#वागळे, राजदीपसारखे
बुद्धीजीवीच आहेत
संघाचे एजंट
दैनंदिन कामे सांभाळत हे सदर लिहीत आहे. त्यामुळे हा भाग लिहायला तीन - चार दिवसांचा अवधी लागला.
दरम्यान, काहींनी म्हटले ही लेखमाला म्हणजे संघाचा पर्दाफाश नाही, तर संघाचा क्रमश: प्रचार आहे.
संघाची बदनामी का करत आहात असे काहींनी विचारले?
संघ स्वातंत्र्यलढ्यात कुठे होता असं विचारणाय्रांना सणसणीत चपराक लगावल्याचे सांगत काहींनी आनंद व्यक्त केला.
संघ हे कॉंग्रेसचे पिल्लू असल्याचे समजल्याने काहींनी आश्चर्यही व्यक्त केले.
पुढचा भाग कधी लिहिणार याची वाट पहात असल्याचे सांगणाय्रांची संख्या मोठी होती.
प्रतिक्रिया परस्परविरोधी आल्या. हरकत नाही. मला जे वाटतं ते मांडणं माझं काम. त्यातून ज्यांना जसा हवा तसा अर्थ त्यांनी काढावा.
कसाही अर्थ काढला तरी सत्य बदलत नाही. आणि महत्वाचं म्हणजे सत्य कुणाच्या रागा-लोभाची चिंता करत नाही. असो.

माझा आजचा मुद्दा आहे की, निखील वागळे, कुमार केतकर, प्रकाश
बाळ, राजदीप सरदेसाई, बरखा दत्त, कुमार सप्तर्षी आणि अशा प्रकारचे बहुतेक
बुद्धीजीवी मान्यवर हे वरवर पाहता संघाचे विरोधक असल्याचे भासवत असले तरी
वास्तव तसे नाही. ते आतून संघाचे प्रचारक आहेत. त्यांचीच भाषा वापरायची तर
एजंट आहेत ते संघाचे.
माझे म्हणणे कदाचित बावळटपणाचे वाटेल. विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे. संघ पाताळयंत्री आहे ते या अर्थाने. संघाचे षडयंत्र सर्वसामान्यांना सोडा भल्याभल्यांना समजत नाही.

समाजाच्या
प्रत्येक क्षेत्रात संघाने घुसखोरी केलीय, ती उगीच नाही. विद्यार्थ्यांत
abvp, राजकारणात bjp, धर्मात vhp, शिक्षणक्षेत्रात विद्याभारती, कामगारांत
मजदूर संघ ही यादी खूप मोठी आहे. या साय्रा संघटना त्या त्या क्षेत्रात
सर्वात मोठ्या आहेत.
ब्रिटिशांनी आपल्या विरोधातील असंतोषाला वाट करून देण्यासाठी कॉंग्रेसची स्थापना केली होती. अगदी तशाच पद्धतीने संघानेच संघाला विरोध करण्यासाठी मीडियाच्या प्रमुख स्थानी एक मोठी फळी उभी केली आहे. ही मंडळी मीडियातून सतत संघावर आरोप करत सनसनाटी निर्माण करत राहतात.
त्यामुळे संघ सतत चर्चेत राहतो. त्याचा फायदा संघालाच होतो.

यामागे
एक मानसशास्त्र आहे. एखाद्यावर विनाकारण सतत टीका करत राहिल्यास लोकांना
त्याचा उबग येतो. आरोप तकलादू असतील तर आरोप करणाय्रांबद्दल घृणा वाटू
लागते. ज्याच्यावर आरोप होतात त्याच्याबद्दल सहानुभूती वाटायला लागते.
संघाने मीडियात पेरलेले सारे "सेक्युलर" एजंट संघाची विरोधभक्ती करत असतात. संघाची ताकद वाढवण्यात हे एजंट मोलाची भूमिका बजावताना दिसतात.

नरेंद्र मोदी यांना सन २००० पूर्वी कोणी ओळखतही नव्हते.
मोदींना सतत १० वर्षे शिव्या देवून लोकप्रिय करण्यात आले.
श्री. वागळे आपल्या चैनलवर संघविरोधासाठी बालिश तर्क देत राहतात आणि त्यांचे प्रेक्षक मात्र त्याच चैनलवर वागळेविरोधी मत नोंदवतात, हे सर्वांना ठावूक आहेच.
लोकांना रुचणार नाही, पटणार नाही असे बिनबुडाचे आरोप करत राहणे हे संघानेच रचलेले फार मोठे षडयंत्र आहे.
संघावर काय आरोप व्हावेत, देशात काय चर्चा झडावी, हेही संघच ठरवतं.

मी पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेताना २०११ मधे मीडिया
कव्हरेजचे कंटेंट ऐनालिसिस केले होते. त्यानुसार साधारणपणे राष्ट्रीय
बातम्यांपैकी ६५ टक्के बातम्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या संघ आणि
हिंदुत्वाशी संबंधित होत्या. आजही यात फरक पडलेला नाही.
संघावर अतिशय तकलादू आणि बिनबुडाचे आरोप करणे, देशभक्त मुस्लिम नेतृत्वाला डावलणे,
जिहादी प्रवृत्तीला पाठिशी घालणे आदी प्रकारांमुळे आपसूकच लोकांच्या मनात संघाबद्दल आस्था वाढीस लागते.
संघविरोधी बातम्या, लेख यामुळे संघाची माहिती धालेले व संघाचे आकर्षण वाटू लागले अशांची संख्या देशात फार मोठी आहे.
म्हणजे वरवर पाहता संघाचे विरोधक म्हणवले जाणारे बुद्धीजिवी व पत्रकार हे संघाचे एजंटच आहेत.

देशाचे महत्वाचे प्रश्न दुर्लक्षित करून सतत संघाला चर्चेच ठेवण्याचे काम हे प्रचारक करतात.
असे षडयंत्र पाहिले की डोके चक्रावून जाते. काय करावं सुचत नाही.
संघाला रोखायचं तर रोजच नथुराम, गांधीहत्या, असहिष्णुता, हिंदू - मुस्लिम, राममंदिर, दलित- सवर्ण वगैरे विषांभोवतीच घुटमळत ठेवणे या एजंटांचे काम आहे.
संघाला विरोध करण्यासाठी संघाची शक्ती, दुर्बलस्थाने समजून घेतली पाहिजेत. बालिश आरोप करण्याऐवजी खोलात जाऊन अभ्यास करणारे बुद्धीजीवी तयार केले पाहिजेत.
संघाप्रमाणे प्रत्येक क्षेत्रात काम परणारी, प्रसिद्धीपासून दूर राहणारी निस्वार्थी माणसं उभी करणे केले तरच संघाला रोखणे शक्य आहे. ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांनीही काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, "वर्षानुवर्षे एखाद्या विषयावर काम करणारी समर्पित माणसे संघाकडे आहेत. तीच त्यांची शक्ती आहे."
खरे आहे पवार यांचे म्हणणे.
समाजासाठी निस्वार्थ आणि समर्पित भावनेने काम करणारी माणसे
उभी करणे हेच संघाला उत्तर असेल.
केवळ संघाचा द्वेष हा काही संघाला रोखण्याचा मार्ग नाही.
संघविरोधाची आघाडी संघाच्या कथित सेक्युलर एजंटांनी हायजैक केली आहे. संघाच्या या छुप्या प्रचारकांना उघडे पाडणे सगळ्यात मोठे आव्हान आहे.
शत्रू कोण आणि मित्र कोण हे ओळखणेच अशक्य झाले आहे.
कथित संघविरोधकांवर मात कशी करायची? कारण या मंडळींनी ताज्या दमाची फळीही तयार केली आहे.
आपण संघाच्या हातचे बाहुले आहोत हे जागोजागी पसरलेल्या संघविरोधकांना माहीतच नाही.
त्यामुळे संघाची विरोधभक्ती अखंडपणे सुरू आहे.
क्रमश:

- सिद्धाराम
मागील लेखांकांसाठी
#rss_चा_पर्दाफाश भाग १ #rss_चा_पर्दाफाश भाग २
#rss_चा_पर्दाफाश भाग ३
No comments:
Post a Comment