प्रश्न : 2002 मधील दंगलीच्या संदर्भानेच आपल्याकडे पाहिले जाते याचे वाईट वाटते? उत्तर : एखाद्या बाबतीत मी चूक केलेली असेल तरच अपराधाची मला जाणीव होईल. त्याचा पश्चात्ताप होईल किंवा ते शल्य बोचेल. मी चोरी केली असेल तर पकडला जाईनच. मुळात माझ्या बाबतीत तसे काहीच नाही.
प्रश्न : 2002 मध्ये जे झाले त्याबद्दल खेद वाटतो?
उत्तर : भारतीय सर्वोच्च न्यायालय जगातील सर्वांत दर्जेदार न्यायालयांपैकी एक मानले जाते. त्याच्या विशेष तपास पथकानेही मला क्लीन चिट दिली. आणखी एक सांगतो, कोणी कार चालवतो आहे किंवा मागच्या सीटवर बसला असेल आणि चाकाखाली कुत्र्याचे एखादे पिल्लू चिरडले तर दु:ख होईल की नाही? दु:ख होणारच. मी मुख्यमंत्री आहे किंवा नाही, यापेक्षा आधी माणूस आहे. काही वाईट घडले तर मन कळवळणे साहजिकच आहे.
प्रश्न : परंतु 2002 मध्ये आपण जे केले ते योग्यच होते असे आपल्याला वाटते?
उत्तर : अर्थातच, देवाने मला जी बुद्धी दिली त्यानुसार तेव्हाची परिस्थिती पाहून शक्य असेल ते मी केले. एसआयटीने हेच म्हटले आहे.
प्रश्न : भारताला तर धर्मनिरपेक्ष नेता हवा आहे?
उत्तर : निश्चित, परंतु धर्मनिरपेक्षतेची व्याख्या काय आहे? माझ्या दृष्टीने देशाला पहिले प्राधान्य. सर्वांसाठी न्याय हे माझ्या पक्षाचे तत्त्व आहे. कोणाचे लांगूलचालन नाही.
हो, मी हिंदू राष्ट्रवादी
प्रश्न : खरे मोदी कोणते, हिंदू नेता की
उद्योजकांचे पाठीराखे मुख्यमंत्री?
मोदी म्हणाले : मी देशभक्त, जन्माने हिंदू आहे. म्हणूनच मी हिंदू राष्ट्रवादी. कामाबद्दल म्हणाल तर, जे बोलतात त्यांचे ते विचार असतील. म्हणूनच दोन्हीलाही विरोध नाही. ती एकच संकल्पना आहे.
भाजपचा खुलासा मोदी काहीच चूक बोलले नाहीत.
प्रश्न : अल्पसंख्याकांना मते कशी मागणार?
उत्तर : हिंदू आणि मुस्लिम असे सगळेच हिंदुस्थानात मतदान करतात. त्यांची विभागणी मी करत नाही. हिंदू आणि शीख यांच्यात फूट पडावी या विचारांचा मी नाही. सर्वच नागरिक, मतदार माझ्या देशातील आहेत. धर्म हा लोकशाही प्रक्रियेचा भाग असूच नये.
प्रश्न : धुव्रीकरणावर आपला भर असल्याचे आपल्याच पक्षाचे लोक म्हणतात?
उत्तर : अमेरिकेत डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन असे धु्रवीकरण झाले नाही तर लोकशाही कशी टिकेल? लोकशाहीचे ते पायाभूत तत्त्व आहे. सर्वच एका दिशेने गेले तर लोकशाही कसे म्हणाल?
प्रश्न : सहकारी पक्ष आपल्याला वादग्रस्त मानतात?
उत्तर : माझा पक्ष किंवा घटक पक्षातील नेत्यांचे असे वक्तव्य अजून तरी मी ऐकलेले किंवा वाचलेले नाही. माध्यमांत ते येत असेल. मात्र, कुणाचे नाव आपण सांगितले तर मी निश्चित उत्तर देऊ शकेन.
प्रश्न : विरोधक म्हणतात आपण हुकूमशहा आहात. समर्थक म्हणतात आपण निर्णायक नेते आहात. मग खरे मोदी कोणते ?
उत्तर : स्वत:ला आपण नेते समजत असून तर निर्णय क्षमता असावी लागते. निर्णय क्षमता असेल तरच आपल्याल नेता होण्याची संधी आहे. या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. नेत्याने निर्णय घ्यावेत अशीच लोकांची इच्छा असते. त्याचवेळी त्या व्यक्तीला नेता म्हणून स्वीकारले जाते. हा गुण आहे. नकारात्मक दृष्टीने ते घेऊ नये. दुसरी गोष्ट म्हणजे हुकूमशहा असेल तर एवढी वर्षे सरकारचा कारभार कसा चालवू शकतो. सांघिक (टीम वर्क ) बळाशिवाय कुणी यशस्वी कसे होऊ शकतो का? म्हणूनच मी म्हणत असतो गुजरातचे यश हे मोदींचे नसून टीम गुजरातचे यश आहे.
प्रश्न : तुम्हाला टीका आवडत नाही, असे म्हणतात...
उत्तर - टीकाटिपण्णी हीच लोकशाहीची खरी ताकद आहे. टीका नसेल याचा अर्थ लोकशाही नाही. प्रगती करायची असेल तर टीकेला निमंत्रण द्यावे लागेल आणि मला प्रगती करायची आहे. त्यामुळे टीकेचेही मी स्वागत करतो, परंतु आरोप आणि
टीका या दोन्हीमध्ये फरक आहे. टीका करण्यासाठी अभ्यास करावा लागतो. घटनांची तुलना, वास्तविकता तपासावी लागते. माहिती पारखून घ्यावी लागते. त्यानंतर टीका करता येते, परंतु आरोप करणे सोपे आहे. लोकशाहीत आरोपांमुळे वातावरण बिघडते. त्यामुळे आरोप करण्यास माझा विरोध आहे, पण टीकेचे नेहमीच स्वागत करतो.
प्रश्न : जनमत चाचणीत तुम्ही अधिक लोकप्रिय असल्याचे दिसून येते ते कसे ?
उत्तर : सन 2003 नंतर अनेकवेळा जनमत सर्वेक्षण झाले.सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून लोकांनी माझी निवड केली. एकदा तर मी इंडिया टुडे ग्रुपचे अरुण पुरी यांना पत्रही लिहिले होते. मी त्यांना म्हणालो, दरवेळेस मीच विजेता ठरतो. त्यामुळे पुढील वेळेसपासून गुजरातला सोडून सर्वेक्षण करा. त्यामुळे इतरांनाही संधी मिळेल .
प्रश्न : तुम्ही पंतप्रधान झाल्यास कोणत्या नेत्याचे अनुकरण कराल ?
उत्तर - पहिली गोष्ट म्हणजे आयुष्यात माझे एक तत्त्व आहे, मी कधी काही बनण्यासाठी स्वप्न पाहत नाही. मी काहीतरी कार्य करण्याचे स्वप्न पाहतो. रोल मॉडेलकडून प्रेरणा घेण्यासाठी मला काही कर्तृत्वाची गरज नाही. मला वाजपेयींकडून काही शिकायचे असेल तर गुजरातमध्ये मी त्याची अंमलबजावणी करेल. त्यासाठी मला दिल्लीचे (पंतप्रधान) स्वप्न पाहण्याची गरज नाही. सरदार पटेलांकडून काही शिकवण घ्यायची असेल, तर तेही मी माझ्या राज्यात राबवू शकतो. गांधीजींची एखादी गोष्ट आवडल्यास ती मी गुजरातमध्ये लागू क रू शकतो.
प्रश्न : पुढील सरकारने काय साध्य क रावे, असे वाटते?
उत्तर - सत्तेवर येणा-या नव्या सरकारने जनतेचा विश्वास पुन्हा संपादन केला पाहिजे. धोरणांमध्ये सातत्य हवे. लोकांना वचन दिले तर त्याचा आदर राखला पाहिजे. ते वचन पूर्ण केले पाहिजे. त्या वेळी आपल्याला जागतिक पातळीवर ठसा उमटवता येईल.
प्रश्न : गुजरातच्या आर्थिक विकासाच्या केवळ बाजारगप्पाच आहेत, असे लोक म्हणतात.
उत्तर - लोकशाहीत अंतिम फैसला कुणाचा आहे? अंतिम निर्णय जनतेचाच असतो. हा केवळ गाजावाजा असेल तर लोक ते दररोज पाहत आहेत. मोदी म्हणतात त्यांनी पाणी दिले. मग ते म्हणतात मोदी खोटं बोलतात. पाणी मिळाले नाही. मग मोदींना का पसंती मिळते? भारतासारख्या जिवंत लोकशाहीत एवढ्या सगळ्या सक्रिय पक्षांमध्ये जो सलग तिस-या वेळेस निवडून येतो, दोन तृतीयांश बहुमताच्या जवळ जातो, याचा अर्थ जे बोलले ते खरे आहे,
याची खात्री लोकांना आहे. रस्ते बनले आहेत, मुलांना शिक्षण मिळते आहे, आरोग्य सुधारले आहे. 108 क्रमांक (इमर्जन्सी नंबर ) उपलब्ध आहे. हवा निर्माण केली जात आहे, असे कुणी म्हणत असेल. मात्र, त्यावर लोकांचा विश्वास नाही आणि जनतेमध्ये खूप शक्ती आहे. खूप.
********अहमदाबाद/ नवी दिल्ली - गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्याने शनिवारी राजकारण ढवळून निघाले. रॉयटर या ब्रिटिश वृत्तसंस्थेशी मुलाखतीत मोदींनी राजकारण, पंतप्रधानपद व गुजरात दंगलीवर स्पष्ट भाष्य केले. या ओघात 2002 च्या गुजरात दंगलीचा उल्लेख आला. याचा पश्चात्ताप होतो का, असे विचारले तेव्हा मोदी म्हणाले, ‘आपण गाडीतून जात आहात आणि चाकाखाली एखादे कुत्र्याचे पिल्लू चिरडून ठार झाले तर मन कळवळतेच ना? शेवटी मी माणूस आहे. ’ या वक्तव्याने विरोधकांना आयते हत्यार मिळाले. विशिष्ट धर्माच्या भावना दुखावल्याबद्दल मोदींनी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. भाजपने मात्र विरोध करणा-यांनी पूर्ण मुलाखत वाचावी, असे आवाहन केले. शिवसेनेने मोदींची पाठराखण केली. आमच्या संस्कृतीमध्ये प्रत्येक प्राणीमात्रा पूजनीय असून प्रत्येक जीव महत्त्वाचा आहे, असे मोदींनी ट्विट केले.
मोदींची मुलाखत जशीच्या तशी / sabhar - divyamarathi.com
No comments:
Post a Comment