शिवबारत्न बहुउद्देशीय संस्थेच्या पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी डावीकडून
अँड. महिबूब कोथिंबिरे, काशिनाथ भतगुणकी, यशवंत सादूल, रामचंद्र
भोसले, संभाजी पवार, दिव्य मराठीचे वरिष्ठ उपसंपादक सिद्धाराम पाटील, कुबेर शिंदे, पूजा कदम, मीना लवटे,
शोभा पाडळे. बसलेले डावीकडून अँड. गाजोद्दीन सय्यद, अजय दासरी, महेश
गादेकर, डॉ. शिवरत्न शेटे, निरंजन बोद्धूल आदी.
सोलापूर : सामाजिक सलोखा आणि ऐक्य टिकण्यासाठी वैचारिक पाया पक्का हवा, त्यासाठी हिंदू आणि मुस्लीम समाजातील धुरिणांनी, अभ्यासकांनी पुढाकार घेऊन प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शिवचरित्रकार डॉ.शिवरत्न शेटे यांनी केले.
शिवबा बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेच्या वतीने फडकुले सभागृहात आयोजित शिवबारत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश गादेकर होते. व्यासपीठावर सत्कारमूर्तीसह अँड.गाजोद्दीन सय्यद आणि प्रा.अजय दासरी हे उपस्थित होते.
डॉ. शिवरत्न शेटे यांच्या हस्ते सिध्दाराम पाटील, यशवंत सादूल यांच्यासह रामशास्त्री म्याना पंतलु, अँड.महिबूब कोंथिबिरे, काशिनाथ भतगुणकी यांना जीवनगौरव पुरस्काराने तर मीना लवटे, पूजा कदम, शोभा पाडळे, रामचंद्र धर्मसाले, संभाजी पवार, कुबेर शिंदे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष निरंजन बोध्दूल यांनी केले. गुरूशांत धुत्तरगावकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. कार्यक्रमास सोलापुरातील सर्वस्तरातील मान्यवर मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment