Tuesday, June 11, 2013

हिंदुत्व को बडा धोका=आम आदमी पा पार्टी

आम आदमी पक्षच मोदींना रोखेल!
 
म . टा . प्रतिनिधी , औरंगाबाद

येत्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना रोखण्याची ताकद फक्त आम आदमी पक्षात असून , मुस्लिमांना हाच एकमेव पर्याय उपलब्धअसल्याचा दावा पक्षाच्या मुस्लिम नागरिक संवाद सभेत करण्यात आला .

आम आदमी पक्षाच्या वतीने सलीम अली सरोवराजवळीत मौलाना आझाद संशोधन केंद्रात रविवारी मुस्लिम नागरिक संवाद सभाघेण्यात आली . या सभेत पक्षाचे जिल्हा समन्वयक बाळासाहेब सराटे , जिल्हा प्रवक्ते हरमितसिंघ संघा , निमंत्रक निसार अहमद खान ,सय्यद अमजद , ऐतहेशाम अली , झाकीर अली यांनी मते व्यक्त केली . ' भाजपने नरेंद्र मोदींना निवडणूक प्रचार समिती प्रमुखपदीघोषित केले आहे . त्यांची पंतप्रधानपदाकडे वाटचाल सुरू असून , त्यांना रोखण्याची ताकद काँग्रेसमध्ये नाही . समाजवादी पक्ष उत्तरप्रदेशात अडकून पडला असून , इतर स्थानिक पक्षांकडून मोदींना रोखण्याची अपेक्षा करणे हास्यास्पद आहे . काँग्रेस पक्ष गलितगात्रझाल्यामुळे मुस्लिमांसमोर आम आदमी पार्टी हाच एक पर्याय आहे ,' असे जिल्हा समन्वयक सराटे म्हणाले . मुस्लिमांच्या विकासासाठीसच्चर आयोग , रंगनाथ मिश्रा आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी , अशी पक्षाची भूमिका आहे . मुस्लिमांच्या विकासासाठी विशेष स्वतंत्र धोरण राबवण्यासाठी पक्ष कटीबद्ध आहे .देशातील राजकीय परिवर्तनाच्या या लढाईत मुस्लिमांनी सामील व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले .

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी