Sunday, December 28, 2008

सारखी लायकी


सारखी लायकी नको बढायकी
कुणी कुणासंग भांडायचं न्हाय
गावकीत अमुच्या ठरलच हाय ।।धृ।।

जमीन जुमला अन्‌ गोठ्यातली गाय
कर्जापाण्यापायी इकायची न्हाय
मौजेत पुख्खा ताडीन्‌ माडी
आल्यागेल्याबरूबर प्यायाचं न्हाय ।।1।।

इठुरखुमाईच्या भक्तीशिवाय
गावून डोलून त्या भजनात काय
सरसी करायला तालासुरांची
डोस्क्यात टाळ कुणी घालायची न्हाय ।।2।।

गावोगावी वर्ग सुरूच हाय
केंद्राबिगर गाव सोभायचं न्हाय
आपल्याच गावात ऱ्हायाचं थाटात
भिवूनशान्‌ आता भागायचं न्हाय ।।3।।

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी