Sunday, February 15, 2015

भाजपच्या पराभवाची पाच कारणे

ज्येष्ठ विचारवंत रमेश पतंगे यांचा दिव्य मराठीत प्रसिद्ध झालेला लेख...
दिल्ली प्रदेश निवडणुकात आम आदमी पार्टीने जबरदस्त बहुमताने जिंकल्या. एकूण 70 पैकी त्यांना 67 स्थानी यश मिळाले. या यशाला लॅन्ड्स्लाइड् म्हणजे भूमीपाताचे यश असे म्हणतात. निवडणुकीत ज्यांना यश मिळते ते आनंदी होतात,आणि ज्यांना अपयश मिळते ते दु:खी होतात. भाजपाचे नेते आणि समर्थक आज दु:खी आहेत. या निवडणुकीत आपला एवढा दारूण पराभव होईल असे स्वप्नात देखील वाटले नव्हते. 
2014 च्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीत भाजपाने सर्व जागा जिंकल्या. 61 विधानसभा मतदार संघात त्यांनी आघाडी घेतली होती. 2013 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाला 32 जागा मिळाल्या आणि आपला 28 जागा मिळाल्या होत्या. 2015 च्या निवडणुकीत भाजपाला फक्त 3 जागा मिळाल्या आणि आपला 67 जागा मिळाल्या. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 46% मते मिळाली होती आणि आता फक्त 32% मिळाली, 'आप' ला 54% मते मिळाली. 2013 च्या निवडणुकीत भाजपाला 33% मते मिळाली होती. भाजपाच्या मताच्या टक्केवारीत फक्त 1% ने फरक पडला आणि 32 ऐवजी 3 जागा झाल्या.

Monday, February 2, 2015

दाभोलकरी मत्सरातून विवेकानंद विचारांचे अपहरण

दाभोलकर कुलोत्पन्न दत्तप्रसाद यांची स्वामी विवेकानंद यांच्यावरची तीन दिवसांची व्याख्यानमाला सोलापुरात २४ ते २६ जानेवारी या काळात पार पडली. अतिशय तल्लख बुद्धीमत्तेच्या दत्तप्रसाद यांनी विवेकानंदांच्या नावावर स्वत:चे विकृत विचार पसरवण्याचा खटाटोप या व्याख्यानमालेतून केला. भंपक आणि खोटारडेपणा करून विवेकानंद विचारांत भेसळ करू पाहणार्‍या दाभोलकर यांना उघडे पाडणारा युवा पत्रकार सागर सुरवसे यांचा तरुण भारतच्या आसमंत पुरवणीमध्ये प्रकाशित लेख...

Saturday, January 3, 2015

धर्मांतरितांविषयी - स्वामी विवेकानंदांची मुलाखत

आमचे प्रतिनिधी लिहितात :
‘हिंदूत्वातूनबाहेर गेलेल्यांविषयी - धर्मांतरितांविषयी - स्वामी विवेकानंदांची मी मुलाखत घ्यावी, असे आमच्या संपादकांनी सुचविले होते. त्यांची व माझी भेट गंगेच्या विशाल पात्रावर तरंगणार्‍या एका निवासी नौकेत, उतरत्या सायंकाळी झाली. रामकृष्ण मठाच्या नजीकच्या तीरावर नौका स्थिरावली होती. तिथे स्वामीजींचे दर्शन झाले.ती वेळ आणि स्थळही मोठे सुरेख होते. माथ्यावर नक्षत्रे चमकू लागली होती. भोवती गंगेचा प्रवाह उसळत होता. एका बाजूला नारळीच्या झाडांनी आणि गर्द सावली धरणार्‍या इतर वृक्षांनी वेढलेल्या मठाची वास्तू दिसत होती. ती शांत प्रकाशाने उजळलेली होती.
‘‘स्वामीजी, हिंदू धर्मातून बाहेर गेलेल्यांना पुनश्च हिंदू धर्मात घेण्यासंबंधी जी चळवळ चाललेली आहे त्यासंबंधी आपल्याशी बोलावे अशी इच्छा आहे. धर्मांतरितांना अशा प्रकारे हिंदुधर्मात परत घ्यावे असे आपले मत आहे काय ?’’

Wednesday, December 24, 2014

विमर्श - चीनशी वागायचं कसं?

ज्ञानप्रबोधिनीच्या उपासना मंदिरात ब्रिगेडियर महाजन यांच्या व्याख्यानाला उपस्थित श्रोते.

चीनच्या शत्रू राष्ट्रांशी मैत्री करून मुकाबला शक्य

ब्रिगेडअर व संरक्षण तज्ज्ञ हेमंत महाजन

डावीकडून दुर्गाप्रसाद मिणीयार, हेमंत महाजन, बसवराज देशमुख आणि सिद्धाराम पाटील
प्रतिनिधी । जपान आणि इतर अनेक शेजारी देशांबरोबर चीनचे वादाचे संबंध आहेत. शत्रूचा शत्रू मित्र या नात्याने त्या देशांबरोबर आपली मैत्री वाढवत चिनी ड्रॅगनशी मुकाबला करणे शक्य आहे. केंद्रातील नवे सरकार मोदींच्या नेतृत्त्वाखाली या दिशेने पावले टाकत असल्याचे प्रतिपादन निवृत्त ब्रिगेडअर व संरक्षण तज्ज्ञ हेमंत महाजन यांनी केले.

Tuesday, November 18, 2014

द्रष्टा - ज्याने दगडात ओतले प्राण

एकनाथजी रानडे

सर्व स्तरातून प्रचंड विरोध होऊनही स्वामी विवेकानंदांचे स्मारक उभारणीत संपूर्ण देशाचे सहकार्य मिळवणारी व्यक्ती होती माननीय एकनाथ रानडे. १९ नोव्हेंबर २०१४ पासून माननीय एकनाथजी रानडे जन्मशती वर्षाला सुरुवात होत आहे, त्यानिमित्ताने…
स्वामी विवेकानंदांचे स्मारक



भारताच्या दक्षिण टोकाला कन्याकुमारी येथे समुद्रातील श्रीपाद शिलेवर उभे असलेले स्वामी विवेकानंदांचे भव्य स्मारक आता सार्‍या देशाला माहीत झाले आहे. तीन सागरांच्या संगमस्थळी असलेल्या या स्मारकाला दरमहा दीड लाखाहून अधिक लोक भेट देतात. सर्व स्तरातून प्रचंड विरोध होऊनही या स्मारकाच्या उभारणीत संपूर्ण देशाचे सहकार्य मिळवणारी व्यक्ती होती माननीय एकनाथ रानडे. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे उद्घाटन नवी दिल्ली येथे नुकतेच, ९ नोव्हेंबर २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.

Tuesday, September 23, 2014

पाकिस्तानी जिहादी बनलाय भारतीय राज्यसभेचा खासदार

📎पाकिस्तानातून अहमद हसन उर्फ इम्रान नावाचा माणूस भारतात येतो. ISI साठी काम करतो. सिमी या जिहादी अतिरेकी संघटनेचा पश्चिम बंगाल राज्याचा प्रमुख म्हणून अनेक वर्षे काम करतो.

📎यावर कळस म्हणजे ममता बैनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसतर्फे खासदार म्हणून त्याला राज्यसभेत पाठवले जाते. मग सगळा भांडाफोड होतो.

📎 लोकसभा निवडणूक प्रचारात ममता यांनी नरेंद्र मोदींना आव्हान दिले होते की, बांगलादेशी मुस्लिमांना हात तर लावून दाखवा.

📎पाकिस्तानातील भारतीय दूतावासातील एक वरिष्ठ महिला अधिकारी इस्लाम कबूल करून पाकिस्तानसाठी हेर म्हणून काम करत होती. आता पाकिस्तानी नागरिक असलेल्या जिहादी माणसाला खासदार बनवून थेट संसदेत पाठवणाय्रा ममता बैनर्जीबद्दल संशय बळावला आहे. ममता बैनर्जी या जिहादींसाठी काम करताहेत की काय?

📎 साधूवेषातील "रावणा"ला ओळखणे कठीण असते. भारतातील अनेक "सेक्युलर" बुद्धीजीवी, पत्रकार आणि राजकारणी देशविरोधी शक्तींसाठी काम करतात, हे मध्यंतरी उघड झाले होते. भारतातील उदारमतवादी वातावरणाचा गैरफायदा घेतात, हे अनेकदा पुढे आले आहे. कायद्यातील पळवाटा व सबळ पुराव्याअभावी या मंडळींचे फावते.

📎बांगलादेशी घुसखोरांचे समर्थन आणि आताच्या नव्या गौप्यस्फोटामुळे ममता यांच्यावरील संशय गडद झाला आहे. ममता यांची चौकशी झाली पाहिजे.

📎संदर्भ - The New Indian Express - http://www.newindianexpress.com/nation/Mystery-Surrounds-Pakistan-Citizens-TMC-MP-Post/2014/09/22/article2442700.ece

#नोंदी सिद्धारामच्या
www.psiddharam.com

Saturday, August 30, 2014

जपान, मोदी, अबे सिंझो आणि विवेकानंद

पंतप्रधान नरेंद्र मोदी जपान दौय्रावर जात आहेत. त्यावरून एक आठवण २२ ऑगस्ट २००७ ची.
त्या दिवशी जपानचे  पंतप्रधान एबे सिंझो यांनी भारताच्या संसदेसमोर भाषण केले होते.
भाषणाची सुरुवात त्यांनी विवेकानंदांचा संदर्भ देऊन केली.

Friday, August 29, 2014

देशोदेशींचा गणपती

Displaying indonesia2000yrs.jpg
२००० वर्षापूर्वीची इंडोनेशिया येथील मूर्ती
शेकडो वैशिष्ट्यपूर्ण रूपं असलेला गणपती हिंदू धर्मातील पंथोपपंथांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. गणपती हा लहान मुलांचा लाडका आणि आवडता देव आहे. तामिळनाडूत गणपतीला पिल्लयार अर्थात मुलांचा देव म्हणतात. दशदिशांत आनंदाची उधळण करणारा गणपती देवांचा सेनापती, दीनदुबळ्यांचा सांगती, साहित्याचा ज्ञाता, केलेचा उद्गाता, भक्तांचा रक्षणकर्ता आहे. रणांगणापासून रणभूमीपर्यंत अग्रस्थानी राहणारा तो नेता आहे. म्हणूनच हिंदू धर्माच्या मुख्य शाखा असणाऱ्या शैव, वैष्णव, जैन, बौद्ध आदी विविध पंथांमध्ये गणपती पूजला जातो.

Thursday, August 21, 2014

विवेक विचार'तर्फे मुजफ्फर हुसेन यांचे आज व्याख्यान

सोलापूर. विवेकानंदकेंद्राचे सांस्कृतिक मासिक विवेक विचारतर्फे शुक्रवार (दि. २२ ऑगस्ट) रोजी सायंकाळी वाजता पद्मश्री मुजफ्फर हुसेन यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

Thursday, August 14, 2014

गुढीपाडवा आणि वैज्ञानिक कालगणना

जगातील सर्वाधिक विज्ञाननिष्ठ कालगणनेचे नवीन वर्ष म्हणजेच गुढीपाडवा. वर्षप्रतिपदा, नवसंवत्सर, संवत्सरी या नावांनीही हे भारतीय नवीन वर्ष साजरे करण्यात येते. युगाचा आदी अर्थात युगाचा प्रारंभ दिवस म्हणूनही युगादी किंवा उगादी म्हटले जाते. याच दिवशी ब्रह्मदेवाने या सृष्टीची निर्मिती केली. सृजनाला सुरुवात झाली अन् वेळेलाही प्रारंभ झाला. मुकुल कानिटकर, नागपूर यांचा स्वैर अनुवादित लेख 

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी