खाटकांच्या ताब्यात
58 बैल देण्यास
कोर्टाचा साफ नकार
सोलापूर, (विशेष प्रतिनिधी) :- जोडभावी पेठेतील चिराग अली तकिया जवळील मदरश्यातून जप्त केलेल्या 58 बैलांना खाटकांच्या पुन्हा ताब्यात देण्याची मागणी दंडाधिकाऱ्यांनी गुरूवारी फेटाळून लावली. दरम्यान 58 बैल आणि 11 गायींचा सांभाळ करण्याची तयारी गोपालक संघाने दाखविली असून त्यांच्या अर्जावर आज निर्णय अपेक्षित आहे.
मंगळवारी 9 डिसेंबर रोजी बकरी ईद निमित्त कत्तल करण्यासाठी आणलेल्या 11 गायी व 58 बैलांची सुटका सोलापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी केली. दरम्यान चिरागअली तकिया जवळील मदरश्यात गायींच्या कत्तली झाल्या. या संदर्भात अखेर संतप्त तरुणांच्या दबावानंतर पोलिसांनी या मदरश्यातून गायी व बैल ताब्यात घेऊन त्यांची कोंडवाड्यात रवानगी केली. तसेच काल आ. आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम समाजातील मंडळींनी कोंडवाड्यातील जप्त गायी व बैलांची मागणी केली. पण आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी फेटाळून तुम्हाला हवे असेल तर न्यायालयात जा असे सुनावले. यासंदर्भात गुरुवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी क्र. 3 चे न्यायाधिश डागा यांच्या समोर सुनावली झाली. तसेच पशुसंवर्धन अधिकारी डॉ. मोहोळकर यांनी , जप्त केलेल्या 58 पैकी 42 बैल शेती आणि प्रजोत्पादनास उपयुक्त असल्याचा अहवाल पोलिसांना दिला होता. तो न्यायालयाकडे सादर करण्यात आला.
तसेच संबंधित मुस्लिम बांधवांनी आमचा खरेदी-विक्रीचा व्यवसाय असून सबब जप्त केलेली जनावरे ताब्यात देण्याची मागणी न्यायालयाकडे केली. पण न्या. डागा यांनी त्यांचा अर्ज फेटाळून लावला. ऍड. कोतींबिरे यांनी यावेळी बाजू मांडली. तर गोपालक संघाच्या वतीने ऍड. कणबसकर यांनी बाजू मांडली असून सर्व 58 बैल, आणि 11 गायींचा गोपालक संघ सांभाळणार असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणले. पण न्यायालयाने निर्णय राखून ठेवला असून शुक्रवारी निर्णय अपेक्षित आहे।
आरोपींना अटक नाही
मंगळवारी पोलिसांनी 9 जणांवर गुन्हा दाखल केला। त्यास 48 तास उलटून गेल्यानंतरही अद्याप एकासही अटक झालेली नाही. संबंधित आरोपी न्यायालयातून अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्नशील आहेत.
दै। तरुण भारत, पान ५, १२ दिसम्बर २००८
No comments:
Post a Comment