अतिक्रमणाकडे
रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष
प्रतिनिधी | सोलापूर
रेल्वेस्थानकालगत मालधक्क्याच्या जागेवर समाधी उभारण्यात आली. मागील दोन ते तीन वर्षांपासून ही समाधी रेल्वेच्या सरकारी जागेत आहे.
रेल्वे प्रशासन याच ठिकाणावरून
स्थानकावर जाण्यासाठी -येण्यासाठी दुसरे गेट सुरू करण्याच्या विचारात आहे. तसेच
विविध स्वरूपाची प्रवासी सुविधा येथे उपलब्ध करण्याचा मानस रेल्वे प्रशासनाचा आहे.
मात्र, प्रशासनाने अतिक्रमण रोखलेले नाही. प्रतिनिधी | सोलापूर
रेल्वेस्थानकालगत मालधक्क्याच्या जागेवर समाधी उभारण्यात आली. मागील दोन ते तीन वर्षांपासून ही समाधी रेल्वेच्या सरकारी जागेत आहे.
सध्या सोलापुरात अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची मोहीम सुरू आहे. सोलापूरचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक जॉन थॉमस असताना ही समाधी हटविण्यासाठी अनुकूल असले तरीही पुढे धार्मिक तेढ निर्माण होईल या भीतीने रेल्वे प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नाही. सुरुवातीला केवळ समाधी असलेल स्वरूप आता दिवसेंदिवस वाढत जात आहे. रोज काही लोक येथे येऊन दिवा, उदबत्ती लावून प्रार्थना करतात.
तत्कालीन डीआरएम जॉन थॉमस यांनी हे लोकांच्या नजरेस येऊ नये म्हणून केवळ गुडस शेडचे गेट बंद केले. मात्र समाधी हटविण्यासाठी ठोस पावले उचली नाहीत. तसेच मागील दोन वर्षांपूर्वी येथे रेल्वेचा बंद डबा जाळण्याचा देखिल प्रकार घडला होता. मालधक्क्याच्या जागेवर कोणाचाही वावर असतो.
^काय प्रकारआहे, हे पाहण्यात येईल. संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.” आर.के. शर्मा, वरिष्ठविभागीय वाणिज्य व्यवस्थापक
दिव्य मराठी, दिव्य सिटी पान १, ९ फेब्रुवारी २०१५
No comments:
Post a Comment