Friday, November 15, 2013
Tuesday, November 5, 2013
Monday, October 21, 2013
नरेंद्र कोहली होंगे विवेकानंद साहित्य संमेलन के अध्यक्ष
इस वृत्त को आपके विख्यात पत्रिका में यथोचित समय प्रकाशित करे यह प्रार्थना.
भवदीय,
सुनील कुलकर्णी
कार्यालय प्रमुख, विवेकानंद साहित्य संमेलन,
सोलापूर. संपर्क : 09371934407*******
नरेंद्र कोहली होंगे विवेकानंद साहित्य संमेलन के अध्यक्ष
सोलापूर | प्रतिनिधीविख्यात हिंदी साहित्यकार श्री. नरेंद्र कोहली सोलापूर (महाराष्ट्र) में होनेवाले ‘विवेकानंद साहित्य संमेलन’ के अध्यक्ष के नाते मनोनित किए गये है. ९ और १० नवंबर २०१३ इन दो दिनों में होनेवाला यह साहित्य संमेलन स्वामीजी के १५० वे जयंती वर्ष के अनुलक्ष्य में आयोजित किया जा रहा है. इस तरह का यह शायद पहला ही साहित्य संमेलन होगा. संमेलन के निमंत्रक, दै. लोकसत्ता के पूर्व संपादक सुधीर जोगलेकर, संयोजक अरुण करमरकर तथा स्वागत समिती के सचिव प्रशांत बडवे ने यह जानकारी दी.
महाराष्ट्र के सभी विभागों से तथा देश के प्रमुख शहरों से लगभग दो हजार प्रतिनिधी इस संमेलन में सहभागी होंगे. संत साहित्य के ज्येष्ठ अभ्यासक तथा समीक्षक डॉ. सदानंद मोरे (पुणे विश्वविद्यालय), राष्ट्रीय विचारों के प्रख्यात विचारक श्री. तरुण विजय, स्वामी बुद्धानंद, नाट्य एवं चित्रपट कलाकार राहुल सोलापूरकर आदि मान्यवर लेखक तथा विचारवंत इस संमेलन के विविध सत्रों मे मार्गदर्शन करेंगे.
सोलापूर के प्रख्यात उद्योजक तथा शिक्षाविद ए. जी. पाटील संमेलन के स्वागताध्यक्ष रहेंगे. इस संमेलन में प्रतिनिधी के नाते अधिकाधिक युवक युवतीयां सहभागी हो, ऐसा आवाहन संयोजन समिती की ओर से किया गया है. अधिक जानकारी के लिए vsammelan13@gmail.com इस ई मेल पते पर या ९४२२६४९२३९ इस दूरभाष पर संपर्क करें.
संमेलनाध्यक्ष नरेंद्र कोहलीजी का अल्प परिचय
एक ज्येष्ठ हिंदी साहित्यकार के नाते कोहलीजी साहित्य विश्व में पहचाने जाते है. स्वामी विवेकानंद के चरित्र पर आधारित ‘तोडो कारा तोडो’ यह ग्रंथमालिका, प्रभू रामचंद्र के संबंध में ‘अभ्युदय’, ‘न भूतो न भविष्यती’, ‘वासुदेव’ यह उनके द्वारा निर्मित साहित्य संपदा है. १९७० से लेकर २००६ तक — ७८ ग्रंथ लिखने का अनोखा विक्रमी कार्य आपने किया है. इसी कारण से १९७५ के बाद का कालावधी हिंदी साहित्य विश्व में ‘कोहली युग’ माना जाता है.
Saturday, October 12, 2013
New message from lokmat e-paper :
This message was sent to you by psiddharam@gmail.com
as a service of lokmat
Comments from sender :
9 oct news in Lokmat
--------------------
Full Story can be found at Lokmat epaper
संमेलनाध्यक्ष नरेंद्र कोहली संमेलनाध्यक्ष नरेंद्र कोहली सोलापूर : युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेक....
= = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = =For news updates throughout the day, visit http://epaper.lokmat.com/epapermain.aspx= = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = =
Saturday, October 5, 2013
जगातील सर्वात मोठे मंदिर बिहारमध्ये
पाटणा : जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर बिहारमध्ये उभारण्यात येत आहे. तब्बल ४0५ फूट उंच आणि २0 हजार लोक बसू शकतील एवढा मोठा सभा मंडप या मंदिराचे वैशिष्ट्य ठरावे.
पश्चिम चंपारण जिल्ह्यातील केसरीयानजीकच्या जानकीनगरमध्ये महावीर मंदिर ट्रस्टतर्फे हे विराट रामायण मंदिर उभारण्यात येत असून दुर्गापूजेनंतर या मंदिराच्या बांधकामास सुरुवात होईल, अशी माहिती ट्रस्टचे सचिव आचार्य किशोर कुणाल यांनी दिली.
बाराव्या शतकातील जगप्रसिद्ध अंग्कोर वॅट मंदिरापेक्षा याची उंची दुप्पट असेल. कंबोडियातील या मंदिराची उंची २१५ फूट आहे. पाटण्यापासून सुमारे १२५ किमी अंतरावरील याच संकुलात उंच कळस असलेली १८ मंदिरे असतील. तसेच यातील शिवमंदिरातील शिवलिंग हे जगातील सर्वात मोठे शिवलिंग असणार आहे.
एकूण १९0 एकर जमिनीवर उभारण्यात येणार्या या संकुलातील मुख्य मंदिरात राम, सीता, लव व कुश यांच्या मूर्ती असतील. तर याच्या गाभार्यासमोर विस्तीर्ण सभामंडप असेल. यासाठी सुमारे ५00 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा निधी देशभरातील भाविकांनी, विशेषत: सर्वसामान्यांनी दिलेल्या दानातून उभारण्यात येणार आहे.
- या भव्य मंदिराचे नाव आधी 'विराट अंग्कोर वॅट राम मंदिर' असे ठरविण्यात आले होते. पण कंबोडियातील काही लोकांनी त्यास आक्षेप घेतल्याने ते बदलून 'विराट रामायण मंदिर' असे करण्यात आले. हिंदू राजा सूर्यवर्मन राजवटीतील 'अंग्कोर वॅट' हे मंदिर सध्या युनेस्को जागतीक वारसा यादीत समाविष्ट आहे.
(वृत्तसंस्था) 03 oct 2013, Lokmat
http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=MainEdition-1-1-03-10-2013-177f3&ndate=2013-10-03&editionname=main
Monday, September 30, 2013
यशोगाथा अमेरिकेतील हिंदूंची ! - -'लोकमत'मधील लेख
हिंदू विदेशात जातात, तेव्हा ते तेथे आपली विजयपताका फडकवितात. असे असताना आपला भारत देश गरीब का राहिला आहे? हा मला पडणारा व सतावणारा प्रश्न आहे. माझ्या मते, 'सोशालिझम' व 'सेक्युलेरिझम' ही दोन दुखणी त्याला कारण आहेत. नेहरूप्रणीत 'सोशालिझम'ने 'लायसन्स- कोटा- राज'ला जन्म दिला आणि उद्योजक वर्गाचे आर्थिक स्वातंत्र्य हिरावून घेतले; आणि एकविसाव्या शतकात आपण हमखास यशस्वी होऊ, असे जगात कोठेही स्वत:च्या कृतीने ज्यांनी अद्याप दाखवून दिलेले नाही, अशा लोकसमूहांचे लाड करण्याचे व त्यांना खास वागणूक देण्याचे काम 'सेक्युलेरिझम'ने केले आहे. त्याचीच फळे संपूर्ण भारत देश आणि ते लाडावलेले लोकसमूहही भोगत आहेत आणि यापुढेही भोगणार आहेत. 'कोटा' व 'रिझर्वेशन' यांमुळे बहुसंख्याकांना त्यांच्या हक्काचे नाकारले जात आहे
>
> यशोगाथा अमेरिकेतील हिंदूंची
> (22-09-2013 : 00:07:51)
>
> - डॉ. दिलीप कारे
>
> 'प्यू' रिसर्च फोरम' नावाच्या एका अमेरिकी संशोधन गटाने त्या देशात वास्तव्य करणार्या विभिन्न धार्मिक लोकसमूहांचे सामाजिक, शैक्षणिक दृष्टिकोनांतून सर्वेक्षण केले आणि त्यांची अमेरिकी लोकांशी तुलना केली आहे. अमेरिकेतील हिंदू हा तेथील सर्वांत सधन व संपन्न लोकसमूह बनला असून, सर्वच क्षेत्रांत त्यांने उत्तम कामगिरी केल्याचे दिसून आले आहे.
>
> एका 'प्यू' रिसर्च फोरम' नावाच्या अमेरिकी संशोधन गटाने त्याचा अहवाल अगदी नुकताच प्रसिद्ध केला आहे. सर्वेक्षणासाठी घेतलेले सर्व लोकसमूह आशिया खंडातून अमेरिकेत स्थलांतर केलेले आहेत. त्यात हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, ज्यू आहेत, बौद्धधर्मीय आहेत. या सर्वेक्षण अहवालांतून या लोकसमूहांमधील साम्य व विरोध यांवर उत्तम प्रकाश पडतो आणि एकंदर अमेरिकी समाजात या समूहांचा सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक दर्जा काय आहे, त्यांचा प्रभाव कसा व किती आहे, याचा उलगडा होतो.
> सर्वेक्षणासाठी घेतलेल्या या लोकसमूहांमध्ये चीन, जपान, व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया, भारत, पाकिस्तान या देशांतून अमेरिकेत स्थलांतर केलेले लोक आहेत. यामधील सर्वांत मोठा लोकसमूह बौद्ध धर्मीयांचा आहे आणि तो प्रामुख्याने चीन, व्हिएतनाम, लाओस व कंबोडिया या देशांतून दडपशाही, छळ, अन्याय, अत्याचार यांमुळे निर्वासित झालेल्यांचा आहे. याशिवाय जपानमधीलपण बौद्धधर्मीय आहेत. ज्यू, मुस्लिम व हिंदूपण आहेत. यापैकी हिंदू अमेरिकेत गेले आहेत, ते छळ, अत्याचार यांतून सुटका करण्यासाठी नव्हे, तर आपले नशीब अजमावण्यासाठी, अधिक सुखी जीवन जगण्याची आकांक्षा बाळगून! हे सगळे हिंदू भारतातील आहेत. अमेरिकेची एकूण लोकसंख्या ३१ कोटी आहे आणि त्यात या स्थलांतरित हिंदूंचे प्रमाण 0.५ टक्के किंवा त्याहून थोडे अधिक आहे. याचा अर्थ अमेरिकेत वास्तव्य करणार्या हिंदूंची संख्या १ लाख ५५ हजारांच्या आसपास आहे.
> अमेरिकेतील सर्वसाधारण अमेरिकी नागरिकांच्या तुलनेत हे आशियाई स्थलांतरितांचे लोकसमूह शिक्षणाच्या क्षेत्रात अधिक यशस्वी झालेले आहेत, असे या सर्वेक्षण अहवालावरून लक्षात येते. त्यांची सरासरी मिळकतसुद्धा इतर अमेरिकी लोकांच्या मानाने बरीच अधिक आहे. त्यातही विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे शिक्षण व मिळकत या दोन बाबतींत हिंदूंनी ज्यूंसकट इतर सर्व स्थलांतरितांच्या लोकसमूहांना फार मोठय़ा फरकाने मागे टाकले आहे. याआधी हा मान ज्यू लोकसमूहाला होता. सर्वेक्षणात स्थलांतरित लोकसमूहांचा मतदानाचा कल, त्यांचा शैक्षणिक दर्जा, त्यांचे मिळकतीचे प्रमाण, विविध वयोगट, त्यांची धर्माबाबतची भूमिका, त्यांच्यातील आंतरधर्मीय विवाहाचे प्रमाण यांसारख्या अनेक बाबी विचारात घेण्यात आलेल्या असल्या, तरी त्यांचा शैक्षणिक दर्जा व मिळकतीचे प्रमाण या फक्त दोन बाबी विचारांत घेतल्या, तर अनेक गोष्टींचा उलगडा होतो. अहवालानुसार अमेरिकेतील हिंदूंमध्ये ५७ टक्के पदव्युत्तर शिक्षण घेतलेले व ८५ टक्के पदवीधर आहेत. त्याखालोखाल ज्यूंमध्ये हे प्रमाण ३४ टक्के व ६३ टक्के आहे. उरलेल्यांपैकी बौद्ध धर्मीयांमध्ये १७ टक्के व ३४ टक्के आहे. अमेरिकेतील अमेरिकी लोक चौथ्या क्रमांकावर असून, त्यांच्यात फक्त १२ टक्के पदव्युत्तर शिक्षण घेतलेले, तर २८ टक्के पदवीधारक आहे. मुस्लिमांमध्ये ११ टक्के पदव्युत्तर शिक्षण घेतलेले व २३ टक्के पदवी प्राप्त केलेले आहेत.
> शिक्षणामधील या भरारीशिवाय अमेरिकेतील हिंदूंमध्ये आणखी एक विशेष गुण आहे, जो अमेरिकनांमध्ये व अन्य आशियाई लोकसमूहांमध्ये नाही. हिंदू जोखीम पत्करणारे आहेत. म्हणून ते स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यास एका पायावर तयार असतात. किंबहुना स्वतंत्र व्यवसाय ही अमेरिकेतील त्यांची पहिली पसंती असते. कमी शिक्षण घेतलेल्यांनी अमेरिकेतील मॉटेल उद्योग व 'कन्व्हिनियन्स स्टोअर' व्यवसाय काबीज केला आहे. आजच्या घडीला अमेरिकेतील ५0 टक्क्यांवर मॉटेल्स गुजराथी पटेल समाजाच्या मालकीची आहेत आणि ती 'पटेल मॉटेल्स' म्हणूनच ओळखली जातात. हिंदूंच्या मालकीच्या 'कन्व्हिनियन्स सेंटर्स'ची संख्या तर ६0 टक्क्यांच्या वर आहे. तांत्रिक व तंत्रवैज्ञानिक क्षेत्रातदेखील उद्योजकांनी अशीच दौड मारली आहे. हायटेक उद्योगांचे जगातील सर्वांत मोठे केंद्र मानल्या जाणार्या 'सिलिकॉन व्हॅली'मध्ये जे नवे उद्योग उभे राहतात, त्यापैकी ३३ टक्के उद्योगांच्या प्रमोटर्समध्ये किमान एक हिंदू असतो.
> अमेरिकेतील हिंदू जेथे नोकरी मिळण्याची खात्री आहे, अशाच क्षेत्रातील पदव्या संपादण्याची ते खबरदारी घेतात. अमेरिकेतील हायस्कूलमध्ये शिकणार्या प्रत्येक पाच हिंदू विद्यार्थ्यांमागे एक मेडिकल कॉलेजमध्ये जातो. उरलेले चार विशुद्ध विज्ञान, गणित किंवा इंजिनिअरिंग विषयात पदवी मिळवितात. त्यांना अमेरिकेत सर्वाधिक मागणी आहे.
> वरील सर्व बाबी एकत्रित विचारात घेतल्या, तर एक गोष्ट ठळकपणे लक्षात येते, की अमेरिकेतील हिंदू हा तेथील सर्वांत सधन व संपन्न लोकसमूह बनला आहे. विभिन्न धार्मिक लोकसमूहांमधील मिळकतीची आकडेवारी यावर उत्तम प्रकाश टाकते. अहवालाप्रमाणे हिंदूंमध्ये ४८ टक्के कुटुंबांची मिळकत एक लाख डॉलर्स व त्याहून अधिक आहे आणि ७0 टक्के कुटुंबांची मिळकत ७५ हजार डॉलर्स व त्याहून अधिक आहे. ज्यू कुटुंबांच्या बाबतीत हे प्रमाण ४0 टक्के व ५३ टक्के, बौद्धांमध्ये १४ टक्के व २७ टक्के आणि मुस्लिमांमध्ये १४ टक्के व २३ टक्के आहे. तर अमेरिकी कुटुंबांच्या बाबतीत फक्त १५ टक्के व २८ टक्के आहे. याचा अर्थ मिळकतीच्या बाबतीतपण हिंदू पहिल्या स्थानावर आहेत. हिंदूंना अमेरिकेत पक्षपाती वागणूक मिळत असूनही त्यांनी सर्व आघाड्यांवर हे असे असाधारण यश मिळविलेले आहे. अर्थात, अमेरिकेत हिंदूंकडे अभिमानाने व आदराने पाहिले जाते, हे पण लक्षात घेतले पाहिजे. मी अधूनमधून अमेरिकेला जातो, तेव्हा विमानतळावर किंवा शॉपिंग मॉलमध्ये अपरिचित भेटतात. मी भारतीय आहे असे सांगताच, मी एक तर वैज्ञानिक किंवा डॉक्टर असणार, असे त्यांना ठामपणे वाटते.
> हिंदू लोक विदेशात जातात, तेव्हा तेथील स्थानिक लोकांच्या मानाने अधिक शिकलेले, कायद्यांचे काटेकोर पालन करणारे व अधिक संपन्न असल्याचे जाणवते. हे फक्त अमेरिकेपुरतेच नाही. इंग्लंड, कॅनडा, सिंगापूर, हाँगकाँग व इतरत्र कोठेही जा, हिंदूंच्या बाबतीत हेच आढळून येते. हिंदू विदेशात जातात, तेव्हा ते तेथे आपली विजयपताका फडकवितात. असे असताना आपला भारत देश गरीब का राहिला आहे? हा मला पडणारा व सतावणारा प्रश्न आहे. माझ्या मते, 'सोशालिझम' व 'सेक्युलेरिझम' ही दोन दुखणी त्याला कारण आहेत. नेहरूप्रणीत 'सोशालिझम'ने 'लायसन्स- कोटा- राज'ला जन्म दिला आणि उद्योजक वर्गाचे आर्थिक स्वातंत्र्य हिरावून घेतले; आणि एकविसाव्या शतकात आपण हमखास यशस्वी होऊ, असे जगात कोठेही स्वत:च्या कृतीने ज्यांनी अद्याप दाखवून दिलेले नाही, अशा लोकसमूहांचे लाड करण्याचे व त्यांना खास वागणूक देण्याचे काम 'सेक्युलेरिझम'ने केले आहे. त्याचीच फळे संपूर्ण भारत देश आणि ते लाडावलेले लोकसमूहही भोगत आहेत आणि यापुढेही भोगणार आहेत. 'कोटा' व 'रिझर्वेशन' यांमुळे बहुसंख्याकांना त्यांच्या हक्काचे नाकारले जात आहे. मित्तल स्टील हा जगातील मोठा पोलाद उद्योग ज्यांनी इंग्लंडमध्ये उभा केला, त्यांचे याबाबतीत उत्तम उदाहरण म्हणून सांगता येईल. आज ते इंग्लंडमधील दुसर्या क्रमांकाचे सर्वांत श्रीमंत उद्योगपती आहेत आणि त्यांची संपत्ती ११ अब्ज अमेरिकी डॉलर्स एवढी आहे. 'लायसन- कोटा- राज'ला कंटाळून त्यांनी भारत सोडला होता. नव्हे, त्यांना सोडावा लागला होता. एकूण आलेख पाहिला तर अमेरिकास्थित हिंदूंची कामगिरी मात्र निश्चितच गौरवास्पद आहे व त्यांच्या गुणांचे दर्शन घडवणारीही...
>
> http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=ManthanEdition-52-1-21-09-2013-c7f71&ndate=2013-09-22&editionname=manthan
>
> --
>
>
>
>
Thursday, September 26, 2013
सोलापुरात होणार विवेकानंद साहित्य संमेलन
सोलापूर | युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या दीडशेव्या जयंती वर्षानिमित्त ९ आणि १० नोव्हेंबर २०१३ रोजी सोलापूरात विवेकानंद साहित्य संमेलन होणार आहे. स्वामी विवेकानंद यांच्या साहित्यावर होणारे हे भारतातील पहिलेच संमेलन आहे. हिंदी साहित्यातील प्रख्यात लेखक श्री. नरेंद्र कोहली (दिल्ली) यांची साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.
.
.
siddharam patil photo
लेखांची वर्गवारी
- bjp (8)
- congress (16)
- g b syndrome (1)
- INBOX (1)
- research (1)
- rss (2)
- shivaji (3)
- tarun bharat (2)
- अग्रलेख (2)
- अतिरेकी हल्ले (3)
- अध्यात्म (16)
- अनुभव (1)
- अन्य (3)
- आंबेडकर (14)
- आर्मी (4)
- इतिहास (23)
- इस्लाम (25)
- एस. गुरुमूर्ती (3)
- ओळख (1)
- कसाब (3)
- कार्यक्रम (1)
- केन्द्र (3)
- खळबळजनक (1)
- ख्रिस्ती (15)
- गीत (3)
- चाणक्य नीती (7)
- चीन (1)
- छायाचित्र (1)
- जटायु (2)
- जटायु अक्षरसेवा (1)
- जीबीएस (4)
- जीवन मंत्र (2)
- डॉ. भूषण कुमार उपाध्याय (2)
- दहशतवाद (7)
- नक्षलवाद (4)
- निमंत्रण (1)
- न्यूज़ (6)
- पत्रकारिता (6)
- परिचय (9)
- पाक (2)
- पाकिस्तान (6)
- पुस्तक परिचय (7)
- पूर्वांचल (2)
- पोलिस (2)
- बातमी (9)
- बातम्या (1)
- बुद्ध (6)
- भारत (2)
- मा. गो. वैद्य (2)
- माझ्याविषयी थोडे... (18)
- मीडिया (11)
- मुकुल कानिटकर (6)
- मुलाखत (4)
- मुस्लिम जगत (9)
- मोदी (7)
- योग (5)
- राजकारण (21)
- विमर्श (6)
- विवेक विचार (15)
- विवेकानंद साहित्य संमेलन (1)
- वैचारिक (50)
- वैद्यक (5)
- शिव धर्म (2)
- सडेतोड सागर (2)
- सर्वस्पर्शी बाबासाहेब (3)
- संस्कृति (21)
- संस्कृती (5)
- सामाजिक (7)
- सावरकर (2)
- साहित्य (6)
- सिद्धरामचे लेख (11)
- सुविचार (1)
- सूर्यनमस्कार (4)
- सोलापुर (7)
- सोलापुर दंगल (2)
- सोलापुर बातमी (7)
- स्वामी विवेकानंद (1)
- स्वामी विवेकानंदांचे विचार (31)
- हिंदू (5)



