Tuesday, May 28, 2013

रोहिंग्या मुस्लिमांना कुटुंब नियोजन सक्ती

यांगून । म्यानमारमध्ये रोहिंग्या मुस्लिमांना कुटुंब नियोजनाची सक्ती करण्यात आली आहे. राखिने राज्याकडून यासंदर्भातील आदेश बजावण्यात आला आहे.

धर्मांतर आणि मातंग समाज


दैनिक दिव्य मराठीत (दि. 25 एप्रिल) ओबीसींच्या धर्मांतराबाबत अँड. डी. आर. शेळके यांचे विवेचन विचारप्रवर्तक आहे. सामाजिक परिवर्तनाचा अभाव सर्वच जातीत आढळतो. मी मातंग समाजातील असून माझा धर्मांतराबाबतचा अनुभव असा आहे- पाच वर्षांपूर्वी मातंग समाजातही हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्मात प्रवेश करण्याचा विचारप्रवाह सुरू झाला होता.

गोहत्येविरोधात भिक्खूचे आत्मदहन



Inline image 1

मटा ऑनालाइन वृत्त । कॅण्डी

श्रीलंकेतील एका बौध्द भिक्खूने गो हत्येचा विरोध करण्यासाठी स्वत:ला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भिक्खूची प्रकृती चिंताजनक असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कॅण्डी शहरातील सेंट्रल टाऊन परिसरात असलेल्या बुध्द विहाराजवळ ही घटना घडली. जेथे गौतम बुध्दांच्या दाताचे अवशेष ठेवले आहेत त्याच मंदीरासमोर बुध्द जयंतीच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Saturday, May 25, 2013

चीन से विवादों का स्थायी हल जरूरी

वेदप्रताप वैदिक | May 24, 2013, 08:11AM IST
प्रधानमंत्री ली केकियांग की यात्रा में सीमा का सवाल, व्यापार असंतुलन जैसे महत्वपूर्ण मुद्दे अनसुलझे रहे।

अगर ली अपने बयानों में कहीं यह भी कह देते कि वे भारत को सुरक्षा-परिषद का स्थायी सदस्य बनवाने के लिए कटिबद्ध हैं तो उनकी यह यात्रा ऐतिहासिक हो जाती। वे भारत का कर्ज अदा कर देते।

Tuesday, May 21, 2013

तिरंग्याचे रंग सरकारने बदलले!


देशाच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयालाच तिरंग्याचे रंग माहित नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. केंद्र सरकारने आपली पाठ थोपटून घेण्यासाठी 'सद्भाव- आयडिया ऑफ इंडिया' हे ब्रिद घेऊन जाहिरांतीची मालिका आणली असून या जाहिरातीतूनच सरकारचे हे अज्ञान चव्हाट्यावर आले आहे.

Tuesday, May 14, 2013

कठीण समय येता मित्र धावून येतात!



2007 मध्ये शिक्षणासाठी मुंबईत राहायला होतो. सप्टेंबर महिन्यात एकदा एका वक्तृत्व स्पर्धेत भाग घेण्यासाठी पुण्याला जायचं होतं. दादर स्टेशनवर आलो. सकाळचे 7.53 वाजले होते. आता मी मुंबईत चांगलाच रुळलो होतो. मला काय झालं होतं कोणास ठाऊक पण मी उगीच घाई केली. सुटलेली इंद्रायणी गाडी पकडायचा प्रयत्न केला. हात सुटला आणि पडलो. कमरेखालचा भाग प्लॅटफॉर्म आणि ट्रेन यामध्ये अडकला.

Saturday, May 11, 2013

जीबीएस : संवेदनशिलतेला आवाहन

तीन वर्षांपूर्वी एका भयंकर आजाराने (जीबीएस) मला छळले होते. नागपूरच्या एका पत्रकारालाही या आजाराने घेरल्याचे आज कळले. त्याविषयी नम्र आवाहन…

Thursday, May 9, 2013

… तर भाजपला ९७ + ९ = १०६ अन काँग्रेसला 82 जागा

येडि्डंनी असे झोपवले भाजपला-
कर्नाटकात भाजपने 40 जागा जिंकल्या. भाजपमधून बाहेर चूल मांडलेल्या येड्डींच्या केजेपीला 6 जागा मिळाल्या. मात्र, 51 जागांवर भाजप-केजेपीला (एकत्रित) विजयी उमेदवारांपेक्षा अधिक मते मिळाली. यात 39 जागांवर काँग्रेसला विजय मिळाला, तर 10 जागी जेडीएस आणि 2 जागांवर अपक्ष विजयी झाले. येड्डी वेगळे नसते तर भाजपला 40+6+51 = 97 जागा मिळाल्या असत्या. यात कमी फरकाने जिंकलेल्या काँग्रेसच्या 39 जागा कमी झाल्या असत्या तर काँग्रेसची 121 वरून ही संख्या 82 जागावर आली असती. म्हणजेच गेल्या वेळेपेक्षा फक्त 2 जागा अधिक. त्यातच खाणसम्राट रेड्डी बंधूंचे साथीदार व माजी आमदार श्रीरामुलू यांनीही भाजपला 9 जागांवर फटका दिला. त्यांचे चार उमेदवार विजयी झाले तर 5 जागांवर दुसर्‍या स्थानी राहिले.
सभार - दिव्य मराठी http://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-OTS-why-bs-yeddyurappas-birthday-party-cancelled-4259103-NOR.html?HT2=


यातून धडा घेऊन लोकसभा निवडणुकीवेळी येडीयुरप्पा भाजप एकत्र येतील का ?

फत्ते? नव्हे, हार!

 -कामगिरी फत्ते झाली, काम फत्ते करून आलो, असं आपण अगदी सहजपणे म्हणत असतो. असे अनेकच अरबी, तुर्की, फारसी शब्द आपण सहजपणे आत्मसात करून टाकले आहेत. हा सगळा मुसलमानी राजवटीचा परिणाम आहे. अरबस्तानात इस्लामी संप्रदाय उदयाला आला. अरबांनी तुर्कांना बाटवलं. तुर्कांनी पर्शिया म्हणजे फारस किंवा इराण जिंकला. पण, अरब आणि तुर्क दोघांपेक्षाही फारस हा श्रेष्ठ संस्कृतीचा होता. त्यामुळे जगभरच्या सर्वच इस्लाम धर्मीयांवर फारसी संस्कृतीचा पगडा बसला. भारतावर बाबरापासून औरंगजेबापर्यंत सत्ता गाजवणारे मुघल किंवा मोगल हे मुळात तुर्क मुसलमान; पण मुघल राजवटीची अधिकृत भाषा होती फारसी, तुर्की किंवा अरबी नव्हे.

दोनशे घरे पेटवून दिली; कुठे दाद ना फिर्याद!

... आता या दंगलीवर कोण बोलणार?

या देशात ढोंगी सर्वधर्मसमभावाचे ढोल इतक्या कर्कश्श आवाजात बडविण्याची स्पर्धा लागली आहे की, त्या आवाजात पश्‍चिम बंगालमध्ये झालेल्या भीषण दंगलीचा आवाज आणि पीडित हिंदूंच्या किंकाळ्या कोणापर्यंत पोहोचल्याच नाहीत! गुजरातच्या दंगलींना आता तप उलटले, त्यानंतर किंचाळणार्‍या सर्व सेक्युलॅरिस्टांच्या आणि प्रसारमाध्यमांच्या नाकावर टिच्चून गुजराती जनतेने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाला तीन वेळा प्रचंड बहुमताने सत्तेवर बसविले. तरीही नितीशकुमारपासून ते कॉंग्रेसच्या छटाक नेत्यांपर्यंत कोणीही उठतो आणि नरेंद्र मोदींना बारा वर्षांपूर्वी झालेल्या दंगलींचा विषय काढून शिव्याशाप देऊ लागतो. मात्र, आता काही दिवसांपूर्वी सेक्युलॅरिजमबद्दल सतत चिरक्या आवाजात किंचाळणार्‍या ममता बॅनर्जी यांच्या राज्यात दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात मुसलमानांनी क्षुल्लक घटनेचे निमित्त करून तीन गावांत अक्षरशः नंगा नाच घातला. दोनशे घरे पेटवून दिली. या घटनेची कुठे दाद ना फिर्याद! सेक्युलॅरिस्टांची तोंडे बंद!

सीबीआय, सरकार आणि विधी अधिकारी

अरुण जेटली 

 -कोळसा खाण वाटप घोटाळ्याच्या संदर्भातील सर्वोच्च न्यायालयात सादर करावयाचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल तयार करताना केंद्रीय कायदा मंत्री आणि पंतप्रधान कार्यालयातील अधिकार्‍यांनी जो हस्तक्षेप केला, त्यातून सरकारवर वारंवार सीबीआयच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याचे जे आरोप होतात, त्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून सीबीआयचे नियंत्रण हळूहळू सरकारकडून सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकार्‍यांच्या हातात जाऊ लागले आहे.

सर्वांत मोठे आरोपी ठरले आहेत-पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग!

 ‘‘सीबीआय ही संगनमत करणारी संस्था आहे, की निष्पक्ष तपास करणारी? पिंजर्‍यात बंदिस्त पोपट जसा आपल्या मालकाच्या सांगण्यावरून पोपटपंची करतो, तसा हा अहवाल आहे.’’ कोळसा घोेटाळा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयसोबतच सरकारवरही ओढलेले हे कठोर शब्दांतील ताशेरे पाहता, पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, संपुआ अध्यक्षा सोनिया गांधी आणि कायदामंत्री अश्‍वनीकुमार यांना तोंड दाखविण्यासाठीही थोडीशीही शिल्लक जागा उरलेली नाही. सीबीआय आधी सरकारच्या पिंजर्‍यात बंदिस्त होते. बुधवारी ते सर्वोच्च न्यायालयासमोर आरोपीच्या पिंजर्‍यात उभे राहिले. सीबीआयची कधी नव्हे एवढी अब्रू प्रथमच चव्हाट्यावर आली. संचालकानेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली केल्यामुळे, तर संपूर्ण सीबीआय या संस्थेची मान शरमेने खाली गेली आहे.

कुठे आहेत संभाजी ब्रिगेडवाले ? म्हणे औरंगझेब 'सुफी संत'.

घ्या राष्ट्रवादीची दहा तोंडे ! म्हणे औरंगझेब 'सुफी संत'. मग संभाजीराजे यांना काय म्हणायचे ? राष्ट्रवादीने ही पिलावळ पोसली आहे म्हणून ते निवडून येताहेत. सगळे असे नाहीत पण जुलमी  औरंग्याचे उदात्तीकरण करणारे धर्मांध आहेतच आणि त्यांना आश्रय देणारी पवार आणि कंपनी काय आहे त्यांचे त्यांनाच माहित !
म्हणे औरंगझेब 'सुफी संत'.
कुठे आहेत संभाजी ब्रिगेडवाले ?

Sunday, May 5, 2013

स्वामी विवेकानंद : हिंदू, हिंदू राष्ट्र और हिंदू धर्म

 ‘हिंदूशब्द को आजकल, और विशेषत: राजनीतिक क्षेत्र में, एक संकीर्ण अर्थ चिपकाने की कोशिशें जारी हैं| ‘हिंदू’, अन्य संप्रदायों की भॉंति एक संप्रदाय मात्र है, ऐसा प्रचारित किया जा रहा है| अत:, जो कोई हिंदू की, हिंदू-हित की, या हिंदू-राष्ट्र की बात करता है, उसे सांप्रदायिक और अराष्ट्रीय मानने की प्रवृत्ति दिख रही है| उसे सेक्युलरराजनीति का शत्रु माना जा रहा है| एक अजीब बात यह है कि जो संप्रदायविशेष का विचार कर अपनी नीतियॉं और कार्यक्रम बना रहे हैं, उन्हें सेक्युलरकहा जा रहा है| और जो सब पंथों को समान समझो, राजनीति और राज्यशासन पंथनिरपेक्ष होना चाहिये, ऐसा कहते हैं, उन्हें सांप्रदायिक कह कर उनकी निंदा की जा रही है| वैचारिक व्यभिचार का ऐसा विचित्र उदाहरण दुनिया में शायद ही, और कहीं मिल पायेगा|
हिंदूहोने का अभिमान इस परिप्रेक्ष्य में, जिनकी १५० वी जयंति, अब अपने देश में मनाई जानेवाली है, उन स्वामी विवेकानंद के विचार क्या थे, यह जानना सचमुच उद्बोधक होगा| हमारे सार्वजनिक जीवन की कई भ्रांतियॉं दूर करने में वे सहायक होंगे|
स्वामीजी कहते हैं, ‘‘हिंदू होने का मुझे अभिमान है| मैं आप का देशवासी हूँ इसका मुझे गर्व है| (Complete works of Vivekanand. vol-3, page 381) हिंदू शब्द सुनते ही, शक्ति का उत्साहवर्धक प्रवाह आपके अंदर जागृत होगा तभी आप सच्चे अर्थ में हिंदू कहने लायक बनते हैं| आपके समाज के लोगों में आपको अनेक कमियॉं देखने को मिलेंगी, किन्तु उनकी रगों में जो हिंदू रक्त है, उस पर ध्यान केन्द्रित करो| गुरु गोविंदसिंह के समान बनो| हिंदू कहते ही सब संकीर्ण झगडे समाप्त होंगे| और जो जो हिंदू है, उसके प्रति सघन प्रेम आपके अंत:करण में उमड पडेगा|’’ (तत्रैव पृ. ३७९)

Saturday, May 4, 2013

ब. ना. जोग : उत्तम संघटक व व्यासंगी लेखक

लेखक आणि कार्यकर्ता या दोन भूमिका रेल्वेच्या रुळाप्रमाणे समांतर धावणार्‍या आहेत. त्या दोन्ही एकत्र आल्या तर त्या व्यक्तींचे व्यक्तिमत्त्व समाजात उठून दिसते. त्याचे वेगळेपण सहजपणाने जाणवते. पण अशी उदाहरणे विरळच होत. तशा अपवादांपैकी एक आहेत बळवंत नारायण तथा ब. ना. जोग, रा. स्व. संघाचे सर्मपित कार्यकर्ते. उत्तम संघटक म्हणून ब. ना. जोग यांचा जेवढय़ा गौरवाने उल्लेख केला जातो, तेवढाच त्यांचा व्यासंगी लेखक व स्पष्टवक्ते, परखड विचारवंत म्हणून लौकिक आहे. साप्ताहिक विवेकचे सात वर्षे संपादक या नात्याने त्यांनी विवेकमधून व नंतर विविध नियतकालिकांमधून राष्ट्रीय प्रश्नांवर विपुल लेखन केले. वैचारिक मांडणी करणारी त्यांची मोठी ग्रंथसंपदा आहे. त्यांच्या सडेतोड लेखनाचे चाहते श्री. गोळवलकर गुरुजी, पं. दीनदयाळ उपाध्याय, स्वा. सावरकर, वाजपेयी-अडवाणी यांच्यासारखी अनेक नामवंत मंडळी होती. ‘जोग तुम्ही चांगले लिहिता’, या शब्दांत सावरकरांनी त्यांना अनेकदा प्रशस्तिपत्र दिले आहे. यावरून जोग यांच्या लेखनाची व त्यांची अभ्यासू वृत्ती ध्यानात यावी.

Thursday, May 2, 2013

जर्मन जिहादी सीरियात

जगभरात कुठेही मुसलमान आणि त्यांचा लढा म्हटलं की अल्-कायदा संघटना आलीच. फेब्रुवारी २०१२ मध्ये अल्-कायदाचा प्रमुख ऐमान अल् जवाहिरी याची एक चित्रफीत इंटरनेटवरून प्रसिद्ध झाली. तिच्यात त्याने स्पष्टपणे म्हटलं होतं की, सर्व मुसलमानांनी सीरियातल्या आपल्या बंधूंना शक्य ती मदत करावी. सीरियातल्या संघर्षात आंतरराष्ट्रीय जिहादी उतरायला तिथून सुरुवात झाली. संघर्ष सुरू होऊन अकरा महिने उलटल्यावर हे घडलं, म्हणजे, खरं पहाता उशीरच झाला.

टिपू सुलतानच्या नावावरून अकोल्यात वातावरण तापले

तारीख: 01 May 2013 21:43:10
-तभा वृत्तसेवा
अकोला, १ मे
महापालिकेतील सत्तापक्षाने अत्यंत घिसाडघाईने घेतलेल्या ठरावामध्ये स्थायी समितीच्या सभागृहाला टिपू सुलतानचे नाव देण्याचा ठराव असून न्यायालयात त्याला आव्हान दिले असताना आज पालकमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या उपस्थितीत टिपू सुलतान सभागृह असे नामकरण करण्यात आले. भाजपा-सेनेचे पदाधिकारी, नगरसेवकांनी त्यास कडाडून विरोध केला. पालकमंत्र्यांनी न्यायालयाचा अवमान केला असल्याचा आरोप करून त्यांच्याविरुद्ध प्रचंड रोष प्रकट झाला. भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा पुतळा जाळला. बाजारपेठही काही काळ बंद होती.

चीनला एवढी हिंमत येण्यामागे काय कारण ?

बलवीर पुंज
गेल्यावर्षी ४०० हून अधिक आणि यावर्षी आतापर्यंत जवळजवळ १०० वेळा चिनी सैन्याने भारतीय सीमांचे उल्लंघन केले आहे. सीमोल्लंघनाच्या ९० टक्के घटनांची नोंद लडाख क्षेत्रात करण्यात आली आहे. अगदी ताज्या प्रकरणात म्हणजे, १५ एप्रिलच्या मध्यरात्री चिनी सैनिकांनी पूर्व लडाखच्या दौलत बेग ओल्डी क्षेत्रात भारतीय हद्दीत १० किलोमीटर आत घुसखोरी केली होती. जवळजवळ १७,००० फूट उंचीवर असलेल्या या भागात चिनी लष्कराने तीन अस्थायी चौक्या उभारल्या आहेत. भारताने यासंदर्भात आक्षेप घेतल्यानंतरही चिनी सैनिक तेथून माघार घ्यायला तयार नाहीत. हा भूभाग आपलाच असल्याचा चीनचा दावा आहे. चीनला ही एवढी हिंमत येण्यामागे काय कारण आहे? आमचे सरकार चीनला सडेतोड उत्तर देण्यास का घाबरत आहे, हा देखील यक्ष प्रश्‍न आहे.

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी