Sunday, August 26, 2018

सनातन संस्थेवर बंदीची मागणी हास्यास्पद


ज्याला कायद्याचे थोडेफार ज्ञान आहे, असा कोणीही सनातन संस्थेवर बंदी घाला अशी मागणी करणार नाही. कोणत्याही संस्थेवर बंदी घालण्यासाठीची एक प्रक्रिया आहे. आवश्यक बाबींची पूर्तता न करता घातलेली बंदी न्यायालयात टिकत नाही. 

सनातन संस्थेची कठोर तपासणी व्हावी आणि तपासात ही संस्था दोषी आढळली तर योग्य कारवाई व्हावी, अशी मागणी करणे रास्त आहे. परंतु, अशी मागणी होताना दिसत नाही. चौकशी न करताच सनातनवर बंदी घातली पाहिजे, यासाठी काहीजण आकांडतांडव करताना दिसत आहेत. पोलिस आणि न्यायालय यांना त्यांचे काम करू दिले पाहिजे. दुसरी, महत्वाची बाब म्हणजे, एखाद्या संस्थेचा कार्यकर्ता एखाद्या गुन्ह्यात दोषी ठरला म्हणून संबंधित संस्थेवर कारवाई करता येत नाही. त्यासाठी संबंधित गुन्ह्यात खुद्द संस्था सहभागी असल्याचे सिद्ध व्हावे लागते. काही वर्षांपूर्वी ओरिसातील कंधमाल येथे दुर्गम भागात शिक्षण पोहोचवण्याचे कार्य करणारे स्वामी लक्ष्मणानंद यांची हत्या झाली. त्या हत्येत चर्चचे अनेक पाद्री सक्रीयपणे सहभागी होते, हे न्यायालयात सिद्ध झाले. दोषींना शिक्षा ठोठावण्याात आली. चर्चची रचना पाहता ती एक संस्था आहे. एका चर्चमधील पाद्री दोषी ठरले म्हणून संपूर्ण चर्च यंत्रणेवर बंदी घाला अशी मागणी कोणी केली नाही. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अनेक राजकीय पक्षांचे नेते दोषी आढळतात, तेव्हा संपूर्ण पक्षावरच कारवाई करा अशी मागणी कोणी करत नाही. काही पक्षांचे कार्यकर्ते जिहादी अतिरेकी कारवायांत सापडल्याच्या घटना महाराष्ट्राला नवीन नाहीत. पण म्हणून संबंधित राजकीय पक्षाला अतिरेकी ठरवून बंदी घालण्याची मागणी कोणी केली नाही. 
सनातनच्या सगळ्याच विचारांशी सर्वांनीच सहमत असले पाहिजे असे नाही. मतभेद असू शकतात. सनातनच्या विचारांशी सहमत नाही म्हणून थेट त्या संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करणे दिवळखाेरपणाचेच आहे. 
सनातन संस्थेने आजवर हिंदू समाजात जागृती आणण्याच्या दृष्टीने मोठे कार्य केले आहे. सनातन संस्थेने अनेक सामान्य लोकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन आणले आहे. भंपक सेक्युलॅरिझमचे भूत उतरवण्याचे सनातनने केलेले कार्य आदर्शवत आहे. गणेशोत्सवातील पावित्र्य टिकवण्याकामी सनातनने केलेले कार्य मोठे आहे. प्लास्टिक राष्ट्रध्वजावर बंदी घालण्यासाठी सनातन परिवाराने मोठी जनजागृती केली आहे. सनातन संस्थेच्या ईश्वरी कार्यासाठी शुभेच्छा. सनातन संस्थेवर बंदी येणार नाही. कोणी तसा प्रयत्न केला तरी बंदी न्यायालयात टिकणार नाही. सत्यमेव जयते.

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी