Thursday, December 31, 2015

एका हातात बॉम्ब दुसर्‍या हातात गीता


''आम्हाला वारंवार एक प्रश्‍न विचारला जातो आणि तो अनेक दशके विचारला गेलेला आहे की, भारताने गेल्या हजारो वर्षांच्या वाटचालीमध्ये आपला भूभाग विस्तारित का केलेला नाही किंवा जगामध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्याचा  प्रयत्न का केला नाही ? त्याचे उत्तर आपण देऊ शकत नसलो तरी काही नामवंत अभ्यासकांनी ते दिलेले आहे. भारतीयांच्या विस्तार न करण्याच्या प्रवृत्तीमागे त्याची मानसिकता दडलेली आहे. त्याचे स्पष्टीकरण करताना हे विद्वान लोक भारतीयांची सहिष्णुता, बेशिस्त, कोणाचाही बदला न घेण्याची किंवा सूड न घेण्याची भावना, परकीयांना आपल्यात सामावून घेण्याची लवचिकता आणि आक्रमणापेक्षा स्वसंरक्षणाला महत्त्व देण्याची प्रवृत्ती याकडेे बोट दाखवतात.''
माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी सहलेखक एस. वाय. राजन यांच्या सहकार्याने 1998 साली लिहिलेल्या ‘इंडिया व्हिजन 2020 - अ व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम’ या पुस्तकात वरील प्रतिपादन केलेले आहे. डॉ. कलाम यांनी या पुस्तकात हा विषय फार सखोलपणे मांडलेला आहे.
भारतीयांच्या या सार्‍या  मनोवृत्तीचे मूळ त्यांच्या गोंधळलेल्या मनःस्थितीत असते आणि ही गोंधळलेली मनःस्थिती ही आपली राष्ट्रीय प्रवृत्ती आहे. युध्दाचा त्याग करणारा राजा अशोक हा आपल्या देशातल्या जनतेचा आदर्श राजा झाला तेव्हापासूनची अनेक शतके भारतीयांच्या मनःस्थितीला हा संभ्रम वेढून राहिलेला आहे.

Friday, December 18, 2015

दिलीप कुलकर्णी यांनी उलगडली पर्यावरणस्नेही विकासनीती

विवेकानंद केंद्राच्या पर्यावरण मंडळातर्फे केले आयोजन
प्रतिनिधी । सोलापूर
निसर्गाच्याव्यवस्थेतील प्रत्येक घटक विघटित होतो. माणसांचे केंद्रीकरण अन्् प्रगतीच्या दिखाव्यामुळे कचऱ्याची निर्मिती होते. स्वत:ला वगळून कचऱ्याचे निर्मूलन अशक्य आहे. कचारानिर्मितीच होणार नाही, यासाठी प्रयत्न करणे हाच त्यावरील एकमेव शाश्वत पर्याय आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ दिलीप कुलकर्णी (कुडाळ, रत्नागिरी) यांनी केले. विवेकानंद केंद्राच्या पर्यावरण मंडळातर्फे गुरुवार आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महापालिका आयुक्त विजयकुमार काळम अध्यक्षस्थानी तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, केंद्राचे नगर संचालक दीपक पाटील, नगरप्रमुख प्रा. प्रशांत स्वामी डॉ. वासुदेव रायते पर्यावरण मंडळाचे प्रमुख अजित आेक आदी उपस्थित होते.

Wednesday, December 16, 2015

विवेकानंद केंद्रातर्फे गुरुवारी पर्यावरणतज्ज्ञ दिलीप कुलकर्णींचे व्याख्यान

सोलापूर । विवेकानंद केंद्राच्या पर्यावरण मंडळातर्फे गुरुवारी (१७ डिसेंबर) सायंकाळी साडेसहा वाजता प्रसिद्ध पर्यारवणतज्ज्ञ दिलीप कुलकर्णी यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. विवेकांनद केंद्र, १६५ रेल्वे लाइन्स येथे “कचरा निर्मूलन आणि नागरिकांची जबाबदारी’ या विषयावर व्याख्यान होईल, अशी माहिती मंडळाचे प्रमुख अजित ओक यांनी िदली. अध्यक्षस्थानी मनपा आयुक्त विजयकुमार काळम पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे सीइओ अरुण डोंगरे उपस्थित असतील. व्याख्यानानंतर कचरा िनर्मूलन आणि नागरिकांचा सहभाग यावर चर्चा होईल.

#होम_मैदान_सोलापूर कोणाच्या मालकीचे?

होम मैदान शासकीय आहे आणि शासनाकडून यात्रेसाठी देवस्थानला ही जागा देण्यात येते, असे अधिकारी आणि काही सन्माननीय पढतमूर्ख सांगत आहेत.
शासन जणू उपकार करते असा भासवण्याचा प्रयत्न यामागे असतो. पण हे खरे नाही.
५० वर्षांपूर्वी महापालिकेत एक अतिशय शहाणे अधिकारी आले होते.
त्यांनी म्हटले, “सिद्धेश्वर तलाव हे सरकारी मालकीचे आहे. त्यामुळे आम्ही तलाव बुजवणार आणि त्या ठिकाणी बाग फुलवणार.’’
हा वाद तेव्हांच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत गेला होता.
मुख्यमंत्र्यांनी समज दिली तेव्हा कुठे अधिकाऱ्यांची अक्कल ठिकाणावर आली.

Tuesday, December 15, 2015

मुंढेजी, अहंकाराचे भूत मानगुटीवरून उतरवा


जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे आणि सिद्धेश्वर यात्रा समिती वाद या विषयावर युवापत्रकार सागर सुरुवसे यांचा दैनिक तरुण भारतच्या रविवारच्या आसमंत पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेला लोकप्रिय लेख

“देवस्थान समितीने संपूर्ण होम मैदानावर मॅट आच्छादन केले आहे. आपातकालीन मार्ग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयालगतचा रस्ताही मोकळा सोडला आहे. ही दोन्ही कामे पूर्ण झाली आहेत आणि उद्घाटन माननीय जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते, मंदिर समितीचे पदाधिकारी आणि पालकमंत्री यांच्या उपस्थितीत होत आहे. ही स्वप्नवत कल्पना. पण ही गोष्ट सत्यात उतरली असती जर का जिल्हाधिकारी मुंढे यांनी स्वत:च्या कार्यशैलीत बदल केला असता.’’ हे उद्गार आहेत सोलापुरात जिल्हाधिकारी पदावर राहिलेल्या एका उमद्या अधिकार्‍यांचे. अर्थातच त्यांनी आपली ही भावना खासगीत बोलताना व्यक्त केली आहे.
संत ज्ञानेश्‍वरांनी अशा स्वभावाच्या व्यक्तींचे वर्णन मोठ्या चपखलपणे केले आहे. ज्ञानोबा म्हणतात, ‘अहंकाराचे वागणे मोठ्या नवलाचे आहे. अज्ञानी, सर्वसामान्य लोकांच्या मागे तो लागत नाही. पण बुद्धीमंतांच्या मात्र तो मानगुटी बसतो. त्याला आपल्या तालावर नाचायला लावतो.’ सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्या वर्तनाला हे वर्णन तंतोतंत लागू पडते.

Monday, December 7, 2015

पुनश्‍च एकदा सडेतोड

आमचे मित्र सागर सुरवसे यांनी तरुण भारतमध्ये सडेतोड या नावाने स्तंभ लेखनाला सुरुवात केली आहे. रामतीर्थकर सरांनी पेटवलेली मशाल अधिक प्रखर होत जावो या शुभेच्छा....

Friday, November 20, 2015

वादळाशी केला संसार : अपर्णा अरुण रामतीर्थकर


व्यासंगी व ज्येष्ठ पत्रकार अरुण रामतीर्थकर यांचे ६ नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या पत्नी व सामाजिक कार्यकर्त्या अॅड. अपर्णा अरुण रामतीर्थकर यांनी जागवलेल्या काही आठवणी.

धर्मनिरपेक्षतेचे नाटक थांबवा

दै. दिव्य मराठीत प्रकाशित मुजफ्फर हुसेन यांचा लेख

जर भारताला सर्व प्रकारची हिंसा आणि असहिष्णुतेपासून मुक्ती द्यायची असेल तर प्रत्येक जाती आणि समुदायाच्या असहिष्णुतेशी लढा द्यावा लागेल. केवळ हिंदूंच्या असहिष्णुतेची निंदा करून चालणार नाही. अलीकडच्या काळात मोदीविरोधाच्या नावाखाली काँग्रेसी नेत्यांनी असहिष्णुतेला हिंदू आवरण चढवून देश-विदेशात बदनामी केली. पण भारतावर दीडशे वर्षे राज्य केलेल्या इंग्लंडला चांगले माहीत आहे की ‘न्यायप्रिय हिंदू हा मुळातच सहिष्णु आहे. त्याला पुन्हा पुन्हा अवमानित केले तरी तो केवळ आपल्या रक्षणासाठीच शक्तीचा वापर करतो.’ त्यामुळेच मोदींचा पाठलाग करणारे इंग्लंडच्या धरतीवरही गेले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. अशा प्रवृत्तीचे लोक कोणताही बुरखा पांघरून आले तरी तो बुरखा फाडणे हे प्रत्येक राष्ट्रप्रेमीचे कर्तव्य आहे हे विसरून चालणार नाही...
http://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-mujaffar-hussen-column-on-secularism-5172867-NOR.html

Sunday, November 8, 2015

पत्रकार अरुण रामतीर्थकर यांनी मुद्रित, इलेक्ट्राॅनिक मीडियात उमटवला ठसा

प्रतिनिधी । सोलापूर
पत्रकारितेतचार दशके गाजवलेले ज्येष्ठ पत्रकार अरुण रामतीर्थकर हे मुद्रित आणि इलेक्ट्राॅनिक या दोन्ही प्रसिद्धी माध्यमांत ठसा उमटवणारे पत्रकार ठरले. पत्रकारितेकडे करिअर किंवा निव्वळ चरितार्थाचे साधन म्हणून पाहता ते एक व्रत असल्याची निष्ठा जीवापाड जपणाऱ्या पत्रकारांच्या पिढीचे अग्रणी म्हणून त्यांची ओळख होती.

Friday, November 6, 2015

ज्येष्ठ पत्रकार अरुण रामतीर्थकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली



ज्येष्ठ पत्रकार अरुण रामतीर्थकर यांचे शुक्रवारी (६ नोव्हेंबर) रात्री निधन झाले. मृत्यूसमयी ते ६६ वर्षांचे होते. गेल्या तीन दिवसांपासून अश्विनी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. शुक्रवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. अंत्ययात्रा ७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता त्यांच्या ओंकार सोसायटी (होटगी रोड) येथील राहत्या घरापासून निघणार आहे. सामाजिक कार्यकर्त्या अॅड. अपर्णा रामतीर्थकर यांचे ते पती होत.

Tuesday, September 15, 2015

डोळस विश्वबंधुत्वाच्या दिशेने दमदार पाऊल

व्हीआयएफच्या देखण्या सभागृहात 3 आणि 4 सप्टेंबर रोजी जागतिक हिंदू-बौध्द संमेलन पार पडले. विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन, जपानची थिंक टँक समजली जाणारी टोकियो फाउंडेशन आणि जगभरातील बौध्दांची सर्वोच्च संस्था इंटरनॅशनल बुध्दिस्ट कॉन्फिडरेशन या जागतिक स्तरावर नावलौकिक असलेल्या तीन संस्थांनी मिळून या संमेलनाचे आयोजन केले होते. केवळ माझाच धर्म खरा म्हणणाऱ्या धर्मांचा अनुभव घेतलेल्या जगासाठी हा विचार नवीन आणि आश्वासक होता. हा विश्वबंधुत्वाचा विचार आजही एकांतिक धर्मीयांनी स्वीकारलेला नाही. धर्मांतरणे घडवून आणण्यासाठी ते कोणत्याही थराला चालले आहेत. त्यामुळे जगातील संघर्ष टाळण्यासाठी एका सशक्त पुढाकाराची गरज होती. जागतिक हिंदू-बौध्द संमेलनाकडे या पार्श्वभूमीवर पाहिले पाहिजे..

Friday, September 11, 2015

गोविंद पानसरे यांची हत्या आणि काही प्रश्न

ज्येष्ठ विचारवंत रमेश पतंगे यांचा दिव्य मराठीत प्रसिद्ध झालेला लेख...
हत्या झाली की पहिला प्रश्न निर्माण होतो, हत्या करण्याचा हेतू कोणता असावा? आणि दुसरा प्रश्न निर्माण होतो, हत्येमुळे सर्वाधिक लाभ कोणाला होणार होता?

हिंदू-बौद्ध ऐक्यातून सजग सुसंवादाचे नवे पाऊल

hindu buddhist initiative / दै. दिव्य मराठी, पान ७, दि. १० सप्टेंबर
hindu buddhist initiative
भारताच्या राजधानीत ३ आणि ४ सप्टेंबर रोजी जागतिक संवादाला दिशा देऊ शकेल असा एक वैशिष्ट्यपूर्ण परिसंवाद पार पडला. रूढ अर्थाने ज्याला परिसंवाद म्हणतात तसा हा परिसंवाद नव्हता. ज्याच्या आयोजनामागे भारत आणि जपान या दोन शक्तिशाली देशांच्या पंतप्रधानांची दूरदृष्टी होती. वर्षभरापूर्वी जपानचे पंतप्रधान आबे शिंझो आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या चर्चेचे फलित म्हणजे हे आयोजन होते. 

Sunday, September 6, 2015

#हिंदू_बौद्ध_ऐक्य_नवी_सुरूवात

आता सोलापूरकडे निघालोय.
दिल्लीतील चार दिवसांपैकी दोन दिवस विवेकानंद इंटरनैशनल फौंडेशनमधे परिसंवादात गेले. असा परिसंवाद की ज्याच्या आयोजनात दोन देशांच्या (जपान आणि भारत) पंतप्रधानांची आत्मीयता होती. परिसंवादाची सुरूवात जपानचे पंतप्रधान आबे सिंझो यांच्या प्रक्षेपित भाषणाने झाली. मुख्य भूमिका भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली. दोन पंतप्रधानांनी या ऐतिहासिक परिसंवादाबद्दल दाखवलेली आत्मीयता ही गौरवास्पद बाब असल्याचे जगभरातून आलेल्या बौद्ध धर्मातील सर्वोच्च धर्मगुरूंनी बोलून दाखवले.

Saturday, July 4, 2015

विवेक विचार जुलै २०१५

विवेक विचार जुलै २०१५
विवेकानंद केंद्राचे मासिक
विवेक विचारचा
जुलै २०१५ चा अंक
अर्थात
वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
विवेक विचार जुलै २०१५

Wednesday, July 1, 2015

मातृत्वयोग : गर्भवतींसाठी वरदान

काही दिवसांपूर्वी सोलापुरात स्त्री प्रसूती तज्ज्ञांची महाराष्ट्र राज्य परिषद झाली. राज्यातून १२०० तज्ज्ञ डाॅक्टर्स सहभागी होते. सोलापूरच्या डाॅ. शोभा शाह यांनी परिषदेत गरोदरपणातील योगाभ्यास आणि ओंकार साधनावर शोधप्रबंध सादर केला आणि त्याला उत्कृष्ट शोधनिबंधाचा पुरस्कार मिळाला.

वैदिक, जैन, बौद्ध अन् नास्तिक दर्शनांतही योग!

योगशास्त्राचाउगम भारतात झाला. भारतात उगम पावलेल्या सर्वच धर्मांमध्ये योगशास्त्राची महती गाण्यात आली आहे. आस्तिक आणि नास्तिक या दोन्ही दर्शनांमध्ये योगाला मान्यता आहे. भारतीय संस्कृतीतील षडदर्शनातील एक दर्शन आहे योग. न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, मीमांसा आणि वेदांत या सहा दर्शनांना भारतीय संस्कृतीत षडदर्शने म्हणतात.

Sunday, June 21, 2015

इतिहास योगशास्त्राचा

योगशास्त्राची मुळं
२१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित झाल्यापासून संपूर्ण जगभरात योगाविषयीची जिज्ञासा वाढली आहे. योग आहे तरी काय, हे मुळापासून समजून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. योगामुळे आपल्या धर्माला धक्का पोहोचेल या भीतीपोटी काही प्रमाणात विरोधाचा सूरही उमटत आहे. पण योग हा कट्टरतावादी किंवा सांप्रदायिक नाही. तो ईश्वराचे एक विशिष्ट नाव किंवा रूपाबद्दल सांगत नाही. तो आदेश किंवा फतवे काढत नाही. योगसाधनेने जीवन ईश्वराशी लीन होते, पावित्र्याने भरून जाते. योग तत्त्वज्ञान विकसित झाले तेव्हा जगात आजच्याप्रमाणे एकांतिक पंथांचा उदय झालेला नव्हता. त्यामुळे योग हा विशिष्ट पंथाच्या (रिलिजन) लोकांना समोर ठेवून विकसित झालेला नाही. योग हे संपूर्ण मानवजातीसाठी आहे.

Monday, June 15, 2015

पर्यावरण विषयावरील निबंध व घोषवाक्य स्पर्धा : विवेकानंद केंद्रात पारितोषिक वितरण

पाणी, ऊर्जा साधने यांची काळजी
घेतल्यास सुटतील अनेक समस्या

विवेकानंद केंद्र पर्यावरण मंडळाच्या कार्यक्रमात
अरविंद जोशी यांचे प्रतिपादन

Sunday, June 7, 2015

विवेक विचार जून २०१५ / योग विशेषांक

विवेकानंद केंद्राचे मासिक
विवेक विचार
जून २०१५ चा
संपूर्ण अंक
वाचण्यासाठी
पुढील लिंकवर क्लिक करा...
विवेक विचार जून २०१५

Friday, May 22, 2015

#मुस्लिम_नोकरी_एकांगी_चर्चा_नको

धर्माच्या आधारावर
नोकरी नाकारणे
आणि
धर्माच्या आधारावर
नोकरीत
आरक्षण मागणे,
दोन्ही गोष्टी
देशासाठी घातकच.
दोन्हींचा विरोध झाला पाहिजे.

Wednesday, May 6, 2015

भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते गोधन विशेषांकाचे प्रकाशन

डावीकडून केंद्राचे नगर संचालक दीपक पाटील, भाऊ तोरसेकर, प्रा. डाॅ. रवींद्र चिंचोलकर व सिद्धाराम.

वाचकांकडून चांगल्या मजकूराचा आग्रह आवश्‍यक
भाऊ तोरसेकर
सोलापूर,  : सर्वच क्षेत्रात नैतिकता घसरत चालली आहे. त्यामुळे चांगले वाचावयास मिळत नाही. वाचकांनी मात्र चांगल्या मजकूरचा आग्रह माध्यमांकडे धरावा असे मत ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी मांडले.

Thursday, April 30, 2015

बसव सेंटरचा आदर्श पुरस्कार प्रदान सोहळा






भाऊ तोरसेकर यांचे रविवारी सोलापुरात व्याख्यान

प्रतिनिधी । सोलापूर
ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांचे रविवारी (३ मे) सायंकाळी ६.३० वाजता डफरिन चौकातील ज्ञानप्रबोधिनी येथे व्याख्यान होणार आहे. "मीडिया - घडवणारी आणि बिघडवणारी' हा व्याख्यानाचा विषय आहे. विवेकानंद केंद्राचे सांस्कृतिक मासिक विवेक विचारच्या वतीने "विमर्श' उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम होत असल्याचे कार्यक्रमप्रमुख शंकर पेद्दी यांनी सांगितले.
अध्यक्षस्थानी सोलापूर विद्यापीठाच्या जनसंज्ञापन व पत्रकारिता विभागाचे प्रमुख डाॅ. रवींद्र चिंचोलकर असतील. यावेळी विवेक विचारच्या गोधन विशेषांकाचे प्रकाशन होणार आहे. आचार्य गोविंददेव गिरी महाराज हे या विशेषांकाचे अतिथी संपादक आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन पेद्दी यांनी केले.

Saturday, March 21, 2015

गुढीपाडवा आणि वैज्ञानिक कालगणना


काळासंबंधी आपण कसा विचार करतो त्याचा आपल्या जीवनशैलीवरही परिणाम होतो. आज सारे विश्व पर्यावरणाच्या समस्यांनी ग्रासले गेले आहे. आपण जर या समस्येच्या मुळाशी जाऊन पाहिले तर असे दिसून येईल की, याची मूळ कारणे पाश्चिमात्य विचारांत आहेत. ती मंडळी काळाला एकरेषीय समजतात. त्यामुळे जीवन केवळ मर्यादित वेळेपर्यंतच मानले जाते. यामुळे जेवढे अधिक भोगता येईल तेवढे भोगण्याची वृत्ती निर्माण होते. परिणामी सृष्टीचे शोषण होते.

Monday, March 9, 2015

#मसरत_काश्मीर_पीडीपी_मुफ्ती_भाजप_कॉंग्रेस

काश्मीरमध्ये
अतिरेकी मसरतला सोडल्याबद्दल
कॉंग्रेस अन् सारे सिकुलर
केंद्र सरकारला
घेरताना दिसत आहेत.
हे चांगले लक्षण आहे.

Friday, March 6, 2015

इराणमध्ये बुरख्याविरुद्ध जिहाद

My Stealthy Freedom


 पद्मश्री मुजफ्फर हुसेन यांचा दिव्य मराठीतील लेख


तिने निवडलेला मार्ग अतिशय वेगळा आणि प्रभावी होता. तिने फेसबुकवर एक पेज बनवले. इराणी महिलांनी बुरखा किंवा कोणत्याही प्रकारचा पडदा न वापरता काढलेले छायाचित्र त्या पेजवर पेस्ट करण्याचे आवाहन केले. हे आवाहन यायचा अवकाश महिलांनी बुरख्याशिवायची छायाचित्रे धडाक्याने अपलोड केली. मौलाना किंवा इस्लामी कायद्याची भीती न बाळगता पोस्ट केलेल्या छायाचित्रांची संख्या तब्बल ७ लाख ६० हजारांहून अधिक होती.
मसीह अलीनिजाद
 

Tuesday, March 3, 2015

संवादाची शक्ती - एक चिंतन

विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे राष्ट्रीय अध्यक्ष व विचारवंत पी. परमेश्वरन् यांचा लेख...
जेव्हा तुम्ही एखाद्या विषयावर एखाद्याशी चर्चा करता तेव्हा ती तीन प्रकारे करता येते. वाद, जल्प आणि वितंड हे ते तीन प्रकार आहेत. किती सुरेख विभागणी आहे ही. ‘वादा’ मध्ये सत्य शोधणे हा तुमचा हेतु असतो. सत्यशोधनाच्या हेतुने तुम्ही दुसर्‍याशी चर्चा करीत असता या चर्चेच्या वेळी तुम्ही शांत, संयमी असता. तुमच्याकडून वाक्‌ताडन होत नाही. चर्चाही गरमागरम नसते. अशा चर्चेला वाद असे म्हणतात.

Sunday, February 15, 2015

भाजपच्या पराभवाची पाच कारणे

ज्येष्ठ विचारवंत रमेश पतंगे यांचा दिव्य मराठीत प्रसिद्ध झालेला लेख...
दिल्ली प्रदेश निवडणुकात आम आदमी पार्टीने जबरदस्त बहुमताने जिंकल्या. एकूण 70 पैकी त्यांना 67 स्थानी यश मिळाले. या यशाला लॅन्ड्स्लाइड् म्हणजे भूमीपाताचे यश असे म्हणतात. निवडणुकीत ज्यांना यश मिळते ते आनंदी होतात,आणि ज्यांना अपयश मिळते ते दु:खी होतात. भाजपाचे नेते आणि समर्थक आज दु:खी आहेत. या निवडणुकीत आपला एवढा दारूण पराभव होईल असे स्वप्नात देखील वाटले नव्हते. 
2014 च्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीत भाजपाने सर्व जागा जिंकल्या. 61 विधानसभा मतदार संघात त्यांनी आघाडी घेतली होती. 2013 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाला 32 जागा मिळाल्या आणि आपला 28 जागा मिळाल्या होत्या. 2015 च्या निवडणुकीत भाजपाला फक्त 3 जागा मिळाल्या आणि आपला 67 जागा मिळाल्या. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 46% मते मिळाली होती आणि आता फक्त 32% मिळाली, 'आप' ला 54% मते मिळाली. 2013 च्या निवडणुकीत भाजपाला 33% मते मिळाली होती. भाजपाच्या मताच्या टक्केवारीत फक्त 1% ने फरक पडला आणि 32 ऐवजी 3 जागा झाल्या.

Monday, February 2, 2015

दाभोलकरी मत्सरातून विवेकानंद विचारांचे अपहरण

दाभोलकर कुलोत्पन्न दत्तप्रसाद यांची स्वामी विवेकानंद यांच्यावरची तीन दिवसांची व्याख्यानमाला सोलापुरात २४ ते २६ जानेवारी या काळात पार पडली. अतिशय तल्लख बुद्धीमत्तेच्या दत्तप्रसाद यांनी विवेकानंदांच्या नावावर स्वत:चे विकृत विचार पसरवण्याचा खटाटोप या व्याख्यानमालेतून केला. भंपक आणि खोटारडेपणा करून विवेकानंद विचारांत भेसळ करू पाहणार्‍या दाभोलकर यांना उघडे पाडणारा युवा पत्रकार सागर सुरवसे यांचा तरुण भारतच्या आसमंत पुरवणीमध्ये प्रकाशित लेख...

Saturday, January 3, 2015

धर्मांतरितांविषयी - स्वामी विवेकानंदांची मुलाखत

आमचे प्रतिनिधी लिहितात :
‘हिंदूत्वातूनबाहेर गेलेल्यांविषयी - धर्मांतरितांविषयी - स्वामी विवेकानंदांची मी मुलाखत घ्यावी, असे आमच्या संपादकांनी सुचविले होते. त्यांची व माझी भेट गंगेच्या विशाल पात्रावर तरंगणार्‍या एका निवासी नौकेत, उतरत्या सायंकाळी झाली. रामकृष्ण मठाच्या नजीकच्या तीरावर नौका स्थिरावली होती. तिथे स्वामीजींचे दर्शन झाले.ती वेळ आणि स्थळही मोठे सुरेख होते. माथ्यावर नक्षत्रे चमकू लागली होती. भोवती गंगेचा प्रवाह उसळत होता. एका बाजूला नारळीच्या झाडांनी आणि गर्द सावली धरणार्‍या इतर वृक्षांनी वेढलेल्या मठाची वास्तू दिसत होती. ती शांत प्रकाशाने उजळलेली होती.
‘‘स्वामीजी, हिंदू धर्मातून बाहेर गेलेल्यांना पुनश्च हिंदू धर्मात घेण्यासंबंधी जी चळवळ चाललेली आहे त्यासंबंधी आपल्याशी बोलावे अशी इच्छा आहे. धर्मांतरितांना अशा प्रकारे हिंदुधर्मात परत घ्यावे असे आपले मत आहे काय ?’’

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी