Friday, September 30, 2011
मध्य प्रदेशात सापडले मंदिरांचं 'बेट'!
मध्य प्रदेशात खजुराहोपेक्षाही ३00 वर्षं जुन्या मंदिरांचं उत्खनन सध्या सुरू आहे.. खजुराहोची मंदिरं हे मध्य प्रदेशातील जगप्रसिद्धपर्यटनस्थळ.. कामशास्त्रावर आधारित शिल्पांमुळे खजुराहोच्या पुरातन मंदिरांना वेगळं वलय प्राप्त झाले आहे. मात्र या मंदिरांपेक्षा तब्बल ३00 वर्षं आधीची, अतिप्राचीन मंदिरं मध्यप्रदेशातल्या मोरेना जिल्ह्यात चंबळ नदीच्या खोर्यात सापडली आहेत. 'बटेश्वर मंदिर' या नावानं ओळखल्या जाणार्या या १0 हेक्टर क्षेत्रफळाच्या वास्तूत तब्बल २00 लहान-मोठी मंदिरं आहेत. यातील बहुतांशमंदिरं शंकर किंवा विष्णुची आहेत. भारतीय पुरातत्व विभागाच्या दिल्ली सर्कलचे अधीक्षक के.के. मोहम्मद यांनी या मंदिरांची सविस्तर माहिती जाहीर केली आहे. सर्वप्रथम १९९४ साली या मंदिराचे अवशेषमिळाले होते. त्यानंतर २00५ साली पुरातत्व खात्यानं या क्षेत्रात उत्खनन सुरू केल्यानंतर बटेश्वर मंदिराची ही अतिभव्य जागा जगासमोर आली. आणखी किमान १0 वर्षं हे उत्खननाचं काम चालेल, इतकी ही वास्तू भव्य आहे. 'आर्यावर्ताचे महाराजाधिराज' अशी उपाधी धारण करणार्या गुर्जर प्रतिहार राज्यकर्त्यांनी ही मंदिरं उभारली आहेत. इसवी सनाच्या ६ ते ११व्या शतकात गुर्जर प्रतिहार घराण्याची उत्तर भारतातल्या बर्याच भागात सत्ता होती.
■ मोहम्मद यांनी या निमित्तानं एक महत्त्वाचा विषय छेडला आहे.. देशात अशा अनेक पुरातन वास्तू असून त्यांचं योग्य संवर्धन व्हायला हवं असेल, तर हा विषय शालेय अभ्यासक्रमात घेतला जायला हवा, असं मत त्यांनी मांडलं आहे.
( दैनिक लोकमत, पान ६, ३० सप्टे. २०११)

Thursday, September 29, 2011
गुजरातमध्ये गोहत्येला सात वर्षांची सजा
अहमदाबाद, दि. २८ (वृत्तसंस्था) - गोमातेची हत्या करणे किंवा गायी खाटकाकडे घेऊन जाणे याविरुद्ध गुजरात सरकारने कडक कायदा केला असून, आरोपींना सात वर्षांची शिक्षा ठोठावणारे विधेयक नुकतेच विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. 'गुजरात प्राणीसंवर्धन कायदा १९५४' या कायद्यामध्ये सुधारणा करणारे विधेयक कृषिमंत्री दिलीप संघानी यांनी मांडले. याला भाजपबरोबर कॉंग्रेसच्या आमदारांनीही समर्थन दिल्याने हे विधेयक मंजूर झाले. यानुसार गोहत्येसाठी सात वर्षांचा तुरुंगवास, ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठाविण्यात येणार आहे. हत्येसाठी गायींची वाहतूक हाही गंभीर गुन्हा ठरणार आहे.
( दै. सामना, २९ सप्टे. २०११)
( दै. सामना, २९ सप्टे. २०११)
Tuesday, September 27, 2011
नक्षलवाद : कोट्यवधींचा ऍक्शन प्लॅन केवळ कागदावरच ( विशेष लेख )
राष्ट्रीय सुरक्षा या विषयावरील तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्तिमत्व म्हणून ब्रिगेडियर हेमंत महाजन हे महाराष्ट्राला परिचित आहेत. नक्षलवादाची गंभीर समस्या हे राष्ट्रीय सुरक्षेपुढील एक गंभीर आव्हान आहे. ब्रिगेडियर महाजन यांनी नक्षलवादाच्या समस्येचा सखोल अभ्यास केला आहे. नक्षलवादाचे विविध पैलू आणि तो नियंत्रणात आणण्याचा मार्ग सांगणाऱ्या लेखमालेचा हा दुसरा भाग खास दिव्य मराठीच्या वाचकांसाठी. या विषयावरील लेख आठवड्यातून एकदा प्रसिद्ध होतील...
Monday, September 26, 2011
स्पर्धा : प्रधानमंत्रिपदासाठी
मा. गो. वैद्य यांचे भाष्य
आमच्या गावाकडे एक मार्मिक म्हण आहे. ती शहरी भागातही असेलच. म्हण आहे : ''बाजारात तुरी अन् भट भटणीला मारी.'' एक दिवस एका भिक्षुकाला जरा बर्यापैकी दक्षिणा मिळाली. त्याने बाजारातून तुरी आणायचे ठरविले. त्याने पत्नीला विचारले, ''तुरीचे काय करशील?'' ती म्हणाली, ''त्याची डाळ करीन आणि छानपैकी वरण करीन.'' भटजी म्हणाला, ''नाही, तू त्याचे पुरण कर.'' पत्नी म्हणाली, ''नाही, वरणच करणार.'' पती म्हणाला, ''पुरणच कर.'' दोघांचा वाद मिटला नाही. शब्दाने शब्द वाढला आणि भटजीने, आपला नवरोजीपणा दाखवीत पत्नीला मारले. घरी तुरी आल्याच नाहीत, तरी त्यावरून वाद आणि वर पत्नीला मारणे, हा प्रकार पाहून म्हण पडली, ''बाजारात तुरी अन् भट भटणीला मारी.''
Sunday, September 25, 2011
अण्णा अंधभक्तीला चालना देताहेत का ?
'मी' पणाचा आजार अर्थात व्यक्तिपूजा हा खतरनाक रोग आहे. ही कॉंग्रेस संस्कृती आहे. व्याक्तीपुजेनेच गांधी बाबांना महात्मा बनविले होते आणि त्यांच्या हट्टापायी देशाची फाळणी. नेहरूंना देशावर थोपविण्यात आले होते. व्याक्तीपुजेचा हा आजार नसता तर अण्णा कदाचित तुम्हाला सरदारजींच्या राज्यात आंदोलन करावे लागले नसते.
Saturday, September 24, 2011
Thursday, September 22, 2011
क्या मुसलमान जाति नहीं मानते ????
हाँ तो साथियों..... हमारे कुछ तथाकथित बुद्धिजीवियों और सेक्युलर लोगो का कहना है कि... हिन्दू धर्म में जातिवाद है और यहाँ दलित भाइयों को प्रताड़ित किया जाता है .... सो.., उन्हें हिन्दू धर्म छोड़ के मुसलमान बन जाना चाहिए....क्योंकि मुसलमान जाति नहीं मानते हैं ........
तो पेश-ए -खिदमत है ..... नमूना -ए-खास.....
आप दलित भाइयों से अनुरोध है कि इसे पढ़ें.., समझें और उन तथाकथित बुद्धिजीवियों से पूछे कि वे आपको क्यों झूठ -सच बता के बरगला रहे हैं....... इसमें उनका क्या हित है....????

Monday, September 19, 2011
नक्षलवादाची विषवेल आणि तिचा देशातील विस्तार
राष्ट्रीय सुरक्षा या विषयावरील तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्तिमत्व म्हणून ब्रिगेडियर हेमंत महाजन हे महाराष्ट्राला परिचित आहेत. नक्षलवादाची गंभीर समस्या हे राष्ट्रीय सुरक्षेपुढील एक गंभीर आव्हान आहे. ब्रिगेडियर महाजन यांनी नक्षलवादाच्या समस्येचा सखोल अभ्यास केला आहे. नक्षलवादाचे विविध पैलू आणि तो नियंत्रणात आणण्याचा मार्ग सांगणारी लेखमाला खास दिव्य मराठीच्या वाचकांसाठी सुरु करीत आहोत. या विषयावरील लेख आठवड्यातून एकदा प्रसिद्ध होतील...
२०१० साली देशभर १ हजार ५११ नक्षलवादी हल्ले झाले. त्यात ४९० निरपराध नागरिक, २३१ पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि १९९ नक्षलवादी ठार झाले; परंतु एकाही नक्षलवाद्याचा मृतदेह सापडला नाही. ३३ राज्यांपैकी २० राज्ये नक्षलग्रस्त आहेत. ६०४ पैकी २३२ जिल्हे, १२४७६ पैकी १६११ पोलीस ठाण्यांची हद्द, ६५०००० पैकी १४,००० गावांना नक्षलवादाने घेरलेले आहे.

Sunday, September 18, 2011
Saturday, September 17, 2011
Friday, September 16, 2011
चाणक्य नीती : तुम्हीही बनू शकता महान...
प्रत्येक माणसाला वाटतं की तो गल्लीत, समाजात आणि देशात प्रसिद्ध व्हावा. प्रत्येक ठिकाणी मान सन्मान मिळावा. सर्वजण आदराने पाहावे. एखाद्या व्यक्तिचा जन्म मोठ्या कुटुंबात, संपन्न परिवारात झाले असेल तर त्या व्यक्तिला या सा-या गोष्टी विनाप्रयास मिळून जातात. समाजात ख्याती कशी प्राप्त करावी ? महान कसे बनावे ? आपल्याला मान सन्मान कसा मिळेल याविषयी आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे. पूर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
http://divyamarathi.bhaskar.com/article/REL-management-tips-of-acharya-chanakya-2435428.html
http://divyamarathi.bhaskar.com/article/REL-management-tips-of-acharya-chanakya-2435428.html
Thursday, September 15, 2011
जम्मू-काश्मीर आणि कपटी राजकारण
देव वारंवार आपल्यापुढे संकटं आणि अडचणी उभ्या करीत असेल, तर आपण देवाचे आभारच व्यक्त करायला हवेत. कारण, अशाच संकटांच्या वेळी शत्रू आणि मित्राची खरी ओळख पटते. संकटग्रस्त व्यक्ती आणि समाजाच्या धमण्यांमध्ये वाहणारे रक्त लाल आहे की पांढरे, याचा खुलासासुद्धा अशाच वेळी होतो आणि ते त्यांच्या कटिबद्धतेशी किती प्रामाणिक आहे, हेदेखील कळून चुकते. उपदेश करणारे आणि देवदूतांचे खरे रूप आम्ही पाहिले आणि अनुभवलेसुद्धा आहे. पंडित नेहरू आणि शेख अब्दुल्ला हे असेच दोन देवदूत होते. या दोघांमुळे काश्मीरमध्ये केवळ फुटीर विचारांचे पोषण झाले नाही, तर १९४७ मध्ये तुष्टीकरणाच्या धोरणामुळे जे विषवृक्ष येथे लावले गेले त्यांची विषारी फळे अजूनही आपल्याला चाखावी लागत आहेत.
Wednesday, September 14, 2011
अमेरिका म्हणते, मोदींकडून शिका !
वॉशिंग्टन. सरकार कसे चाललावे हे नरेंद्र मोदींकडून शिकायला हवे, असा अहवाल अमेरिकेच्या संसदीय समितीने दिला आहे. गुजरात दंगल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा गौरव करणारी ही बातमी आली आहे. एके काळी अमेरिकेत येण्यास मज्जाव करणा-या अमेरिकेने नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे.
Tuesday, September 13, 2011
सर्व कार्येषु सर्वदा..
दैनिक लोकसत्तामध्ये प्रसिद्ध झालेला एक अग्रलेख खूप आवडला, तो येथे देत आहे.... तुम्हालाही आवडेल असे वाटते...
| |
समाजासाठी पैसा देण्याची वृत्ती श्रीमंतांमध्ये कमी का दिसते? हातातील चतकोर भाकर गरीब जितक्या सहजतेने पुढे करतो तसे श्रीमंत का करीत नाहीत? या प्रश्नांचा मानसशास्त्रातून शोध घेण्यास सुरुवात झाली ती एका श्रीमंताच्या साध्या सूचनेमुळे आणि या सूचनेवर होणाऱ्या टीकेमुळे. 'श्रीमंतांचे कौतुक करणे थांबवा. आमच्यावर अधिक कर बसवा. समाजाच्या आर्थिक समृद्धीसाठी हे आवश्यक आहे', अशी मागणी सरकारकडे केली ती श्रीमंतीत तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या वॉरेन बफे यांनी. |
'कसं जीवन जगायचं'?
हिंदू धर्मग्रंथ महाभारतात जीवनाकडे कसे पहावे याविषयी अतिशय महत्त्वाचे सूत्र सांगण्यात आले आहे. या सूत्रानुसार जीवनात 5 प्रकारचे लोक भेटत असतात, हे ध्यानात घेऊन माणसाने परिस्थिती हाताळत जीवन जगावे. महाभारतात म्हटले आहे... पूर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा ... हे 5 प्रकारचे लोक आपल्याला शिकवतात 'कसं जीवन जगायचं'?
Monday, September 12, 2011
बहुसंख्यांकांना आधीच गुन्हेगार ठरवणारा कायदा
सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय सल्लागार समितीने या विधेयकाचा मसुदा तयार केला आहे. हे विधेयक लिहिले आहे तीस्ता सेटलवाड, नजमी वझिरी यांनी. सल्लागार समितीचे सदस्य आहेत फराह नकवी, कमल फारुकी, जॉन दयाल, मौलाना नियाज फारुकी. या व्यतिरिक्त हर्ष मंदेर, गोपाल सुब्रह्मण्यम असे लोक लिखाण समितीमध्ये, तर सल्लागार समितीमध्ये माजी न्यायमूर्ती सुरेश होस्पेट, अबुसालेह शरीफ, असगर अली इंजिनिअर, जॉन दयाल, राम पुनियानी, शबनम हाशमी, सिस्टर मारिया स्कारिया, सय्यद शहाबुद्दीन, रूपरेखा वर्मा, गगन सेठी आदी आहेत. (यातील तीस्ता सेटलवाडसारखी मंडळी दंगल प्रकरणी खोटे साक्षी पुरावे सादर केल्याप्रकरणी न्यायालयात दोषी ठरले आहेत हे विशेष.)
देशातील ९० जिल्हे आणि शेकडो गावे अशी आहेत की, जिथे हिंदू अल्पसंख्यांक आहेत; पण लोकसंख्या मापनाचे जे एकक आहे ते राज्यस्तराचे आहे. त्यामुळे प्रत्येक राज्यात हिंदू बहुसंख्यांकच ठरतात. हे कलम हिंदूंना आधीच गुन्हेगार ठरवून मोकळे होते.
पूर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
http://divyamarathi.bhaskar.com/article/DMS-bill-against-communal-and-targeted-violence-2424265.html?HT5=

दंगली वाढविणारे विधेयक ?
शनिवार दि. १० सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय एकात्मता परिषदेच्या बैठकित 'धार्मिक व लक्ष्यित हिंसा प्रतिबंधक विधेयक 2011'च्या प्रस्तावित मसुद्यावर चर्चा झाली. हे विधेयक 'जातीय दंगली कमी करण्याऐवजी वाढविणारे' आहे इथपासून ते 'राज्यांच्या अधिकारावर अतिक्रमण करणारे' आहे, असे मत तेथे बोललेल्या सर्वच मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. सत्ताधारी कॉंग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी मौन पाळले पण विधेयकाचे समर्थन केले नाही... असे या विधेयकात काय आहे ?
पूर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा ...... हे विधेयक - जातीय दंगली कमी करणारे की वाढविणारे ? ( विशेष )
पूर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा ...... हे विधेयक - जातीय दंगली कमी करणारे की वाढविणारे ? ( विशेष )
Saturday, September 10, 2011
सांप्रदायिक हिंसाविरोधी विधेयक 'घातक' असल्याचा मुख्यमंत्र्यांचा सूर
नवी दिल्ली. केंद्र सरकार आणू पाहत असलेल्या 'धार्मिक व लक्ष्यित हिंसा प्रतिबंधक विधेयक 2011'च्या प्रस्तावित मसुद्याला एनडीएतील घटक पक्षांसह सत्ताधारी संयुक्त पुरोगामी आघाडीचा घटक असलेल्या तृणमूल काँग्रेसनेही विरोध केला आहे. हा प्रस्तावित मसुदा अतिशय घातक, अल्पसंख्य आणि बहुसंख्य यांच्यात असलेली दरी आणखीणच रूंदावणारा आणि राज्यांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारा असल्याचं मत वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं आहे. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय सल्लागार समितीने या विधेयकाचा मसुदा तयार केला आहे.
पूर्ण बातमी वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
१. सांप्रदायिक हिंसाविरोधी विधेयक 'घातक' असल्याचा मुख्यमंत्र्यांचा सूर
२. http://psiddharam.blogspot.com/2011/07/blog-post_30.html
Friday, September 9, 2011
ज्यू - मुसलमान संघर्ष आणि बहिष्काराला मदत (?)
ज्यूंचा बहिष्कार
ज्यू आणि मुसलमान यांचा संघर्ष इतिहासकाळापासून सुरू आहे. १९४८ मध्ये इस्रायलची निर्मिती झाल्यापासून त्याला एक नवी धार आली आहे. इस्रायल जगाच्या नकाशातून मिटवून टाकण्यासाठी अनेक प्रयत्न प. आशियातील मुस्लिम राष्ट्रांनी एकजुटीने केले. पण ते सर्व फसले. पण वैर मात्र संपले नाही. काही दिवसांपूर्वी, इराणचे सर्वश्रेष्ठ धर्मगुरू अयातुल्ला अली खामेनी यांनी सर्व मुस्लिमांना आग्रहपूर्वक कळविले की, त्यांनी ज्यू (= यहुदी) लोकांकडून जे जे निर्मित होते किंवा झाले असेल, त्यावर बहिष्कार घालावा.
यावर प्रतिक्रिया म्हणून मेयेर ट्रिंकमॅन या औषधिशास्त्रज्ञाने, मुसलमानांच्या बहिष्काराला मदत (?) करण्याच्या हेतूने खालील गोष्टी सुचविल्या आहेत :-ज्यू आणि मुसलमान यांचा संघर्ष इतिहासकाळापासून सुरू आहे. १९४८ मध्ये इस्रायलची निर्मिती झाल्यापासून त्याला एक नवी धार आली आहे. इस्रायल जगाच्या नकाशातून मिटवून टाकण्यासाठी अनेक प्रयत्न प. आशियातील मुस्लिम राष्ट्रांनी एकजुटीने केले. पण ते सर्व फसले. पण वैर मात्र संपले नाही. काही दिवसांपूर्वी, इराणचे सर्वश्रेष्ठ धर्मगुरू अयातुल्ला अली खामेनी यांनी सर्व मुस्लिमांना आग्रहपूर्वक कळविले की, त्यांनी ज्यू (= यहुदी) लोकांकडून जे जे निर्मित होते किंवा झाले असेल, त्यावर बहिष्कार घालावा.
१) कोणाही मुसलमानाला उपदंश (सिफलीस) हा रोग झाला असेल, तर 'सलवर्सान' या औषधाचा उपयोग करू नये. कारण या औषधाचा शोध डॉ. एरलिच या ज्यूने लावला होता. त्याने, त्याला खरेच उपदंश रोग झाला आहे, वा नाही याचाही शोध घेऊ नये. कारण 'वॉसर्मन टेस्ट' हाही एका ज्यूचाच शोध आहे. परमा (गनोरिया) हा रोग झालेल्या मुसलमानाने त्या रोगाचे निदान करण्याच्या भानगडीत पडू नये. कारण या रोगाचे निदान करण्याची पद्धत नेइसनेर या ज्यू माणसाने शोधून काढली होती.
२) एखाद्या मुस्लिमाला हृदयरोग झाला असेल, तर त्याने 'डिजिटॅलिस' या औषधाचा वापर करू नये. कारण त्याचा शोध लुडविक ट्रॉबे या ज्यू शास्त्रज्ञाने लावला होता.
३) मुसलमानाला दंतपीडा असेल तर त्याने 'नोव्होकेन'चा उपयोग करू नये. कारण विदाल आणि वेल या नावाच्या दोन ज्यूंचा तो शोध आहे.
४) एखाद्या मुसलमानाला मधुमेह (डायबेटिस)चा आजार झाला असेल, तर त्याने इन्शुलिनचा उपयोग करू नये. कारण तो मिन्कोस्की या ज्यूने लावलेला शोध आहे. तसेच ज्याला डोकेदुखीचा त्रास असेल तर त्याने पायरामिडॉन आणि ऍण्टिपिरीन वर्ज्य करावे. कारण स्पायरो आणि एलेजी या दोन ज्यूंमुळे हा शोध लागला आहे.
५) मुसलमानांना झटके येत असतील तर त्यांनी ते सहन करावे, कारण त्यावरील क्लोरल हायड्रेटचा उपाय ऑस्कर लेब्रिच याने सुचविलेला आहे.
६) अरब मुसलमानांनीही या रीतीनेच आपल्या मनोरुग्णतेबाबत सावध असावे. कारण फ्राईड नावाच्या ज्यूने मानसिक रोगांची चिकित्सा सांगितली आहे.
७) मुसलमान मुलाला घटसर्प (डिप्थेरिया) झाला असेल तर त्याला 'शिक' (Schick) उपचारापासून दूर ठेवावे. कारण त्याचाही शोध बेला शिक या ज्यूनेच लावला होता.
८) मुसलमानांनी, मोठ्या संख्येत मरणाला तयार रहावे, आणि कर्णरोग व मेंदूचे आजार यांच्यावर उपचार करून घेऊ नये. कारण तो उपचार नोबल पारितोषिक विजेता रॉबर्ट बराम या ज्यूने शोधून काढला होता.९) मुसलमानांनी त्यांच्या बालकांना होणार्या लकव्याने तसेच रोगी राहू द्यावे. कारण, जोनास साल्क या ज्यूने पोलियो प्रतिबंधक लस शोधून काढली.
१०) मुस्लिमांनी, वाटल्यास क्षयाची बाधा होऊन मरून जावे, पण 'स्ट्रेप्टोमायसिन' या औषधाचा वापर करू नये. कारण हे चमत्कार घडवून आणणारे औषध झालमन वॅक्समन या ज्यूने शोधले होते.
सारांश असा की, सर्व धर्मनिष्ठ मुसलमानांनी उपदंश, परमा, हृदयरोग, डोकेदुखी, मधुमेह, मानसिक आजार, पोलियो, झटके, क्षय हे सारे रोग अंगीकारावे आणि आपण इस्लामी बहिष्काराच्या आदेशाचे पालन केल्याचा अभिमान धारण करावा.
*** *** ***
योगाचा महिमा
प्राचीन योगशास्त्राला सध्या वैभवाचे दिवस आले आहेत. अनेक पौरस्त्य आणि पाश्चात्त्य देशांमध्ये योगचिकित्सा दिवसेंदिवस लोकप्रिय होऊ लागली आहे. त्याची ही काही उदाहरणे :-
१) आपल्या सैन्यव्यवस्थेशी संबद्ध असलेली 'डिफेन्स रीसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन' (डीआरडीओ) ही संस्था सर्वांना माहीत आहे. तिने, उंच पर्वतश्रेणीवर कार्यरत असलेल्या सैनिकांमध्ये, त्या उंचपणामुळे, जे आजार होतात, त्यावर उपचार म्हणून योगशिक्षणाचा आपल्या अभ्यासक्रमात अंतर्भाव केला आहे. डीआरडीओने, किरगीजीस्थानात, तसेच सियाचीन किंवा नाथू ला यासारख्या दहा हजार फुटांपेक्षा अधिक उंची असलेल्या जागी राहणार्या सैनिकांना योगमार्गाने काही लाभ होतो की नाही, हे पाहण्याचे ठरविले आहे.
सुमारे सहा कोटी रुपये खर्च करून, किरगीजीस्थानात डीआरडीओने एक केंद्र स्थापन केले आहे. या उपक्रमात किरगीजीस्थानातील हृदयरोगचिकित्सेचे जे केंद्र आहे, त्याचा सहभाग राहणार आहे. ज्या उंचीवर प्राणवायूची कमतरता असते आणि ज्यामुळे श्वासोच्छ्वास बाधित होतो, त्या उंचीवर योगाचा उपयोग होऊ शकतो काय, याचा शोध हे केंद्र घेणार आहे. त्याचप्रमाणे सामान्य उंचीवर राहणार्या लोकांमध्ये अस्थमा, रक्तवाहिन्यांचे तसेच इतरही रोग यांच्यावर योगाभ्यासाने फायदा होऊ शकतो काय, याचेही परीक्षण केले जाणार आहे. योगात, प्राणायाम हा मुख्य व्यायाम असतो; आणि श्वासोच्छ्वासाशी प्राणवायूचा घनिष्ठ संबंध असल्यामुळे योगचिकित्सेकडे नवे शास्त्रज्ञ वळलेले आहेत.
२) अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठाचे अँडर्सन कॅन्सर सेंटर आणि बंगलोर जवळील स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्थान यांच्या परस्पर सहयोगाने, योगामुळे कर्करोग (कॅन्सर) बरा होण्याला मदत होऊ शकते काय, यासंबंधी प्रयोग करण्यात आले. त्यांना असे आढळून आले की, स्तनांच्या कर्करोगाने बाधित झालेल्या ज्या स्त्रियांनी किरणोत्सर्गी चिकित्सा पद्धतीचा (रेडिएशन थेरपी) उपचार घेतला, त्यांना योगोपचाराने लाभ झाला आहे. योगशास्त्रात जी आसने, प्राणायामादि ज्या श्वासप्रक्रिया सांगितलेल्या आहेत, त्यांच्या कृतीने त्यांचा थकवा जाण्यात, शारीरिक क्षमता वाढण्यात आणि एकूणच सामान्य निरोगीपणासाठी फायदा झाला आहे. ''योगात मन व शरीर या दोघांचाही व्यायाम केला जातो. त्या योगाच्या ठिकाणी मानसिक व शारीरिक व्याधींच्या निराकरणासाठी साहाय्यभूत होण्याची खूप क्षमता आहे आणि त्या क्षमतेचा, कर्करोग उपचारातही लाभ होतो'', असे त्या विद्यापीठातील एकात्म चिकित्सा अध्ययन केंद्राचे (इंटेग्रेटिव्ह मेडिसिन प्रोग्रॅम) संचालक प्रो. लोरेंझो कोहेन यांनी म्हटले आहे.
३) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ ऍण्ड न्यूरो सायन्सेस (निमहान्स) या संस्थेने, उद्विग्नता (डिप्रेशन), दुभंग मानसिकता (स्किझोफ्रेनिया) या रोगांवर उपचार करताना ४५ मिनिटे योगासने व प्राणायामादि पद्धतीचा उपयोग केला; आणि त्यांना असे आढळून आले की, योगप्रक्रियेने शरीरात जीवशास्त्रीय (बॉयोलॉजिकल) परिवर्तन घडून येते. मोठ्या रोगांच्या बाबतीत अन्य औषधोपचारांबरोबर योगाचा आणि लहानसहान रोगांच्या बाबतीत केवळ योगाचा उपयोग यासंबंधी निमहान्स संस्था अनेक प्रयोग करीत आहे.
४) सुप्रसिद्ध योगगुरू श्री. बी. के. एस. अयंगार हे अलीकडे प्रथमच चीनमध्ये गेले आणि त्यांचे तेथे भावोत्कट स्वागत झाले. सुमारे ३० हजार चिनी लोक योगोपचाराचा फायदा घेत आहेत, असे त्यांना आढळून आले. चीनच्या १७ प्रांतांमधील ५७ शहरात योगशिक्षण केंद्रे आहेत. गुआँगजाऊ शहरात योगाचा अभ्यास करणार्यांची एक सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या आयोजनात चिनी सरकारचाही सहभाग होता, हे विशेष. त्या सभेत एक हजाराहून अधिक संख्येत योगाभ्यासी लोक उपस्थित होते. बेजिंगमधील एका कार्यक्रमात, ७०० लोकांच्या उपस्थितीत, योगाभ्यास करणार्या चिनी व्यक्तींनी योगासनांची प्रात्यक्षिकेही सादर केली.
५) अमेरिकेतील न्यू यॉर्क शहरात 'टाईम्स स्क्वेअर' हा प्रसिद्ध चौक आहे. तेथे २१ जून २०११ ला ८००० योगप्रेमी एकत्र आले होते. न्यू यॉर्क शहराची संस्कृती सामान्यत: एकांडी नाही. ती समन्वयाचा पुरस्कार करणारी आहे. तेथे नऊ वर्षांपूर्वी, असाच एक वर्ग आयोजित केला गेला होता, तेव्हा फक्त दोन योगप्रेमी उपस्थित होते. नऊ वर्षांमध्ये ती संख्या ८ हजारावर गेली. न्यू यॉर्कमध्ये अनेक ठिकाणी योग प्रशिक्षण केंद्रे आहेत. कोनी चान आणि डग्लस स्टेवर्ट या दुक्कलीने हा २१ जूनचा कार्यक्रम आयोजित केला होता. सर्वांना प्रवेश नि:शुल्क होता.

विद्यार्थ्यांच्या नमाजावर बंदी
ताजकीस्तान हा आपल्या आशिया खंडातलाच एक देश आहे. त्याच्या पूर्वेकडे चीन, दक्षिणेला अफगानिस्तान, उत्तरेला किरगीजीस्तान आणि पश्चिमेला उजबेकीस्तान आहे. हा सुमारे पाऊण कोटी लोकसंख्येचा देश, सोव्हियत रशियाचा भाग होता. १९९१ साली तो स्वतंत्र झाला. तेथे अध्यक्षीय लोकशाही पद्धतीची राज्यव्यवस्था आहे.
ताजकीस्तानात ८५ टक्के सुन्नी मुसलमान आहेत, तर ७ टक्के शिया मुसलमान आहेत. या देशाच्या सरकारने नुकताच असा कायदा केला आहे की, देशातील शाळांमध्ये विद्यार्थी नमाज पढणार नाहीत. मुलांना न समजणार्या अरबी भाषेतील आयता म्हणायला लावून व त्या आयतांचा आपल्या सोयीप्रमाणे अर्थ लावून, शिक्षक, मुलांना बालपणापासून कट्टर बनवतात, असे तेथील सरकारच्या ध्यानात आले आणि त्यांनी शाळांमधील नमाजाला प्रतिबंध केला.
९० टक्क्यांहून अधिक मुस्लिमांची संख्या असलेल्या देशाच्या सरकारने उचललेले हे पाऊल म्हणजे एक धाडसच म्हटले पाहिजे. कारण इस्लामच्या पाच पायाभूत तत्त्वांपैकी नमाज एक आहे. प्रत्येक मुसलमानाने दिवसातून पाच वेळा नमाज पढला पाहिजे, असा धार्मिक दंडक आहे. एकटाही नमाज पढू शकतो. पण मशिदीत जाऊन सामूहिकतेने नमाज पढला, तर अधिक पुण्य लाभते, अशी तेथे सार्वत्रिक धारणा आहे. ताजकीस्तानचे सरकार म्हणते की, ''विद्यार्थ्यांना नमाज कट्टरवादी बनवितो. या कट्टरवादानेच अल कायदा व तालिबान यासारख्या आतंकवादी संघटनांना जन्म दिला आहे; आणि कट्टरवादाचे शिक्षण देऊन असंतुष्ट, समाजविध्वंसक गट, आपल्या राजकीय उद्दिष्टपूर्तीसाठी 'मजहब'चा उपयोग करतात. ही मंडळी विद्यार्थ्यांच्या मनात अशा प्रकारचे विचार पेरतात की, ज्यामुळे ते पुढे कट्टरवादी बनतील आणि आपल्याच देशासाठी धोका निर्माण करतील.''

राजीव माहात्म्य
थोर पुरुषांच्या नावाने संस्थांची, वस्त्यांची, सडकांची आणि पारितोषिकांची नावे ठेवण्याची पद्धती जगभर रूढ आहे. आपल्याही देशात अनेक गांधीनगरे, टिळकनगरे, विवेकानंद नगरे आहेत. एकेका काळाचा तो महिमा असतो. स्वातंत्र्यानंतर विवेकानंद आणि टिळक यांची नावे मागे पडली. महात्माजींचे नाव पुढे आले. पण नंतर स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री पं. जवाहरलाल नेहरू यांच्या नावाचे फलकही झळकू लागले. त्यानंतर श्रीमती इंदिरा गांधी यांचा क्रम लागला. पण विवेकानंद, टिळक, गांधी, नेहरू, इंदिराजी यांना नावांच्या बाबतीत मागे टाकणारी एक व्यक्ती आहे. ती म्हणजे श्रीमती इंदिरा गांधी यांचे पुत्र राजीव गांधी. तसे ते पाचच वर्षे प्रधानमंत्री होते. पण त्यांच्या पत्नी श्रीमती सोनिया गांधी २००४ पासून गेली ७ वर्षे सत्तारूढ दलाच्या सर्वेसर्वा आहेत. त्यांनी आपल्या पतिदेवांची स्मृती अजरामर रहावी यासाठी असंख्य उपक्रमांना, संस्थांना आणि पारितोषिकांना त्यांचे नाव देण्याचा सपाटा सुरू केला. संपूर्ण माहिती अजून प्रकट झाली नाही. पण जेवढी हाती लागली तीवरून खालील सत्ये बाहेर आली.
क्रीडा स्पर्धांसाठी ठेवलेल्या २८ पारितोषिकांमध्ये, २ पं. जवाहरलाल नेहरूंच्या, ३ इंदिरा गांधींच्या आणि उरलेली २३ राजीव गांधींच्या नावावर आहेत. केंद्र सरकारच्या ५२ योजनांमध्ये दोन जवाहरलालजींच्या, २९ इंदिराजींच्या आणि २१ राजीवजींच्या नावाने आहेत. १९ स्टेडियममध्ये जवाहरलालजींच्या नावे १, इंदिराजींच्या नावे ६, तर १२ राजीवजींच्या नावाने आहेत. विश्व विद्यालयीन १७ पुरस्कारांमध्ये पंडितजींच्या नावाने २, इंदिराजींच्या नावाने ६ तर राजीवजींच्या नावाने ८ पुरस्कार आहेत. फेलोशिप/स्कॉलरशिपमध्ये राजीवजींचे नाव ९ ठिकाणी आहे. नवे सर्व दहा दवाखाने राजीव गांधींच्या नावावर आहेत. ही उपलब्ध यादी फक्त गेल्या अठरा वर्षातील आहे आणि तीही अपूर्ण आहे. कुणा संशोधकाने स्वातंत्र्योत्तर काळात सरकारतर्फे दिलेल्या नावांची संपूर्ण सूची तयार केली, तर जनतेचे खूपच प्रबोधन होईल आणि संशोधकालाही कदाचित डॉक्टरेटही मिळू शकेल.

एक अभिनव विवाह निमंत्रण पत्रिका
विवस्वान हेबाळकर या व्यक्तीने ही पत्रिका तयार करून पाठविली आहे.
लग्नपत्रिका
॥ लोकशाही प्रसन्न॥
कोपरापासून दंडवत, विनंती विशेष
आमच्या येथे लोभी व्यापार्यांच्या कृपेने आणि अनिश्चित सरकारच्या आशीर्वादाने
चि. भ्रष्टाचार (स. ग. ळी. क. डे)
(श्री. कु. प्रसिद्ध सारा काळाबाजार यांचे अनिष्ट पुत्र)
यांचा शुभविवाह
चि. सौ. कां. महागाई (सा. मा. न्य. जनता)
(श्री. कु. क. रा. आमटे यांची कन्या)
हिजबरोबर काळ्या रात्री १२ वा. २ मि. एच. एम. टी. मुहूर्तावर मनाविरुद्ध करण्याचे योजिले आहे. आपण सहकुटुंब व मित्रपरिवारासह येऊन वधूवरांच्या कानाखाली आवाज काढावेत, ही नम्र विनंती.
आपले नम्र
श्री. व सौ. मा. रा. जोडे
श्री. व सौ. स. दा. वाटलावे
श्री. व सौ. क. र. बुडवे
श्री. व सौ. भ. रा. खिसे
विवाहस्थळ - जुगार भवन, मटका गल्ली, भाववाढ रोड, सट्टा बाजाराशेजारी, ४२०
टीप- (१) हळदीचे भाव वाढल्यामुळे चुना चालेल.
(२) आपला अहेर आणणे बंधककारक आहे.
समग्र काळाबाजार बंधू
आमच्या दादाच्या लग्नाला यायचं हं.
चि. खोटे, भामटे, चोरटे, लबाडे
...

-मा. गो. वैद्य
नागपूर
दि. १३-०८-२०११
नागपूर
दि. १३-०८-२०११
Thursday, September 8, 2011
बॉम्बस्फोटानंतर नेत्यांनी भेटी टाळलेल्याच ब-या ! - एक्स्पर्ट कॉमेंट
स्लिपर सेल्स म्हणजे प्रशिक्षित अतिरेक्यांची चमू असते. एखाद्या शहरात दहा दहा वर्षांपासून ते शांतपणे वास्तव्यास असतात. स्थानिकांमध्ये मिसळून गेलेले असतात. यांना बॉंब बनविण्यापासून ते स्फोट घडविण्यापर्यंतचे प्रशिक्षण दिलेले असते. कधी सक्रीय व्हायचे हेही ठरलेले असते. आपल्या देशात किमान 300 स्लिपर सेल्स असण्याची शक्यता आहे. एका सेलमध्ये 5 ते 6 अतिरेकी असतात. जेव्हा स्फोट घडलेले नसते अशा वेळी पोलिसांनी हे स्लिपर सेल शोधून काढणे आवश्यक असते. बहुतेक वेळा स्लिपर सेलमधील अतिरेकी हे लोकल असतात. येथे लोकल माणसांचा 90 टक्के सहभाग असतो.
पूर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
एक्स्पर्ट कॉमेंट : बॉम्बस्फोटानंतर नेत्यांनी भेटी टाळलेल्याच ब-या !
पूर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
एक्स्पर्ट कॉमेंट : बॉम्बस्फोटानंतर नेत्यांनी भेटी टाळलेल्याच ब-या !
Wednesday, September 7, 2011
सोशल नेटवर्किंग साईट्सवर फिरतोय 'धमाका हेल्प लाइन'
Tuesday, September 6, 2011
आपल्या देशात असे मुस्लिमांबरोबर घडले तर काय होईल?
पूर्ण बातमीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा ....
पाक से आए हिंदुओ ने सुनाई दर्द-ए-दास्तां तो छलक...
Monday, September 5, 2011
भारतीय इतिहासातील युगनायक शिक्षक
भारताच्या इतिहासात हजारो वर्षांपासून अनेक युगनायक शिक्षक होऊन गेल्याचे दिसते. श्रीरामापासून ते स्वामी विवेकानंदांपर्यंत जेवढे महापुरुष होऊन गेले त्या प्रत्येक महापुरुषामागे एक खंबीर शिक्षक किंवा गुरूचे आशीर्वाद होते. या लेखात आपण युगनायक घडविणा-या महान शिक्षकांची ओळख करून घेऊ या.
सांदिपनी.आचार्य सांदिपनी हे भगवान श्रीकृष्णाचे गुरू होते. त्यांचा आश्रम उज्जयिनी अर्थात आजच्या उज्जैन येथे होता. सांदिपनी ऋषींनी श्रीकृष्णाला या आश्रमात 64 कलांचे शिक्षण दिले.
पूर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
हे आहेत भारतीय इतिहासातील युगनायक शिक्षक

रस्त्यावर नाचण्याची व्यवस्था करणे, हाही गणेशोत्सवामागील उद्देशच !
अंथरुणातून बाहेर न पडताच मोठमोठे उपदेशाचे डोस पाजणारी, फुकटचे सल्ले देणारी मंडळी सर्वच काळात असतात. सुरुवातीच्या काळातच लोकमान्यांनी त्यांना खणखणीत उत्तर देऊन ठेवलं आहे. 22 सप्टेंबर 1896 रोजी पुण्यातील एका जाहीर कार्यक्रमात लोकमान्य म्हणतात, ""आपले राष्ट्र म्हणजे काही गुलामांचे राष्ट्र नाही. मानवी प्राण्याला कैद्याच्या राहणीने राहा असे सांगणे म्हणजे महामूर्खपणा आहे. समारंभ व थाटमाट ही प्रत्येक उत्सवाची आवश्यक अंगे होत. कोणतेही काम पैशावाचून होत नसते. इतर वाईट गोष्टींत पैसे खर्च होण्यापेक्षा गणेशोत्सवात थोडेबहुत खर्च झाल्यास पुण्यच आहे. या उत्सवात प्रत्येकजण आपापल्या हौसेने खर्च करीत असतो. कोणाची कोणावर सक्ती नाही. आठ-दहा दिवस जर उत्साहाने काढता येत नाहीत व त्या उत्सवाप्रीत्यर्थ थोडेसे द्रव्य खर्चण्याचे जर सामर्थ्य नाही, तर ते राष्ट्र जिवंत असून मेल्यासारखेच आहे. या गोष्टीला उधळपट्टी म्हणणारे म्हणोत, पण कष्टमय संसाराची यात्रा सुखाची व शांतीची होण्यास असले खर्च आवश्यकच आहेत.''
पूर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
रस्त्यावर नाचण्याची व्यवस्था करणे, हाही गणेशोत्सवामागील उद्देशच !
पूर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
रस्त्यावर नाचण्याची व्यवस्था करणे, हाही गणेशोत्सवामागील उद्देशच !
Sunday, September 4, 2011
शिक्षक दिन विशेष - डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे तीन प्रश्न
आपण जेव्हा आपल्या स्वभावानुसार कार्य करतो तेव्हा थोडेसे यशदेखील समाधान देऊन जाते, परंतु जेव्हा आपण आपल्या स्वभावाच्या विपरित कार्य करू लागतो तेव्हा उच्चतम सफलता मिळाली तरीसुद्धा जीवनात एक पोकळी जाणवत राहते. हीच गोष्ट राष्ट्राच्या बाबतीतही सत्य आहे. आधुनिक शिक्षणाने आम्हाला रोजगार, विज्ञान, तंत्रज्ञान आणि व्यापाराच्या क्षेत्रात मोठी सफलता प्रदान केली आहे. परंतु गुणवत्तेच्या स्तरावर भारतात प्रचंड विषमता दिसून येते. एकीकडे राष्ट्रीय संस्थान (आय.आय.टी., आय.आय.एम.) आहेत. येथे जगातील सर्वोच्च संस्थांच्या तोडीचे शिक्षण मिळते. दुसरीकडे सर्वत्र पावसाळ्यातील भूछत्राप्रमाणे उगवलेल्या खाजगी शिक्षणसंस्थांमध्ये शिकलेले अभियंते आणि अन्य पदव्या घेतलेले तरुण दिसतात. आपल्या विषयातील अगदी किरकोळ ज्ञानही यांच्यामध्ये नसल्याचे आढळून येते. योग्यतेतली ही दरी निराशेचे एक कारण आहे, परंतु अधिक सूक्ष्म स्तरावर जाऊन पाहिले तर या पोकळीमागील कारण आहे, आमचे आपल्या मुळांपासून उखडले जाणे. डॉ. सर्वपल्ली
राधाकृष्णन यांनी आपल्या तत्त्वाज्ञानातून याकडे लक्ष वेधल्याचे दिसते.
Thursday, September 1, 2011
मु. पो. यशोधरा हॉस्पिटल
माझी केवळ विचार करण्याची क्षमताच शाबूत आहे; उर्वरित शरीर प्राण असूनही निपचित होतं. अचानक भेटायला येणाऱ्यांना थांबविण्यात आलं. डॉक्टर शस्त्रसज्ज होऊन आले. "गळ्याच्या इथे थोडं काम आहे. थोडा त्रास होईल, काही नाही', असे ते म्हणाले. आता येईल त्या स्थितीला सामोरे जाण्यासाठी मनाची तयारी मी कधीच केली होती. थोडा अधिक त्रास व्हायचा तेव्हा मी श्वासासोबत मनातल्या मनात ओम्कार उच्चारण करीत असे. माझ्या गळ्यातून एक वीतभर लांब नळी हृदयाच्या दिशेने...
पूर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
पूर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
"जीबीएस'च्या विळख्यात 12 महिने part 1
मु. पो. यशोधरा हॉस्पिटल part 2... अन् मी पुन्हा चालू लागलो part 3
Subscribe to:
Posts (Atom)
.
माझी टी.व्ही. मुलाखत पाहा...
siddharam patil photo
लेखांची वर्गवारी
- bjp (12)
- congress (19)
- g b syndrome (1)
- INBOX (1)
- research (1)
- rss (5)
- shivaji (4)
- tarun bharat (2)
- अग्रलेख (4)
- अतिरेकी हल्ले (6)
- अध्यात्म (16)
- अनुभव (2)
- अन्य (3)
- आंबेडकर (18)
- आर्मी (4)
- इतिहास (29)
- इस्लाम (35)
- एस. गुरुमूर्ती (3)
- ओळख (2)
- कसाब (3)
- कार्यक्रम (1)
- केन्द्र (3)
- खळबळजनक (1)
- ख्रिस्ती (21)
- गीत (3)
- चाणक्य नीती (7)
- चीन (1)
- छायाचित्र (2)
- जटायु (2)
- जटायु अक्षरसेवा (1)
- जीबीएस (4)
- जीवन मंत्र (2)
- डॉ. भूषण कुमार उपाध्याय (2)
- दहशतवाद (9)
- नक्षलवाद (5)
- निमंत्रण (1)
- न्यूज़ (7)
- पत्रकारिता (7)
- परिचय (10)
- पाक (2)
- पाकिस्तान (7)
- पुस्तक परिचय (7)
- पूर्वांचल (3)
- पोलिस (3)
- प्रज्ञा (2)
- बातमी (12)
- बातम्या (4)
- बुद्ध (6)
- भारत (4)
- मा. गो. वैद्य (2)
- माझ्याविषयी थोडे... (18)
- मीडिया (16)
- मुकुल कानिटकर (6)
- मुलाखत (4)
- मुस्लिम जगत (13)
- मोदी (9)
- योग (5)
- रमेश पतंगे (1)
- राजकारण (28)
- विमर्श (6)
- विवेक विचार (17)
- विवेकानंद साहित्य संमेलन (1)
- वैचारिक (57)
- वैद्यक (5)
- शिव धर्म (7)
- सडेतोड सागर (2)
- सर्वस्पर्शी बाबासाहेब (3)
- संस्कृति (22)
- संस्कृती (6)
- सामाजिक (9)
- सावरकर (2)
- साहित्य (7)
- सिद्धरामचे लेख (17)
- सुविचार (2)
- सूर्यनमस्कार (4)
- सोलापुर (9)
- सोलापुर दंगल (5)
- सोलापुर बातमी (9)
- स्वामी विवेकानंद (3)
- स्वामी विवेकानंदांचे विचार (32)
- हिंदू (9)