भुवन मण्डले नवयुगमुदयतु सदा विवेकानन्दमयम् |
सुविवेकमयं स्वानन्दमयम् ॥
भुवनमण्डलामध्ये अर्थात विश्वामध्ये नवीन युगाचा उदय होऊ दे. हे नवीन युग सदैव विवेकानंदांच्या विचारांनी युक्त असू दे म्हणजेच सुविवेक आणि स्वानंद यांनी परिपूर्ण असू दे.
वह्निवायुजल बल विवर्धकं पांचभौतिकं विज्ञानम् |
सलिलनिधितलं गगनमण्डलं करतलफलमिव कुर्वाणम् |
दीक्षुविकीर्ण मनुजकुलमिदं घटयतुचैक कुटुम्बमयम्॥
अग्नी, वायू, जल आणि बल यांची वृध्दी करणारे पंचभौतिक विज्ञान जिथे आहे, जिथे समुद्रतळ आणि आकाश हे हातात ठेवलेल्या फळासमान सुगम आहे, जिथे सर्व दिशांमध्ये व्यापलेला मानव समुदाय एका कुटुंबात गठित (सामावलेला) आहे, अशा नवयुगाचा उदय होऊ दे, जे सदैव विवेकानंदांच्या विचारांनी युक्त असेल, जे सुविवेक आणि स्वानंद यांनी परिपूर्ण असेल.
सगुणाकारं ह्यगुणाकारं एकाकारमनेकाकारम् |
भजन्ति एते भजन्तु देवं स्वस्वनिष्ठया विमत्सरम् |
विश्वधर्ममिममुदारभावं प्रवर्धयतु सौहार्दमयम्॥
जिथे सुगुणाकार वा निर्गुणाकार, एकाकार वा अनेकाकार ईश्वराची आपापल्या निष्ठेनुसार ईर्ष्यारहित होऊन उपासना केली जाते अशा नवयुगाचा उदय होऊ दे, जे सदैव विवेकानंदांच्या विचारांनी युक्त असेल, जे सुविवेक आणि स्वानंद यांनी परिपूर्ण असेल.
जीवे जीवे शिवस्वरुपं सदा भावयतु सेवायाम् |
श्रीमदूर्जितं महामानवं समर्चयतु निजपूजायाम् |
चरतु मानवोऽयं सुहितकरं धर्म सेवात्यागमयम्॥जिथे प्रत्येक जिवाची शिवस्वरुप मानून सेवा करण्यात येते, मनुष्यातील ईश्वरत्वाच्या प्रकटीकरणासाठी पूजा केली जाते, ज्या युगात मनुष्याचे आचरण समष्टिहितासाठी त्याग, सेवा आणि धर्म यांनी युक्त असेल. अशा नवयुगाचा उदय होऊ दे, जे सदैव विवेकानंदांच्या विचारांनी असेल, जे सुविवेक आणि स्वानंद यांनी परिपूर्ण असेल.
तमोमयं जन जीवनमधुना निष्क्रियतालऽऽस्य ग्रस्तम् |
रजोमयमिदं किंवा बहुधा क्रोध लोभमोहाभिहतम् |
भक्तिज्ञानकर्मविज्ञानै: भवतु सात्विकोद्योतमयम् ॥
आजचे मानवी जीवन हे एकतर तमसपूर्ण निष्क्रिय आणि आळस याने भरुन राहिले आहे किंवा रजोगुणाच्या प्राबल्यामुळे क्रोध, लोभ आणि मोह यामुळे दु:खी झालेले आहे. भक्ती, ज्ञान, कर्म आणि विज्ञान याद्वारा मानवी जीवन सात्विक प्रकाश देणारे बनू दे. अशा नवयुगाचा उदय होऊ दे, सदैव विवेकानंदांच्या विचारांनी युक्त असेल, जे सुविवेक आणि स्वानंद यांनी परिपूर्ण असेल.

No comments:
Post a Comment