उत्तराखंड पुराच्या भयानक व विनाशकारी
संकटाशी झुंजत आहे. गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि हेमकुंडसाहिब येथील
यात्रेचे सर्व मार्ग ठप्प पडले आहेत. अगदी अशीच अवस्था गेल्या वर्षी झाली
होती. दहा वर्षांपूर्वी झालेल्या पावसामुळेही अशीच परिस्थिती ओढवली होती.
स्वातंत्र्यानंतर ते अगदी आजपर्यंत प्रत्येक पुराच्या आणि दुष्काळाच्या
वेळी सरकार, पीडित नागरिकांना मोठी आर्थिक मदत देते. या (संकटकाळातील)
मदतनिधीतील वितरणाच्या माध्यमातून व मोठमोठ्या आश्वासनांच्या माध्यमातून
अधिकारी आणि नेतेमंडळी नवी वाहने आणि बंगले खरेदी करतात. पूर आणि
दुष्काळाच्या समस्येवर आजपर्यंत स्थायी तोडगा का काढण्यात येऊ शकला नाही?
जे नागरिक नदीच्या किनार्यावर राहतात, घाम गाळून व प्रचंड कष्ट उपसून
ज्यांनी आपली घरे बांधली आहेत ती नदीच्या पुरात वाहून जाऊ नयेत म्हणून
आजपर्यंत उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत? डॉ. नित्यानंद सध्या ८८
वर्षांचे आहेत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक महनीय व संतसमान प्रचारक
राहिले आहेत. त्यांनी बर्याच वर्षांपूर्वी ही संकल्पना मांडली होती की,
प्राचीन काळी तीर्थयात्रांसाठी पर्वतात जेवढे रस्ते तयार झाले त्यांचे
नद्यांना आलेल्या पुरामुळे किंवा भूस्खलनामुळे एवढे नुकसान कधीच झाले
नव्हते. तेव्हा मानवी वसाहती आणि रस्ते नद्यांच्या वर आणि मोठमोठे शिलाखंड
असलेल्या पर्वतीय क्षेत्रांत अतिशय विचारपूर्वक निर्माण करण्यात येत होते.
ते लोक अनुभवी होते, भलेही ते अभियांत्रिकी महाविद्यालयाचे पदवीधर नसतील.
या अनुभवांचा लाभ वर्तमान सरकारे घेऊ शकत नाहीत काय? मात्र, यासाठी प्रबळ
इच्छा आणि उदारहृदयी नेतृत्वाची आवश्यकता आहे, जे विकासाला जाती, प्रांत
आणि गटबाजीत हरवू देणार नाही.
हिंदुस्थान कात टाकू इच्छित आहे.
विश्वातील सर्वांत तरुण देश २०२० मध्ये महासत्तेची स्वप्ने बघत आहे, तर
२०५० चे भविष्यातील चित्र रंगवत आहे. जर मनात आणले तर आम्ही चीन आणि
अमेरिकेलाही मागे टाकू शकू. चांगले लोक सर्वच पक्षात आहेत. काय त्या
सगळ्यांचा देशाप्रती विश्वास संपून जाईल? बर्याच वर्षांनंतर संपूर्ण
राष्ट्र एक अशा समर्थ नेतृत्वाची सामूहिक कामना करीत आहे जे
वर्षानुवर्षांची घुसमट, असुरक्षितता आणि आर्थिक विवंचनेतून आमची मुक्तता
करेल. आम्ही आपल्याच तलावातील गाळात फसून विकासाच्या समुद्रापर्यंतचा
प्रवास अयशस्वी करणार आहोत काय? जर अशी निर्णायक वेळ आलीच आहे, तर
अर्जुनाप्रमाणे केवळ विजयसाधनेच्या दिशेनेच सर्वांना एकत्र येऊन लक्ष
केंद्रित करावे लागेल.
तरुण विजय यांच्या लेखातून
No comments:
Post a Comment