Friday, March 29, 2013

पाकिस्तानात चढला होळीचा राजकीय रंग

 मुझफ्फर हुसेन
पाकिस्तान हे कट्टरपंथी इस्लामी राष्ट्र आहे. असे असूनही यंदा तेेथे होळीच्या सणाचा प्रभाव पाहायला मिळाला. आतापर्यंत तेथील मुल्लांनी भारतीय सणांचा तीव्र विरोधच केला आहे. वेळप्रसंगी फतवे काढून अशा सणांवर बंदी आणण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, पाकिस्तान हा भारतीय उपखंडातील देश असल्यामुळे आजही तेथे भारतीय संस्कृतीचा प्रभाव आहे.

नव्या पोपना चर्चची पापं थांबवता येतील ?

गेल्या मंगळवारी व्हॅटिकन सिटीत २६६ वे कॅथॉलिक ख्रिश्‍चन धर्मगुरू म्हणून पोप फ्रांसिस यांनी अधिकृत रीत्या पदभार सांभाळला. ते प्रथम लॅटिन अमेरिकन तर आहेतच, शिवाय जवळजवळ एक शतकानंतर युरोपबाहेरचे ते प्रथम पोप ठरले आहेत. पोप पदाची शपथ ग्रहण केल्यानंतर अधिकृतपणे त्यांच्या कार्यकाळाचा प्रारंभ झाला आहे. त्यामुळेच साहजिकच कॅथॉलिक जगतच नव्हे, तर संपूर्ण विश्‍वच त्यांच्याकडे मोठ्या आशेने बघत आहे.

Tuesday, March 26, 2013

अद्वितिय ठिकाण - कोपेश्वर मंदिर

कोल्हापूर नरसोबावाडीला भेट देणा-यांनी भेट द्यावी असे अद्वितिय ठिकाण. खिद्रापूर नरसोबावाडी पासुन २५ कि.मी. अंतरावर आहे. खाजगी वाहन असणारे वाडीहून अर्ध्या तासात तेथे पोहोचू शकतात. रस्त्या बाबत न बोलनेच उत्तम. (महामंड्ळ तेथे जाते का माहीत नाही).

IMG10075.jpg
मंदिर पारिसर.

IMG10063.jpg
स्वर्ग मंड्प
IMG10066.jpg
स्वर्ग मंड्प
IMG10062.jpg
स्वर्ग मंड्प
अंतराळात तरंगणार्या पृथ्वी चा भास होतो. दंत कथा अशी की इथे उभे राहुन कोपेश्वराचे दर्शन घेतल्यास मानवाला (जिवंतपणी?) स्वर्ग प्राप्ती होते असे म्हण्तात. अशा प्रकारची मंडप रचना इतर कुठे पाहिल्याचे आठवत नाही.

महाराष्ट्रातही लव्ह जिहाद

राज्याचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांची माहिती  ( माहितीच्या अधिकारातून )… पुढील लिंकवर क्लिक करा … 
महाराष्ट्रातही लव्ह जिहाद

लव्ह जिहादपासून वाचवण्यासाठी प्रबोधन करणाऱ्या – ऍड. अपर्णा रामतीर्थकर


भोजन सम्बन्धी कुछ नियम

सनातन धर्म के अनुसार भोजन ग्रहण करने के कुछ नियम है

१ पांच अंगो ( दो हाथ , २ पैर , मुख ) को अच्छी तरह से धो कर ही भोजन करे !
२. गीले पैरों खाने से आयु में वृद्धि होती है !
३. प्रातः और सायं ही भोजन का विधान है !
४. पूर्व और उत्तर दिशा की ओर मुह करके ही खाना चाहिए !
५. दक्षिण दिशा की ओर किया हुआ भोजन प्रेत को प्राप्त होता है !
६ . पश्चिम दिशा की ओर किया हुआ भोजन खाने से रोग की वृद्धि होती है !
७. शैय्या पर , हाथ पर रख कर , टूटे फूटे वर्तनो में भोजन नहीं करना चाहिए !

बाराशे वर्षांनंतर व्हॅटिकनमध्ये किंचितसा बदल

मुक्ती तत्वज्ञानाच्या मुद्यावरून जेस्युट आणि लाल बावटा खांद्यावर मिरविणार्‍या गोदाताई परुळेकर यांच्यात संघर्ष आणि हातापायी झाली होती. महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील तलासरी येथे गरीब आणि आदिवासींमध्ये पाय पसरविण्याचा जेस्युटांचा इरादा होता. पण, गोदाताईंनी वर्षानुवर्षे त्या भागाची श्रमपूर्वक मशागत केली होती. ग्रामीण लोकांच्या अधिकारांसाठी गोदाताईंनी प्रामाणिकपणे उभारलेल्या आंदोलनामुळे चर्चला येथे आपले जाळे पसरविताना प्रचंड त्रास झाला. गोदाताई हयात होत्या तोवर जेस्युटांना वारली, धोडिया, कोंकणा, काथौडी आदी समाजांमध्ये घुसखोरी करता आली नाही. तथापि,...

पुणेकरांना एक पत्र शालजोडीतून…

मूळचा मराठवाड्यातील असलेला माझा मित्र सुनील सध्या पुण्यात शिक्षण घेतोय. त्याच्याकडे एका पुणेकराचे पत्र आले. पत्रातील दांभिकता आणि शब्दछल करून चुकीच्या गोष्टींचे समर्थन करण्याची प्रवृत्ती त्याला खटकली म्हणून त्याने पुणेकराला समजेल अशा भाषेतून अर्थात शालजोडीतून उत्तर दिले. ती दोन्ही पत्रे वाचनीय आणि विचार करायला लावणारी आहेत म्हणून येथे देत आहे…  सिद्धाराम 

इस्लाम ते वैदिक धर्म

संस्कृती शोध
वसंत गद्रे
मी फक्त एका समाजाला सोडून दुसऱ्या समाजात प्रवेश केला आहे. अशिक्षित, अतार्किक, अशास्त्रीय अशा मुस्लीम उम्मांना सत्य विचारात घेण्याची आवश्यकता वाटत नाही. अंधारातून मी वैदिक धर्माने दाखवलेल्या प्रवेशात येत आहे. या धर्मात सत्याला मान आहे, शंकाकुशंकांना जागा आहे. विचारांची देवाण-घेवाण होऊ शकते. मी माझे उरलेले आयुष्य अशा समाजात घालवण्याचे निश्चित केले आहे. मौलवी महबूब अलींनी 'पंडित महेंद्रपाल आर्य' हे नाव स्वीकारले.

Thursday, March 21, 2013

भानुदासजी यांची दिव्य मराठीतील मुलाखत

एकमेकांना पूरक विचार रूजवण्याचा प्रयत्न
संपूर्ण भारतात संस्कृती एकच आहे. मात्र, तिची अभिव्यक्ती ठिकठिकाणी वेगवेगळी आहे. या अभिव्यक्तीच्या आविष्कारावर लक्ष देण्यापेक्षा सर्वत्र समान असलेला संस्कृतीचा धागा पकडून एकमेकांसाठी पूरक जगणं आम्ही शिकवतो असे प्रतिपादन विवेकानंद केंद्राचे महासचिव भानुदासजी धाक्रस यांनी केले.

Wednesday, March 20, 2013

श्रध्दा: धगधगती यज्ञशिखा

16मुकुल कानिटकर
गत दोन वर्षांचा अनुभव दिसतो की भारताच्या नवशिक्षित युवकांमध्ये जागृति आली आहे. मोर्चे, आंदोलन उपोषणात तरूणांची संख्या वाढतेच आहे. दूसरीकडे कावड, पदयात्रा, किर्तन, कथा, मंदिरदर्शन अश्या धार्मिक कामातही युवकांचा सहभाग वाढतानांच दिसतो. हे दोन्ही शुभसंकेतच आहेत. पण काय स्वामी विवेकानन्दांना असा जागर अपेक्षित होता ? न पेक्षा काहीही बरे. स्वामीजी म्हणायचेच आळशीपणे पडून राहण्यापेक्षा चोरी करणे केव्हाही बरेच. तमसाधीन युवसमाजापेक्षा आक्रोशित बंडखोर, राजस्तिक कर्मशीला, तरूणाई उत्तमच. पण हयापूढचा विचारा करायला हवा. तारूण्याच्या हया उद्रेकाला सकारात्मक राष्ट्रनिर्माणाची दिशा कशी देता येईल?

विराटाची साधना : भारतमातेची उपासना

तारीख: 3/14/2013 11:38:24 AM

- मुकुल कानिटकरश्रीरामकृष्ण परमहंसांना काशी विश्‍वनाथाच्या दर्शनाची इच्छा झाली. पूर्ण तयारीने ठाकूरांबरोबर काही शिष्य आणि त्यांचे प्रबंधक मथुरबाबू रेल्वेने काशीला निघाले. एका डब्ब्यात ठाकूर आणि भक्तगण व शेजारी दुसर्‍या डब्ब्यात प्रसादाची सामग्री मथुरबाबूंनी घेतली होती. फळं, मिठाई अशा अनेक गोष्टी होत्या.देवघर स्थानकावर गाडी खूप वेळ थांबते. ठाकूर बाहेर फलाटावर पाय मोकळे करायला उतरले. ही बहुदा १८६८ ची घटना असावी. बंगालमध्ये दुष्काळी परिस्थिती होती.

जेसुइट पोप

मल्हार कृष्ण गोखले 

-नवा पोप निवडण्याची कार्डिनल मंडळींची बैठक पूर्ण होऊन तिथून अखेर जॉर्ज मारिओ बर्गोग्लिओ यांच्या नावाची निश्‍चिती झाली आहे. बर्गोग्लिओ हे ब्यूनोस आयर्सचे आर्चबिशप आहेत. ब्यूनोस आयर्स ही अर्जेंटिनाची राजधानी आहे. अशा प्रकारे अखेर पोप पदाचा सन्मान दक्षिण अमेरिका खंडाकडे गेला आहे. बर्गोग्लिओ हे मूळचे इटालियनच आहेत. सर्वात महत्त्वाची आणि अभ्यासकांच्या भुवया उंचावणारी गोष्ट म्हणजे ते जेसुइट आहेत.
रोमन कॅथलिक या ख्रिस्ती संप्रदायाच्या मुख्य पंथामध्ये अनेक गट आहेत. शतकानुशतकांमध्ये हे गट निर्माण होत गेले आहेत. फ्रान्सिस्कन किंवा ग्रे फ्रायर्स, डॉमिनिकन्स, कार्मेलाईट किंवा बेगिंग फ्रायर्स, ऑगस्टिन, थिएटिन्स किंवा कापुचिन्स ही त्यांच्यापैकी काही नावं. त्यातलाच एक गट म्हणजे जेसुइट किंवा पॉलिस्टिन्स.

पाण्याखालून क्षेपणास्त्र - भारत एकमेव देश

भारत ठरला जगातील एकमेव देश


वृत्तसंस्था /  विशाखापट्टनम्, २० मार्च

भारताने आज पाणबुडीवरून मारा करणार्‍या ‘ब्राह्मोस’ या सुपरसॉनिक क्षेपणास्त्राची बंगालच्या उपसागरातून यशस्वी चाचणी घेऊन नवा इतिहास रचला आहे. अशा प्रकारच्या क्षेपणास्त्राची पाण्याखालून चाचणी घेणारा भारत हा जगातील एकमेव देश ठरला आहे. २९० किलोमीटर अंतरापर्यंत अचूक मारा करण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे.

या क्षेपणास्त्राची ही पहिलीच चाचणी असून ती पूर्णपणे यशस्वी राहिली आहे, अशी माहिती ‘ब्राह्मोस’ प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवथानू पिल्लई यांनी वृत्तसंस्थेला दिली.

जगाच्या पाठीवरील कोणत्याही देशाने आजवर पाण्याच्या खालून सुपरसॉनिक कू्रझ क्षेपणास्त्राची चाचणी घेतलेली नाही. चाचणीनंतर या क्षेपणास्त्राने संपूर्ण २९० किलोमीटरचा प्रवास केला. चाचणीच्या काळात क्षेपणास्त्राची कामगिरी अगदी अचूक राहिली. असे त्यांनी सांगितले.

यापूर्वी या क्षेपणास्त्राची जमिनीवरील चाचणीही यशस्वी राहिली होती. आता पाण्याखालूनही यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. हे क्षेपणास्त्र लष्करासोबतच भारतीय नौदलाच्या सेवेतही तैनात करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.
साभार / तरुण भारत 

एकूण पृष्टदृश्ये 97000

वाचक बंधू - भगिनी,
आताच काही क्षणांपूर्वी माझ्या ब्लॉग पृष्ठदृश्यांची संख्या 97000 इतकी झाली. त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आपण या ब्लॉगचे वाचक आहत. वाचक म्हणून या ब्लॉगविषयी आपले मत, सूचना अवश्य सांगा, ही विनंती. 
आपला स्नेहांकित, 
सिद्धाराम 
psiddharam@gmail.com 
8806555588

Tuesday, March 19, 2013

मराठी ब्लॉग्ज : एक अभ्यास (लघुशोधनिबंध)


मी 2011 मध्ये सोलापूर विद्यापिठात पत्रकारिता व जनसंज्ञापनचे पदव्यत्तर शिक्षण पूर्ण केले. तेंव्हा मराठी 'ब्लॉग्ज : एक अभ्यास' या विषयावर लघुशोधनिबंध सादर केला. जिज्ञासूंसाठी लघुशोधनिबंध पुढील लिंकवर  उपलब्ध करून देत अहे. अभिप्राय जरूर कळवा. 

मराठी ब्लॉग्ज : एक अभ्यास (लघुशोधनिबंध)


येतोय विवेक विचार एप्रिलचा अंक

योगाने तारले

सन 2002 मध्ये एका अपघातात पाठीच्या मणक्यांना इजा झाली. शेवटचे तीन मणके दबले गेले, त्यामुळे हालचालच बंद झाली. उपचार सुरू झाले. ट्रॅक्शन आणि औषधोपचार. डॉक्टरांनी संपूर्ण बेडरेस्ट सांगितले. दुखणं अशा ठिकाणी होतं की जिथे प्लास्टरही करता येत नव्हतं. पेनकिलर आणि कॅल्शियमच्या गोळ्यांचा मारा सुरू होता. ऑपरेशन केले आणि बरे झाले नाही तर कमरेखालचा भाग कायमचे लुळे पडण्याचीही शक्यता होती.

Monday, March 18, 2013

चर्चची 'ती' भूमिका श्रद्धावंतांच्या धार्मिक भावना दुखावत

आनंद हर्डीकर
Published: Sunday, March 17, 2013
२४ फेब्रुवारीच्या 'लोकरंग'मध्ये 'वेध.. व्हॅटिकनमधील सत्तांतराचा!' हा माझा लेख प्रसिद्ध झाला. त्यावरील प्रतिक्रिया ३ मार्च रोजी आणि १० मार्च रोजी प्रसिद्ध झाल्या. त्या सर्व प्रतिक्रियांचा हा एकत्रित प्रतिवाद..

आंबेडकर विरुद्ध मूलनिवासी


Published: Sunday, March 10, 2013
आरपीआयप्रमाणेच आता बामसेफमध्ये बरेच गट पडले आहेत. या सर्व गटांनी पुन्हा एकत्र यावे यासाठी बामसेफच्या मूळ विचारसरणीला मानणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी लोकशाही पद्धतीने संघटनेची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याला कितपत यश येईल, हा वेगळा प्रश्न आहे. परंतु अलीकडच्या काळात बामसेफने जी मूलनिवासी ही संकल्पना मांडण्यास सुरुवात केली आहे, तीच मुळात फुले-आंबेडकर विचारधारेच्या विरोधात जाणारी आहे..

Saturday, March 9, 2013

दीपस्तंभ - होटगी मठ

प्रेरणा inspiration
Veertapaswi Channaveer Shivacharya

Taporatnam Yogirajendra Shivacharya


गेल्या शंभरहून अधिक वर्षांपासून आध्यात्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात समर्पित भावाने मठाचे कार्य सुरू आहे. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णप्पा (ए.जी.) कुंभार हे गेल्या साडेतीन दशकांपासून निष्ठेने कार्यरत आहेत. त्यांच्याशी झालेल्या संवादावर आधारित होटगी मठाच्या यशस्वी वाटचालीवर प्रकाश टाकणाऱ्या लेखाचा पहिला भाग येथे देत आहोत.

महाशिवारीत्री निमित्त - वीरतपस्वी मंदिर.

Friday, May 15, 2009

स्थळ : अक्कलकोट रोडवरील वीरतपस्वी मंदिर.

प्रेरणा inspiration
पत्रकार परिषद झाली आहे. गेल्या 20 वर्षांपासून सोलापुरात इतके भव्य निर्माणकार्य सुरू आहे आणि आपल्याला याची काहीच कल्पना नाही, याबद्दल काहीजण नवल व्यक्त करीत आहेत. भव्य मंदिर आणि शिल्पकलेतील बारकावे पाहण्यातच काहीजण थकून गेले आहेत. त्यामुळे 450 × 150 इतका भव्य मंडप, याशिवाय यज्ञमंडप, भोजन मंडप पाहायची तसदी न घेता काही पत्रकार मंदिराच्या तळमजल्यावर विसावले आहेत.

लव्ह जिहादपासून वाचवण्यासाठी प्रबोधन करणाऱ्या – ऍड. अपर्णा रामतीर्थकर


आज कुठे भगूरला, उद्या पुणे, परवा सांगली… सगळा प्रवास लाल डब्यातून (एसटीने). गडचिरोली व चंद्रपूर सोडल्यास संपूर्ण महाराष्ट्रात व्याख्यानांच्या माध्यमातून समाजकार्याचा आणि धर्मकार्याचा यज्ञ त्यांनी पेटवलाय. बहुतांश सभांना तीन-चार हजार गर्दी ठरलेली. परवा वाशीम जिल्ह्यातील मंगळूरपीर येथील सभेला 40 हजारांची उपस्थिती होती अन् नाशिक जिल्ह्यातील पिंपळनेरला 30 हजारांची. हे वर्णन आहे 58 वर्षीय ऍड. अपर्णा अरुण रामतीर्थकर यांचं. ‘लव्ह जिहाद’ ही समस्या हळूहळू वाढत असल्याचं त्यांना जाणवलं. लव्ह जिहादला बळी पडलेल्या मुलींना सावरता सावरता लव्ह जिहाद थोपवणं, त्याविषयी जनजागृती करणं हे त्यांचं अंगीकृत कार्यच होऊन गेलं.

Wednesday, March 6, 2013

मदर तेरेसाचे असली रूप

लंडन, २ मार्च - मदर तेरेसा यांनी त्यांच्या जीवनात कार्य केले असले, तरी त्या संत नव्हत्या. त्यांनी केलेली गोरगरिबांची सेवा संशयास्पद होती. प्रसारमाध्यमांनी तेरेसा यांचा उदो उदो केल्यामुळे त्यांना संत घोषित करण्यात आले. व्हॅटिकनने चर्चपासून दूर जाणार्‍या ख्रिस्त्यांना पुन्हा चर्चकडे वळवण्यासाठी त्यांना संत म्हणून घोषित केले, असे निष्कर्ष कॅनडा येथील संशोधकांनी काढले आहेत. कॅनडाच्या ‘युनिव्हर्सिटी ऑफ मॉन्ट्रीयल’चे सर्गे लेरिवी आणि जेनविएव, तसेच ‘युनिव्हर्सिटी ऑफ ओटावा’चे करोल यांनी हे संशोधन केले आहे. 

‘जीबीएस’च्या विळख्यात दोन वर्षे

‘जीबीएस’च्या विळख्यात दोन वर्षे   दिव्य मराठीत प्रकाशित

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी