Saturday, May 4, 2013

ब. ना. जोग : उत्तम संघटक व व्यासंगी लेखक

लेखक आणि कार्यकर्ता या दोन भूमिका रेल्वेच्या रुळाप्रमाणे समांतर धावणार्‍या आहेत. त्या दोन्ही एकत्र आल्या तर त्या व्यक्तींचे व्यक्तिमत्त्व समाजात उठून दिसते. त्याचे वेगळेपण सहजपणाने जाणवते. पण अशी उदाहरणे विरळच होत. तशा अपवादांपैकी एक आहेत बळवंत नारायण तथा ब. ना. जोग, रा. स्व. संघाचे सर्मपित कार्यकर्ते. उत्तम संघटक म्हणून ब. ना. जोग यांचा जेवढय़ा गौरवाने उल्लेख केला जातो, तेवढाच त्यांचा व्यासंगी लेखक व स्पष्टवक्ते, परखड विचारवंत म्हणून लौकिक आहे. साप्ताहिक विवेकचे सात वर्षे संपादक या नात्याने त्यांनी विवेकमधून व नंतर विविध नियतकालिकांमधून राष्ट्रीय प्रश्नांवर विपुल लेखन केले. वैचारिक मांडणी करणारी त्यांची मोठी ग्रंथसंपदा आहे. त्यांच्या सडेतोड लेखनाचे चाहते श्री. गोळवलकर गुरुजी, पं. दीनदयाळ उपाध्याय, स्वा. सावरकर, वाजपेयी-अडवाणी यांच्यासारखी अनेक नामवंत मंडळी होती. ‘जोग तुम्ही चांगले लिहिता’, या शब्दांत सावरकरांनी त्यांना अनेकदा प्रशस्तिपत्र दिले आहे. यावरून जोग यांच्या लेखनाची व त्यांची अभ्यासू वृत्ती ध्यानात यावी.

Thursday, May 2, 2013

जर्मन जिहादी सीरियात

जगभरात कुठेही मुसलमान आणि त्यांचा लढा म्हटलं की अल्-कायदा संघटना आलीच. फेब्रुवारी २०१२ मध्ये अल्-कायदाचा प्रमुख ऐमान अल् जवाहिरी याची एक चित्रफीत इंटरनेटवरून प्रसिद्ध झाली. तिच्यात त्याने स्पष्टपणे म्हटलं होतं की, सर्व मुसलमानांनी सीरियातल्या आपल्या बंधूंना शक्य ती मदत करावी. सीरियातल्या संघर्षात आंतरराष्ट्रीय जिहादी उतरायला तिथून सुरुवात झाली. संघर्ष सुरू होऊन अकरा महिने उलटल्यावर हे घडलं, म्हणजे, खरं पहाता उशीरच झाला.

चीनला एवढी हिंमत येण्यामागे काय कारण ?

बलवीर पुंज
गेल्यावर्षी ४०० हून अधिक आणि यावर्षी आतापर्यंत जवळजवळ १०० वेळा चिनी सैन्याने भारतीय सीमांचे उल्लंघन केले आहे. सीमोल्लंघनाच्या ९० टक्के घटनांची नोंद लडाख क्षेत्रात करण्यात आली आहे. अगदी ताज्या प्रकरणात म्हणजे, १५ एप्रिलच्या मध्यरात्री चिनी सैनिकांनी पूर्व लडाखच्या दौलत बेग ओल्डी क्षेत्रात भारतीय हद्दीत १० किलोमीटर आत घुसखोरी केली होती. जवळजवळ १७,००० फूट उंचीवर असलेल्या या भागात चिनी लष्कराने तीन अस्थायी चौक्या उभारल्या आहेत. भारताने यासंदर्भात आक्षेप घेतल्यानंतरही चिनी सैनिक तेथून माघार घ्यायला तयार नाहीत. हा भूभाग आपलाच असल्याचा चीनचा दावा आहे. चीनला ही एवढी हिंमत येण्यामागे काय कारण आहे? आमचे सरकार चीनला सडेतोड उत्तर देण्यास का घाबरत आहे, हा देखील यक्ष प्रश्‍न आहे.

Sunday, April 28, 2013

तरुण भारतवर हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न


तारीख: 27 Apr 2013 20:46:53

-पोलिसांच्या सतर्कता; हिंदुत्ववादी संघटनांतर्फे निषेध
प्रतिनिधी
जळगाव, दि. २६ -
दैनिक तरुण भारतमधील प्रकाशित बातमीचा राग येऊन मुस्लिम समाजातील काही युवकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंच्या संख्येने जमून नंतर तरुण भारतच्या गोलाणी मार्केटमधील कार्यालयाावर हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. गोलाणी मार्केट परिसरात आल्यानंतर मात्र पोलिसांनी वेळीच सतर्कता बाळगत आणि शांततेचे आवाहन करुन हा प्रयत्न हाणून पाडला.

ड्रॅगनची पुन्हा आगळीक


तारीख: 27 Apr 2013 18:25:47

ले. जनरल दत्तात्रय शेकटकर 
 १५ एप्रिल २०१३ रोजी सकाळी सूर्योदय होत असताना लद्दाख-चीन सीमा क्षेत्रात लाईन ऑफ कंट्रोलवर सुरक्षा व्यवस्था सक्षम ठेवण्याकरता जबाबदार आयटीबीपीच्या (इंडिया टिबेट बॉर्डर पोलिस) अधिकारी व जवानांनी, दौलत बेग ओल्डी (डी.बी.ओ.) क्षेत्रात, एक आश्‍चर्यजनक व धक्कादायक सत्य समोर पाहिलं. ज्या जागेवर चीनचे सैन्य १९६२ च्या युद्धानंतर कधीपण स्थानीय रूपाने राहिले नव्हते, त्या जागेवर चिनी सैन्याचे जवळ जवळ ३० ते ४० सैनिक टेंट लावून उपस्थित दिसले! ही संख्या चिनी सैन्याच्या एका प्लाटूनची (एका प्लाटूनमध्ये ५० सैनिक असतात) होती. जरी चीनचे सैन्य या क्षेत्रात पेट्रोलिंगकरता येत होते, परंतु त्यांनी टेंट (तंबू) कधीच लावले नव्हते! ही जागा भारतीय क्षेत्रात जवळ जवळ १० किलोमीटर आत आहे!

हे चमकते आमचे आदर्श नव्हेत


-शिवाजी महाराजांच्या जन्माच्या काळचे वर्णन करताना इतिहासकारांनी म्हटले आहे- ‘‘त्या काळी महाभयंकर स्थिती होती. हिंदूंना बाटविले जात होते.पवित्र मूर्तींच्या ठिकर्‍या होत होत्या. गायींची सर्रास हत्या होत होती. हिंदू स्त्रियांना सरळ उचलून घेऊन जात होते. तलवारीच्या टोकावर धर्मांतरे चालू होती...’’

Thursday, April 25, 2013

गुजरात: कॉग्रेसच्या हिंसक हिंदूत्वाची प्रयोगशाळा

भाऊ तोरसेकर  
१९६९ च्या गुजरात दंगलीच्या वेळी जाफ़रभाई सरेशवाला अवघा पाच वर्षाचा पोरगा होता. सतत वर्ष दोन वर्षानंतर उसळणार्‍या दंगली तो बघतच होता, त्यांचे चटके भोगतच होता. पण नंतर जीवन उध्वस्त करणारी पुढली मोठी दंगल गुजरातमध्ये झाली, ती १९८५ सालात. तेव्हा तर संपुर्ण देशातच भाजपाची धुळधाण उडालेली होती आणि गुजरातमध्ये कॉग्रेसचे माधवसिंह सोलंकी मुख्यमंत्री होते. तेव्हा तर एकट्या अहमदाबाद शहरात सलग दोनशे दिवस म्हणजे सात महिने कुठल्या ना कुठल्या भागात संचारबंदी चालूच होती.  संसदेत तर राजीव गांधींनी अफ़ाट बहूमत मिळवलेले होत. पण म्हणून गुजरातच्या मुस्लिमांना सुरक्षा लाभली नव्हती. दोन वर्षात गुजरातचा मुख्यमंत्री बदलला तरी हिंदू-मुस्लिम दंगली काही संपत नव्हत्या.

Wednesday, April 24, 2013

वृत्तपत्र बनतं कसं ? (माहितीपट)

 मी 2011 मध्ये सोलापूर विद्यापिठात पत्रकारिता व जनसंज्ञापनचे पदव्यत्तर शिक्षण पूर्ण केले. तेंव्हा मराठी ' वृत्तपत्र बनतं कसं ?' या विषयावर माहितीपट सादर केला. जिज्ञासूंसाठी माहितीपट पुढील youtube लिंकवर  उपलब्ध करून देत अहे. अभिप्राय जरूर कळवा.
वृत्तपत्र बनतं कसं ?

Monday, April 22, 2013

शीतल साठे, सचिन माळी नक्षलवादीच!


Thursday, April 18, 2013

धर्मसंस्थापना हीच खरी सेवा!


 समाजात सेवेची गरज तेव्हा भासते जेव्हा धर्म स्थापित झालेला नसतो.धर्मसंस्थापनेने समाजाच्या परस्पर सहयोगातूनच सहज सेवा होऊ लागते.परस्परसंबंधातूनच सर्वांचे समग्र कल्याण होते. अशा आदर्श समाजाची रचना करण्यासाठी केलेले कार्य ही सर्वोत्तम सेवा.भारतात परतल्यावर दिलेल्या व्याख्यानात स्वामी विवेकानंदांनी या विषयावर अनेक संदर्भ दिले आहेत. एकदा बोलताना स्वामीजी म्हणतात, ‘प्राचीन ऋषींनी आदर्श जीवन स्थापनेची एक अद्भुत योजना आखली होती.या योजनेवर अंमल करून प्रत्येक युगात धर्माधारित आदर्श रचना होत गेली. कालाच्या प्रवाहात आज ती योजना पूर्णपणे उलगडण्याआधीच विधर्मी,परकीय प्रभावात निष्प्रभ झालेली दिसते.’

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी