Monday, November 28, 2011

Truth of Secular Media




Tehelka armtwisted Goa govt into funding its literary fest

A crusader turns collector
Devika Sequeira, Nov 12, Panaji:
http://www.deccanherald.com/content/204473/a-crusader-turns-collector.html

After several preliminaries and high-power calls-some of them from Sonia

Gandhi's political adviser Ahmed Patel -''Tehelka'' publisher and chief
operating officer Neena Tejpal met Chief Minister Digambar Kamat in Goa
weeks ahead of ''Think 2011'', the magazine's 'festival of ideas' that
was held here from November 4 to 6.

युरेनियम साठ्यावर बसलेले भुजंग - ख्रिश्‍चन मिशनरी

एस. गुरुमूर्ती ( लेखक हे राजकीय विश्लेषक आणि विख्यात विचारवंत आहेत. )
गेल्या काही आठवड्यांपासून  कुडनकुलम च्या अणुवीज केंद्राच्या विरोधातले आंदोलन टीव्हीवरच्या रिऍलिटी शोप्रमाणे सुरू आहे. सतत बातम्यांच्या शोधात असणार्‍या दृकश्राव्य माध्यमांनी, १३ हजार कोटी रूपये खर्चुन पूर्ण झालेले आणि पूर्णत्वास आलेले हे ऊर्जा केंद्र बंद पाडण्यासाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला काही माध्यमांनी तर मॅटिनी शोचे स्वरूप आणले आहे. या सार्‍या प्रकारात अण्णा हजारे यांच्या आंदोलनाची भ्रष्ट नक्कल केली जात आहे. आणि माध्यमे त्यातले नाट्य वाढवायचा प्रयत्न करीत आहेत. इथली जनता हतबल झाली असून ती जगण्याचा हक्क मागत आहे, असे माध्यमांकडून दाखवले जात आहे.

Saturday, November 19, 2011

सुखी गृहस्थी जीवनासाठी...

यशस्वी गृहस्थी जीवनाचा आधार सुखी दांपत्य असतो. पती-पत्नींमध्ये एकमेकांप्रती सन्मानाची भावना असेल आणि स्वाभिमानाची मर्यादा न ओलांडण्याचा विवेक असेल तरच दांपत्य जीवन सुखी बनणे शक्य आहे. पती पत्नीशी किंवा पत्नी पतीशी सन्मानाने वागत नसल्यास तिथे परामात्मा राहू शकत नाही. परमात्मा प्रेमाचा भुकेला आहे. ज्या घरात प्रेम आणि सन्मानाचे वातावरण असेल तिथेच त्याचा वास असतो.

Wednesday, November 16, 2011

भारताला बलशाली होण्यापासून रोखाणा-या शक्ती

भारताला बलशाली होण्यापासून रोखाणा-या शक्ती कशा रीतीने कार्यरत आहेत, हे सांगणारा एस. गुरुमूर्ती यांचा हा लेख कोणाच्याही डोळ्यात अंजन घालू शकेल. या अतिशय महत्वाच्या विषयावरील या लेखाचा अनुवाद करून कोणीतरी मराठीत आणेल का ? असे लेख मराठीतूनही प्रकाशित झाले पाहिजेत. ( कृपया कोणी या लेखाचा अनुवाद केलाच तर तो psiddharam@ gmail.com या पत्त्यावर पाठवावा ही विनंती.)

Forces halting our n-surge
The agitation against the Koodankulam Nuclear Power Plant has been running as a TV reality show for weeks now. The news-starved visual media has reduced the Koodankulam nuclear plant — a national investment of Rs 13,000 crore and just about to start — to a day-matinee-night show.

Thursday, November 10, 2011

'देऊळ' पाहून मनात आलेले काही प्रश्न

हिंदू विचारांवर श्रद्धा असलेला मी एक कार्यकर्ता आहे. अन्य धर्म जन्मास येण्यापूर्वीही हिंदू धर्म अस्तित्वात होता. तेव्हा या धर्माला सनातन धर्म म्हणत. जगातील अन्य भागातील लोकांना कपडे घालायचीही बुद्धी नव्हती तेव्हा या भारत देशात एक प्रगल्भ संस्कृती नांदत होती.

सरकारलाही नाही माहित, सोनिया गांधींनी कुठे कुठे केला परदेश दौरा

नवी दिल्ली. वृत्तसंस्था . संयुक्त पुरोगामी आघाडी आणि राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कुठे कुठे परदेश दौरा केला याची माहिती सरकारच्या कोणत्याच मंत्रालयाकडे उपलब्ध नाही, असे दिसते. माहितीच्या अधिकाराखाली दाखल झालेल्या अर्जातून ही बाब समोर आली आहे. सोनिया गांधी यांच्या परदेश दौ-याविषयी माहिती मागणारा एक अर्ज माहितीच्या अधिकाराखाली दाखल झाला आहे आणि हा अर्ज सध्या वेगवेगळ्या विभागात फिरत आहे.

Tuesday, November 8, 2011

चाणक्य नीती 13 : मूर्खपणा आणि जवानीपेक्षाही घातक आहे ही गोष्ट

कष्ट, दु:ख, अडचणी या सतत येत असतात. या प्रकारच्या काही गोष्टींवर आपले काहीही नियंत्रण नसते तर काही गोष्टी मात्र आपल्या कर्मानेच उत्पन्न होत असतात. आपण जाणते-अजाणतेपणी अशी काही कामे करतो की भविष्यात ती कामे आपल्यासमोर अडचणी बनून येतात. यासंदर्भात आचार्य चाणक्य म्हणतात...

'बकरी ईद' नमाजनंतर 'स्वतंत्र काश्मीर'च्या घोषणा








सतरा सुरक्षा जवान जखमी



वृत्तसंस्था । श्रीनगर

अनंतनाग, तसेच बारामुल्ला जिल्ह्यात 'स्वतंत्र काश्मीर'ची मागणी करणारे आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झालेल्या संघर्षात सतरा सुरक्षा जवान जखमी झाले आहेत. 'बकरी ईद'च्या प्रार्थनेनंतर हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

Monday, November 7, 2011

नास्तिकांना युधिष्ठिराने मूर्ख का म्हटले असेल ?

'नास्तिक: कच उच्यते? की मूर्ख:?'
'नास्तिक कोणाला म्हणावे? मूर्ख कोण?'
युधिष्ठिराचे उत्तर :
'नास्तिको मूर्ख: उच्यते।'
मूर्ख, मूढ, गोंधळलेला, भ्रमिष्ट, अज्ञ, बालिश, वैधेय: व यथाजात: इतक्या शब्दांनी मूर्खाला संबोधिले जाते.

विवेकानंद केंद्राला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

धर्मशाला. विवेकानंद केंद्र या अध्यात्मप्रेरित सेवा संघटनेला यंदाचा सतपाल मित्तल राष्ट्रीय घोषित झाला आहे. कन्याकुमारी येथे मुख्यालय असलेल्या विवेकानंद केंद्राने देशाच्या विविध भागात मानवता जपत सेवाकार्ये उभी केली केली आहेत, त्याची दखल घेत हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

Sunday, November 6, 2011

भाजपाचे काँग्रेसीकरण होत आहे काय? - मा. गो. वैद्य

'देशोन्नती'च्या संपादकांनी, आपल्या दैनिकाच्या दिवाळी अंकासाठी, वरील विषयावर माझा लेख मागितला आणि मी तो देण्याचे मान्य केले. लेखाचे शीर्षक प्रश्नात्मक आहे आणि माझे उत्तर आहे 'होय.' काँग्रेसीकरणाच्या वाटेवर भाजपाची 'प्रगती' होत आहे. पण काँग्रेस पक्षाने 'प्रगती' करीत जो पल्ला गाठला आहे, तो मात्र भाजपाने गाठला नाही; बहुधा तो गाठूही शकणार नाही.

एकदा तुम्हाला ते गवसले की...

आपल्याला लवकरच मृत्यू येणार आहे याची जाणीव म्हणजे  काहीतरी भव्य-दिव्य  करण्यासाठीचे साधन हाती लागल्याचा आनंद देणारी गोष्ट आहे. कारण  सर्व अपेक्षा,अभिमान, अपयशाने येणारे नैराश्य आणि वैषम्य या सर्व गोष्टी मृत्यूच्या पाश्र्वभूमीवर  नगण्य  ठरतात आणि  सर्वात खरोखरच जे महत्वाचे आहे तेच शिल्लक राहाते.

Friday, November 4, 2011

चाणक्य नीती 12 : तुम्हाला जर घाणीत सोने दिसले तर...

चाणक्य नीती 12 : तुम्हाला जर घाणीत सोने दिसले तर...
दररोजच्या व्यवहारात आपण अनेकांना भेटत असतो, त्यात काही जण चांगल्या चरित्र आणि स्वभावाचे असतात तर काहींचा स्वभाव आणि वर्तणूक वाईट असते. चांगल्या लोकांकडून शिकण्यासारखे आणि घेण्यासारखे खूप काही असते. परंतु आपण वाईट लोकांकडूनही काही चांगल्या गोष्टी शिकू शकतो. या संबंधात आचार्य चाणक्य यांनी म्हटले आहे की,
http://divyamarathi.bhaskar.com/article/REL-chanakya-niti--life-management-tips-of-chanakya-niti-2541831.html 

कष्टाशी तडजोड न करण्यातच जीवनाचे खरे सौंदर्य - प्रकाश पाठक

सोलापूर. दिव्य मराठी नेटवर्क. जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवी मूल्यांवर श्रद्धा, कष्टाशी तडजोड न करता निरंतर कष्ट करण्याची वृत्ती आणि समर्पण भावना असल्यास जीवन ख-या अर्थाने फुलते. याचवेळी वैयक्तिक अपमान विसरून सामूहिक अपमानाविरोधात खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धारही असला पाहिजे, असे मत भोसला मिलिटरी स्कूलचे संचालक प्रकाश पाठक यांनी व्यक्त केले. विवेकानंद केंद्राच्या विवेक विचार दिवाळी अंक प्रकाशनाच्या निमित्ताने आयोजित 'आयुष्यावर ऐकू काही' या विषयावर पाठक यांचे व्याख्यान झाले. यावेळी ते बोलत होते.
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAH-WMAH-KOL-vivek-vichar-diwali-issue-2541614.html

Tuesday, November 1, 2011



पत्रकाराचे लेखन कसे असावे, याबाबत लोकमान्य टिळक यानी एके ठिकाणी लिहून ठेवले आहे की, पत्रकाराची लेखणी ही धीरगंभीर नदीच्या प्रवाहासारखी असावी. तिच्या प्रवाहाला खळखळीचा वेग नसावा पण कोठे तुंबूनही राहता कामा नये. थोडक्यात तिला कोठेतरी पोहोचण्याची घाई नसावी आणि वाया घालवायला वेळही नसावा. या साऱ्या वर्णनाची प्रचीती बापूराव यांच्या लेखनातून नेहेमी येते.

मुलं ही केवळ संपत्ती नव्हे तर कर्तव्यही !

कुटुंबाचा आधार आहे गृहस्थी आणि गृहस्थीची धुरा टिकलेली असते दांपत्य जीवनावर. साधारणपणे लोक कुटुंब, गृहस्थी आणि दाम्पत्य हे तीन्ही एकच समजतात. परंतु या तीन्हीत सूक्ष्म अंतर आहे हे मात्र खरे. पती-पत्नीतील वैयक्तीक संबंधांवर आधारित असते ते दांपत्य. पती-पत्नीसोबतच मुलांच्या जबाबदा-याही असतात याला म्हणतात गृहस्थी. यात आर्थिक, मानसिक आणि भौतिक या तीन्ही स्तरांचा समावेश असतो. या सा-यांचे समग्र रूप म्हणजे कुटुंब होय. कुटुंबात पती, पत्नी आणि मुलं यांच्याशिवाय अन्य नात्यांचाही समावेश असतो.
http://divyamarathi.bhaskar.com/article/REL-gruhasti-and-children-2532794.html

कुटुंब ही संपत्ती आहे आणि प्रेरणाही !

घर किंवा कुटुंब म्हणजे एक माळ आहे. ही माळ प्रेमाच्या धाग्यात गुंफली जाते. घरातील सारे सदस्य या माळेतील मोती आहेत. एकही मोती कमी असेल किंवा धागा तुटलेला असेल तर माळेचे सौंदर्य नष्ट होते. माळ विखुरली जाते.
घरातील प्रत्येक सदस्याचे महत्त्व हे समसमान असते. आपण कुटुंबाशिवाय अपूर्ण असतो. आपल्यावर कोणतीही परिस्थिती येवो, कितीही संकटे येवोत, आपण सदैव कुटुंबासोबत राहिले पाहिजे. कुटुंबाला एकत्र ठेवले पाहिजे. कुटुंब म्हणजे ऊर्जा आणि प्रेरणा देणारे स्थान आहे.
महाभारतातील पांडवांकडे पाहा. किती अडचणी आल्या, इंद्रप्रस्थ निर्माण असो की वनवास, पांडव सदैव एकत्र राहिले. द्युतात हार झाल्यानंतर
http://divyamarathi.bhaskar.com/article/REL-kutumb-aikya-what-to-do-2532811.html

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी