प्रतिनिधी । सोलापूर
ज्येष्ठ
पत्रकार भाऊ तोरसेकर यांचे रविवारी (३ मे) सायंकाळी ६.३० वाजता डफरिन
चौकातील ज्ञानप्रबोधिनी येथे व्याख्यान होणार आहे. "मीडिया - घडवणारी आणि
बिघडवणारी' हा व्याख्यानाचा विषय आहे. विवेकानंद केंद्राचे सांस्कृतिक
मासिक विवेक विचारच्या वतीने "विमर्श' उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम होत
असल्याचे कार्यक्रमप्रमुख शंकर पेद्दी यांनी सांगितले.
अध्यक्षस्थानी सोलापूर विद्यापीठाच्या जनसंज्ञापन व पत्रकारिता विभागाचे
प्रमुख डाॅ. रवींद्र चिंचोलकर असतील. यावेळी विवेक विचारच्या गोधन
विशेषांकाचे प्रकाशन होणार आहे. आचार्य गोविंददेव गिरी महाराज हे या
विशेषांकाचे अतिथी संपादक आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन
पेद्दी यांनी केले.
Thursday, April 30, 2015
Wednesday, April 8, 2015
विवेक विचार - एप्रिल २०१५

विवेक विचार
- एप्रिल २०१५ चा
संपूर्ण अंक
वाचण्यासाठी
पुढील लिंकवर
क्लिक करा...
विवेक विचार - एप्रिल २०१५
http://vivekvichar.vkendra.org/2015/04/vivek-vichar-april-2015.html
Saturday, March 21, 2015
गुढीपाडवा आणि वैज्ञानिक कालगणना
काळासंबंधी आपण कसा विचार करतो त्याचा आपल्या जीवनशैलीवरही परिणाम होतो. आज सारे विश्व पर्यावरणाच्या समस्यांनी ग्रासले गेले आहे. आपण जर या समस्येच्या मुळाशी जाऊन पाहिले तर असे दिसून येईल की, याची मूळ कारणे पाश्चिमात्य विचारांत आहेत. ती मंडळी काळाला एकरेषीय समजतात. त्यामुळे जीवन केवळ मर्यादित वेळेपर्यंतच मानले जाते. यामुळे जेवढे अधिक भोगता येईल तेवढे भोगण्याची वृत्ती निर्माण होते. परिणामी सृष्टीचे शोषण होते.
Friday, March 6, 2015
इराणमध्ये बुरख्याविरुद्ध जिहाद
![]() |
My Stealthy Freedom |
पद्मश्री मुजफ्फर हुसेन यांचा दिव्य मराठीतील लेख
तिने निवडलेला मार्ग अतिशय वेगळा आणि प्रभावी होता. तिने फेसबुकवर एक पेज बनवले. इराणी महिलांनी बुरखा किंवा कोणत्याही प्रकारचा पडदा न वापरता काढलेले छायाचित्र त्या पेजवर पेस्ट करण्याचे आवाहन केले. हे आवाहन यायचा अवकाश महिलांनी बुरख्याशिवायची छायाचित्रे धडाक्याने अपलोड केली. मौलाना किंवा इस्लामी कायद्याची भीती न बाळगता पोस्ट केलेल्या छायाचित्रांची संख्या तब्बल ७ लाख ६० हजारांहून अधिक होती.
![]() |
| मसीह अलीनिजाद |
Tuesday, March 3, 2015
संवादाची शक्ती - एक चिंतन
विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे राष्ट्रीय अध्यक्ष व विचारवंत पी. परमेश्वरन् यांचा लेख...
जेव्हा तुम्ही एखाद्या विषयावर एखाद्याशी चर्चा करता तेव्हा ती तीन प्रकारे करता येते. वाद, जल्प आणि वितंड हे ते तीन प्रकार आहेत. किती सुरेख विभागणी आहे ही. ‘वादा’ मध्ये सत्य शोधणे हा तुमचा हेतु असतो. सत्यशोधनाच्या हेतुने तुम्ही दुसर्याशी चर्चा करीत असता या चर्चेच्या वेळी तुम्ही शांत, संयमी असता. तुमच्याकडून वाक्ताडन होत नाही. चर्चाही गरमागरम नसते. अशा चर्चेला वाद असे म्हणतात.

Sunday, February 15, 2015
भाजपच्या पराभवाची पाच कारणे
ज्येष्ठ विचारवंत रमेश पतंगे यांचा दिव्य मराठीत प्रसिद्ध झालेला लेख...
दिल्ली प्रदेश निवडणुकात आम आदमी पार्टीने जबरदस्त बहुमताने जिंकल्या. एकूण 70 पैकी त्यांना 67 स्थानी यश मिळाले. या यशाला लॅन्ड्स्लाइड् म्हणजे भूमीपाताचे यश असे म्हणतात. निवडणुकीत ज्यांना यश मिळते ते आनंदी होतात,आणि ज्यांना अपयश मिळते ते दु:खी होतात. भाजपाचे नेते आणि समर्थक आज दु:खी आहेत. या निवडणुकीत आपला एवढा दारूण पराभव होईल असे स्वप्नात देखील वाटले नव्हते.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीत भाजपाने सर्व जागा जिंकल्या. 61 विधानसभा मतदार संघात त्यांनी आघाडी घेतली होती. 2013 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाला 32 जागा मिळाल्या आणि आपला 28 जागा मिळाल्या होत्या. 2015 च्या निवडणुकीत भाजपाला फक्त 3 जागा मिळाल्या आणि आपला 67 जागा मिळाल्या. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 46% मते मिळाली होती आणि आता फक्त 32% मिळाली, 'आप' ला 54% मते मिळाली. 2013 च्या निवडणुकीत भाजपाला 33% मते मिळाली होती. भाजपाच्या मताच्या टक्केवारीत फक्त 1% ने फरक पडला आणि 32 ऐवजी 3 जागा झाल्या.

Monday, February 2, 2015
दाभोलकरी मत्सरातून विवेकानंद विचारांचे अपहरण
दाभोलकर कुलोत्पन्न दत्तप्रसाद यांची स्वामी विवेकानंद यांच्यावरची तीन दिवसांची व्याख्यानमाला सोलापुरात २४ ते २६ जानेवारी या काळात पार पडली. अतिशय तल्लख बुद्धीमत्तेच्या दत्तप्रसाद यांनी विवेकानंदांच्या नावावर स्वत:चे विकृत विचार पसरवण्याचा खटाटोप या व्याख्यानमालेतून केला. भंपक आणि खोटारडेपणा करून विवेकानंद विचारांत भेसळ करू पाहणार्या दाभोलकर यांना उघडे पाडणारा युवा पत्रकार सागर सुरवसे यांचा तरुण भारतच्या आसमंत पुरवणीमध्ये प्रकाशित लेख...
Saturday, January 3, 2015
धर्मांतरितांविषयी - स्वामी विवेकानंदांची मुलाखत
आमचे प्रतिनिधी लिहितात :
‘हिंदूत्वातूनबाहेर गेलेल्यांविषयी - धर्मांतरितांविषयी - स्वामी विवेकानंदांची मी मुलाखत घ्यावी, असे आमच्या संपादकांनी सुचविले होते. त्यांची व माझी भेट गंगेच्या विशाल पात्रावर तरंगणार्या एका निवासी नौकेत, उतरत्या सायंकाळी झाली. रामकृष्ण मठाच्या नजीकच्या तीरावर नौका स्थिरावली होती. तिथे स्वामीजींचे दर्शन झाले.ती वेळ आणि स्थळही मोठे सुरेख होते. माथ्यावर नक्षत्रे चमकू लागली होती. भोवती गंगेचा प्रवाह उसळत होता. एका बाजूला नारळीच्या झाडांनी आणि गर्द सावली धरणार्या इतर वृक्षांनी वेढलेल्या मठाची वास्तू दिसत होती. ती शांत प्रकाशाने उजळलेली होती.

‘‘स्वामीजी, हिंदू धर्मातून बाहेर गेलेल्यांना पुनश्च हिंदू धर्मात घेण्यासंबंधी जी चळवळ चाललेली आहे त्यासंबंधी आपल्याशी बोलावे अशी इच्छा आहे. धर्मांतरितांना अशा प्रकारे हिंदुधर्मात परत घ्यावे असे आपले मत आहे काय ?’’
Wednesday, December 24, 2014
विमर्श - चीनशी वागायचं कसं?
| ज्ञानप्रबोधिनीच्या उपासना मंदिरात ब्रिगेडियर महाजन यांच्या व्याख्यानाला उपस्थित श्रोते. |
चीनच्या शत्रू राष्ट्रांशी मैत्री करून मुकाबला शक्य
ब्रिगेडअर व संरक्षण तज्ज्ञ हेमंत महाजन
| डावीकडून दुर्गाप्रसाद मिणीयार, हेमंत महाजन, बसवराज देशमुख आणि सिद्धाराम पाटील |
Tuesday, November 18, 2014
द्रष्टा - ज्याने दगडात ओतले प्राण
| एकनाथजी रानडे |
सर्व स्तरातून प्रचंड विरोध होऊनही स्वामी विवेकानंदांचे स्मारक उभारणीत संपूर्ण देशाचे सहकार्य मिळवणारी व्यक्ती होती माननीय एकनाथ रानडे. १९ नोव्हेंबर २०१४ पासून माननीय एकनाथजी रानडे जन्मशती वर्षाला सुरुवात होत आहे, त्यानिमित्ताने…
| स्वामी विवेकानंदांचे स्मारक |
भारताच्या दक्षिण टोकाला कन्याकुमारी येथे समुद्रातील श्रीपाद शिलेवर उभे असलेले स्वामी विवेकानंदांचे भव्य स्मारक आता सार्या देशाला माहीत झाले आहे. तीन सागरांच्या संगमस्थळी असलेल्या या स्मारकाला
दरमहा दीड लाखाहून अधिक लोक भेट देतात. सर्व स्तरातून प्रचंड
विरोध होऊनही या स्मारकाच्या उभारणीत संपूर्ण देशाचे सहकार्य मिळवणारी व्यक्ती होती
माननीय एकनाथ रानडे. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे उद्घाटन नवी
दिल्ली येथे नुकतेच, ९ नोव्हेंबर २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
Subscribe to:
Posts (Atom)
.
.
siddharam patil photo
लेखांची वर्गवारी
- bjp (8)
- congress (16)
- g b syndrome (1)
- INBOX (1)
- research (1)
- rss (2)
- shivaji (3)
- tarun bharat (2)
- अग्रलेख (2)
- अतिरेकी हल्ले (3)
- अध्यात्म (16)
- अनुभव (1)
- अन्य (3)
- आंबेडकर (14)
- आर्मी (4)
- इतिहास (23)
- इस्लाम (25)
- एस. गुरुमूर्ती (3)
- ओळख (1)
- कसाब (3)
- कार्यक्रम (1)
- केन्द्र (3)
- खळबळजनक (1)
- ख्रिस्ती (15)
- गीत (3)
- चाणक्य नीती (7)
- चीन (1)
- छायाचित्र (1)
- जटायु (2)
- जटायु अक्षरसेवा (1)
- जीबीएस (4)
- जीवन मंत्र (2)
- डॉ. भूषण कुमार उपाध्याय (2)
- दहशतवाद (7)
- नक्षलवाद (4)
- निमंत्रण (1)
- न्यूज़ (6)
- पत्रकारिता (6)
- परिचय (9)
- पाक (2)
- पाकिस्तान (6)
- पुस्तक परिचय (7)
- पूर्वांचल (2)
- पोलिस (2)
- बातमी (9)
- बातम्या (1)
- बुद्ध (6)
- भारत (2)
- मा. गो. वैद्य (2)
- माझ्याविषयी थोडे... (18)
- मीडिया (11)
- मुकुल कानिटकर (6)
- मुलाखत (4)
- मुस्लिम जगत (9)
- मोदी (7)
- योग (5)
- राजकारण (21)
- विमर्श (6)
- विवेक विचार (15)
- विवेकानंद साहित्य संमेलन (1)
- वैचारिक (50)
- वैद्यक (5)
- शिव धर्म (2)
- सडेतोड सागर (2)
- सर्वस्पर्शी बाबासाहेब (3)
- संस्कृति (21)
- संस्कृती (5)
- सामाजिक (7)
- सावरकर (2)
- साहित्य (6)
- सिद्धरामचे लेख (11)
- सुविचार (1)
- सूर्यनमस्कार (4)
- सोलापुर (7)
- सोलापुर दंगल (2)
- सोलापुर बातमी (7)
- स्वामी विवेकानंद (1)
- स्वामी विवेकानंदांचे विचार (31)
- हिंदू (5)