![](https://lh3.googleusercontent.com/blogger_img_proxy/AEn0k_t9Trtjl6aZlGJlpsuTVjeQebmtiq03DALJD64yhB0snttBR924BbjIvNu6PXFmz4tiy8YW0pLIEwfnFknh1KijXlIKuvDgpMe_HRCOwr9OF70v3KgOahtWUEV0sn_gmvKccA=s0-d) |
![](https://lh3.googleusercontent.com/blogger_img_proxy/AEn0k_uAMrIL1jZyCZc9KnausWkoMew82d8eS0ImQ-cEYemtRDsJ_LVEAXRihFeZlxyWtWpBjTuNeFXy6Qd4EspsirEZk2XWc5TNxbszy99i=s0-d) |
पदव्युत्तर शिक्षण घेत
असताना सयाजी गायकवाड यांची जिज्ञासू वृत्ती, निरीक्षण क्षमता आणि
संशोधनाची आवड ओळखून प्रो. बी. आर. झटे (परभणी) यांनी त्यांच्या नावाची
शिफारस नामवंत शास्त्रज्ञ प्रो. एस. आर. यादव (शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर)
यांच्याकडे पीएच.डी.साठी केली. यानिमित्ताने सयाजी यांना प्रो. यादवांकडे
विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाच्या प्रकल्पांतर्गत 1996 मध्ये कनिष्ठ संशोधक
म्हणून रुजू होण्याची संधी मिळार्ली. सह्याद्री पर्वतरांगा व कोकणातील
दुर्गम भागास भेटी देऊन तेथील वनस्पती गोळा करून त्यांचा प्रयोगशाळेत
सविस्तर अभ्यास करणे, असे कामाचे स्वरूप होते. दरम्यानच्या काळात पश्चिम
घाटातील जैवविविधतेचा अभ्यास कारण्यासाठी आलेल्या जपान, र्जर्मनी, नेदरलँड,
इंग्लंड इ. देशांतील तसेच भारतातील वनस्पती संशोधकांच्या शिवाजी
विद्यापीठात भेटी होत होत्या. यातून सयाजी यांच्यातील संशोधकवृत्ती प्रबळ
होत गेली.
पहिल्या वनस्पतीच्या शोधाविषयी प्रा. सयाजी गायकवाड
सांगतात, ‘‘1998 च्या पावसाळ्यात प्रो. यादव सरांसोबत कर्नाटक राज्यातील
उडपी तालुक्यात वनस्पतींच्या अभ्यासासाठी गेलो असताना भाताच्या शेतातून
अँपोनोजेटॉन या वनस्पतीची एक दुर्मिळ प्रजात मिळाली. त्या प्रजातीवरील
शोधनिबंध आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झाला. अवघ्या दीड वर्षात
आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रसिद्ध झाल्याने उत्साह आला आणि मी दिवसातील
17-18 तास प्रयोगशाळेत काम करू लागलो. आता नवीन वनस्पतींचा शोध लावायचा
एवढेच ध्येय समोर होते. बर्याच वेळा स्वप्नेही तशीच पडायर्ची.
त्याअनुषंगाने पश्चिम घाटातील व कोकणातील बर्याच दुर्गम प्रदेशात भटकंती
करत होतो. बर्याच वेळेस खूप पायपीट करावी लागायची. जेवणाचे हाल व्हायचे.
पण या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणून मला 1999 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात
पहिली नवीन प्रजात मिळाली. त्यास इरिओकॉलान रत्नागिरीकस असे नाव दिले आणि
तो शोधनिबंध आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध केला. तद्नंतर माझ्या
संशोधन कार्यास चांगला वेग आला आणि मी अकरा नवीन वनस्पतींच्या प्रजातींचा
शोध लावण्यात यशस्वी झालो. यात किटकभक्षी वनस्पतींच्या तीन, कंदीलपुष्पीची
एक, सफेदमुसळीची एक, गवताची एक, सुरणची एक, रोटालाची एक, ईरिओकाऊलानच्या
तीन प्रजातींचा समावेश आहे.’’
वरील नवीन प्रजातींपैकी सफेदमुसळीची
प्रजात माळावर कमी पाण्यात वाढते. त्यामुळे औषधी वनस्पती म्हणून तिची
लागवड करता येऊ शकते. तसेच शेतकरी तिचा पर्यायी पीक म्हणून लागवड करू
शकतात. रोटालाची प्रजात जलग्रहामध्ये शोभिवंत वनस्पती म्हणून उपयोगात आणली
जाऊ शकाते. कीटकभक्षी वनस्पतींच्या प्रजाती व इरिओकॉलानचे निसर्गातील
अन्नसाखळीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. कायनम लीलीच्या कंदामध्ये अनेक
प्रकारची अल्कोलॉईडस असल्याचे पुरावे आहेत. ज्यांचा उपयोग औषधनिर्मितीमध्ये
होऊ शकतो. या सर्व प्रजातींवर पुढे संशोधन होणे आवश्यक आहे. प्रा. गायकवाड
यांना 2012 मध्ये आश्चर्यकारकरीत्या सोलापूर जिल्ह्यातून भीमा नदीच्या
पात्रात कायनम लीलीची नवीन प्रजात मिळाली. तिला ‘कायनम सोलापुरेन्स’ असे
नाव दिले आहे. सदरील शोधनिबंध ‘किव बुलेटीन लंडन’ या नियतकालिकाकडे
प्रकाशनासाठी पाठवण्यात आला असून तो संपादक मंडळाने स्वीकारला. कृष्णदेवराय गरड, रामचंद्र गारे, वालचंद महाविद्यालय |
सोलापुरातील वालचंद महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. सयाजी गायकवाड यांना
केंद्र व राज्य शासनाकडून विविध संशोधन प्रकल्पांतर्गत 39 लाख रुपये इतका
निधी मिळाला आहे. त्यांनी नुकताच राज्य शासनाला सोलापूर व उस्मानाबाद
जिल्rातील औषधी वनस्पतींचा डाटाबेस तयार करून दिला. | आहे.
|
No comments:
Post a Comment