुरावे नसतील तर ते निर्दोषही सुटतील. परंतु सोलापुरात सीमीच्या अतिरेक्यांपेक्षा अधिक घातक विषवेल अतिशय बेमालुमपणे पसरत आहे. त्याकडे कुणाचेच लक्ष नाही. संशयित अतिरक्यांना पडल्याची चर्चा तर मोठ्या प्रमाणात होते. परंतु अतिरेक्यांपेक्षाही अधिक घातक स्थिती सोलापुरात तयार करण्याचा पद्धतशीर प्रयत्न होतोय, याकडे मात्र कोणाचेच लक्ष नाही, हे दुर्दैवच. सीमीच्या अतिरेक्यांपेक्षा घातक काय आहे, हे समजून घेण्यासाठी पुढील बातम्या पाहा.

स्वार्थासाठी देशहिताला नख
भारताच्या साधनसंपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे, असे विधान पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी ९ डिसेंबर २००६ रोजी राष्ट्रीय विकास परिषदेत केले.
देशाच्या गृहमंत्रीपदावर विराजमान असलेले सोलापूरचे सुपुत्र सुशीलकुमार शिंदे यांनी ३० सप्टेंबर २०१३ रोजी सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. ‘कोणत्याही निरागस, निष्पाप मुसलमान तरुणांना संशयावरून अटक करू नका. चुकीने कोणत्याही अल्पसंख्याक व्यक्तीला अटक केल्यास त्या पोलिस अधिकार्‍यावर कठोर कारवाई करण्यात यावी.’, असे त्या पत्रात म्हटले होते.

‘मुसलमानांना तुटपुंजे कर्ज देऊ नका. त्यांना ५० लाखांपर्यंत कर्ज अल्पसंख्याक विकास महामंडळाने दिले पाहिजे. तसेच जर ते कर्ज मुसलमान फेडत नसतील तर सरकारची त्याला हरकत राहता कामा नये. तेवढी सूट त्यांना दिल्याने काही बिघडत नाही.’, असे प्रतिपादन कॉंग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष जी. परमेश्‍वर यांनी ६ ऑक्टोबर २०१३ रोजी केले.

मुस्लिमांवर अन्याय करणारी बाब
मुसलमानांची गठ्ठा मते कशी मिळतील यासाठी स्वार्थी राजकारण्यांचे हे वर्तन आणि इस्लामी अतिरेक्यांबद्दल पळपुटी भूमिका घेणारे स्वयंघोषित पुरोगामी यांच्याबद्दलच्या रागाचं पर्यवसान सामान्य मुस्लिमांविरुद्धच्या रागात होत आहे. ही वाढती भावना नक्कीच मुस्लिमांवर अन्याय करणारी आहे. सामान्य हिंदू ज्याप्रमाणे धर्मांध नाही, त्याप्रमाणे सामान्य मुस्लिमही धर्मांध नाही. त्याचं या देशावर प्रेम आहे आणि इस्लामी अतिरेक्यांच्या विध्वंसक कारवायांबद्दल त्यालाही चीड आहे. असं असताना इस्लामी अतिरेक्यांबद्दलच्या लोकांच्या मनात असलेल्या रागाची झळ सामान्य मुस्लिमांना सोसावी लागणे हे अन्यायकारक आहे.

सोलापूर ज्वालामुखीच्या तोंडाकडे
सामान्य मस्लिमांवरच्या या अन्यायाला सुशिलकुमार शिंदे, आडम मास्तर, मनमोहनसिंग यासारखे राजकारणी हातभार लावतात. सर्वसामान्य मुसलमानांनाही या पापाचे धनी करण्याचे कारस्थान सोलापुरात गेल्या काही वर्षांपासून मुस्लिम समाजातील स्वत:ला पुरोगामी समजणार्‍या काही बुद्धीजीविंकडून होत आहे. आणि याला माजी महापौरांसह सर्वसामान्य मुस्लिम जनता अजाणतेपणी बळी पडत आहे. ही स्थिती सिमीच्या अतिरेक्यांपेक्षाही अधिक घातक आहे. हा प्रकार सोलापूरला ज्यालामुखीच्या तोंडाकडे नेणारा ठरू शकतो.

पत्रकार संघातील वार्तालाप
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपून नव्या राष्ट्रपतीच्या निवडीची प्रक्रिया सुरू असतानाची ही घटना आहे. सोलापूरच्या श्रमिक पत्रकार संघाने राष्ट्रपती निवड प्रक्रियेसंबंधी संघाच्याच सभागृहत एका वार्तालापाचे आयोजन केले होते. मुस्लिम समाजातील एक ‘पुरोगामी’ विचारवंत पत्रकारांशी संवाद साधत होते. डॉ. कलाम कुठले शास्त्रज्ञ, ते तर टेक्निशियन आहेत, असे सांगत या महोदयांनी संसद हल्ल्यातील अतिरेकी अफझल गुरू याची आडमार्गाने बाजू घेण्याची कसरत केली. (तेव्हा तरुण भारतने याचे वृत्त ठळकपणे प्रसिद्ध केले होते.)

बुद्धीजीवींचा असाही जिहाद
‘‘पवित्र महिने उलटल्यानंतर जिथे जिथे तुम्हाला मूर्तिपूजक दिसतील, तेथे त्यांना ठार करा. त्यांना पकडा, त्यांना वेढा घाला, त्यांच्यासाठी दबा धरून बसा व ते दिसताच त्यांना मारा. पण त्यांना पश्‍चात्ताप झाला, इस्लामचा त्यांनी स्वीकार केला, गरिबांसाठी द्यावयाचा दंड त्यांनी दिला तर त्यांना सुखरूप जाऊ द्या.’’ हा इस्लामी धर्मग्रंथातील आदेश. तो थेट देण्याऐवजी या आदेशाचे पालन करणार्‍या धर्मांधांना मुस्लिम समाजात हिरो म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा प्रकार अतिशय गंभीर असला तरी याला रोखू शकणारा कायदा सध्या अस्तित्वात नाही.

कट्टरतेला प्रोत्साहनयातूनच आता औरंगजेबासारख्या क्रूरकर्म्याला सुफी संत म्हटले जात आहे तर शेकडो हिंदूंची कत्तल आणि लक्षावधी हिंदूंना जबरदस्तीने मुसलमान करणार्‍या टिपू सुलतानाला मुस्लिम समाजासमोर आदर्श म्हणून ठेवण्यात येत आहे. त्यामुळे अलीकडे टिपू सुलतानची जयंती मोठ्या धडाक्यात होईल यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहेत. यंदा सोलापुरातही जयंती मोठ्या प्रमाणात साजरी झाली. यातून इस्लाम विदाऊट जिहाद निर्माण होण्याऐवजी कट्टरतेला प्रोत्साहन मिळते.

आडमार्गाने भिनवतात धर्मांधता
माजी खासदार आणि सुधारणावादी म्हणून प्रतिमा असलेले डॉ. रफिक झकेरिया म्हणाले होते, ‘डॉ. कलाम हे खरे मुसलमान नाहीत. त्यांना मुसलमान राष्ट्रपती म्हणू नका.’ मुस्लिम समाजाचे नेतृत्त्व करणारे नेते डॉ. कलामांना सामान्य मुस्लिमांसमोर हिरो म्हणून सादर करत नाहीत. आडमार्गाने धर्मांधता भिनवण्याचे काम मात्र करतात.

मुख्यालय मशिद प्रकरण
सोलापूरच्या पोलिस मुख्यालयातील मशिदीचे प्रकरणही असेच आहे. प्रणिती शिंदे यांच्या मतदारसंघात मुस्लिम समाजाची संख्या अधिक आहे. मुस्लिम मते आपल्याकडेच वळावित यासाठी माकपचे नरसय्या आडम आणि कॉंग्रेसचे नेते अतिशय घातक राजकारण खेळत आहेत. त्या मशिदीतून देशविघातक कारवाया करणार्‍या लोकांचा वावर असल्याचे पुढे आल्याने बाहेरील लोकांना नमाज करण्यास बंदी घालण्यात आल्याचे सांगितले जाते.

कणखर भूमिका पोलिसांची
पोलिसांच्या ठाम भूमिकेमुळे आजवर केंद्रीय गृहमंत्री शिंदे, राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांना अनेकदा साकडे घालूनही मशिद खुली झाली नाही. राज्याचे मोठे पोलिस अधिकारी मशिद प्रकरणाचा आढावा घेऊन गेले. आडम मास्तर यांनी आंदोलनाची भाषा केली. कॉंग्रेसमधील काही मुस्लिम नेत्यांनी पक्ष गेला उडत, मशिद खुली करेपर्यंत स्वस्थ बसणार नाही अशी भूमिका घेतली. या राजकीय कुरघोडीतील एक भाग म्हणून आडम मास्तर यांनी संशयीत अतिरेक्यांना निर्दोष ठरवून पंतप्रधानांना भेटणार असल्याचे सांगितले. त्याला उत्तर म्हणून बेरियासह कॉंग्रेसमधील मुस्लिम नेते पकडण्यात आलेल्यांना निर्दोष असल्याचे सांगितले. हे खूपच घातक आहे.

तुमचे राजकारण होते...
मुस्लिम समाजातील पत्रकार, बुद्धीजीवी आणि नेते यांनी समाजाला दिशा देण्याची गरज आहे. हे करणे शक्य नसेल तर शांत बसा पण सामान्य मुस्लिमांच्या मनात विष पेरू नका. तुमचे राजकारण होते आणि या बिचार्‍यांचे जीवन उद्ध्वस्त होते. परिणाम मोठे असतात त्यामुळे परिणामांची चर्चा अधिक होते. कारणे सूक्ष्म असतात. त्या अजिबात चर्चा होत नाही. हे सर्वसामान्यांना सहजगत्या ध्यानात येत नाही.

करता येतील हे उपाय
समाजाची दिशाभूल करणार्‍यांविरुद्ध सर्वसामान्य मुस्लिम समाजाने पुढे आले पाहिजे.

डॉक्टर्स, वकिल, उद्योजक, शिक्षक, अभियंते अशा विभिन्न क्षेत्रात काम करणार्‍या संघटनांनी दिशाभूल करणार्‍या राजकारण्यांच्या विरोधात तत्काळ निवेदने प्रसिद्धीला दिली पाहिजेत.

हिंदू मुस्लिमांमध्ये सौहार्दाची भावना वाढीस लागण्यासाठी दोन्ही बाजूने विविध प्रयत्न व्हावेत.
मुस्लिम धर्मगुरूंनी धर्मांधता पसरवणार्‍यांविरोधात सक्रीय व्हावे.

गठ्ठा मतांसाठी लांगूलचालनाचे धोरण आखणार्‍यांना सर्वांनीच मतपेटीतून धडा शिकवले पाहिजे. असे झाले तर कोणी पुढारी समाजाला तोडण्याचे राजकारण करेल काय ?





.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी