पाकिस्तानातील अल्पसंख्यकांचा छळ आणि
त्यांचे जबरदस्तीने होणारे धर्मांतर काही नवीन
बाब नाही. परंतु, काही दिवसांपूर्वी ज्याप्रकारे एका हिदू
मुलाच्या मुस्लिम धर्मात होणारया धर्मपरिवर्तनाचे दृश्य थेट
प्रसारित करण्यात आले, त्यावरून पाकिस्तानात
गैरमुस्लिमांची अवस्था कशी असेल, याचा अंदाज करता
येतो. सुनीलकुमार या हिंदू मुलाचे मौलाना मुफ्ती मोहम्मद
अकमलने धर्मांतर केल्यावर त्याचे नाव ‘मोहम्मद
अब्दुल्ला' असे ठेवण्यात आले. धर्मांतराचे दृश्य ‘लाईव्ह'
बघणारया कट्टरवादी प्रेक्षकांनी अत्यंत उत्साहित होऊन,
चित्कारत हे नाव सुचविले होते.
